मिळून मिसळून करा दिवाळीचा आनंद साजरा

* शैलेंद्र सिंह

लनानंतर प्रिया पहिल्यांदाच पतीसोबत दुसऱ्या शहरात आली होती. तिच्या पतीचा ‘दृष्टी रेसिडेन्सी’मध्ये खूपच सुंदर फ्लॅट होता. स्वत:च्या शहरात प्रियाचे छानसे कुटुंब होते. सण-उत्सवांवेळी सर्व जण मिळून मिसळून आनंद साजरा करायचे. त्यामुळेच जसजशी दिवाळी जवळ येत होती तसा या नवीन घरात तिला जास्तच एकटेपणा जाणवू लागला होता. काय करावे, तिला काहीच समजत नव्हते. पती प्रकाशशी बोलल्यानंतर तिच्या लक्षात आले की त्याचे बहुतेक मित्र बाहेरून कामासाठी येथे आलेले आहेत. दिवाळीला घरी परत जाण्यासाठी त्यांनी आधीच तिकीट काढून ठेवले आहे.

यातील काही जण होते जे प्रियाच्या या नव्या घरापासून दूर राहत होते. प्रियाने तिच्या निवासी संकुलात राहणाऱ्या काही कुटुंबांशी अल्पावधीतच चांगली ओळख करून घेतली होती. त्या सर्वांशी बोलल्यानंतर प्रियाला समजले की, या संकुलातील काही जण दिवाळी साजरी करतात. पण ती घराच्या चार भिंतींआडच साजरी केली जाते. अगदी खूपच काही वाटले तर एखाद्या मित्राला भेटवस्तू देऊन सण साजरा केल्याचा आनंद घेतला जातो. हे ऐकल्यावर प्रियाने ठरवले की, यंदा दिवाळी नव्या पद्धतीने साजरी करायची. दृष्टी रेसिडेन्सी खूपच चांगल्या ठिकाणी बांधण्यात आली होती. संकुलाजवळ हिरवेगार उद्यान होते. प्रियाने उद्यानाची देखभाल करणाऱ्याला सांगून उद्यानाची साफसफाई करून घेतली.

त्यानंतर तिने एक सुंदरसे दिवाळी कार्ड तयार केले. त्याच्या काही रंगीत छायांकित प्रती काढल्या आणि आपल्या निवासी संकुलात राहणाऱ्यांसाठी चहा, दिवाळीचे पदार्थ, मिठाईची व्यवस्था केली. तिने दृष्टी रेसिडेन्सीमधील सर्वच ५० फ्लॅटमधील लोकांना निमंत्रण दिले होते. बहुतेक सर्व जण येतील, असा विश्वास तिला होता. संध्याकाळी पती प्रकाश कामावरून आल्यानंतर प्रियाने त्याला याबाबत सर्व सांगितले. सुरुवातीला प्रकाशचा यावर विश्वासच बसत नव्हता, पण प्रियाने यासाठी केलेली सर्व तयारी पाहून तो खूपच आनंदित झाला. प्रकाशने प्रियाला पाठिंबा देत दिवाळी कार्यक्रमाचा आनंद अधिक वाढविण्यासाठी प्रदूषणमुक्त फटाके आणले. गीत-संगीताची मजा घेण्यासाठी डीजेचीही व्यवस्था केली.

रात्री ८ वाजता प्रकाश आणि प्रिया नटूनथटून उद्यानात आले. थोडया वेळानंतर एकेक करून सर्व येऊ लागले. दिवाळीचे एक नवीनच रूप पाहायला मिळत होते. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम सुरू होता. नाचगाणे, मौजमजा, असे सर्वच उत्साह वाढवणारे होते. त्यानंतर फुलबाज्या, फटाके फोडण्यात आले. दिवाळीनिमित्त इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांनी प्रियाचे मनापासून आभार मानले. प्रियाने जी सुरुवात केली त्याचा कित्ता दरवर्षी गिरवण्यात येऊ लागला. आता अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठी सर्व कुटुंबं मिळून मिसळून काम करू लागली. यासाठी होणारा खर्चही आपापसात वाटून घेण्यात येऊ लागला. लोक वाढू लागले तसा कार्यक्रमातील आनंदही वाढू लागला. दिवाळी हा रात्रीचा उत्सव आहे. अशा वेळी दिवे आणि फटाक्यांची मजा खूपच वेगळी असते. दिवाळीचा फराळ आणि मिठाईमुळे हा आनंद द्विगुणित होतो.

खर्च कमी करा आणि मजा वाढवा

मिळून मिसळून सण-उत्सव साजरे केल्यामुळे या सण-उत्सवांसाठी येणारा खर्च कमी होतो आणि आंनद वाढतो. आपले घर, कुटुंबापासून दूर राहूनही घराइतकाच आंनद साजरा करता येऊ शकतो. आजकाल बहुसंख्य लोक नोकरीनिमित्त, कमाईसाठी आपले शहर आणि घरापासून दूर दुसऱ्या शहरात राहतात. त्यांना सणांसाठी घरी जायला सुट्टी घ्यावी लागते. आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वे, बस, विमानाचे महागडे तिकीट काढावे लागते. अनेक अडचणी येत असल्यामुळे आपल्या घरी जाणे अनेकदा त्यांच्यासाठी त्रासदायक होते. अशावेळी सण-उत्सवांचे असे वेगळया प्रकारे करण्यात येणारे आयोजन उत्साह वाढवणारे ठरते. मिळून मिसळून आयोजन करण्यात येत असल्यामुळे सर्व लोक एकत्र येतात. एकत्र मिळून सर्व कामे करतात. त्यामुळे कोणी कोणावर ओझे ठरत नाही. कमी खर्चात उत्सवाचे उत्साहात आयोजन करता येते. कुटुंब सोबत असल्यामुळे पती आपल्या मित्रांसोबत दारू पिणे, पत्ते खेळणे अशा व्यसनांपासून दूरच राहणे पसंत करतो.

गवसेल प्रत्येक नाते

सण-उत्सवांसाठी एकत्रितपणे करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे दूर गेलेले प्रत्येक नाते गवसते. ज्यांचे आईवडील सोबत नसतात त्यांना इतरांच्या कुटुंबात राहणाऱ्या आईवडिलांची सोबत मिळते. कोणाला दादा-वहिनी, काका-काकी, भावोजी-भावजय, मुलगा-मुलगी आणि बहिणीसारखे प्रत्येक नाते कोणत्या ना कोणत्या कुटुंबातून मिळतेच. आपापसात जी मैत्री आधीपासूनच होती ती अधिकच घट्ट होते. सणांवेळी एकत्र आल्यामुळे मिळून मिसळून आनंद साजरा केला जातो, सोबतच गरज पडल्यास दु:खही समजून घेऊन ते दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. धर्म, रूढी-परंपरा आणि संकुचित चालीरीती या माणसांचे विभाजन करण्याचे काम करतात. पण, सण-उत्सवांचा आधार घेऊन माणसांमध्ये जात, बुरसटलेल्या विचारांमुळे निर्माण झालेली दरी दूर करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो.

आज त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंब पद्धती पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुले विविध नाती आणि त्यांच्यामध्ये दडलेला प्रेमाचा ओलावा, आपलेपणा यापासून दुरावत आहेत. जर अशा प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले तर त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबात राहूनही काही प्रमाणात का होईना, पण मोठया, एकत्र कुटुंबातील मजा अनुभवता येईल.

मजेदार ठरतील कार्यक्रमातील खेळ

अशा कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी काही खेळांचेही आयोजन करता येऊ शकते. मात्र प्रत्येक वयोगटातील माणसांना नजरेसमोर ठेवूनच अशा खेळांचे आयोजन करायला हवे. यामुळे उत्सवातील उत्साह अधिकच वाढेल. वेळ मजेत जाईल. गीत-संगीताचेही आयोजन करायला हवे. यात सर्वांनी सहभागी व्हायला हवे. प्रत्येकामध्ये एखादे तरी कौशल्य असतेच. सर्वाना त्यांच्या कौशल्यानुसार काम द्यायला हवे. अशावेळी मुलांकडेही दुर्लक्ष होता कामा नये. त्यांनाही त्यांची आवड लक्षात घेऊन एखादे छोटेमोठे काम द्यायला हवे. कार्यक्रमाच्या एकत्रितपणे केलेल्या आयोजनामुळे दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे प्रदूषणही कमी करण्यास मदत होते.

कार्यक्रमाच्या अशा प्रकारे मिळून मिसळून केलेल्या आयोजनामुळे सण-उत्सवांतील आनंद द्विगुणित होतो. अनेक धर्माचे लोक एकाच सोसायटीत राहत असल्यामुळे तेही या सणांचा एक भाग बनतात. यामुळे विविध ठिकाणची संस्कृती आणि खाद्यपदार्थांचीही देवाण-घेवाण होते. आजकाल ज्या प्रकारे आपापसातील दरी वाढत आहे ती कमी करण्याचे एक माध्यम म्हणजे सण-उत्सवांतील आनंद मिळून मिसळून साजरा करणे हे आहे. फक्त निवासी  संकुलातच नव्हे तर छोटया वसाहती, चाळी, विविध शहरांमध्ये तसेच गावागावांमध्येही दिवाळी उत्सवाचे आयोजन सर्वांनी एकत्र येऊन करायला हवे. यामुळे समाजात नव्याने प्रेम आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल.

छोट्याछोट्या आनंदाने नात्यांमध्ये आणा गोडवा

* गरिमा पंकज

दिवाळी एक प्रकारे अंधारातून प्रकाशाकडे सैर करणारा सण आहे. प्रकाशाचं हे पर्व चंद्रप्रकाशात उजळलेल्या पौर्णिमेला नाही तर चहुबाजुंनी पसरलेल्या अंधारालादेखील परिभाषित करणाऱ्या अमावस्येचा दिवस असतो. म्हणजेच जेव्हा चहूबाजूंनी अंधार पसरलेला असेल, तेव्हाच आपल्याला प्रकाश आणायचा आहे. आनंदाचा शोध करायचा आहे. आनंद आपल्या आजूबाजूलाच आहे, जो छोटयाछोटया गोष्टींमध्ये लपलेला आहे. आपल्याला तो जमा करायचा आहे. दिवाळी जुन्या, विस्मृतीत गेलेल्या नात्यांना जागविण्याचा आणि निभावण्याचादेखील सण आहे.

आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात जिथे माणसं सतत एकटी होत चालली आहेत,

तिथे आपल्यासाठी दररोज नात्यांचे नवीन रोपटे लावणं खूपच गरजेचं झालंय.

दिवाळीच्या बहाण्याने आपण कुटुंबिय आणि नातेवाईकांसोबत अधिक छान वेळ घालवून घरदार अधिक उजळविण्याची संधी मिळते. तसंही सणवार आनंद वाटण्याचं एक माध्यम आहे. दिवाळीचा सण प्रकाश आणि आनंद घेऊन येतो. यंदाचा हा सण आपल्या कुटुंबीयांसोबत छोटया छोटया गोष्टींचा आनंद घेत साजरा करूया.

घराला द्या क्रिएटिव्ह लूक

* दिवाळीत आपल्या घराच्या सजावटीत थोडा बदल करा. पत्नी आणि मुलांसोबत २ दिवस अगोदरच या कामाला लागा. यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालविण्याची संधी मिळेल. पत्नीसोबत थोडी मस्ती करण्याचादेखील आनंद मिळेल. मुलंदेखील तुमचं नवीन कौशल्य आणि खेळकर क्षण व्यतीत करून आनंदित होतील.

* घराच्या अडगळीतील जुन्या वस्तू फेकण्याऐवजी त्या रियुज करण्याचा प्रयत्न करा. त्यांची दुरुस्ती करा आणि त्यांना नवीन लूक द्या. जसं की तुम्ही जुन्या काचेच्या बाटल्यांचा लॅम्प बनवू शकता आणि जुन्या डब्यांना सजवून कुंडया बनवू शकता. अशाप्रकारे तुमच्या जुन्या सामानाने घराला नवीन लूक देऊ शकता. यामुळे तुमचं घर क्रिएटिव्हिटीसोबतच सजलेलं दिसेल. जे सर्वांना आवडेल देखील. या कामांमध्ये मुलांची मदत घ्यायला विसरू नका.

* अलीकडे तर साधारणपणे लहान मूल असलेल्या सर्वच घरांमध्ये क्ले गेम असतातच. हा एक प्रकारचं रबरासारखा हलका पदार्थ असतो, जो लहान मुलांची इमॅजिनेशन आणि त्यांच्या क्रिएटिव्हिटीला लक्षात घेऊन बनविण्यात आलेला आहे. क्ले एक प्रकारचा खूपच फ्लेझिबल पदार्थ असतो, ज्याला आपण आपल्याला हवा तसा आकार देऊ शकतो. शाळेतदेखील मुलांना क्लेच्या मदतीने नवनवीन वस्तू बनवायला शिकवलं जातं.

तर या दिवाळीत तुम्ही तुमच्या मुलांना होम डेकोरेशनसाठी काही नवीन कलाकृती वा मग डिझाईनर दिवे बनविण्याची प्रेरणा द्या. यासाठी तुम्ही त्यांना मदतदेखील करू शकता. यामुळे मुलांचं मन गुंतेल आणि त्यांना काहीतरी नवीन शिकायलादेखील मिळेल आणि तुमचं त्यांच्यासोबत ट्युनिंगदेखील स्ट्राँग होईल.

* फुलं कायमच सर्वांना आकर्षित करतात. म्हणूनच दिवाळीत घराची सजावट फुलांनी करा. तुम्ही बाजारातून आर्टिफिशियल फुलं आणूनदेखील घराची सजावट करू शकता. यामुळे तुमचं घर सुंदर दिसण्याबरोबरच आकर्षकदेखील दिसेल.

* तुम्ही मुलांसोबत मिळून तुमचे नातेवाईक वा मित्रांसाठी हाताने बनवलेले हॅम्पर्सदेखील बनवू शकता. काही रंगीत थर्माकोल बॉक्स बनवू शकता. चॉकलेट, केक, सुकामेवा इत्यादी सजवून हॅम्पर बनवा. याव्यतिरिक्त काही दिवे, मेणबत्त्या वगैरेदेखील जोडा, जे दिवाळीची अनुभूती देतील. तुमच्या हम्परमध्ये विंड चाईम्स लावा आणि मग बघा मुलं अशी हॅम्पर्स बनवण्यासाठी किती उत्साहित होतात.

* दिवाळीसाठी तुम्ही सुंदर घरातल्या घरात रंगीबेरंगी मेणबत्त्या तयार करू शकता. ज्या तुम्ही स्वत: मुलांसोबत मिळून बनविलेल्या असतील.

* मुलांना सुंदर आणि रंगीत रांगोळीदेखील पहायला आवडते. तुम्ही सोबत असाल तर हे काम त्यांच्यासाठी अधिक छान आणि रोमांचक होऊ शकतं. तुम्ही त्यांना रांगोळी काढायला शिकवून दुसरी कामं करू शकता. रांगोळी काढण्यात मुलं व्यग्र होतील. काही क्रिएटिव्ह करण्याचा आनंददेखील त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल.

* दिवाळीच्या दिवसाला खास बनविण्यासाठी मुलांना दिवाळीशी संबंधित काही कथा सांगा. स्वत:च्या घरातील कुटुंबीयांसोबत या सणाशी संबंधित तुमच्या काही आठवणी ताज्या करा. दिवाळीशी संबंधित काही पुस्तकेदेखील मुलांना देऊ शकता.

दिवाळीच्या अनोख्या भेटवस्तू

* पत्नी आपल्या पतींना दिवाळीत घालण्यासाठी एक सुंदर डिझाईन केलेला पारंपारिक कुर्ता-पायजमा सेट भेट देऊ शकतात.

* तुम्ही तुमच्या कुटुंबियातील सदस्यांचं एक मेमरी कोलाजदेखिल बनू शकता. यामध्ये आतापर्यंतचे आवडते फोटो एक प्रेममध्ये बसवून तुमच्या भिंतीवर लावू शकता. हे सर्वांसाठी सुवर्ण क्षणांची एक संस्मरणीय भेट राहील.

* या दिवाळीत तुम्ही तुमच्या जीवनसाथीला पर्सनलाइज्ड ज्वेलरी सेट देऊन सरप्राईज करू शकता. ज्वेलरी सेटमध्ये पेंडेंट वा अंगठी वा स्वत:च्या आवडीची एखादी वस्तूच्या इनिशियलला जोडू शकता. यामध्ये त्यांचा आवडता रंगदेखील असू शकतो.

* मुलांची खोली वेगळया प्रकारे सजवून त्यांना सरप्राईज करू शकता.

* मुलांना पर्सनलाइज्ड वस्तू खूप आवडतात. जर त्यावर त्यांचा आवडीचा कार्टून बनलेलं असेल तर मग काय विचारूच नका. दुधासाठी कप, वॉटर बॉटल, मुलांचा टॉवेल, कलर्स, पेन्सिल इत्यादींवर स्वत:चं नाव तसंच आवडीच कार्टून बनविल्यास ते खूपच आनंदित  होतील.

* मुलं सणावारी नवीन कपडे घालण्यासाठी खूपच उत्सुक असतात. या दिवाळीत तुम्ही त्यांना ट्रॅडिशनल लूक देऊ शकता. तुम्ही मुलं आणि मुलींच्या ट्रॅडिशनल आणि ट्रेंडी कपडयांसाठी ऑनलाईनदेखील एक्सप्लोर करू शकता.

* मिठाई खासकरून ‘चॉकलेट’ मुलांसाठी सर्वात छान दिवाळीची भेट असेल. तुम्ही काही वेगळया स्टाइलच्या चॉकलेट्स घरच्या घरी बनवू शकता.

सोबत शॉपिंग करा

* दिवाळीसाठी खूप खरेदी करायची असते. हे खूपच थकविणारं काम असतं. परंतु या खरेदीत तुम्ही तुमचा जोडीदार आणि मुलांनादेखील सहभागी केलंत तर तुम्हाला फार त्रास होणार नाही, उलट आनंदच मिळेल.

* तुम्ही तुमची जाऊबाई, दीर वा खास मैत्रीणींना शॉपिंग करण्यासाठी बोलावू शकता. त्यामुळे सर्वांचं आउटिंगदेखील होईल, सोबत वेळ घालविण्याचीदेखील संधी मिळेल. यासोबतच तुमची खरेदी बजेटमध्येदेखील राहील, कारण सर्वजणांनी मिळून शॉपिंग केली तर बचतदेखील होते.

* दिवाळीच्या तयारीच्या दरम्यान अचानक घरी पाहुणे आलेत आणि नेमकं कुटुंबीयांसाठी शॉपिंग करण्यासाठी निघायचं असेल, तर मेकअप करायलादेखील वेळ मिळत नाही. अशावेळी घाईघाईत निघायचं असतं आणि वेळ नसेल तर अजिबात काळजी करू नका. तुम्ही बीबी क्रीम लावा. बीबी क्रीम तुम्हाला मेकअपसारखाच फिनिश देतं. हे लावून तासनतास बसावं लागत नाही. बस तुम्ही ते लावलं आणि तुमचा फेस ग्लो करू लागतो. मग हवं असल्यास पाहुण्यांसोबत बसा वा खरेदीसाठी जा. अशाप्रकारे उलट तुम्ही काही मिनिटात तयार व्हाल.

घरच्या फराळाचा आस्वाद घ्या

* दिवाळीत वेगवेगळया प्रकारचा फराळ घरोघरी  बनत असतो. तुम्हीदेखील बाहेरून भेसळ युक्त मिठाई  खरेदी करण्याऐवजी तुमचे पती आणि मुलांच्या आवडीचं काही स्पेशल ट्विस्ट फराळ बनवून खायला द्या.

* पती किचनमध्ये जाउन काही डिश तयार करू शकतात वा मदत करू शकतात. दररोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो म्हणून हे सर्व शक्य होत नाही. परंतु दिवाळीच्या क्षणी या गोष्टीचा आनंद घ्यायला विसरू नका. विश्वास ठेवा मोठया आनंदाऐवजी अशा छोटया छोटया गोष्टींमध्ये आनंद शोधू शकता.

* जर तुमचे मित्र व नातेवाईक खाण्यापिण्याचे शौकीन असतील, तर तुम्ही बनविलेला फराळ खाण्यासाठी त्यांना घरी बोलवा वा त्यांच्या घरी फराळ घेऊन जा. हवं असल्यास दिवाळी सेलिब्रेशनसाठी रात्री आपल्या सर्व नातेवाईकांना निमंत्रित करा. अशाप्रकारे गेट-टुगेदरदेखील होईल आणि मुलेदेखील या आनंदी वातावरणाचा आनंद घेतील. दिवाळीत सर्वजण मिळून टेस्टी फराळाचा आस्वाद

घेतील तेव्हा नात्यांमध्ये आपलेपणा अधिक वाढेल.

नातेवाईक आणि मित्रांना भेटा

* आजच्या व्यस्त आणि तणावग्रस्त आयुष्यात आपल्याला आपल्या जिवलगांसोबत काही क्षणदेखील घालविण्याची संधी मिळत नाही. परंतु सणवार आपल्याला आपल्या लोकांशी पुन्हा एकदा जोडण्याची संधी देतात. दिवाळीदेखील असाच एक खास सण आहे, जो आपल्याला आपल्या नातेवाईकांना, मित्रांना आणि शेजाऱ्यांना भेटण्याची संधी देतो. अशा प्रकारे पाहायला गेलं तर दिवाळी आपल्या नात्यांना सुमधुर बनविते. तुम्हीदेखील या दिवाळीत असा प्रयत्न करू शकता, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील आनंद अधिक द्विगुणित होईल .

* तुम्ही देखील तुमचा जिवनसाथी आणि मुलांसोबत मिळून आपल्या जवळच्या लोकांच्या घरी जा. त्यांनादेखील आपल्या घरी बोलवा. यादरम्यान खूप गप्पा मारा. जुन्या आठवणी उजळवा आणि नवीन आठवणींचे क्षण जतन करा.

* जर एखाद्या मित्र वा नातेवाईकांसोबत काही कारणामुळे जर दुरावा वाढला असेल तर अशा रागवलेल्या नातेवाईकांचा रुसवा दूर करा. त्यांच्या घरी भेटवस्तू घेऊन जा. त्यांना आपल्या आनंदामध्ये सहभागी करा. प्रत्येक रागरुसवा दूर करून आपलेपणाने हा क्षण साजरा करा. तुमच्या कुटुंबातील सदस्यदेखील यामुळे खूप आनंदित होतील.

दिवाळी धमाका

कथा * पूनम अहमद

एके दिवशी विनय मुंबईतल्या त्याच्या कार्यालयातून परतला तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. पत्नी रिनाने त्याला यामागचे कारण विचारले असता तो उत्साही स्वरात म्हणाला, ‘‘मला सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे, मला तुमच्यासोबत फ्रान्समधील मुख्य कार्यालयात जाण्याची संधी मिळाली आहे. फक्त एकच अडचण आहे ती म्हणजे राहुलला आपण आपल्यासोबत नेऊ शकत नाही.’’

रिनाला अत्यानंद झाला, पण अडचण ऐकून तिचा उत्साह मावळला, ‘‘आता काय करायचे, काहीही झाले तरी ही संधी मला सोडायची नाही.’’

‘‘राहुलला तुझ्या आईवडिलांकडे ठेवूया. तेही इथे मुंबईतच तर आहेत.’’

‘‘नाही विनय, आई आजारी आहे. ती राहुलला सांभाळू शकत नाही. भाऊ, वहिनी दोघेही कामाला आहेत. त्यामुळे त्याला तिथे सोडू शकत नाही, पण आणखी एक मार्ग आहे. दिवाळीसाठी लखनऊहून तुझ्या आईवडिलांना बोलावून घे, ते इथेच राहिले तर राहुलचा वेळ आजूबाजूच्या मुलांसोबत खेळण्यात चांगला जाईल. कंपनी मोफत पाठवत आहे, तर ही संधी सोडणे मूर्खपणाचे ठरेल. यावेळची दिवाळी फ्रान्समध्ये. मी तर कल्पनाच करू शकत नाही. किती छान ना? आताच आईवडिलांशी बोल. त्यांना यायला सांग.’’

विनयने फोनवर सर्व काही वडील गौतम यांना सांगितले. ‘‘बघू,’’ एवढेच ते म्हणाले.

विनय रागाने म्हणाला, ‘‘यात बघण्यासारखे काय आहे? राहुलला फक्त तुमच्यासोबत सोडून आम्ही जाऊ शकतो.’’

गौतम यांनी फोन ठेवला आणि सर्व पत्नी सुधाला सांगितले. दोघेही एकमेकांकडे बघून हसले.

विनयची सर्व तयारी जवळपास वाया गेली. आईवडील न सांगता कुठेतरी गेले होते, याची चिंता होतीच, पण त्याहून अधिक दु:ख म्हणजे परदेशात जाण्याची संधी हातची गेली होती. आईवडील आहेत तरी कुठे? हे समजू शकत नसल्याने मुंबईत राहणारी बहीणही काळजीत होती. विनय पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याच्या विचारात होता.

खरंतर विनयला दिवाळीच्या ३ दिवस आधी निघायचे होते. गेल्या काही दिवसांपासून तो त्याच तयारीत मग्न होता. वडिलांना यायला सांगूनही त्यांनी पुन्हा फोन केला नव्हता. रिना म्हणाली, ‘‘ते कधी येणार, हे फोन करून विचारा, आपल्याला जायला फक्त २ दिवस बाकी आहेत.’’

विनयने वडिलांना फोन लावला. फोन बंद होता. त्याने आईला फोन लावला, तोही बंद होता. तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिला, मात्र दोघांचे फोन बंदच होते.

तो अस्वस्थ झाला. रिनाही घाबरून म्हणाली, ‘‘लवकर शोध घ्या. आपली जायची वेळ झाली आहे. सर्व तयारी पूर्ण झाली आहे.’’

विनय म्हणाला, ‘‘मी ताईला विचारतो.’’

माया म्हणाली, ‘‘आठवडा होऊन गेला, त्यांच्याशी बोलणे झालेले नाही.’’

आता विनय आणि माया पुन्हा पुन्हा फोन लावत राहिले. आई-वडिलांच्या शेजारी राहणाऱ्या कोणाचाही नंबर दोघांकडेही नव्हता.

दिवाळी आली आणि गेली. विनय किंवा रिना दोघेही परदेशात जाऊ शकले नाहीत, पुरस्कार घेण्यासाठी आणखी ३ जण त्यांच्या पत्नीसोबत गेले. त्यामुळे रिना संतापली, तिच्या अशा वागण्यामुळे विनयचे जगणे कठीण झाले. विनयला गंभीर आजाराचे कारण सांगून सुट्टी घ्यावी लागली.

दुसरीकडे, काही दिवसांपासून विनयचा फोन येण्यापूर्वी लखनऊमध्ये विनयचे आईवडील सुधा आणि गौतम नाराज होते की, विनय नातवासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी कधी यायचे, याबद्दल अजून काहीच कसे बोलला नाही.

‘‘विनयने अद्याप सांगितले नाही की, तो इथे लखनऊला येईल की आपल्याला मुंबईला बोलावेल, त्याला आपले तिकीटही काढावे लागेल ना?’’ विनयची आई सुधा म्हणाल्या.

गौतम एक दीर्घ उसासा टाकत म्हणाले, ‘‘त्याला येथे यायचे नाही आणि आपल्याला बोलवायचेही नाही. अजूनही तू तुझ्या मुलाला ओळखले नाहीस, की मग तुला सत्याला सामोरे जावेसे वाटत नाही? ५ वर्षांपासून तो त्याची सर्व कर्तव्ये विसरून स्वत:च्याच विश्वात मग्न आहे. तू तुझ्या मुलाचा विचार करणे सोडून दे. आता आपण दोघेच एकमेकांचा आधार आहोत, दुसरे कोणी नाही.’’

‘‘हो, तुमचे बरोबर आहे. मालाला विचारू का? ती दिवाळीला आली तर निदान घरात थोडासा तरी आनंद येईल.’’

‘‘स्वत:चे समाधान करून घेण्यासाठी विचार, पण ती येणार नाही हे मला माहीत आहे. तिला स्वत:चा संसार आहे, ती नोकरी करते, तिला इथे यायला वेळ आहे कुठे? शिवाय मुंबईहून इथे लखनऊला आल्यानंतर तिच्या मुलांना कंटाळा येतो. मागच्या वेळी बघितले नाहीस का, त्यांना सांभाळताना तुझ्या नाकीनऊ आले होते.

‘‘सुधा, मुलगा असो किंवा मुलगी, दोघेही आपापल्या जगात मग्न आहेत. कधीतरी तू त्यांच्याशी फोनवर जे काही बोलशील, त्यातच आनंदी राहा. मी आहे तुझ्यासाठी, तुझ्यासोबत. कधीतरी त्या वृद्धांचाही विचार कर जे पूर्णपणे एकटे पडले आहेत. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी फक्त कष्टच केले. आता या विषयावर बोलून रक्त आटवावेसे वाटत नाही. कोणाकडून काहीही अपेक्षा न ठेवता आयुष्याचा हा शेवटचा टप्पा आनंदाने, शांततेने जगूया.’’

तेवढयात शेजारचे रजत दाम्पत्य, ज्यांच्याशी त्यांची जुनी ओळख होती, ते आले. रजत आणि गौतम एकाचवेळी निवृत्त झाले होते. आता रिकामा वेळ ते एकत्र घालवायचे, एकत्र हिंडायचे. त्यांची दोन्ही मुले परदेशात नोकरी करत होती. रजतची पत्नी मंजू यांनी विचारले, ‘‘तुम्ही नाश्ता केला का?’’

सुधा म्हणाल्या, ‘‘नाही, मी अजून काही बनवलेले नाही.’’

‘‘खूप छान, मलाही काही बनवावेसे वाटले नाही. चला बाहेर फिरायला जाऊ, येताना बाहेरच नाश्ता करू.’’

सुधा हसल्या, ‘‘सकाळी, सकाळी?’’

‘‘हो, नाश्ता सकाळीच केला जातो ना?’’ मंजू यांच्या या विनोदावर चौघेही हसले आणि फिरायला निघाले. सकाळचे ९ वाजले होते. चौघेही एका उद्यानात फिरत राहिले. येताना एका ठिकाणी थांबून त्यांनी नाश्ता केला. मौजमजा, सुखदु:खाच्या गप्पा मारून सुधा घरी आल्या, तोपर्यंत त्यांचे मन अगदी हलके झाले होते.

गौतम आणि सुधा पुन्हा त्यांच्या रोजच्या कामात व्यस्त झाले. गौतम एका खासगी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक या पदावरून निवृत्त झाले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली होती. आपल्या पत्नीला भावनाविवश होऊन दु:खी झालेले पाहून त्यांचेही मन दु:खी होत असे, पण ही घरोघरींची व्यथा होती. त्यांना माहीत होते की, सणासुदीला सुधाला मुले सोबत हवी असतात. रोज संध्याकाळी दोघे १-२ तासांसाठी सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये जायचे. त्यांच्या वयाच्या १२-१३ लोकांचा ग्रुप होता. त्यांच्यासोबत वेळ चांगला जायचा. कोणाला काही गरज लागल्यास संपूर्ण ग्रुप धावून जायचा. सर्वांचीच परिस्थिती एकसारखी   होती.

जवळपास एकसारखाच दिनक्रम आणि एकसारखीच विचारसरणी होती. आता तर हा ग्रुप एखाद्या कुटुंबासारखा झाला होता. राजीव रंजन अनेकदा सांगायचे की, ‘‘कोण म्हणते आपण एकटे आहोत? बघा, आपले किती मोठे कुटुंब आहे.’’

गप्पांच्या ओघात त्या सर्वांनी बाहेर फिरायला जायची योजना आखली.    तिकिटांचे आरक्षण केले. बॅगा भरून झाल्या. व्हिजा काढण्यात आला. दिवाळीतील एकटेपणाचे शल्य आता पळून गेले होते.

दिवाळीच्या ७व्या दिवशी पुन्हा एकदा विनयने वडिलांना फोन लावून पाहिला. बेल वाजली. विनयला आश्चर्य वाटले. गौतम यांनी फोन उचलताच विनयने प्रश्न, टोमण्यांचा भडिमार सुरू केला, गौतम यांनी शांतपणे उत्तर दिले. आम्ही सर्व १० दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो.

विनयला हे ऐकून धक्का बसला. ‘‘काय? कसे? कोणासोबत?’’

‘‘आमच्या सोसायटीच्या ग्रुपसोबत.’’

‘‘पण तुम्ही मला सांगायला हवे होते ना? माझे बाहेर जायचे सर्व नियोजन फसले. तुम्हाला जायची काय गरज होती?’’

‘‘तुम्ही तुमच्या जगण्याची पद्धत बदलली पाहिजे, असे तूच सांगायचास ना? आपण आपल्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे, हो ना? शिवाय तू कुठे आमचा विचार करून आम्हाला बोलावत होतास? तो तुझा स्वार्थ होता.’’

विनयला मुस्कटात मारल्यासारखे झाले. तो फोन बंद करून डोकं धरून तसाच बसून राहिला. दिवाळीचा हा धमाका जबरदस्त होता.

या उत्सवात भीती नाही आनंद आणा

* पारुल भटनागर

सण-उत्सवाचा अर्थ आनंदाचा काळ, परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोना आपल्यामध्ये राहील्यामुळे आपण सतत आपल्या घरात राहण्यास विवश झालो आहोत आणि जर बाहेर पडलो तरीदेखील अजूनही भीती मनात असतेच. यामुळे लोकांना भेटणं फारसं होतच नाहीए.

आता सणउत्सवात ती एक्साइटमेंटदेखील पहायला मिळत नाही, जी पूर्वी मिळत होती. अशावेळी गरजेचं झालंय की आपण सणउत्सव मोकळेपणाने साजरे करावेत. स्वत:देखील सकारात्मक रहावं आणि दुसऱ्यांमध्येदेखील ही सकारात्मकता निर्माण करावी.

तर चला आपण जाणून घेऊया अशा टीप्सबद्दल ज्यामुळे तुम्ही या सणावारी तुमच्या घरामध्ये सकारात्मक वातावरण कसं टिकवून ठेवू शकता :

घरामध्ये बदल करा

सणवार येण्याचा अर्थ घराची साफसफाई करण्यापासून खूप सारी खरेदी करणं, घरातील इंटेरियरमध्ये बदल करणं, घर व स्वत:साठी प्रत्येक अशी गोष्ट खरेदी करणं, जी घराला नवीन लुक देण्याबरोबरच आपल्या जीवनात आनंद आणण्याचेदेखील काम करेल. तर या सणावारी तुम्ही असा विचार अजिबात करू नका की कोण कशाला घरी येणार आहे वा जास्त बाहेर जायचंच नाहीए, उलट असा विचार करुन घर सजवा की यामुळे घराला नवेपणा मिळण्याबरोबरच तर घरात आलेल्या बदलामुळे तुमच्या आयुष्यातील उदासपणा सकारात्मकतेमध्ये बदलेल.

यासाठी तुम्ही जास्त बाहेर पडू नका तर स्वत:च्या क्रिएटिविटीने घराला सजविण्यासाठी छोटया-छोटया वस्तू बनवा वा बाजारातदेखील बजेटमध्ये सजावटीच्या वस्तू खरेदी करू शकता आणि जर तुम्ही बराच वेळापासून घरासाठी काही मोठं सामान विकत घेण्याबद्दल विचार करत असाल आणि तुमचं बजेटदेखील असेल तर या सणावारी त्याची खरेदी कराच. विश्वास ठेवा हा बदल तुमच्या आयुष्यातदेखील आनंद देण्याचं काम करेल.

करा सोबत सेलिब्रेट

सणवार असेल आणि तुमच्या जिवलगांची भेट होत नसेल तर सणावारी तेवढी मजा येत नाही, जी तुमच्या जिवलगांसोबत सेलिब्रेशन करण्यामध्ये येते. या सणावारी तुम्ही सावधानता बाळगून तुमच्या जिवलगांसोबत आनंदाने उत्सव साजरा करा. जर तुम्ही व तुमचे कुटुंबीय हे जिवलग आणि मित्रांसोबत सण साजरा करण्याचा प्लान करत आहात आणि जर ते पूर्णपणे व्हॅक्सिनेटेड असतील तर तुम्ही त्यांच्यासोबत योग्य काळजी घेऊन सण साजरा करू शकता. या दरम्यान मोकळेपणाने मस्ती करा. खूप सेल्फी घ्या, भरपूर खूप डान्स करा, पार्टी करा, आपल्या लोकांसोबत गेम्स खेळून आनंदाच्या रात्रीदेखील सजवा.

पार्टीमध्ये एवढी मजा करा की तुमच्या आयुष्यातील सर्व उदासीनता गायब होईल आणि तुम्ही या दिवसांमध्ये केलेली मजा लक्षात राहील, हाच विचार करा की सगळे दिवस असेच असोत. म्हणजेच सेलिब्रेशनमध्ये एवढी मजा असो की तुम्हाला त्याची आठवण येताच तुमच्या चेहऱ्यावर आपोआप समाधानाचं हास्य परतेल.

स्वत:लादेखील रंगांमध्ये रंगवा

तुम्ही सणावारी घर तर सजवलं परंतु सणाच्या दिवशी तुमचा लुक अगदीच साधा असेल तर तुम्हालादेखील उत्सवाची अनुभूती होणार नाही. अशावेळी घर सजविण्याबरोबरच तुमच्या आयुष्यातदेखील रंग भरण्यासाठी आनंदी राहण्याबरोबरच नवीन कपडे विकत घ्या आणि स्वत:ला सजवा म्हणजे तुमच्यामध्ये आलेला नवीन बदल पाहून तुमचादेखील उत्साह वाढेल.

स्वत:ला वाटू लागेल कि तुम्ही सण मनापासून साजरा करत आहात. तुमच्या नवीन आऊटफिट्सवर तुमचा फुललेला चेहरा दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरदेखील हास्य फुलवीण्याचं काम करेल. तुम्ही भलेही कोणाला भेटा वा भेटू नका, परंतु सणावारी नटूनथटून नक्की रहा, कारण हा बदल आपल्या मनामध्ये सकारात्मकता आणण्याचं काम करतं.

भेटवस्तूनी दुसऱ्यांमध्ये आनंद वाटा

जेव्हादेखील तुम्ही सणावारी कोणाच्या घरी जाल वा कोणी तुमच्या घरी येईल तेव्हा तुम्ही त्याला मोकळया हाताने परत पाठवू नका. आपापसात आनंद वाटण्यासाठी भेटवस्तूंची देवाण-घेवाण करा. भलेही भेटवस्तू जास्त महागडी नसेल, परंतु हे मनाला अशा प्रकारे आनंद देईल की याचा अंदाजदेखील तुम्ही लावू शकत नाही.

भेटवस्तू मिळाल्याच्या आनंदापासून ते खोलण्याचा व पाहण्याचा आनंद आपल्याला आतल्या आत उत्तम फिल देण्याचं काम करतं. सोबतच यामुळे कोणत्यातरी स्पेशल डेचीदेखील जाणीव होते. तुम्ही ऑनलाईनदेखील तुमचे गिफ्ट पाठवू शकता. तर मग या सणावारी तुमच्या जिवलगांच्या चेहऱ्यावर भेटवस्तूंनी आनंद आणा.

मिठाईचा आनंद घ्या

जर तुम्हाला सणावारी सणासारखा आनंद घ्यायचा असेल तर या दिवसात बनणाऱ्या पक्वान्नांचा खूप आनंद घ्या. असा विचार करू नका की जर आपण चार दिवस गोड, तळलेलं खाल्लं तर जाडजूड होऊ. उलट या दिवसात बनणाऱ्या प्रत्येक ट्रॅडिशनल फराळाची मजा घ्या. स्वत:देखील खा आणि दुसऱ्यांनादेखील  खायला द्या.

कोरोनामुळे सणउत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत नक्कीच बदल झाला आहे, परंतु तुम्ही सणवार पुरेपूर एनर्जीसोबत साजरे करा, जसे पूर्वी साजरे करत होते. भलेही कोणी नाही आलं तरी तुम्ही तुमच्या लोकांसाठी फराळ बनवा. जेव्हा घरात फराळ बनेल आणि त्यांच्यासोबत तुम्ही एकत्रित बसून खाल तेव्हा सणाची मजा अधिक द्विगुणित होईल.

सजावटीमुळे मिळते सकारात्मकता

जर तुम्ही तुमच्या घरात एकच वस्तू अनेक वर्षापासून पाहून कंटाळला आहात आणि घरात सकारात्मकता आणायची असेल, तर घरात छोटया छोटया गोष्टींमध्ये बदल करा. जसं खोलीमध्ये एकच भिंत हायलाइट करा. यामुळे तुमच्या पूर्ण खोलीचा लुक बदलला जाईल. तसंच घरात नावीन्यपणा आणण्यासाठी कुशन कव्हर, टेबल कव्हर बेडशीटमध्येदेखील रंगसंगती आणा. तुम्ही बाहेर बाल्कनीमध्ये हँगिंगवाल्या कुंडया लावण्यासोबतच रिकाम्या बाटल्यादेखील सजवून त्यामध्ये रोपटी लावू शकता.

असं केल्यामुळे तुम्हाला मनापासून आनंद मिळण्या बरोबरच तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणण्याचं कामदेखील करेल. तसंच खोलीतील भिंती ज्या घराची शान असतात, त्यांनादेखील तुमच्या हाताने बनविलेल्या वस्तुनी सजवा आणि पहा पुन्हा घर हसेल.

आत्मविश्वासाच्या प्रकाशात साजरा करा दिव्यांचा उत्सव

* जगदीश पवार

सण उत्सवांचं भारतीय जीवनात खूप महत्त्व आहे. सणवार आपल्या आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करतात. वर्षभराचा आनंद एन्जॉय करण्याची संधी देतात आणि वर्षभरातील दु:ख विसरण्यासाठी प्रेरित करतात. आयुष्यात नवीन जोश, नवीन आत्मविश्वास, नवा उत्साह देणाऱ्या या सर्वात मोठया सणाची म्हणजेच दिवाळीची तयारी बरेच दिवस अगोदर सुरू होते.

दिवाळी अंधारातून उजेडाकडे जाण्याचं प्रतिक मानलं जातं. आपल्या भारतीयांचा विश्वास आहे की सत्याचा नेहमीच विजय होतो आणि असत्याचा नेहमी नाश होतो. म्हणून दिवाळीला रामायणातील एका दंतकथेशी जोडलं आहे. हिंदूंचा विश्वास आहे की या दिवशी अयोध्येचा राजा राम, लंकेचा राजा रावणाचा वध करून परतले होते. त्यांच्या स्वागतासाठी आनंदाप्रीत्यर्थ तुपाचे दिवे लावण्यात आले होते. म्हणून हा सण साजरा केला जातो.

इकडे, कृष्णभक्तांचं म्हणणं आहे की यादिवशी श्रीकृष्णाने अत्याचारी राजा नरकासुराचा वध केला होता. या नृशंस राक्षसाचा वध केल्यामुळे जनतेला खूप आनंद झाला होता आणि लोकांनी या आनंदाप्रीत्यर्थ तुपाचे दिवे लावले होते. परंतु प्राचीन साहित्यात हा सण साजरा करण्यामागे यापैकी कोणताही पुरावा सापडत नाही. मात्र हा सण साजरा करण्यामागे नव्या पिकाच्या आगमनाचं वर्णन नक्कीच सापडतं.

दु:ख या गोष्टीचं आहे की या सणाचे स्वरूप खूपच बदललं आहे. दिव्यांचा हा सण घोर अंधारालादेखील सोबत घेऊन चालला आहे. खरंतर दिवाळीच्या सणात अंधश्रद्धेचा अंधार भरला गेला आहे. धर्माच्या व्यापाऱ्यांनी आनंदाच्या या सणाला धार्मिक कर्मकांडाशी जोडलं आहे, कारण या दरम्यान त्यांची कमाई होत राहील तसंच खुशालचेंडू, टिळाधारिंची शिरापुरीची व्यवस्थादेखील होईल. यामध्ये कोणतीही बाधा येऊ नये यासाठी नंतरदेखील धार्मिक साहित्यात अनेक भय व अंधश्रद्धेलादेखील उभं केलं आहे आणि सोबतच सुखसमृद्धीची लालूचदेखील दिली आली आहे.

लक्ष्मीला या सणाची अधिष्ठात्री देवी सांगून तिला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळे उपायदेखील सुचविण्यात आले आहेत. लक्ष्मीची कृपा करण्यासाठी तिची पूजा करणे गरजेचे आहे. तिला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारच्या विधी करणं गरजेचं आहे असा प्रसार केला गेलाय. असं सांगण्यात आलंय की देवीच्या प्रसन्नतेमुळे धनाची प्राप्ती होईल. म्हणून तर भटब्राम्हण दिवाळीच्यावेळी यजमानांकडून वसुली करण्यासाठी एका घरातून दुसऱ्या घरात पळत असताना दिसतात. कर्म, पुरुषार्थाच्या आधारे समृद्ध मिळविण्याची प्रेरणा देणाऱ्या या सणात ते लक्ष्मीच्या प्रसन्नतेचे उपाय, दानाचे मार्ग सांगून लोकांची दिशाभूल करतात आणि त्यांना पूर्ण अंधकाराकडे घेऊन जातात.

‘तमसो मा ज्योतिर्गमय’ अर्थात अंधारातून ज्योति (प्रकाश)कडे जाणं, त्याऐवजी समाजात अंधार आणि अंधाराकडे जाऊन समृद्धी शोधताहेत, खरंतर दिवाळीला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं विजय पर्व म्हणतात.

जागवा आत्मविश्वास

दिवाळी व्यक्तिगत आणि सामूहिक पद्धतीनेदेखील साजरा करणारा खास सणउत्सव आहे. ज्याची स्वत:ची सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ठ आहेत. या सणाचा व्यक्तिगत आणि सामूहिकपणे एक आनंद घ्या. घरात कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण बनवा, घरातील कानाकोपरा आनंदाने उजळवा, नवीन कपडे घाला, कुटुंबांसोबत नव्या वस्तूंची खरेदी करा, फराळाची भेट एकमेकांना द्या, एकमेकांना भेटा, आपापसातील गैरसमज दूर करा, घरोघरी सुंदर रांगोळी बनवा, दिवे लावा, फटाके फोडा, हा आनंदच आहे जो तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करतो.

या सणावारी सर्व आनंद एकत्रित करून आपल्या जिवलगांचं अधिक प्रेम मिळवा. फराळाचा कुटुंबीयांसोबत आनंद घ्या. दिवाळीनिमित्त भरणाऱ्या जत्रांमध्ये जा. विविध समूहाचा हा सण असल्यामुळे सगळीकडे खूप धामधूम असते. तुम्ही सर्व अंधश्रद्धेचा अंधार दूर करून या आत्मविश्वासाने भरलेल्या सणाचा आनंद घ्या. या काळात आनंदित लोकं बाजारात फिरतात. दुकानात खास सजावट आणि गर्दी दिसून येते. प्रत्येक कुटुंब आपल्या गरजेनुसार कोणती ना कोणती खरेदी करत असतं.

दिवाळी आयुष्यातील रंगांचं पर्व आहे. हे अंधश्रद्धेच्या अंधारात हरवून बसू नका. घर, कुटुंब, समाज व देशाच्या आनंदाचा संकल्प करा. यामुळेच प्रकाश निर्माण होईल, प्रगती येईल. धर्माने आज जीवनाच्या प्रत्येक भागात आपल्याला जखडून ठेवलं आहे. याने जन्म, लग्न, उत्सव, सणवार, मनोरंजन, मरण इत्यादी सर्वच जागी स्वत:चा कब्जा करून ठेवला आहे.

धर्म व धर्माच्या व्यापारांनी उत्सवाच्या या आनंदावरदेखील विनाकारण कर्मकांड आणि अंधश्रद्धेची भीती निर्माण केली आहे. काही मिळविण्याचा लोभ लोकांच्या मनात भरून ठेवला आहे. तुम्हाला कळणारदेखील नाही की कशाप्रकारे धर्माच्या व्यापाऱ्यांनी तुमच्या भावविश्वात घुसखोरी केली आहे.

सणावारी हावी झालेल्या अंधश्रद्धा दूर करा. बदलत्या काळानुसार आज समस्या आणि मान्यतादेखील बदलत आहेत. अशावेळी दिवाळीसारख्या सणउत्सवाच्या स्वरूपाला नियंत्रित करणंदेखील गरजेचं झालं आहे. कर्मकांडांसोबत सणावारी अपव्यय आणि दिखावादेखील वाढला आहे. प्रेम, जिव्हाळा, बंधुभावाच्या जागी सतत पुढेपुढे करण्याची वृत्ती मागे घेऊन जात आहे. अनेक मध्यमवर्गीयांची मिळकत निश्चिंत असते आणि तशी कमी असते. परंतु परंपरेत बांधल्यामुळे दिवाळीत चादरीच्या बाहेर पाय पसरल्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

नवीन सुरुवात करा

दिवाळीत प्रत्येक घराच्या व्हरांडयावर झगमगणारे दिवे कायम अंधकारातून प्रकाशाकडे प्रगती करण्याचा संदेश देतात. हाच खरा प्रकाशाचा उत्सव आहे. हेच खरं संपूर्ण जीवनाचं सार आहे. या दिवशी नवीन खाती खोलली जातात. घराबाहेर स्वच्छता केली जाते. परंतु केवळ घरदुकानचं नाही, तर मनाची स्वच्छता, मनुष्याची आंतरिक चेतना जगविण्याची म्हणजेच भारतीय जनजीवनाची ऊर्जा व उल्हास खऱ्या अर्थाने अभिव्यक्त केल्यास, हे पर्व वास्तवात प्रगती आणि विकासाचा संदेश देऊ शकेल.

आजदेखील काही लोकं अशी आहेत जी तर्क आणि बुद्धीसोडून मूर्खासारखे भाग्य, अंधश्रद्धा आणि अवडंबर माजवत आहेत आणि पुरुषार्थवर विश्वास ठेवण्याऐवजी दिवा स्वप्नांमध्ये भटकत आहेत. सर्वात दु:खाची बाब ही आहे की गावखेडयांतील लोकच नाही तर स्वत:ला आधुनिक आणि अपडेटेड म्हणविणारे सभ्य लोकंदेखील कर्मकांड आणि अंधश्रद्धामध्ये बुडाले आहेत.

दिवाळीच्या दिवशी प्रत्येक घरात जळणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशाचा उद्देश मनात लपलेल्या निरर्थक अंधश्रद्धा आणि अवडंबर दूर करणं आहे. याउलट पूजापाठ आणि भटाब्राम्हणांच्या नादी लागून लोकं मेहनत व प्रामाणिकपणा ऐवजी अशी काही कामं करत आहे जी त्यांना आतून कुचकामी आणि आळशी बनवितात. अंधश्रद्धा व अवडंबर आपल्याला आतून कमजोर बनवतं. तसंच आपला संकल्प पोकळ करून टाकतो. जी लोकं वर्षभर जुगार खेळत नाहीत तीदेखील या दिवशी रुढी, परंपरा व अंधश्रद्धांचा डांगोरा पिटत जुगार खेळतात आणि हे सर्व धर्माच्या नावाखाली होतं.

या दिवाळीत एक प्रण करा की तुम्ही अंधश्रद्धा आणि अवडंबर ऐवजी समाजाच्या प्रगतीत स्वत:ला झोकून द्याल. स्वताला नवीन विचारांच्या प्रकाशात पहाल आणि घराबाहेरच्या स्वच्छतेबरोबरच मनालादेखील विवेकाच्या आधारे जागृत कराल. तेव्हाच सगळीकडे धनधान्य आणि आनंदाचे दिवे जळतील आणि तेव्हाच दिवाळी एका खऱ्या अलौकिक पर्वाचं रूप घेईल.

एकत्रित दिवाळी साजरी करा

अलीकडच्या अतिव्यस्त काळात जर हा प्रकाशोत्सव शेजाऱ्यांसोबत मिळून-मिसळून साजरा केला तर आजूबाजूच्या वातावरणासोबतच मनदेखील उजळून निघेल. जर समाजातील कटुता आणि वैमनस्य संपवायचं असेल तर दिवाळीचा आनंद शेजाऱ्यांसोबत साजरा करा. अनेकदा एखाद्या शेजाऱ्याची काही अडचण असेल वा त्यांची मुलं शिक्षणासाठी, नोकरीसाठी जर दुसऱ्या शहरात असतील तर तुम्ही अशा शेजाऱ्यांना स्वत:च्या आनंदात सहभागी करा आणि या दिवाळीत यांच्याशी चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश उजळवा.

अमावस्येच्या अंध:कारात, अंधारातून प्रकाशाकडे जाणारा संदेश देणारा दिवाळीचा सण जिथे सत्याच्या विजयाचा संदेश देतो, तिथे जीवनात जगण्याचा उत्साह आणि उल्हासाचे रंग भरण्याची संधीदेखील देतो. दिवाळीत विनाकारण खूप पैसे खर्च होतात. मध्यमवर्गीय भारतीय समाजासाठी सणावारी पैशाचा अपव्यय करणं जणू अभिशापच बनलं आहे. कुटुंबीयांच्या सणावारी मागण्यानंपुढे कमाऊ नोकरदार सणांनाचं जणू घाबरू लागले आहेत. वास्तविकपणे आनंदाच्या जागीच सण औपचारिकतेचं पर्व बनता कामा नये, म्हणून अशा सणावारी अतिभावूकता व आस्थेचा त्याग करून आनंदाला महत्त्व द्या. दिव्यांच्या उत्सवाला अंधश्रध्येच्या या अंधारात नाही, तर आत्मविश्वासाच्या प्रकाशात उजळवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें