ज्येष्ठ देती फुकटचे सल्ले

* बीरेंद्र बरियार ज्योती

योगासनं करून माझा शुगर लेव्हल अगदी नॉर्मलला राहाते. गेली दोन वर्षं मी एलोपथी औषधं बंद केलेली आहेत. टीव्हीवर पाहून योगासनं स्वत:च करतो व मनसोक्त मिठाईसुद्धा यखातो, तरीही माझा शुगर लेव्हल नॉर्मलच राहाते.’

‘मी तर गेली चार वर्षं ब्लड प्रेशरची औषधंच बंद केली आहेत, किती दिवस औषधं घेत राहाणार. डौक्टर उगीचच औषधं देत राहतात. स्वत:च पुस्तकं वाचून होमिओपथिक औषधं घेत आहे. अजूनपर्यंत तरी कोणतीच अडचण आलेली नाही. डॉक्टरांनी तर अगदी हैराण करून सोडलं होतं की हे खाऊ नका ते खाऊ नका!’

‘खरंच जर डॉक्टरांनी औषधं सुचविली नाहीत, तर त्यांचा धंदा कसा काय चालणार? मी तर सांधेदुखीमुळे इतका हैराण झालो होतो की विचारूच नका. जेव्हा जेव्हा दुखणं वाढत असे तेव्हा डॉक्टर डझनभर औषधं खाण्यास सांगत. दुखण्यापेक्षा औषधं घेण्याचाच त्रास अधिक होता. एका आयुर्वेदिक तज्ज्ञाने अशी जडीबुटी दिली की गेले पाच महिने माझं दुखणं पार नाहीसं झालेलं आहे.’

‘‘अरे, सर्दीखोकला झाल्यावरसुद्धा डॉक्टर अॅण्टीबायोटिक्स, कफ सिरप व एलर्जीची औषधं देतात. याउलट होमिओपथीत काही अशी औषधं आहेत की ज्यांनी सर्दीखोकला झटपट ठीक केला जातो. मला असा काही त्रास होतो त्यावेळी पाच रुपयांत होमिओपथिक औषधं घेऊन मी स्वत:वर इलाज करतो. माझी मुलं व सुना व्यर्थ पैसे खर्च करत राहातात. साधी सर्दी व ताप आला तरी डॉक्टरचं औषध, कित्येक तपासण्या व औषधपाण्यावर हजारो रुपये खर्च करतात.’’

आयुष्य धोक्यात घालणारी वडीलमाणसं

बागांमध्ये, चौकाचौकांत जमलेले ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारे चर्चा करताना आढळून येतात. सकाळी अथवा संध्याकाळी फेरफटका मारताना अथवा आपल्या बैठकांमध्ये आपले आजार व त्यावर आपण स्वत:च केलेले उपचार याविषयी ते बोलत असतात. आपापल्या तोकड्या अनुभवांतून योग, आयुर्वेद व होमिओपथीविषयी गैरसमज पसरवत असतात. असं करून ते आपलं उर्वरित आयुष्य तर धोक्यात घालतातच परंतु आप्तस्वकियांनाही अडचणीत आणतात. आपल्या अर्धवट वैद्यकीय ज्ञानाने कित्येक वृद्ध लोक आपल्या शरीरस्वास्थ्याशी खेळत आहेत.

अशा वृद्धांच्या नातेवाइकांशी चर्चा केल्यावर अशा कित्येक क्लेशदायक घटना समोर येतात. ठाण्यातील एक चार्टर्ड अकाउंटंट रामभाऊ जोशी सांगतात की, त्यांचे वडील गेली वीस वर्षं हाय ब्लडप्रेशरने त्रस्त आहेत. अनेक वेळा होमिओपथिक औषधांच्या नादाने औषधं खाणं बंद करतात व यामुळे दर सहा महिन्यांनी अथवा वर्षाने त्यांची तब्येत इतकी बिघडते की त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. गेल्या वर्षी तर ते कोमामध्ये जाता जाता वाचले.

इंडियन मेडिकल एसोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजयकुमार सांगतात की, असे ज्येष्ठ नागरिक जर वेळीच सावध झाले नाहीत, तर मोठ्या अडचणींत येऊ शकतात. शुगर आणि उच्च रक्तदाबाची औषधं अशी मध्ये मध्ये सोडल्यास त्याचे दुष्परिणाम किडनी, यकृत इत्यादी अवयवांवर दिसून येतात व ते अवयव आपलं काम सोडून देण्याची शक्यता वाढते. हा परिणाम हळूहळू दिसून येतो. ज्येष्ठ नागरिक हे लक्षात घेत नाहीत व स्वत:च मृत्युला निमंत्रण देतात.

जेव्हा योग कमी पडतो

योग व आयुर्वेद एलोपथीपुढे तोकडे पडल्याचं ताजं उदाहरण म्हणजे स्वत:ला योगाचे महागुरू समजणारे रामदेव बाबा यांचंच आहे. उपोषणास बसलेल्या रामदेव बाबांची तब्येत जेव्हा अत्यंत खालावली तेव्हा त्यांना एलोपथिक उपचारांना शरण जावं लागलं. का नाही त्यांनी डीहायड्रेशनपासून योगाच्या सहाय्याने आपली सुटका करून घेतली? त्यांना ग्लुकोज का द्यावं लागलं व एलोपथिक हॉस्पिटलमध्ये का भरती व्हावं लागलं? उपवासाच्या वेळी ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठी त्यांनी जडीबुटी का नाही खाल्ली? हॉस्पिटलला नेण्यास त्यांनी का मज्जाव नाही केला? तेथे जाऊन तेथील उपचारांनी माझी तब्येत अधिकच बिघडेल असं का सांगितलं नाही? याचा अर्थ सरळ आहे की ते जाणत होते की अशा परिस्थितीत एलोपथिक उपचारांशिवाय पर्याय नाही.

ठाण्यातील एक डॉक्टर तेजस्वी सांगतात, काही ज्येष्ठ नागरिक असा दावा करतात की त्यांचा होमिओपथी व आयुर्वेदावर पूर्ण विश्वास आहे, पण मग जेव्हा तब्येत फारच बिघडते तेव्हा ते एलोपथिक डॉक्टरकडे कशाला जातात? खरं तर असे लोक टीव्हीवर योग पाहून आणि स्वस्त होमिओपथिक व आयुर्वेदिक पुस्तकं वाचून पूर्णपणे गोंधळलेले असतात.

आता एका ज्येष्ठ नागरिकाचाच अनुभव ऐका. साहेब निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. एके दिवशी डायबिटिसची गोळी खाल्ल्यावरसुद्धा त्यांना असं वाटलं की अजूनही आपणास चक्कर येत आहे. त्यांनी पटकन कुठलंसं होमिओपथिक औषध खाल्लं. त्यानंतरही आराम न पडल्याने त्यांनी एलोपथीची आणखी एक गोळी खाल्ली. यामुळे त्यांची तब्येत अधिक बिघडली व ते बेशुद्ध पडले. घरच्यांना वाटलं की त्यांची शुगर कमी झाल्याने त्यांना चक्कर आली आहे म्हणून त्यांनी त्यांना शुद्धीवर आणून सरबत पाजलं. मग त्यांना ताबडतोब डॉक्टरकडे नेण्यात आलं. शुगर लेव्हल चेक केल्यावर साखरेचं प्रमाण ४० आढळल्याने डॉक्टर म्हणाले की त्यांना वेळेवर साखर देण्यात आली नसती व येथे आणण्यात आलं नसतं तर त्यांचं जगणं अशक्य होतं.

आपल्या जीवाशी खेळू नका

डोंबिवलीचे डॉ. राजीव कुमार सांगतात की, स्वत:च डॉक्टर बनणाऱ्याचं हेच दु:ख असतं. वाईट एवढंच आहे की, शिकलेसवरलेले लोकसुद्धा असं मान्य करतात की आयुर्वेदिक अथवा होमिओपथिक औषधांचे दुष्परिणाम होत नाहीत. या भ्रमातून लोकांनी बाहेर पडण्याची गरज आहे अन्यथा  स्वत:च आपल्या प्राणावर बेतून घेतील.

ठाण्यातील होमिओपथिक डॉक्टर उपेंद्रकुमार वर्मा सांगतात की, टोकाला जाऊन तुम्ही होमिओपथीला नकार देऊ शकत नाही. होमिओपथिकपासून मिळणारा आराम खूपच प्रभावी आहे. परंतु लोक जेव्हा एलोपथीची औषधं खाऊन कंटाळतात तेव्हा ते इकडे वळतात. जर एखाद्या शिकलेल्या तज्ज्ञ होमिओपथीकडून वेळेवर इलाज करून घेतला तर कोणत्याही रोगावर फायदाच दिसून येईल. आपल्या ज्येष्ठांना अर्धवट ज्ञानातून आपल्या कमजोर व आजारी शरीरावर उपाययोजना स्वत:च करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. तसंच आपल्या आजारावर आपणच केलेल्या अपुऱ्या उपायांचा फैलाव करणंही बंद केलं पाहिजे. ज्या गोष्टीची योग्य व पूर्ण माहिती नाही तिचा उपयोग आपल्यावर प्रयोग करण्यासाठी करू नये. हे त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियासाठी योग्य ठरेल व आपल्या आयुष्यातील शेवटचा टप्पा ते यामुळे स्वस्थपणे व शांतपणे पार करू शकतील.

व्हिसाशिवाय करा इथली सफर

* श्री प्रकाश

आम्ही भारतीय पासपोर्टवर जवळपास ६० देशांची सफर व्हिसाशिवाय किंवा इ व्हिसा अथवा व्हिसा ऑन अरायव्हलद्वारे करू शकता. व्हिसाशिवाय ज्या देशात तुम्ही जाऊ शकता त्यातील काही आशिया, काही आफ्रिका तर काही दक्षिण अमेरिकेत आहेत.

पाहायला गेल्यास दक्षिण कोरियाची सफर व्हिसाशिवाय करता येत नाही, पण दक्षिण कोरियातील जेजू हे एक असे बेट आहे, जिथे तुम्ही व्हिसाशिवाय भारतीय पासपोर्टवर जाऊ शकता. जेजू दक्षिण कोरियातील हवाई बेट म्हणूनही ओळखले जाते. लक्षात ठेवा की तुम्ही व्हिसाशिवाय दक्षिण कोरियाच्या मुख्य प्रवेशद्वारातून कोणत्याही हवाइमार्गे येथे येऊ शकत नाही किंवा येथून दक्षिण कोरियात कुठेही जाऊ शकत नाही. अर्थात हवाइमार्गे अन्य देशातून येऊन कोरियात न थांबता येथे येऊ शकता किंवा येथून बाहेर जाऊ शकता.

तुम्ही मलेशिया, सिंगापूर किंवा अन्य देशातून येथे येऊ शकता. पण हो, जेथून येणार आहात त्या देशाच्या ट्रान्झिस्ट व्हिसाची माहिती अवश्य करून घ्या.

दिल्ली, मुंबई, बंगळुरूवरूनही हवाइमार्गे तुम्ही जेजूला येऊ शकता.

जेजू हे दक्षिण कोरियाच्या दक्षिणेकडे वसलेले सुंदर बेट आहे. इथले वातावरण अन्य पर्यटनस्थळांपेक्षा वेगळे आणि खूपच शांत आहे. म्हणूनच तर दक्षिण कोरियाचे निवासीही थकवा आणि धावपळीच्या जीवनाला कंटाळून येथे सुट्टी मजेत घालवण्यासाठी येतात.

प्रेक्षणीय स्थळे

नैसर्गिक सौंदर्य : जेजूला निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभले आहे. येथील स्वच्छ वातावरण आणि मोकळया हवेत श्वास घेणे आल्हाददायी आहे.

हलासन : जेजू बेटाची निर्मिती हजारो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली. बेटाच्या मध्यभागी हलासन ज्वालामुखी आहे, जो आता निष्क्रिय झाला आहे. दक्षिण कोरियातील सर्वात उंच शिखरावरील माउंट हला नॅशनल पार्कची सफर करून आपण याचा आनंद घेऊ शकता. येथे खोल विवर तयार झाले होते, जे आता एक सुंदर सरोवर आहेत. येथे चहुबाजूंना विविध वनस्पती आणि अन्य जीव आहेत.

ह्योपले बीच : जेजू बेटाच्या उत्तर दिशेकडील हे प्रसिद्ध बीच आहे. येथील वाळू पांढऱ्या रंगाची असते. तुम्ही येथील शुभ्र पाण्यात पोहण्याचा मनमुराद आनंद लुटू शकता.

लाव्हाचा बोगदा : ज्वालामुखीच्या भयानक स्फोटानंतर लाव्हा याच बोगद्यातून बाहेर पडत असे. हा एखाद्या गुहेप्रमाणे आहे. तो १३ किमी लांब असला तरी केवळ १ किमी लांबीचा बोगदाच पर्यटकांसाठी खुला आहे. येथे गेल्यावर सेल्फी काढायला विसरू नका.

रस्त्यावरील सफर : येथे जीपीएसच्या मदतीने कारमधून बेटाची सफर करणे सहज शक्य आहे. अन्य एखादी गाडी किंवा गाडयांचा ताफा तुमच्या आजूबाजूला असेल असा प्रयत्न करा. पायी जाण्यासाठीही पायवाटा आहेत.

याच रस्त्यावर एका ठिकाणी ग्रॅण्डमदर्स रॉक स्टॅच्यू आहे. अशी दंतकथा आहे की एकदा समुद्रात गेलेला मच्छीमार परत आलाच नाही आणि तेथे त्याची वाट पाहत उभी असलेली पत्नी अखेर पाषाणाचा पुतळा बनली. कोरियन लोक आपल्या मुलांना सांगतात की एकटयाने उशिरापर्यंत बाहेर राहू नका नाहीतर तुमची आजीही पाषाणाची मूर्ती बनेल.

सोनेरी टँजेरिनची बाग : कीनू किंवा टँजेरिन फळांच्या बागेत वृक्षांच्या रांगा अनेक मैल दूरवर पाहायला मिळतात. या वृक्षांवरील पिवळया रंगांची असंख्य फळ तुमच्या कॅमेऱ्याला फोटो काढण्यासाठी मोहात पाडतील.

टेडीबिअर संग्रहालय : मुलांच्या आवडीच्या लोकप्रिय टेडीबिअर खेळण्याचे सुंदर संग्रहालय येथे आहे, जे तुम्हाला आकर्षित करेल.

लवलँड येथील सेक्सी मुर्त्या : जेजू बेटावर लवलँड आहे जिथे सुमारे १४० मुर्त्या आहेत, ज्या सेक्स या संकल्पनेवर आधारित सेक्सच्या विविध भावमुद्रेत आहेत.

जेजू येथे जाण्यासाठीची योग्य वेळ : नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंतचा काळ हा जेजू बेटावर जाण्यासाठी उत्तम आहे.

राहण्याची सोय : जेजूमध्ये तुम्हाला चांगली हॉटेल्स किंवा बजेटमधील हॉटेल्सही मिळतील. वाटल्यास तुम्ही कमी खर्चात हॉस्टेलमध्ये राहू शकता. पण हो, जर तुम्हाला शॉपिंगची आवड असेल तर मात्र येथे तुमची निराशा होईल.

वैवाहिक जीवनावर पोर्नचा परिणाम

* मोनिका अग्रवाल

जेव्हा स्त्री, पुरुष विवाह बंधनात बांधले जातात, तेव्हा त्यांच्या मनात सेक्सबाबत बरीच गुंतागुंत असते. अशावेळी पोर्नोग्राफीचा आधार घेणेच त्यांना योग्य वाटते. पण पुढे जाऊन याच आधाराचे व्यसन लागले तर निरोगी आणि सुखी वैवाहिक जीवनावर याचा दुष्परिणाम होऊ शकतो.

सेक्ससाठी जागृत करणे : मुलगा, मुलगी किंवा स्त्री, पुरुषाच्या यौन संबंधांवेळीच्या क्षणांचे फोटो किंवा व्हिडिओजना पोर्नोग्राफीचे नाव देण्यात आले आहे. हे सध्या सहज उपलब्ध आहेत. पण हे व्यसन आहे आणि तुम्ही व्यसनी बनत चालला असाल तर विचार करण्याची गरज आहे.

सहज उपलब्धता : सध्या इंटरनेट हा पोर्नबाबत माहिती मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. गेल्या काही वर्षांची तुलना केल्यास सध्या तुमच्यासाठी येथे यासंदर्भात बरेच काही उपलब्ध आहे.

सेक्सोलॉजिस्टचे मत : सेक्सोलॉजिस्टनुसार, सेक्स लाईफ चांगले बनवण्यासाठी पोर्न साहित्य किंवा साईट्सचा वापर केला जात असेल तर याचा सेक्स लाईफवर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे वैवाहिक जीवनावर दुष्परिणाम होतो.

चुकीचे चित्रण : पोर्नोग्राफीचे साहित्य किंवा फिल्म माणसातील कामवासनेला चुकीच्या पद्धतीने दाखवते जे केवळ कल्पनेवर आधारित असते, पण सादरीकरण असे असते की पाहणाऱ्याचे मन आणि बुद्धीवर ते खोलवर परिणाम करते. एका संशोधनानुसार, पोर्नोग्राफी आठवडयातून फक्त एक तासापेक्षा कमी वेळेसाठी पाहिली जात असेल तर काळजीचे कारण नाही. पण दहा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ पाहिली जात असेल तर पाहणाऱ्याची सेक्स लाईफ किंवा वैवाहिक जीवनावर याचा परिणाम झाल्याशिवाय राहात नाही.

वैवाहिक जीवनात पोर्नोग्राफी : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पोर्नोग्राफी पाहिल्यामुळे वैवाहिक जीवनात सेक्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. पोर्नोग्राफीचे व्यसन लागलेला जोडीदार सेक्सची ती पद्धत आपलीशी करू पाहातो, जी तो पाहातो. यामुळे दुसऱ्या जोडीदाराकडून त्याला सेक्सबाबतची कमी जाणवते आणि त्याचा वैवाहिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. अशा फिल्ममध्ये दाखवली जाणारी सेक्सची दृश्ये प्रत्यक्षातील सेक्सपेक्षा खूपच वेगळी असतात.

पती असो किंवा पत्नी, त्यांना आपल्या जोडीदाराकडून तितक्याच उत्तेजनेची अपेक्षा असते आणि ती नसेल तर आपसातील प्रेमाची भावना कमी होते. अशावेळी जे होते त्याला वासनेच्या श्रेणीत पाहाणेच योग्य ठरेल. कारण हे प्रेम न राहता केवळ शरीराची भूक ठरते.

दिल्लीच्या एका फर्ममध्ये काम करणाऱ्या सुनीलला पोर्न पाहण्याची वाईट सवय लागली. तो अनेकदा ऑफिसच्या मीटिंगदरम्यानही लॅपटॉपवर पोर्न साईट उघडून ठेवायचा. हे महिला कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी त्याची तक्रार केली. शेवटी त्याला नोकरी सोडावी लागली आणि उपचारासाठी मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्यावी लागली.

लैंगिक असमाधान : तुमचे जोडीदारासह भावनात्मक नाते नसेल तर याचा तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम होतो. कारण कामवासनेचा हा प्रयत्न तो जोडीदाराऐवजी पोर्नोग्राफी माध्यमातील व्यक्तीसोबत करू लागतो, ज्याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. पोर्नोग्राफीमुळे वैवाहिक जीवनात तणाव आणि लैंगिक असमाधान निर्माण होते आणि घटस्फोटापर्यंतची वेळ येते.

मानसशास्त्रज्ञांच्या मते त्यांच्याकडील ५० टक्के कौटुंबिक वादाच्या प्रकरणांत भांडणाचे मूळ जोडीदार पोर्न अॅडिक्ट असणे हे असते. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जोडीदार खूप जास्त पोर्न साईट्स पाहातो तर सावध व्हा आणि आपसात बोलून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा.

याबाबत सेक्सोलॉजिस्टचा सल्ला अवश्य घ्या. पती-पत्नीला सेक्सबाबत चांगली आणि पूर्ण माहिती असेल तर पोर्नोग्राफीमुळे त्यांचे सेक्स लाईफ जास्त चांगले होऊ शकते. अट एकच, ते पाहायला मर्यादा हवी आणि जोडीदाराला त्याची सवय लागता कामा नये.

मुलांना वाचवा : आजकाल वयस्कर लोकांमध्येच नाही तर मुलांमध्येही ही समस्या पाहायला मिळते. ९ ते १५ वर्षांपर्यंतची मुलेही पोर्न अॅडिक्ट झाली आहेत. ९ वर्षांच्या एका मुलाला जेव्हा वर्गशिक्षकांनी अश्लील फोटोंसह पकडले, तेव्हा त्याने पोर्नचे व्यसन जडल्याने शाळेतील काही मित्रांकडूनच मिळालेल्या फोटोंबद्दल सांगितले. इंटरनेटवर अशा अनेक फिल्म पाहून नंतर डिलीट करता येतात, असा सल्ला एका मित्राने त्याला दिला होता. येथून सुरू झालेला हा प्रकार त्या धोकादायक वळणावर गेला, जिथे संधी मिळताच तो त्याच्याच घराशेजारील महिलांचे विवस्त्र किंवा अर्धनग्नावस्थेतील फोटो काढायचा. घरच्यांनी त्याचे समुपदेशन केले, तेव्हा त्याला पोर्नचे व्यसन जडल्याचे समजले.

सेक्सचे व्यसन

पोर्नचे व्यसन आणि सेक्सचे व्यसन या दोन वेगळया गोष्टी आहेत. सेक्सचे व्यसन जडलेला जास्तीत जास्त सेक्सची मागणी करतो पण कधीच समाधानी होत नाही तर पोर्नचे व्यसन लागलेला सतत पोर्न व्हिडिओ किंवा फोटो पाहातो. ज्याला सेक्सचे व्यसन असेल त्याला पोर्नचेही व्यसन असेलच असे नाही. हीच गोष्ट पोर्नचे व्यसन असलेल्यालाही लागू होते. अशावेळी गरजेचे आहे की सर्वप्रथम कोणते व्यसन जडले आहे ते शोधा. त्यानंतर त्यापासून वाचण्यासाठी किंवा त्यातून बाहेर पडण्यासाठी पाऊल पुढे टाका.

मूल रडतंय का…

* डॉ. परिणीता तिवारी

लहान मूल अनेक कारणांमुळे रडत असतं. त्याच्यामध्ये इतकी क्षमता नसते की ते आपल्याला काय त्रास होतोय हे मोठ्यांना सांगू शकेल. म्हणूनच ‘रडणं’ हाच एकमेव उपाय दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी त्याच्याकडे असतो. सर्व आईवडिलांनी हे समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा की त्यांचं बाळ का रडत आहे? त्याच्या रडण्याचं कारण काय आहे? त्याला काय सांगायचं आहे, कधीकधी हे समजून घेणं खूपच कठीण होतं. खासकरून जेव्हा प्रथमच कुणी जोडपं आईवडील झालेले असतात.

खरंतर ‘रडणं’ हा मुलाच्या जीवनाचा एक भागच असतो. लहान बाळ तर दिवसाला किमान दोन तास रडतं आणि हे प्रमाण दिवसागणिक वाढत जातं किंवा कमी कमी होत जातं. मूल जन्माला आल्यापासून ते पुढील सहा महिन्यांपर्यंत दिवसाला २-३ तास तरी हमखास ते रडत राहातं, मग तुम्ही त्याची कितीही काळजी घ्या. ६ महिन्यांनंतर मुलाचं रडणं कमी होऊन ते दिवसात फार तर एखादं तासच रडतं. हळूहळू आईला आपल्या बाळाच्या गरजा समजू लागतात तेव्हा ती बाळाच्या गरजा वेळीच पूर्ण करू लागते तेव्हा बाळाचं रडणं आणखीनच कमी होतं.

अनेक कारणं आहेत रडण्याची

भूक लागणे : जेव्हा बाळ रडू लागतं तेव्हा त्याला भूक लागली असावी ही गोष्ट सर्वप्रथम लक्षात येते, परंतु हळूहळू आई आपल्या बाळाची लक्षणं ओळखू लागते तेव्हा ती बाळाला रडण्याआधीच खायला देऊ लागते. जेव्हा बाळ भुकेलं असतं तेव्हा ते रडू लागतं, कुणाकडे जायलाही तयार नसतं, सतत तोंडामध्ये हात घालत राहातं.

डायपर खराब होणे : अनेक मुलं रडून हे सांगत असतात की त्यांचं डायपर बदलण्याची गरज आहे, तर काही मुलं अशीही असतात जी अस्वच्छ डायपरमध्येही राहातात. म्हणूनच वेळोवेळी डायपर तपासत राहा.

झोप येणं : नेहमी आपल्याला असं वाटतं की मुलं किती नशीबवान आहेत जी थकल्यावर किंवा झोप आल्यावर जेव्हा हवं तिथे झोपू शकतात. पण तसं नाहीए. मुलालादेखील झोपण्यासाठी आरामदायी आणि शांत जागेची गरज असते. जर असं झालं नाही तर मुलं रडू लागतात, त्रस्त होतात, चिडचिडी होतात आणि खासकरून जेव्हा ते फार थकलेले असतात.

कडेवर उचलून घेणं : लहान मुलाला आईवडिलांनी उचलून घेतलेलं खूप आवडतं. त्याला आई जेव्हा उचलून घेते तेव्हा ते खूपच आनंदित होते. मुलाला उचलून घेतलं की त्यांचं हसणं-खिदळणं ऐकू येतं, त्याच्या हृदयाची धडधड जवळून जाणवते. इतकंच काय, मूल आपल्या आईचा गंधदेखील ओळखू लागतो. लहान बाळांसाठी रडणं हे केवळ उचलून घेण्यासाठीचं कारण असतं.

पोटाचा त्रास : मूल रडण्याचं आणखी एक कारण पोटदुखीही होऊ शकतं. सर्वसाधारणपणे पोटाच्या त्रासामुळे मूल दिवसातून कमीत कमी ३ तास तरी रडतं आणि जर वेळेवर उपचार झाले नाहीत तर त्याचं रडणं अधिकच वाढतं. जर मुलाने खाल्ल्यानंतर त्वरित उलटी केली किंवा अधिकच ते रडू लागलं तर याचा अर्थ असा आहे की मुलाच्या पोटात दुखत आहे. अशावेळी मुलाला त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जावं.

दुधाचं पचन होण्यासाठी : जर मुलाने दूध प्यायल्यानंतर लगेचच रडायला सुरुवात केली तर याचा अर्थ त्याला व्यवस्थितपणे दुधाचं पचन झालेलं नाही आणि त्याला ढेकर येण्याची गरज आहे. म्हणून मूल दूध प्यायलाबरोबर लगेचच त्याला झोपवू नका; कारण काही मुलं दुधासोबत हवाही पोटात घेतात. यामुळे पोटात दुखू लागतं आणि ती रडू लागतात.

खूप थंडी अथवा गरमी : काही वेळा मूल अधिक थंडी किंवा गरमीच्या त्रासानेही रडू लागतं. जेव्हा आई आपल्या मुलाचं डायपर बदलत असते किंवा स्वच्छ करत असते तेव्हा मुलाच्या रडण्याचं हेच कारण असतं.

एखादी लहानशी गोष्ट : मुलाला एखाद्या लहानशा गोष्टीचाही त्रास होऊ शकतो आणि आपल्याला ते सहजपणे लक्षातही येत नाही. उदा. केस, चकचकीत कपडे, आईने घातलेले दागिने, कपड्यांवर लावलेला स्टीकर किंवा टॅग इत्यादी. काही मुलं अधिक संवेदनशील असतात, त्यांच्या शरीरावर या गोष्टींचा वाईट प्रभाव पडतो.

दात येणं : जेव्हा मुलाला दात यायला सुरुवात होते तेव्हा ते खूप रडू लागतं; कारण त्यावेळेस मुलाला खूप वेदना होत असतात. तेव्हा मूल खूपच चिडचिडंदेखील होतं. जर तुमच्या मुलाला खूपच त्रास होत असेल आणि त्याला नेमकं काय होतंय हे कळत नसेल तर त्याच्या तोंडात हात घालून पाहा, कदाचित त्याचे दात येत असतील. सर्वसाधारणपणे ४ ते ७ महिन्यांच्या दरम्यान बाळाला पहिला दात यायला सुरुवात होते.

एक लहान मूल बऱ्याच गोष्टींनी घेरलेले असतं, जसं की लाइट, आवाज, बरीचशी लोक इत्यादी. लहान मुलाला सर्व काही एकसाथ हे कळत नसतं, म्हणूनही ते रडायला लागतं. त्याला आपल्या रडण्याद्वारे हे सांगायचं असतं की मला हे सर्व त्रासदायक होतंय. काही मुलं रडून इतरांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करू पाहातात. अशा मुलांना गप्प करण्याचा एकच उपाय असतो आणि तो म्हणजे त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ हसण्याखेळण्यात घालवावा, त्यांच्यासोबत खेळावं. याव्यतिरिक्त मुलाच्या रडण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे त्याची तब्येत बिघडणं, हेदेखील असू शकतं. मुलाला कोणताही शारीरिक त्रास असेल तर तो स्वत:हून सांगू शकत नाही. उदाहरणच द्यायचं झाल्यास ताप, सर्दी, पोटदुखी याविषयी मुलाला स्वत:हून सांगता येत नाही. तापामुळे जेव्हा मूल रडू लागतं, तेव्हा त्याचं रडणं इतर सर्व कारणांमुळे रडण्यापेक्षा वेगळं असतं.

खरंतर मुलाला रडताना पाहून आईवडिलांनी आपला संयम सोडू नये. मूल का रडतंय, या गोष्टीची चिंता करत बसण्याऐवजी मुलाच्या रडण्याचं, त्याच्या त्रस्त होण्याचं कारण शोधावं. म्हणूनच अशावेळी मुलाला शांत करण्याचा प्रयत्न करायला हवा. अनेकदा मुलाच्या रडण्याचं कारण त्यांच्या मनात बसलेली भीतीही असते. आईवडिलांनी या सर्व गोष्टीही विशेष करून लक्षात घ्यायला हव्यात. त्यांनी मुलांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा.

फादर्स डे स्पेशल : पालकांचा पाल्यांच्या वैवाहिक जीवनावर प्रभाव

* राजलक्ष्मी त्रिपाठी

तुम्ही जेव्हा विवाह बंधनात बांधले जाता, तेव्हा जीवनात अनेक बदल होतात. आयुष्यात प्रेमासोबत जबाबदाऱ्यांचाही समावेश होतो. जेव्हा तुम्ही आपल्या जीवनसाथीसह त्याच्या कुटुंबालाही मनापासून स्वीकारता, तेव्हा तुमच्या जीवनात कधीही न संपणाऱ्या आनंदाचा प्रवेश होतो.

पती-पत्नीचे संबंध अधिक संवेदनशील असतात. ज्यात प्रेम-माया आणि एकमेकांच्या चांगल्या-वाईट गुणांना स्वीकारण्याची भावना असते. तुम्ही मान्य करा किंवा करू नका, पण तुमच्या संबंधांवर तुमच्या आई-वडिलांचा परस्पर संबंध कसा होता याचा कळत-नकळत परिणाम पडतो. सत्य तर हे आहे की तुमच्या व्यक्तित्वावर कुठे ना कुठे तुमच्या पालकांची छाप पडलेली असते. तसेच तुमच्या जीवनातील दृष्टीकोनांवर पालकांचा प्रभाव दिसून येतो.

अनेकदा नकळतपणे इच्छा नसतानाही तुम्ही तुमच्या पालकांकडून चूकीच्या सवयी शिकता, ज्यामुळे कळत-नकळतपणे तुमचे संबंध प्रभावित होतात.

जर तुमच्यामध्ये तुमच्या पालकांची अशी कोणती सवय असेल, ज्यामुळे जोडीदारासोबतच्या संबंधांमध्ये कटूता येत असेल तर ती सवय सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कधी प्रेम तर कधी तक्रार

रिलेशनशीप काउन्सिलर डॉ. निशा खन्ना यांच्या मते, पती-पत्नीचे नाते संवेदनशील असते. ज्यात प्रेमासह तक्रारीदेखील असतात. पण ही तक्रार जेव्हा गरजेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा दोघांच्या नातेसंबंधांमधील दरी वाढू लागते. खरं तर पती-पत्नी आपले संबंध अगदी तसेच बनवू पाहतात, जसे त्यांच्या आई-वडिलांचे होते. यामुळे दोघांच्यात संबंध दूरावू लागतात. जेव्हा पती-पत्नी एकमेकांवर आपली मते थोपू लागतात, त्यावेळी त्यांच्यातील प्रेम हळूहळू संपू लागते. मग ते शुल्लक गोष्टींवरून वाद घालू लागतात. सामान्यत: पत्नीची तक्रार असते की पती वेळ देऊ शकत नाही आणि पतीची तक्रार असते की ऑफिसमधून थकून घरी परतल्यावर पत्नी किटकिट करते.

पती-पत्नीमधील ही सवय सामान्यपणे त्यांच्या पालकांकडून आलेली असते. जर तुमच्या पालकांना आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याची सवय असेल तर तुमच्या नकळत ही सवय तुमच्यात येते. सुखी दांपत्य जीवनासाठी हे खूप गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या साथीदाराला त्यांच्या चांगल्या-वाईट गुणांसह स्वीकारलं पाहिजे. प्रयत्न करा की तुमच्या जीवनात अशा नकारात्मक गोष्टी येऊ नयेत, ज्या तुमच्या पालकांच्या जीवनात होत्या.

ज्या दांपत्यांच्या पालकांची सवय साथीदाराला गृहीत धरण्याची असेल तर त्यांची मुलेदेखील त्यांच्या साथीदारासोबत तशाच प्रकारचा व्यवहार करतात आणि तसेच संबंध प्रस्थापित करतात. अशाप्रकारचा विचार परस्पर संबंध कधीच फुलू देत नाहीत.

खरं तर पती-पत्नी एकमेकांचे पूरक असतात. जेव्हा दोघे एकत्र येऊन चालतात, तेव्हा जीवनाची गाडी सहजपणे पुढे जाते. पण जेव्हा दोघांमध्ये तणाव वाढतो, तेव्हा संबंधांची गाठ सुटण्यास वेळ लागत नाही. आपले नाते सहजपणे पुढे नेण्यासाठी हे गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या साथीदाराला गृहीत धरण्याची चूक करू नका. त्याला आपला मित्र, जोडीदार समजून आपले सुख-दु:ख वाटून घ्या.

आपलंच म्हणणं खरं ठरवू नका

जर तुमच्या पालकांना आपले म्हणणे बरोबर म्हणण्याची सवय असेल तर नक्कीच तुमच्यातही हा गुण आला असेल. आपण आपला हा विचार बदलण्याची गरज आहे. आजकाल पती-पत्नी एकमेकांसह मिळून काम करत आहेत. घर-कुटुंबाची जबाबदारी एकत्रितपणे पार पाडत आहेत. अशावेळी दोघांची मते महत्त्वाची असतात. यात जर तुम्हाला तुमचेच म्हणणे खरं ठरवण्याची सवय असेल तर ही सवय सोडून आपल्या साथीदाराचे म्हणणे ऐका. प्रत्येकवेळी तुम्हीच बरोबर असलं पाहिजे असं नाही. तुमचा साथीदार जो विचार करतो, जे सांगतो तेही बरोबर असू शकतं.

सामायिक जबाबदारी

सामान्यपणे बऱ्याच जणांचे पालन पोषण अशा वातावरणात होते, जिथे पती पैसे कमावून आणतो आणि पत्नी घरातील जबाबदाऱ्या सांभाळते. म्हणजेच वडील आईकडे पैसे सोपवून जबाबदाऱ्यांतून मुक्त होतात. मात्र गरज पडल्यास आई ने साठवलेले पैसे कोणताही विचार न करता लगेच वडिलांना देते.

जर तुमचा असाच विचार असेल तर, यात बदल केला पाहिजे. जर, बदलत्या जगात पती-पत्नी दोघेही काम करतात, अशावेळी गरजेचे आहे की दोघांनीही आपले संबंध मजबूत बनवण्यासाठी एकमेकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये सहयोग दिला पाहिजे. यावेळी पतीने हा विचार करता कामा नये की हे घरचे काम फक्त पत्नीचे आहे. तर पत्नीने हा विचार करता कामा नये की घरखर्च चालवणे फक्त पतीचे काम आहे.

बदलते जग

जीवनसाथीच्या संबंधांमधील दृढतेसाठी पारंपरिक जुन्या गोष्टींतून बाहेर पडणं गरजेचे आहे. ज्याप्रकारे तुमची आई साडी नेसत होती, डोक्यावर पदर घेत होती तसंच तुमच्या पत्नीने करावं हे जरूरी नाही. तुमची आई मंदिरात जात असे, पूजा करत असे याचा अर्थ हा नाही की तुमची पत्नी असंच करेल. तिला तिच्या पद्धतीने जगण्याचं स्वातंत्र्य द्या. पत्नीलादेखील हे समजणं गरजेचं आहे की घरासंबंधित बाहेरच्या कामांची जबाबदारी फक्त पतीची नाही. हे गरजेचे नाही की तुमचे वडील बाहेरची सर्व कामे घरी बसून करतात तर तसंच तुमच्या पतीनेही करावं. बदलत्या जगानुसार आपली मानसिकता बदलली पाहिजे. मग तुम्ही तुमच्या संबंधांमध्ये प्रेमाचा ओलावा निर्माण होईल.

नको भांडण-तंटा

तुमचे पालक छोटया-छोटया गोष्टींवरून एकमेकांशी वाद घालायचे म्हणजे तुम्हीदेखील तुमच्या साथीदाराशी प्रत्येक गोष्टीवरून वाद घालत राहावं असं नाही.

खरं तर, तुम्ही एकमेकांच्या भावनांचा आदर राखला पाहिजे आणि एकमेकांचा सन्मान केला पाहिजे, जेणेकरून संबंध सुधारतील.

क्लालिटी लव्ह

जर तुमच्या मनात तुमच्या पालकांना पाहून काही विचारांनी घर केलं असेल की पालकत्व आल्यानंतर एकमेकांसोबत जवळीक साधणं चुकीचं आहे. तर तुम्ही हे विचार तुमच्या डोक्यातून बाहेर काढा.

सामान्यपणे आई बनल्यानंतर पत्नीचे पूर्ण लक्ष आपल्या बाळावर असते. ज्यामुळे बऱ्याचदा पती त्रासून जातो. पालक बनल्यानंतरही एकमेकांसोबत वेळ घालवा, फिरायला जा आणि छोटया गोष्टींमधून आपले प्रेम व्यक्त करा. यामुळे नक्कीच तुमचे संबंध मजबूत राहतील. मुलांची जबाबदारी एकत्रितपणे घ्या. हा विचार नका करू की बाळाची जबाबदारी फक्त आईची आहे.

या गोष्टींकडे लक्ष द्या

* जर तुमचे वडील तुमच्या आजोळच्या लोकांचा आदर करत नाहीत तर याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही तुमच्या पत्नीच्या कुटुंबाशी असा व्यवहार करावा. जर तुम्ही तुमच्या सासरच्यांना पूर्ण मान-सन्मान दिला तर पत्नीचं तुमच्याप्रति असलेलं प्रेम अधिक वाढेल आणि तीदेखील मनापासून तुमच्या कुटुंबाचा स्वीकार करेल आणि मान-सन्मान देईल.

* जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मोठ-मोठयाने ओरडण्याची सवय असेल तर ती सोडून द्या. घरात प्रेमपूर्ण वातावरणाची निर्मिती करा.

* कुटुंबाची जबाबदारी एकत्रितपणे निभावली पाहिजे.

* आपल्या साथीदाराला संपूर्ण स्पेस द्या.

* जर कोणत्या गोष्टीवरून तुमचे मन दुखावले असेल तर मोठ-मोठयाने एकमेकांशी भांडून वाद वाढवण्यापेक्षा गप्प बसा.

* सुखी दांपत्य जीवनासाठी एकमेकांवर चुका थोपवण्यापेक्षा एकमेकांच्या चुकांचा स्वीकार करण्याची वृत्ती ठेवा.

फादर्स डे स्पेशल : घर सांभाळणारा प्रेमळ पती

* गरिमा पंकज

सकाळचे आठ वाजले आहेत. घड्याळाचे काटे वेगाने पुढे सरकत आहेत. शाळेची बस कधीही येऊ शकते. घरातील वातावरण तणावपूर्ण आहे. तितक्यात मोठा मुलगा आतून बाबांना आवाज देतो कि त्याला शाळेचे मोजे सापडत नाहीत. इकडे बाबा ना-ना-चा पाढा वाचणाऱ्या चिमूरडीला नाश्ता भरवण्यात मग्न आहेत. त्यानंतर त्यांना मुलाचा लंचबॉक्स भरायचा आहे. मुलाला शाळेत पाठवून मुलीला अंघोळ घालायची आहे आणि घराची स्वच्छताही करायची आहे.

हे दृश्य आहे एका अशा घरातील, जिथे पत्नी नोकरी करते आणि पती घर सांभाळतो. अर्थात तो हाउस हसबंड आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटतं हे, पण हे वास्तव आहे.

पुराणमतवादी आणि मागास मानसिकतेच्या भारतीय समाजामध्येही  पतींची अशी नवी जमात उदयास येत आहे. ते जेवण बनवू शकतात. मुलांना सांभाळू शकतात आणि घराची स्वच्छता, भांडीधुणी अशी घरगुती कामेही व्यवस्थित पार पाडू शकतात.

हे सामान्य भारतीय पुरूषांप्रमाणे विचार करत नाहीत. कुठल्याही कटकटीशिवाय बिछाना घालतात आणि मुलांचे नॅपीसुद्धा बदलतात. समाजातील हा पुरूष वर्ग पत्नीला समान दर्जा देतो आणि गरज भासल्यास घर आणि मुलांची जबाबदारी घेण्यासही तत्पर असतात.

तसे तर जुनाट मनुवादी भारतीय अजूनही अशा हाउस हसबंडना नालायक आणि पराभूत पुरूष समजतात. त्यांच्यामते घरकुटुंब, मुलांची काळजी घेणे ही नेहमीच स्त्रीची जबाबदारी असते आणि पुरूषांचे काम आहे बाहेरील जबाबदाऱ्या स्विकारणे आणि कमावून आणणे.

अलीकडेच हाउस हसबंड या संकल्पनेवर आधारित एक चित्रपट आला होता, ‘का एंड की’ करीना कपूर आणि अर्जुन कपूर अभिनीत या चित्रपटाचा मूळ विषय होता लिंग आधारित कार्यविभाजनाच्या विचारसरणावर टीका करत पतिपत्नींच्या कामाची अदलाबदली करणे.

लिंग समानतेचा काळ

हल्ली स्त्रीपुरूषांच्या समानतेच्या गप्पा रंगतात. मुलांबरोबरीनेच मुलीसुद्धा शिकून उच्चपदावर पोहोचत आहेत. त्यांची स्वत:ची स्वप्नं आहेत, स्वत:ची योग्यता आहे. या योग्यतेच्या बळावर ते उत्तम असा पगार मिळवत आहेत आणि अशात लग्नानंतर वर्किंग जोडप्यांना मूल होतं, तेव्हा अनेक जोडपी भावी समस्या आणि शक्यतांचा विचार करून कुणासाठी दोघांपैकी कुणासाठी नोकरी महत्त्वाची आहे हे समजून घेतात. अशाप्रकारे परस्पर संमतीने ते आर्थिक आणि घरगुती जबाबदाऱ्या विभाजित करून घेतात.

हा व्यवहार्य विचार गरजेचा आहे. जर पतिपत्नीची कमाई अधिक आहे. करिअरसाठी तिची स्वप्नं आकांक्षा जर जास्त प्रबळ असतील तर अशावेळी कमावते असण्याची भूमिका पत्नीने स्विकारली पाहिजे. पती पार्टटाइम किंवा घरातून काम करत कुटुंब व मुलांना सांभाळण्याचे काम करू शकतो. यामुळे मुलांना पाळणाघरात ठेवावं लागत नाही तसेच त्या पैशांचीही बचत होते, जे पाळणा घरात किंवा मोलकरणीला द्यावे लागतात.

हाउस हसबंडची भूमिका

हाउस हसबंड म्हणजे असे नाही की पती पूर्णपणे पत्निच्या कामावरच अवलंबून राहिल किंवा पूर्णपणे गुलाम बनून जाईल. तर घरातील काम व मुलांना सांभाळण्यासोबतच तो कमावूसुद्धा शकतो. हल्ली घरातून काम करण्याच्याही बऱ्याच संधी उपलब्ध असतात. आर्टिस्ट, रायटर हे त्यांचे काम घरीच व्यवस्थितरित्या करू शकतात. पार्टटाइम काम करणेही शक्य आहे.

सकारात्मक बदल

बराच काळ महिलांना गृहिणी बनवून सतावले गेले आहे. त्यांच्या स्वप्नांची अवहेलना करण्यात आली आहे. आता काळ बदलत आहे. एका पुरूषाने स्वत:च्या करिअरचा त्याग करून पत्नीला स्वत:ची स्वप्नं पूर्ण करू देण्याची संधी देणे समाजात वाढती समानता आणि सकारात्मक बदलाचा संदेश आहे.

एकमेकांप्रति आदर

जेव्हा पतिपत्नी कर्ते असण्याची पारंपरिक भूमिका आपसात बदलतात, तेव्हा ते एकमेकांचा अधिक सन्मान करतात. ते जोडिदाराच्या त्या जबाबदाऱ्या आणि कामाचा दबाव अनभवू शकतात, जो त्या भूमिकांसोबत येतो.

पुरूष एकदा का घरगुती काम आणि मुलांचे संगोपन करू लागतो तेव्हा आपोआपच त्याच्या मनात महिलांसाठी आदर वाढतो. महिलासुद्धा अशा पुरूषांना अधिक मान देतात, जे पत्नीच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपलं योगदान देतात आणि कुठलाही भेदभाव करत नाहीत.

जोखीमही कमी नाही

समाजाचे टोमणे : मागास आणि बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक आजही हे स्विकारू शकत नाहीत की पुरूषाने घरात काम करावे व मुलांना सांभाळावे. अशा पुरूषांना बायकोचा गुलाम म्हटल्याशिवाय त्यांना राहवत नाही. स्वत: चेतन भगतनेही मान्य केले होते की त्यांनाही अशा प्रश्नांना तोंड द्यावे लागले, जे सामान्यत: अशा पुरूषांना ऐकावे लागतात. उदा ‘अच्छा तर तुमची पत्नी कमावते?’ ‘घरातील कामे करताना कसे वाटते तुम्हाला? इ.’

पुरूषाचा अहंकार दुखावणे : अनेकदा परिस्थितीमुळे किंवा वैयक्तिक असफलतेमुळे पुरूष जर हाउस हसबंड झालाच तर तो स्वत:ला कमकुवत आणि हीन समजू लागतो. त्याला असे वाटू लागते की त्याच्या कर्तव्यात (कमाई किंवा घर चालवणे) तो अयशस्वी होत आहे आणि पुरूषाने जे केले पाहिजे ते कार्य तो करत नाहीए.

मतभेद : स्त्री बाहेर जाऊन जेव्हा पैसे कमावते आणि पुरूष जेव्हा घरी राहतो, तेव्हा इतरही अनेक बाबी बदलतात. साधारणत: कमावणाऱ्यांच्या विचारांना प्राधान्य दिले जाते. त्याचाच आदेश घरात चालतो आणि अशावेळी स्त्रिया अशा बाबींवरही कंट्रोल करू लागतात, ज्यावर पुरूषांना अॅडजस्ट करणे कठिण असते.

सशक्त आणि पुरूषार्थावर विश्वास ठेवणारा पुरूष या बाबीकडे दुर्लक्ष करू शकतो की लोक त्याच्याबद्दल काय म्हणत आहेत. असे पुरूष आपल्या मनाचे ऐकतात, समाजाचे नाही.

स्त्रीपुरूष संसाराच्या गाडीची दोन चाके आहेत. आर्थिक आणि घरातील जबाबदाऱ्या त्या दोहोंमधील कुणी कुठली जबाबदारी घ्यायची आहे हे उभयतांनी आपसात ठरवायला हवे. समाजाने त्यात नाक खुपसणे चुकीचे आहे.

शिथिल होऊ नयेत वैवाहिक संबंध

– दिपान्वीता राय बॅनर्जी

आज अदिती स्वत:चे लग्न वाचवण्यासाठी ज्या कौन्सिलरकडे चकरा मारत होती,  त्यामागे एक खूपच साधारण पण जटिल कारण आहे. अदिती आणि तिच्या पतिच्या सेक्स लाइफमध्ये खूप गुंतागुंत होती. कुठलाही मोकळेपणा नसल्यामुळे त्यांच्या संबंधात घुसमट व निराशा निर्माण झाली होती.

असे काय घडले की सेक्ससारखा मनोरंजक विषय घुसमटीचे कारण बनला? पतीपत्नीमधील शरीरसंबंध हे गहिऱ्या संबंधाचे लक्षण आहे. यात सुरक्षेची जाणीव, प्रेमळ अनुभूती, आपसातील सामंजस्य, प्रेमातील गहिरेपणा व ते सर्वकाही असायला हवे, जे स्थिर व आनंददायी संबंधांसाठी गरजेचे असते. पण यासाठी काही तडजोडीही कराव्या लागतात. उत्तम सेक्स जीवन व गहिऱ्या नात्याच्या अनुभूतीसाठी एकमेकांना स्पेस देण्याचे स्वातंत्र्य स्विकारावे लागते.

पतीपत्नी दोघांसाठी दैनंदिन कार्याप्रमाणे सेक्स करत राहणे ही सेक्स लाइफ कंटाळवाणी करणारी गोष्ट तर आहेच शिवाय यामुळे नातेबंध अयशस्वी होण्यातही काही कसर बाकी राहत नाही. शहर असो किंवा गाव भारतीय आणि मुस्लीम समाजात स्त्रियांनी सेक्सवर चर्चा करणं वा अन्य बाबतीत इच्छा व्यक्त करण्याला नीच मानसिकता ठरवून खच्चीकरण केलं जातं. ज्या स्त्रिया आपल्या जोडीदाराला सेक्सच्या बाबतीत आपल्या इच्छा मोकळेपणी सांगू इच्छितात, त्यांना सभ्य आणि सुसंस्कृत मानले जात नाही. मोठया शहरांतील बिनधास्त मुली सोडल्या तर अन्य मुली सेक्स म्हणजे पतीच्या सेवेचाच एक भाग मानतात, तसेच त्यांना आपली इच्छा अनिच्छा पतिला सांगण्याची गरज वाटत नाही.

भेदभाव का?

थोडया खोलात जाऊन विचार केलात की कळेल की सेक्सची इच्छा व क्षमतेला मानवी जीवनाचे प्रधान तत्त्व समजले जाऊ शकते. सेक्स जीवनाला नियंत्रित करण्यासाठी जीववैज्ञानिक, नैतिक, सांस्कृतिक, कायदेशीर, धार्मिक इ. विभिन्न दृष्टीकोनांचे योगदान असते, जेणेकरून सेक्स जीवन आणि याचे स्वातंत्र्य या बाबींचा खूप प्रभाव असतो.

जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्तिच्या लैंगिक आयुष्याच्या महत्वतेवर जोर देत याबद्दल सकारात्मक व स्विकारार्ह दृष्टीकोन बाळगावा असे म्हटले आहे. या संघटनेचे म्हणणे आहे की आपल्या जोडिदारासोबत लैंगिक संबंध कुठल्याही भेदभाव, हिंसा, शारीरिक, मानसिक शोषणाशिवाय व्हायला हवेत. पूर्ण उर्जा, इच्छा आणि भावनिक संतुलनासहित हे संबंध व्हायला हवेत.

प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की आपल्या देशात जिथे स्त्रियांवर सेक्स संबंधित बलात्कार, मानसिक शोषण, घरगुती हिंसा, राजरोजपणे सुरू आहे. स्त्रीचे लैंगिक अधिकार आणि सेक्सबद्दलचे उघड मत स्विकारार्ह आहे का?

जर थोडी सजगता आली आणि स्त्रियांनीही याबाबतीत स्वत:च्या भावनांना पूर्ण महत्त्व दिलं व जोडीदाराशी मोकळेपणे संवाद साधला तर खूप फायदे होऊ शकतील.

आपसात मैत्रीपूर्ण नाते
जर पतीपत्नी दोघांमध्ये मैत्रीची भावना निर्माण झाली तर त्यांच्यात उच्चनीच, लहान मोठे असे अहंकाराने भरलेले भेद आपोआप नाहीसे होतील. दोघांनीही एकमेकांशी सेक्स इच्छांबद्दल मोकळेपणाने मते व्यक्त केली तर ही बाब खूपच सोपी होईल.

व्यक्तिमत्त्वाचा विकास
स्त्री जर सेक्सच्या बाबतीत फक्त समर्पित न राहता  स्वत:ची आवडनावड व्यक्त करू लागली तर, ती जोडीदाराच्या हृदयात स्वत:प्रति आवड निर्माण करू शकते, जी व्यक्तिमत्त्व विकासासाठी सहाय्यक आहे.

आत्मविश्वासात वाढ
फक्त पुरूषाच्या इच्छेनुसार वागणे म्हणजे वैवाहिक व लैंगिकता आयुष्य यंत्रवत जगण्यासारखे आहे, पण जर स्त्रीनेही यात महत्वपूर्ण भमिका निभावली तर आयुष्यात पुन्हा एका नव्या उर्जेचा संचार होईल.

तसेही भारतीय संस्कृतीला अजून पारंपरिक बंधनांतून मुक्त होण्यास दिर्घकाळ लागेल, पण त्या त्या बाबींबद्दल बोलून मागासलेली मानसिकता काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो.

लहानपणापासूनच कौटुंबिक वातावरणात मुलींना हेच शिक्षण मिळते की सेक्स हे निरूपयोगी आहे आणि मुलींनी यापासून दूर राहिले पाहिजे.

सेक्ससोबत चारित्र्यही जोडले जाते. सेक्सची आपली इच्छा मारून त्याबद्दल आपले मत लपवणे यालाच चांगले चरित्र म्हटले जाते.

चारित्र्याला कुटुंबाच्या अब्रूशी जोडले जाते. मुलगी म्हणजे कुटुंबाची अब्रू असे समजले जाते. अर्थात सेक्सबद्दल वैयक्तिक मुक्त विचार बाळगणे हे चारित्र्यहिन असण्याचे लक्षण आहे, ज्यामुळे कुटुंबाची अब्रू चव्हाट्यावर येऊ शकते.

लग्नानंतर हेच संस्कार स्त्रीमध्ये रूजलेले असतात आणि त्यामुळे सेक्सबद्दल आपली इच्छा पतीने व्यक्त करण्यात तिला संकोच वाटू लागतो.

याबाबतीत पुरूषांची मानसिकताही पारंपरिक वर्चस्ववादी विचारांचा पगडा असणारी असते. त्यांना आपल्या पत्नीने सेक्सबद्दल मोकळेपणाने इच्छा व्यक्त करणे असभ्यपणा वाटतो. यामुळेच पुरूष स्त्रियांची यावरून चेष्टा करतात व त्यांच्या भावनांची कदर करत नाहीत. त्यावेळी स्त्रीला आपल्या कोषात राहण्याशिवाय काहीही पर्याय उरत नाही. नंतर हेच पुरूष सेक्सच्यावेळी स्त्री कशी मृतवत पडून असते अशी तक्रारही करतात. यामुळेच सबंधांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते.

स्त्री जेव्हा या साऱ्या समस्यांना पार करून मूल्य आणि अधिकारांचा आनंद घेऊ शकेल तेव्हा ती एखाद्या भोगवस्तूप्रमाणे नाही तर एका खऱ्या जोडीदाराप्रमाणे आयुष्यातील या अमूल्य क्षणांचा उपभोग घेऊ शकेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें