रिमझिम पावसातील चटकदार स्वाद : मान्सून स्पेशल

* पाककृती सहकार्य : संजय चौधरी

  • पालक रताळं जॅलेपीनो टिक्की

साहित्य

* २५० ग्रॅम ताजा पालक

* २५० ग्रॅम रताळं

* २ मोठे चमचे चिरलेली जॅलेपीनो

* २ मोठे चमचे चिरलेला कांदा

* १ मोठा चमचा आलं

* १ मोठा चमचा चिरलेली लसूण

* १ चिमूटभर गरम मसाला

* १ चिमूटभर भाजलेलं जिरं

* १ लिंबाचा रस

* मीठ चवीनुसार

* तळण्यासाठी तेल.

कृती

पालक भाजी स्वच्छ धुवून कापून घ्या. रताळं ओवनमध्ये बेक करा. मग त्याची साल काढून किसून घ्या. आता पालक मीठ मिश्रित पाण्यात ४५ सेंकद शिजवून घ्या. मग तो गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात घाला. पालक पाण्यातून काढून घ्या. आता सर्व साहित्य एकत्रित करून लहान गोले बनवून हाताने दाबून त्याला टिक्कीचा आकार द्या. मग तेल गरम करून मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत फ्राय करून चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

रिमझिम पावसातील चटकदार स्वाद : मान्सून स्पेशल

* पाककृती सहकार्य : संजय चौधरी

  • थ्री कोबी भजी

साहित्य

* १८० ग्रॅम सफेद कोबी

* १८० ग्रॅम लाल कोबी

* १८० ग्रॅम चायनीज कोबी

* ५० ग्रॅम चिरलेला कांदा

* १ लहान चमचा चिरलेलं आलं

* १ लहान चमचा चिरलेली लसूण

* १ कप बेसण

* २ मोठे चमचे दही

* १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबिर

* १ लहान चमचा धणे पावडर

* अर्धा लहान चमचा जिरे

* चिमूटभर लाल मिरची पावडर

* १ लहान चमचा चिरलेली हिरवी मिरची

* तळण्यासाठी तेल

* मीठ चवीनुसार.

कृती

तिन्ही प्रकारची कोबी स्वच्छ करून कापून एका भांड्यात मिसळून घ्या. मग सर्व साहित्य एकत्रित करा. बेसणाचे घोळवून त्याचे मऊ गोळे बनवा. आता हे मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत डीप फ्राय करा. लसूण चटणीसोबत सर्व्ह करा.

  • मँगो मालपोहे

साहित्य

* दीड कप मैदा

* १ चिमूट वेलची दाणे

* १ मोठा चमचा रवा

* १ कप दूध

* १ मोठा चमचा दही

* १ चिमूट बडीशेप

* अर्धा कप ताज्या आंब्याचा गर

* ४ मोठे चमचे ताज्या आंब्यांचे तुकडे

* तळण्यासाठी देशी तूप

* १ कप साखरेचा पाक.

कृती

एका मोठ्या बाउलमध्ये मैदा, रवा, बडीशेप, वेलची, आंब्याचा गर, दही आणि दूध मिसळून मिश्रण बनवा. मग हे मिश्रण ३ तास फ्रिजमध्ये ठेवा. आता एका तव्यावर तूप गरम करून पॅन केक म्हणजेच मालपोहा बनवा. दोन्हीकडून पॅन केक भाजून घ्या. आता गरम पाकामध्ये पॅन केक डिप करा. अतिरिक्त पाक काढून प्लेटमध्ये ठेवा. आंब्याच्या तुकड्यांनी सजवून सर्व्ह करा.

  • राजमा समोसा

साहित्य

* १८० ग्रॅम मैदा

* २ मोठे चमचे रिफाइंड

* चिमूटभर ओवा

* मीठ चवीनुसार

* मिश्रणाचे साहित्य

* १२० ग्रॅम राजमा

* २ मोठे चमचे चिरलेला कांदा

* २ मोठे चमचे चिरलेलं आलं

* १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर

* चिमूटभर जिरा पावडर

* १ लहान चमचा चिरलेली हिरवी मिरची

* अर्धा लिंबाचा रस

* चिमूटभर लाल मिरची पावडर

* मीठ चवीनुसार.

कृती

मैदा, तेल, ओवा आणि मीठ मिसळून कोमट पाण्याने घट्टसर पीठ मळून घ्या. मग पीठ एका कापडात गुंडाळून ३ तास ठेवा. राजमा मऊ होईपर्यंत शिजवा. आता मिश्रणातील अन्य साहित्य राजम्यामध्ये कुस्करून एकत्रित मिसळा. आता पिठाचे लहान गोळे बनवून पुऱ्या लाटा. त्यात मिश्रण भरा आणि समोशाचा आकार द्या. कडा हलकेच दाबून बंद करा. आता समोसे गरम तेलामध्ये सोनेरी होईपर्यंत तळून सर्व्ह करा.

आंब्याचे रसरशीत पदार्थ

*प्रतिनिधी

मँगो कोल्ड सूप

साहित्य

* २ आंबे

* अर्धा छोटा चमचा जलजीरा

* ६० ग्रॅम दही
* १ मोठा चमचा लोणी

* पाव छोटा चमचा पांढरी मिरीपूड

* शेव इच्छेनुसार

* १ मोठा चमचा क्रीम

* अर्धा छोटा चमचा गुलाबपाणी

* मीठ व साखर चवीनुसार.

कृती

आंब्याचा गर काढून घ्या. मिक्सरमध्ये आंब्याचा गर, दही, साखर, मीठ, जरजीरा, काळीमिरी पूड, गुलाबपाणी व क्रीम घालून मिक्समधून फिरवून घ्या. कढईत लोणी गरम करून त्यात हे तयार मिश्रण ओतून शिजवून घ्या. फ्रिजमध्ये थंड करून मँगो कोल्ड सूपवर आंब्यांचे तुकडे, जलजीरा पावडर, शेव व क्रीम घालून सर्व्ह करा.

मँगो भल्ले

साहित्य

* २ आंबे

* १०० ग्रॅम मूगाची डाळ

* अर्धा छोटा चमचा आले किसलेले

* २०० ग्रॅम दही

* १ मोठा चमचा चिंचेची चटणी

* १०० ग्रॅम तेल

* अर्धा छोटा चमचा भाजलेले जिरे पूड

* १ मोठा चमचा बेसन पीठ

* १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर चटणी

* साखर व लाल तिखट चवीनुसार

* मीठ चवीनुसार.

कृती

मूगाची डाळ ३ तास पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर अर्धी डाळ भरड व अर्धी डाळ व्यवस्थित बारीक वाटून घ्या. एक आंब्याचा गरही मिक्सरवर फिरवून घ्या. एका भांड्यात डाळ, २ मोठे चमचे आंब्याचा गर, आले, बेसनपीठ व इतर मसाल्याचे साहित्य घालून व्यवस्थित मिसळून घ्या. कढईत तेल गरम करून भल्ले सोनेरी रंगावर तळून घ्या. गरम पाण्यात तयार भल्ले टाका. दह्यामध्ये आंब्याचा गर व मसाले घालून फेटून घ्या. दह्यात मँगो भल्ले पाणी निथळून घेऊन घाला. त्यावर चिंचेची चटणी, मीठ, जिरे, मिरची पूड, आंब्याचा गर, कोथिंबीरीची चटणी घाला. फ्रिजमध्ये थंड करा. सर्व्ह करताना पुन्हा थोडी चिंच व कोथिंबीर चटणी, आंब्याचे काप व जिरेपूड घालून सर्व्ह करा.

आंब्याचे रसरशीत पदार्थ

*प्रतिनिधी

मँगो लस्सी

साहित्य

* २ कप आंब्याचा गर

* १ कप दही

* अर्धा लिटर दूध

* साखर चवीनुसार

* अर्धा कप आमरस

* पाव छोटा चमचा वेलची पूड

* पाव छोटा चमचा केशर सजवण्यासाठी.

कृती

सर्व साहित्य एकत्र मिसळून ब्लेंडरमधून फिरवून घ्या व केशराने सजवून सर्व्ह करा.

कैरीचे पन्हे

साहित्य

* २ कैरीचे साल काढून कापलेले तुकडे

* अर्धा कप साखर

* पाव छोटा चमचा केशर

* अर्धा छोटा चमचा वेलची पूड.

कृती

एका भांड्यात कैरीचे तुकडे व साखर मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. हे मिश्रण ब्लेंड करून यात वेलची पूड व केशर मिसळा आणि सर्व्ह करा. जर थोडे पातळ हवे असेल तर इच्छेनुसार पाणी मिसळा.

हलकेफुलके पदार्थ

* पाककृती सहकार्य : लतिका बत्रा

झटपट गाजर हलवा

साहित्य

* १ किलोग्रॅम गाजर

* १ वाटी साखर

* २ चमचे देशी घी

* २ लहान वेलदोडे

* बदाम, काजू व मगज आवडीनुसार

* २५० ग्रॅम खवा.

कृती

गाजर किसून घ्या. मग साखर आणि गाजराचा किस एकत्र काढीत कढईच्या आचेवर शिजायला ठेवा. ५-७ मिनिटात जेव्हा साखरेचे पाणी आटेल तेव्हा त्यात देशी घी टाकून परतून घ्या. सुका मेवा तळून मिसळा. शेवटी खवा मिसळून काही वेळ परतत राहा. तुमचा गाजर हलवा तयार आहे.

मंचाव सूप

साहित्य

* ४ कप भाज्यांचा स्टॉक

* १ कप बारीक कापलेले कोबी, गाजर, मशरूम, पातीचा कांदा,
पनीर, बीन्स

* ४ टोमॅटो

* १ मोठा चमचा बटर

* १ लहान चमचा चिली सॉस

* एक मोठा चमचा व्हिनेगर

* मीठ चवीनुसार.

कृती

एका पॅनमध्ये बटर गरम करून त्यात सगळया भाज्या थोडा वेळ परतून घ्या. आता भाज्यांचा स्टॉक टाका. टोमॅटो उकळून किसून घ्या. त्या उकळलेल्या स्टोकमध्ये टोमॅटोचा गर टाकून थोडा वेळ शिजवा. दोन्ही सॉस आणि मीठ मिसळा. गॅस बंद करून त्यात पातीच्या कांद्याची पात मिसळा. तळलेल्या न्युडल्ससोबत गरमगरम सर्व्ह करा.

आल्याची भाजी

रुचिता जुनेजा कपूर

साहित्य

* १०० ग्रॅम आले
* ५-६ लसूण पाकळ्या

* १ छोटा कांदा
* १ छोटा टोमॅटो
* १० एम.एल. दूध
* १० एम.एल तूप
* अर्धा छोटा चमचा लाल तिखट
* अर्धा छोटा चमचा हळद
* अर्धा छोटा चमचा बडिशेप
* अर्धा छोटा चमचा जिरे

* अर्धा छोटा चमचा ओवा
* कोथिंबीर व आल्याचे ज्युलिअन्स सजावटीसाठी

* मीठ चवीनुसार

कृती

कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. कढईमध्ये तूप गरम करून त्यात जिरे आणि बडीशेप घालून परता. मग आलं-लसूण घाला. नंतर कांदा आणि टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्या. यात हळद व लाल तिखट आणि मीठ घाला. थोडं पाणी घालून कांदा व्यवस्थित शिजेल असा परतून घ्या. या मिश्रणात दूध घाला आणि एक उकळी काढा. शिजल्यावर कोथिंबीर आणि आल्याचे ज्युलिअन्स घालून सर्व्ह करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें