डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण आहे गरजेचे

* सोमा घोष

18 वर्षीय सुमितला १२वी नंतर शिक्षण घ्यायचे नव्हते, कारण त्याला अभ्यास करायला आवडत नव्हता. त्याला पैसे कमावून श्रीमंत व्हायचे होते. त्याच्या मित्रमंडळींनी त्याला सांगितले की, डिजिटल मार्केटिंग हा आज पैसे कमविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आणि त्यामुळे लाखो लोक कमावू शकतात. हे लक्षात आल्यावर सुमित प्रभावित झाला आणि त्याने त्याचे शिक्षण सोडून दिले. त्याने आई-वडिलांना समजावून सांगितले की, आजच्या काळात जास्त अभ्यास केल्याने काही फायदा होत नाही, मेंदूचा वापर करावा लागतो, म्हणून तुम्ही माझ्यासाठी एक प्रयत्न करा, ज्यासाठी घरात एक संगणक, एक वेगळी खोली आणि एक की बोर्ड असणे गरजेचे आहे.

सुमितचे वडील राजेश यांनी मुलाचे म्हणणे ऐकले, कारण सुमित दिवसभर घरीच पडून असे, त्याने पुढील शिक्षण घेण्यासही नकार दिला. मुलाच्या हट्टामुळे अखेर आई-वडिलांनी त्याला एअर कंडिशनर, की-बोर्ड आणि संगणक घेऊन दिला. त्यांना वाटले होते की, त्यांचा मुलगा काही नवीन संकल्पनांसह चांगले पैसे कमावेल, पण तसे झाले नाही. सुमितला पहिले काही महिने काहीही कमावता आले नाही, परंतु सहा महिन्यांनंतर त्याने थोडे पैसे कमावले, दुसरीकडे वडील राजेश यांना खूप मोठे वीज बिल येऊ लागले, कारण त्यांचा मुलगा दिवसभर एसी लावून ठेवायचा.

आता काय करावे तेच वडिलांना सुचत नव्हते. त्यांनी पुजारी, ताईत, होमहवन आणि मंदिरांचा आधार घेतला, परंतु मुलाचे वर्तन तसेच राहिले. त्यांना मुलाच्या भविष्याची चिंता वाटू लागली, कारण त्यांना माहीत होते की, शिक्षणाशिवाय कोणत्याही क्षेत्रात प्रगती करणे कधीही शक्य नसते, कारण ते स्वत: एका महाविद्यालयाचा प्राचार्य होते.

२५ वर्षीय पीएचडीची विद्यार्थिनी सीमा हिने तिच्या मैत्रिणींच्या आग्रहावरून अभ्यासासोबत डिजिटल मार्केटिंगमध्येही काम करायला सुरुवात केली, पण काही महिन्यांतच तिला जाणवले की, या व्यवसायात दिलेल्या आश्वासनाची पूर्ती ब्रँडकडून केली जात नाही. ब्रँडची प्रसिद्धी केल्यानंतर जेवढे पैसे मिळायला हवे होते ते तिला देण्यात येत नव्हते. थोडक्यात काय तर हे क्षेत्र वेळ आणि मेहनत वाया घालवते. म्हणूनच तिने नोकरी सोडली आणि शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. हे खरं आहे की, आज जगाचा ८० टक्के भाग ऑनलाइन आहे आणि बहुतेक लोक खरेदी करण्यापूर्वी ऑनलाइन माहिती घेणे पसंत करतात. आज ऑनलाइन सेवा कोणालाही अगदी घरोघरी उपलब्ध आहेत. स्विगी आणि झोमॅटोसह अनेक प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन खाद्यपदार्थ घरपोच मागवून घेण्यासाठी उपलब्ध आहेत. ते त्वरित दाराशी पोहोचवले जातात. याशिवाय, वाहतूक सेवा ऑनलाइनदेखील मिळू शकतात. ज्यामध्ये उबर आणि ओला प्रमुख आहेत, म्हणूनच त्यांना मोठी मागणी आहे, विशेषत: कोविड-१९ साथीच्या काळात, सर्वकाही डिजिटल झाल्यामुळे, या सेवांना खूप गती मिळाली.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

इंटरनेट आणि इतर डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन किंवा सेवा विकण्याची पद्धत म्हणजे डिजिटल मार्केटिंग. याला ऑनलाइन मार्केटिंग असेही म्हणतात. डिजिटल मार्केटिंगमुळे व्यवसाय आणि ऑनलाइन वाहिनीच्या संभाव्य ग्राहकांशी जोडले जाता येते.

डिजिटल मार्केटिंगचा इतिहास

डिजिटल मार्केटिंगच्या इतिहासाचा विचार करता, डिजिटल मार्केटिंग हा शब्द पहिल्यांदा १९९०च्या दशकात वापरण्यात आला. त्यानंतर, सोशल मीडियाच्या उदयाबरोबर त्याचा विस्तार झाला.

डिजिटल मार्केटिंगचे प्रकार

डिजिटल मार्केटिंगचे अनेक प्रकार आहेत, ज्यात व्हिडीओ मार्केटिंग, डिस्प्ले अॅडव्हर्टायझिंग, ईमेल मार्केटिंग आणि बरेच काही समाविष्ट आहे. अशाप्रकारे, डिजिटल मार्केटिंग हा एकूण डिजिटल धोरणाचा एक भाग आहे. व्यवसायाच्या गरजांनुसार हे वैयक्तिकरित्या वापरले जाऊ शकतात.

डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर करण्यापूर्वी, त्या क्षेत्रात शिक्षण घेणे महत्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला प्रक्रिया समजेल. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्ही त्यासंबंधित प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा कोर्स करू शकता. या क्षेत्रात एमबीए करण्याचा पर्याय देखील आहे (डिजिटल मार्केटिंगमध्ये एमबीए), डिजिटल मार्केटिंग कोर्स ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही पद्धतीने करता येतो. चांगली नोकरी मिळवण्यासाठी, तुम्हाला किमान ६ महिने किंवा १ वर्षाचा कोर्स पूर्ण करावा लागतो. त्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

* सर्वप्रथम, मूलभूत कौशल्ये वाढवावी लागतील, जसे की डिजिटल मार्केटिंगची मूलभूत तत्त्वे शिकणे, ज्यामध्ये एसइओ, पीपीसी, सोशल मीडिया मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंग आणि अॅनालिटिक्स यांचा समावेश आहे.

* मूलभूत गोष्टी शिकल्यानंतर, तुम्ही स्वत:ला कौशल्यवान बनवू शकता आणि स्वत:ची वेबसाइट तयार करू शकता, ज्यामध्ये सोशल मीडिया मोहिमा चालवणे, सामग्री तयार करणे आणि बरेच काही समाविष्ट आहे.

* हे काम घरी बसून करावे लागत नाही तर त्यासाठी बाहेर नेटवर्किंग आवश्यक आहे. उद्योगासंबंधी कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याने तुम्हाला मार्केटिंग व्यावसायिकांशी चांगले संबंध निर्माण करण्यास मदत होऊ शकते आणि सोशल मीडियाद्वारे व्यावसायिकांच्या समुदायात सामील झाल्याने तुम्हाला नवीनतम ट्रेंड्सबद्दल माहिती मिळू शकते.

* मोठ्या कंपनीत सहभागी होण्यासाठी, तसेच गरजू कंपन्यांच्या गटात काम करण्यासाठी तुम्हाला नोकरीच्या संधी शोधाव्या लागतील. यासाठी कंपनीच्या वेबसाइट तपासाव्या लागतील.

* डिजिटल मार्केटिंग क्षेत्राबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ब्लॉगिंग हा एक उत्तम मार्ग आहे. जर तुम्ही या क्षेत्रात नवीन असाल तर तुम्ही प्रथम तुमच्या विषयाशी संबंधित ब्लॉग पोस्टसाठी गुगलवर शोधू शकता. याशिवाय, तुम्ही एक ब्लॉग तयार करू शकता आणि तुमचा अनुभव आणि ज्ञान शेअर करू शकता. डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी, तुमच्यामध्ये शक्य तितका सराव आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी हवी, जेणेकरून तुम्हाला हळूहळू त्यातील बारकावे समजू शकतील.

डिजिटल मार्केटिंगचे फायदे

डिजिटल मार्केटिंगमुळे ब्रँडचा दबदबा वाढतो. ती कमी खर्चात करता येते. ती ऑनलाइन असल्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे ग्राहकांची निष्ठा वाढू शकते. या उत्पादनाची जाहिरात करणं सोपं आहे, ज्याद्वारे देशातील तसेच परदेशातील वापरकर्त्यांपर्यंत ते सहज पोहोचू शकते, ज्यामुळे विक्री आणि महसूल वाढतो.

डिजिटल मार्केटिंगचे तोटे

डिजिटल मार्केटिंगमध्ये सहभागी होण्यापूर्वी, त्याच्या मर्यादा समजून घेणे गरजेचे आहे. असे न केल्यास नंतर पश्चात्ताप होऊ शकतो:

* डिजिटल मार्केटिंगमध्ये, सर्व प्रकारचे ब्रँड स्वत:ला विकसित करण्यासाठी स्पर्धा करताना दिसतात.

* आजकाल, डिजिटल जगात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि वेगळे दिसण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बँड्सचा भरणा आहे. विशेषत: लहान व्यवसायांसाठी वेगळे दिसणे ही एक कठीण लढाई असू शकते,

* डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात डेटा चोरी होणे सामान्य आहे. धोकादायक हॅकिंगपासून ते मालवेअरपर्यंत, धोके भरपूर आहेत. अशी घुसखोरी ब्रँडची विश्वासार्हता खराब करू शकते आणि आर्थिक नुकसान करू शकते.

* डिजिटल मार्केटिंगचे जाळे विस्तृत असले तरी, त्यात वैयक्तिक संवाद आणि जवळीकतेचा अभाव आहे. ग्राहकांशी थेट संवादाचा अभाव हा चुकीची माहिती आणि अविश्वास निर्माण करतो.

* तंत्रज्ञान हे डिजिटल मार्केटिंगचे सार आहे, जे पूर्णपणे सुरक्षित नाही. अस्पष्ट लिंक्स, प्रतिसाद न देणारी पृष्ठे किंवा सिस्टम ग्राहकांना निराश करू शकतात. बँडची प्रतिमा डागाळू शकतात आणि आर्थिक नुकसान करू शकतात. तांत्रिक त्रुटी विशेषत: डिजिटल मार्केटिंगच्या नवशिक्यांसाठी हानिकारक ठरू शकतात, ज्यामुळे वेबसाइटची सखोल चाचणी घेण्याची गरज अधोरेखित होते. केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून राहाणे कधीकधी उलट परिणाम देऊ शकते. यामध्ये गुंतवलेले पैसे बुडू शकतात.

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडियासोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

* सोमा घोष

सुरक्षित इंटरनेट दिनाच्या निमित्ताने, यूनिसेफ इंडिया आणि राष्ट्रीय ब्रँड अॅम्बेसेडर तसेच बॉलीवूड स्टार आयुष्मान खुरानाने एकत्र येऊन इंटरनेट सुरक्षिततेबाबत जनजागृती केली. आजच्या डिजिटल युगात मुलांनी आणि युवकांनी इंटरनेटचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वापर करावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला.

बालहक्क आणि डिजिटल कल्याणाचा जोरदार समर्थक असलेल्या आयुष्मानने यूनिसेफ इंडिया आणि PRATYeK (प्रत्येक) या बालहक्क संस्थेसोबत त्यांच्या सेंटरला भेट दिली. येथे त्याने मुलांसोबत डिजिटल सुरक्षा या विषयावर शिक्षणात्मक आणि मजेशीर खेळ खेळत इंटरनेट सुरक्षिततेबद्दल जागरूकता वाढवली. इंटरनेटच्या सुरक्षिततेबद्दल बोलताना आयुष्मान म्हणाला, “आजच्या काळात ५-६ वर्षांची लहान मुले ते वृद्धांपर्यंत प्रत्येकजण इंटरनेटचा वापर करत आहे. अशा परिस्थितीत, इंटरनेटचा पहिल्यांदा वापर करणाऱ्या मुलांना त्याच्या धोक्यांची जाणीव करून देणे आणि सुरक्षित राहण्याचे उपाय शिकवणे फार आवश्यक आहे. यावर्षी सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त मी युनिसेफसोबत PRATYeK  (प्रत्येक) संस्थेला भेट दिली आणि मुलांसोबत काही महत्त्वाच्या इंटरनेट सुरक्षा नियमांबद्दल शिकण्याची संधी मला मिळाली.”

याशिवाय, इंटरनेट सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, “या सुरक्षित इंटरनेट दिनी, युनिसेफसोबत मी ऑनलाइन सुरक्षा आणि जबाबदार डिजिटल वर्तनाबाबत जनजागृती करायची आहे. मुलांना अशा साधनांनी सक्षम करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यांना इंटरनेट वापरताना कुठलाही धोका वाटल्यास किंवा अडचण आल्यास ते त्याचा रिपोर्ट करू शकतील. त्यामुळे ते स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करू शकतील. पालकांनीही त्यांच्या मुलांशी मोकळ्या संवाद साधणे आवश्यक आहे, जेणेकरून इंटरनेटशी संबंधित कोणत्याही अडचणींचा सामना करण्यास त्यांना मदत होईल. एकत्र येऊन, जबाबदारीने इंटरनेटचा वापर करून आपण या प्लॅटफॉर्मला अधिक सुरक्षित आणि सर्वांसाठी उपयोगी बनवू शकतो.”

आयुष्मान खुरानाची सुरक्षित इंटरनेट दिनीची ही भेट त्याच्या बालहक्क आणि डिजिटल कल्याणाच्या प्रतिबद्धतेशी सुसंगत आहे. त्याने केलेली ही पुढाकार प्रेरणादायी ठरत आहे आणि डिजिटल जग अधिक सुरक्षित व समावेशक करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा आणि कृतींना चालना देत आहे.

तुमच्याकडेही डिजिटल आय स्ट्रेन आहे का, मग जाणून घ्या त्याचे प्रतिबंध आणि उपचार

* गृहशोभिका टिम

आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या दिवसाचा बराचसा वेळ स्क्रीनसमोर बसून घालवतात. मग ती कॉम्प्युटर स्क्रीन असो वा मोबाईल स्क्रीन. डिजिटल स्क्रीनसमोर तासनतास बसल्याने आपल्या डोळ्यांवर सर्वात वाईट परिणाम होतो. त्यामुळे तणाव, निद्रानाश आणि इतर अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. डोळ्यांशी संबंधित या समस्येला डिजिटल आय स्ट्रेन म्हणतात.

डिजिटल आय स्ट्रेन पूर्वी कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणून ओळखले जात असे. लोकांमध्ये हा आजार दिवसेंदिवस वाढत आहे.

पूर्वी काम फक्त कॉम्प्युटरवर व्हायचे पण आता लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्ट फोन हे देखील आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत. या गोष्टींच्या अतिवापरामुळे डिजिटल आय स्ट्रेनची समस्या उद्भवते.

याची सुरुवात डोळ्यांत हलक्या वेदनांनी होऊ शकते. परंतु वेळेवर उपचार न केल्यास भविष्यात डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते.

डिजिटल डोळ्यांच्या ताणाची सुरुवातीची लक्षणे

डोळ्यांत ताण येणे, डोळ्यांत पाणी येणे, वेदना, अंधुक दृष्टी, लालसरपणा ही त्याची सुरुवातीची लक्षणे आहेत. यासोबतच डोकेदुखी आणि अस्वस्थता देखील येऊ शकते. काहीवेळा हे चिडचिडेपणाचे कारण देखील असू शकते. सकाळी उठल्यावर तुमचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे, पण जसजसा दिवस पुढे सरकतो तसतसा हा त्रास वाढू लागतो.

प्रतिबंध आणि उपचार

  1. डिजिटल उत्पादने वापरणे ही आपली गरज बनली आहे. अशा स्थितीत त्यांचा वापर करण्याची योग्य पद्धतही आपण जाणून घेतली पाहिजे. या गोष्टी डोळ्यांपासून खूप जवळ किंवा दूर वापरणे धोकादायक ठरू शकते.
  2. तुम्ही ज्या खोलीत बसून या गोष्टी वापरत आहात त्या खोलीत पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी. अन्यथा डोळ्यांवर ताण येतो.

३. ऑफिसमध्ये एसी व्हेंटसमोर बसू नये. त्यामुळे डोळ्यातील पाणी सुकते. 20-20-20 नियम पाळले पाहिजेत. जे लोक ऑफिसमध्ये कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर जास्त वेळ काम करतात त्यांनी दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर ठेवलेल्या वस्तूकडे पहावे. त्यामुळे डोळ्यांचा ताण कमी होतो.

  1. स्क्रीन खूप तेजस्वी नसावी आणि फॉन्ट आकार खूप लहान नसावा.
  2. जेव्हा तुम्ही संगणकावर बराच वेळ काम करता तेव्हा तुमच्या पापण्या एका मिनिटात फक्त 6-8 वेळा लुकलुकतात, तर 16-18 वेळा डोळे मिचकावणे सामान्य असते. अशा परिस्थितीत दर सहा महिन्यांनी एकदा डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे.
अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें