७ सोप्या टीप्स राखतील फिट अॅन्ड फाइन

* मोनिका अग्रवाल

तुम्ही तंदुरुस्त राहू इच्छित असाल, तर काही टीप्सचा तुम्ही अवलंब केला पाहिजे. तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करता आणि डाएटही कंट्रोल करता. सुरूवात तर एकदम उत्साहाने करता, पण काही वेळाने हा उत्साह धरू लागतो आणि तुम्ही फास्टफूड खायला सुरूवात करता. मग हळु हळु पुर्वपदावर येता, असं तुम्हीच नाही तर प्रत्येक स्त्री करते.

फिट राहण्यासाठी ध्येय ठरवा : तुम्हाला सर्वात आधी ध्येय ठरवावं लागेल की कशाप्रकारे तुम्हाला फिटनेस हवा आहे. यासाठी तुम्ही मोठे नाही तर लहान ध्येय ठेवा. फिटनेस दिवा शिल्पा शेट्टीनुसार फिट राहण्यासाठी स्मार्ट ध्येय निश्चित करा. स्मार्ट ध्येय म्हणजे असा व्यायाम करा की जो सहजतेने करता येईल आणि परिणामही लवकर समोर येईल. सुरूवातीच्या दिवसात थोडं अंतरच पळा जे १५-२० मिनिटातच पूर्ण केलं जाऊ शकेल.

ठरवून जेवण तयार करा : कामाची घाई गडबड असो अन्य आणखीन काही महत्वाचा कार्यक्रम असो वेळेवर खाल्लंच पाहिजे. खाण्याची वेळ टाळू नये वा हलगर्जीपणा करू नये. योजना आखून पूर्ण आठवडयासाठी पोषण तत्वांनी परिपूर्ण असं जेवण बनवा. थोडा वेळ काढून पोषक तत्वांनी युक्त जेवण गरम करून खात जा. घरातून बाहेर जाताना आपलं जेवण आणि पाणी सोबत घेऊन जा.

चांगला जोडीदार निवडा : फिट राहण्यासाठी एका चांगल्या साथीदाराची निवड करा. त्यामुळे तुमच्यात उत्साह संचारेल. दोघं एकमेकांना प्रेरित कराल आणि रोजच्या दिनक्रमात उशीर होणार नाही. शक्य असेल तर एखाद्या व्यायाम शिकविणाऱ्या इंस्ट्रक्टरचा सल्ला घ्या.

मनावर नियंत्रण ठेवा : समजा बर्गर, पिझ्झा, चाट तुमची आवड आहे आणि तुम्ही ते बघून स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही, तर आपला मार्ग बदला. खाण्याची इच्छा झाली, राहावलं नसेल तरी या भावनांवर नियंत्रण ठेवणं आपल्याच हाती आहे.

व्यायामाचा आनंद घ्या : फक्त कॅलरी कमी करायची आहे, हा विचार करून व्यायाम करू नका. तुम्हाला जे काम करायला आवडतं जसं की घराची सफाई, बागकाम, नृत्य यासारखी कामं मन लावून करा. आनंद घेत बॅडमिंटन, रश्शीउडया, टेनिस खेळणे वगैरे फिटनेस मेण्टेन करायचे सोपे प्रकार आहेत.

स्वत:ला बदला : जर दररोजच्या आयुष्याला कंटाळला असाल तर काहीतरी नवीन करा, ज्याने तुम्हाला आनंद मिळेल. जेव्हा फार कंटाळा येईल, तेव्हा काहीतरी नवीन करा, मग भले ते स्वयंपाक करणं असेल किंवा डांसिंग असेल किंवा इतर काही हलकफुलकं जे तुम्ही ऐन्जॉय कराल.

व्यस्त राहा स्वस्थ रहा : बारीक व्हायचं आहे, हा विचार करुन स्वत:ला त्रास करून घेऊ नका. काहीच न खाणं किंवा शिळं अन्न खाणं योग्य नाही. मनावर नियत्रंण ठेवून हलकंफुलकं आणि पौष्टीक खा. भरपूर पाणी प्या. उपाशी पोटी राहू नका आणि नियमित व्यायाम करा. विश्वास ठेवा तुम्हाला पाहुन आरसाही लाजेल.

धावण्यापूर्वी हे नक्की माहिती करून घ्या

* डॉ. विनोद गुप्ता

शरीर निरोगी ठेवण्यासाठी काही लोक जिममध्ये जाऊन घाम गाळतात, तर काही घरातच व्यायाम करतात. काही मॉर्निंग वॉकला जातात, तर काही धावतात. जर तुम्हीही धावून निरोगी बनू इच्छित असाल तर ही चांगली गोष्ट आहे, पण धावण्यापूर्वी काही गोष्टी माहिती करुन घेणे गरजेचे आहे, अन्यथा फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, रोज १ तास धावून तुम्ही सुदृढ आणि निरोगी राहू शकता. सोबतच तुमचे आयुष्यही ३ वर्षांपर्यंत वाढवू शकता. १८ ते १०० वर्षे वयापर्यंतच्या या ५५ हजार लोकांच्या जीवनमानाचा अभ्यास करुन संशोधक या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले की, कोणत्याही व्यायामाच्या तुलनेत धावल्यामुळे शरीरातील ताकद आणि आयुष्य दोन्हीही सर्वात जास्त वाढते. या संशोधानातील प्रमुख अमेरिकेच्या ‘आयोवा स्टेट युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक डकचुल्ली यांच्या मते, अभ्यासात असे निदर्शनास आले की, अन्य व्यायाम करणाऱ्या लोकांच्या तुलनेत धावणारे दीर्घ काळपर्यंत जगतात. लवकर मरण येण्यासाठी जबाबदार ठरणाऱ्या गोष्टींशी लढण्याची ताकद धावणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त असते.

सर्वसाधारण लोकांच्या तुलनेत रोज धावणाऱ्यांना हृदयरोगाच्या झटका येण्याची शक्यता २५ टक्क्यांपर्यंत कमी असते. धावणे निरोगी राखते, जो चांगल्या आरोग्यासाठी मुख्य समजल्या जाणाऱ्या निर्देशकांपैकी एक आहे. रोज १ तास धावल्यास लवकर मरण येण्याची शक्यता ४० टक्क्यांपर्यंत कमी होते. धावल्यामुळे संपूर्ण शरीराच्या सर्व अवयवांचा चांगला व्यायाम होतो. पायांव्यतिरिक्त हृदय, फुफ्फुस इत्यादींचाही व्यायाम होतो आणि त्यांची कार्यक्षमता वाढते.

धावायची सुरुवात कधी करावी?

विशेषज्ज्ञांच्या मते, लठ्ठपणा कमी करण्यासाठी डायटिंग करण्याची नव्हे तर धावण्याची गरज आहे. तुम्ही आधीपासूनच धावत असाल तर लठ्ठपणा कधीच येणार नाही. धावल्यामुळे मांसपेशी सशक्त होतात. अधिक क्षमतेने कार्य करू लागतात. धावल्यामुळे पोटाच्या मांसपेशींचाही व्यायाम होतो. डायबिटीसही नियंत्रणात ठेवता येतो, कारण यामुळे बऱ्याच प्रमाणात कॅलरीज जाळल्या जातात किंवा बर्न होतात.

धावल्यामुळे निरोगी राहण्यास मदत होतेच, शिवाय याला नैराश्य दूर करण्यासाठीही सर्वात प्रभावी मानले जाते, कारण ९७ टक्के लोकांना याची प्रचिती आली आहे की, धावल्यामुळे त्यांच्या मानसिक आणि भावनात्मक आरोग्यातील सुधारणेसाठी मदत झाली. या सव्हेक्षणात मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि जयपूर अशा ४ शहरांमधील लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते. सकाळी धावल्यामुळे जास्त ऑक्सिजन मिळते, जे फुफ्फुसांसाठी खूपच गरजेचे असते.

धावल्यामुळे रक्तप्रवाह गतिमान होतो. यामुळे शरीरातील वाहिन्या सक्षम होऊन चांगल्या प्रकारे कार्य करू लागतात.

जर तुम्ही कधीच धावला नसाल तर पहिल्याच वेळी जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात पायी चालण्याने म्हणजेच मॉर्निंग वॉकने करा. मॉर्निंग वॉकवेळी सुरुवातीला सामान्यपणे चालतो तसेच चालत रहा. त्यानंतर थोडे वेगाने चालण्याचा प्रयत्न करा. जॉगिंगही करा. त्यानंतर जेव्हा धावायची सुरुवात कराल तेव्हा कमी अंतरच धावा आणि धावण्याचा वेग जास्त ठेवू नका. प्रत्येक आठवडयाला धावण्याचे अंतर आणि वेग वाढवत रहा. झेपेल तेवढेच धावा.

कधी आणि किती धावावे?

मोसमानुसार धावण्याच्या वेळेत बदल करता येईल. गरमीत सकाळी ५ ते ७ वाजण्याच्या दरम्यानची वेळ योग्य ठरू शकते. तर थंडीच्या दिवसांत सकाळी ७ ते ८ वाजण्याच्या दरम्यान तुम्ही धावू शकता. गरमीत डिहायड्रेशनची शक्यता जास्त असते. म्हणूनच धावण्यापूर्वी पाणी अवश्य प्या, कारण धावताना खूप घाम येतो. थंडीत मांसपेशी ऊबदार ठेवणे गरजेचे असते. यासाठी वॉर्मअप करता येईल.

काही कारणास्तव तुम्ही मॉर्निंग वॉकवेळी धावू इच्छित नसाल तर ही क्रिया संध्याकाळीही करू शकता. लक्षात ठेवा की, संध्याकाळचा नाश्ता आणि धावण्याच्या दरम्यान ३ तासांचा कालावधी असायलाच हवा. दररोज किती वेळ आणि किती अंतरापर्यंत धावायला हवे याबाबत काहीच निश्चित ठोकताळे नाहीत. हे माणसाचे वय, लिंग आणि शारीरिक क्षमतेवर अवलंबून असते.

धावण्यापूर्वी काही लोक अनवाणी धावतात, पण ते योग्य नाही. धावण्यासाठी विशेष प्रकारचे बूट असतात, ते घालूनच धावायला हवे. बूट तुमच्या पायांच्या मापाचेच हवेत. दुसऱ्यांचे बूट घालून धावणे धोकादायक ठरू शकते. चांगले बूट धावताना पायांना आधार मिळवून देतात. मापाचे नसलेले बूट धावताना अडचणीचे ठरतात.

धावणे भलेही चांगला व्यायाम आहे, पण तो सर्वांसाठीच उपयुक्त नाही. धावणे सुरू करण्याआधी डॉक्टरांकडून संपूर्ण बॉडीचा चेकअप करुन घ्यायला हवा. त्यांनी परवानगी दिली तरच धावावे. तुम्हाला एखादा आजार किंवा आरोग्यासंबंधी काही समस्या असेल तर त्याबाबत डॉक्टरांना नक्की सांगा. जसे की, हाय बीपी, डायबिटीस, थायरॉईड, अस्थमा, टीबी इत्यादी असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि पुरेशी काळजी घेऊनच धावा.

तुम्ही आतापर्यंत टीएमटी, ईसीजी आणि इकोकार्डिओग्राफी केली नसेल तर सर्वात आधी या टेस्ट करुन घ्या. यामुळे तुम्हाला हृदयासंबंधी एखादी समस्या तर नाही ना, हे डॉक्टर सांगू शकतील. एखादा हृदयरोगी जास्त धावण्याचा प्रयत्न करत असेल तर ते त्याच्यासाठी जीवघेणे ठरू शकते. त्याला हार्टअटॅक येऊ शकतो किंवा हार्ट फेल्युयर होऊ शकते.

तुम्ही धुम्रपान करत असाल तर धावणे तुमच्यासाठी योग्य नाही. त्यामुळे धावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे हेच योग्य ठरेल.

नुकतेच एखादे ऑपरेशन झाले असेल तर धावणे टाळा. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास अशक्तपणा येतो. त्यामुळेच हिमोग्लोबीन सामान्य स्तरापर्यंत येत नाही तोपर्यंत धावू नका.

अशा बना स्लिम ट्रिम व सुंदर

* मोनिका गुप्ता

प्रत्येक मुलीची इच्छा असते की ती स्लिम ट्रिम व सुंदर दिसावी, परंतु आजकालची तरुण पिढी फास्टफूडसाठी इतकी क्रेझ आहे की चवीसाठी काहीही खाणे पसंत करते. जेव्हा की खाण्या-पिण्याची ही सवय शरीराच्या ठेवणीला बिघडवते. जर तुम्ही सतत फास्ट फूडचे सेवन करीत असाल व तेही शारीरिक मेहनत वा एक्सरसाइजशिवाय, तर लठ्ठपणाशी दोस्ती होणे तर नक्की आहे.

टेस्ट बिघडवते तब्येत

खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी व चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरात एक्स्ट्रा फॅट जमा होऊ लागते. त्यामुळे वजन वाढते व आपण वजनवाढीसारख्या समस्यांच्या विळख्यात सापडतो. आजकालच्या तरुण मुलींना जिभेची चव घेणे छान जमते, परंतु या चवीसोबतच आणखी स्लिम ट्रिम बनण्याचे स्वप्न स्वप्नच राहून जाते.

शरीरात जेव्हा फॅट जमा होऊ लागते, तेव्हा याचा सगळयात जास्त परिणाम कंबर व पोटावर होतो. हे दोन शरीराचे असे भाग आहेत, जिथे चरबी सगळयात जास्त साठते, ज्याने लक्षात येतं की आपण जाड होतोय. त्यामुळे काही मुली ज्या कालपर्यंत पिझ्झा-बर्गर इत्यादी खाणे पसंत करत होत्या, त्या आपलं डाएट लगेच बरंच कमी करतात व औषधांचा आधार घेऊ लागतात, जे अजिबात योग्य नाही.

सादर आहेत लठ्ठपणा कमी करण्याचे काही उपाय :

वाढलेले पोट व कंबरेमुळे मुली आवडते ड्रेस घालणे सोडून देतात, परंतु आवडते ड्रेस घालणे सोडण्यापेक्षा जास्त चांगलं आहे की तुम्ही फास्ट फूड खाणं सोडून द्यावे.

मध व लिंबू : सकाळी उपाशीपोटी हलक्याशा कोमट पाण्यात मध व लिंबाचा रस मिसळून प्यावे. असे करणे पोटाची अतिरिक्त चरबी कमी करते.

अंडयाचा पांढरा भाग : कंबर व पोटाची चरबी कमी करण्यासाठी अंडयाच्या पांढऱ्या भागाचे सेवन नाश्त्यामध्ये नक्की करावे. यात प्रोटीन व अमिनो अॅसिड दोन्ही जास्त मात्रेत असतात.

बदाम : बदामात व्हिटॅमिन्स व मिनरल्स पुष्कळ प्रमाणात असतात. रोज सकाळी भिजवलेले बदाम नक्की खावेत. यांनी शरीराला उष्णता व ऊर्जा दोन्ही मिळतात व बॉडीचे अतिरिक्त फॅटदेखील कमी होते.

ब्राउन राईस : ब्राउन राईस फॅट फ्री असतो. यात कॅलरीचे प्रमाण नगण्य असते. हे खाल्ल्याने शरीरात लठ्ठपणा येत नाही.

पाणीयुक्त भाज्या व फळे : पाणीयुक्त भाज्या व फळे याचा अर्थ अशी फळे व भाज्या, ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त असेल, जसे की दुधी भोपळा, गाजर, कांदा, काकडी, टरबूज, पपई, टोमॅटो यांचे सेवन केल्याने शरीरातील फॅट लवकर कमी होते.

जाड रवा : जाड रव्यामध्ये कॅलरी अजिबात नसतात. फॅट फ्री बॉडी मिळवण्यासाठी हे सगळयात बेस्ट आहे. जाड रवा खाल्ल्याने भूकदेखील लवकर लागते व ऊर्जादेखील भरपूर मिळते.

पाण्याचे सेवन : जास्त पाणी प्यायल्याने चेहऱ्याचे सौंदर्य अबाधित राहते.

हिरव्या भाज्या : कॅलरी बर्न करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये हिरव्या भाज्या जरूर समाविष्ट कराव्यात.

काय खाऊ नये

* जास्त तेल, मसालेयुक्त पदार्थांपासून दूर राहावे.

* बाहेरचे खाणे बंद करावे.

* अधिक गोड पदार्थांचे सेवन करू नये.

* छोले, राजमा, भात यांचे अधिक सेवन करू नये.

कंबर व पोट पातळ ठेवण्यासाठी एक्सरसाइज

बेस्ट फिगरसाठी योग्य डाएटसोबतच एक्सरसाइज करणेदेखील अत्यंत गरजेचे आहे. या व्यायामाने बॉडी फॅट कमी करून आपली कंबर स्लिम दाखवू शकता.

डबल लेग एक्सरसाइज : पाठीवर झोपून दोन्ही पायांना वरकरून दोन्ही गुडघ्यांना मधून वाकवावे. पाच सेकंदांपर्यंत हातांनी पायांना पकडून ठेवावे. असे सात ते आठ वेळा करावे.

कात्री एक्सरसाइज : हा कंबर बारीक करण्यासाठी बराच लाभदायक आहे. हा व्यायाम करण्यासाठी पाठीवर झोपून दोन्ही पाय वर उचलावेत व नंतर उजवा पाय खाली आणून सरळ करावा. आता डाव्या पायाला खाली आणून सरळ करावे.

दोरीवरच्या उडया : कंबर बारीक करण्यासाठी हा व्यायाम बराच फायदेशीर आहे. हा कंबर बारीक करण्यासोबतच स्नायुंनादेखील मजबूत बनवतो.

बायसिकल क्रंचेस : पाठीवर झोपून दोन्ही पाय हवेत सायकलसारखे चालवावेत. यामुळे पोट जांघा व कंबरेची चरबी कमी होते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें