Diwali Special: उत्सवप्रसंगी असे सजवा घर

* नितीश चंद्रा, मॅडहोम डॉट कॉम

सण, उत्सव सुरू होताच सर्वांमध्येच उत्साह संचारतो. सर्वांनाच आपापल्या घरांना सजावट करून पारंपरिक तसेच आधुनिक रूप द्यायचे असते, जेणेकरून येणाऱ्या आप्तेष्टांसोबत दुप्पट उत्साहाने सण साजरा करता येईल.

आपल्या घराची सजावट नव्या ढंगात करण्यासाठी अशा अनेक वस्तू आहेत. विविध सजावटीच्या सामानासह तुम्ही अनेक प्रकारे घर सजवू शकता आणि प्रियजनांकडून प्रशंसा ऐकू शकता.

प्रकाश : घर आकर्षक बनवण्यामध्ये विविध प्रकारच्या लाइट्स खूप महत्त्वाच्या असतात. दिवाळी, नाताळ, गुरूनानक जयंती इ. सणांमध्ये मेणबत्तीच्या प्रकाशाचे काही वेगळेच महत्त्व आहे. चमकदार रंगांच्या शानदार मेणबत्त्या, विविध आकारांमध्ये उपलब्ध असणारे मेणबत्ती स्टॅन्ड, टी लाईट स्टॅन्ड, ग्लास वोटिवच्या संग्रहाच्या वापराने तुम्ही आपल्या घरातील उत्सव उजळू शकता. भारतीय घरांमध्ये जर तांब्याचा दिवा नसेल तर सण अपूर्ण वाटतो. घराच्या दारावर कंदिलाच्या आकाराचे वोटिव किंवा लॉनमध्ये मेणबत्ती टी, लाइट हॉल्टर्सद्वारे घराला सुंदर रूप देऊ शकता. सुंगधित मेमबत्त्यांचा वापर तुम्हाला मंत्रमुग्ध करू शकेल. सुरेख लॅम्पशेड्सद्वारे तुम्ही इंटिरियरला नवा लुक देऊ शकता. कोपऱ्यात ठेवलेला एखादा लांब लॅम्प शेड तुमच्या खोलीत प्रकाश पसरून बेडरूमचं सौंदर्य आणखी खुलवेल.

सेंटर पीसेस : सेंटर पीसेस शिवाय देशी डेकोर अपूर्ण आहे. यांचा वापर करून आपल्या घराला पारंपरिक रूप देऊ शकता. हल्ली विविध रूपात उपलब्ध पारंपरिक किंवा आधुनिक शैलीतील मुर्त्या सर्वांत जास्त पसंत केल्या जातात. यामध्ये तुम्ही लाल नारिंगी रंगाच्या नैसर्गिक फुलांचा वापर करून चैतन्य आणू शकता.

फुलदाणी : भारतीय संस्कृतीत फुलांना विशेष महत्त्व आहे. घरी आलेल्या पाहुण्यांचे आनंदाने स्वागत करण्यासाठी घर सुगंधित आणि सुंदर दिसावे म्हणून फुलांचा वापर केला जातो. लिली, ट्यूलिप आणि ऑक्रिडची फुले घराला सुगंधित ठेवतात. बाजारात मिळणाऱ्या फुलदाण्यांमध्ये तुम्ही ही फुले ठेवू शकता. यामुळे घरातील सौंदर्य अजून उठावदार होईल.

रग्ज आणि गालिचे

फरशीवर रग्ज किंवा गालिचे अंथरून तुम्ही घराची शोभा वाढवू शकता. घराच्या बाहेरील भागात जसे की अंगण आणि मोकळ्या भागात हातांनी विणलेले सुंदर गालिचे किंवा रग्जचा वापर करून तुम्ही पाहुण्यांवर छाप सोडू शकता.

चादरी/कुशन कव्हर/रूफुस

उत्सव सणांच्या दिवसांत बिछान्यावरील गडद रंगीत चादरींचा संग्रह घरात सकारात्मक उर्जा आणू शकतो. खोल्यांमध्ये असलेले शानदार डिझाइनचे कुशन कव्हर्ससुद्वा सर्वांचे लक्ष वेधून घेतील. बागेत सुंदर रूफुसचा वापर करून बाग अधिक सुंदर बनवू शकता.

ऐक्सेंट फर्निचर

ऐक्सेंट फर्निचर आपल्या अनोख्या डिझाइनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. हल्ली बाजारात ऐक्सेंट खुर्च्या, वुडन चेस्ट, साईड टेबल्स तर सुंदर काउचेजसुद्धा उपलब्ध आहेत. या उत्सवांमध्ये अशा फर्निचरचा वापर करून आपण घराची शोभा वाढवू शकता व आपल्या सर्वोत्तम निवडीचीही सर्वांना जाणीव करून देऊ शकता.

डेकोरेटिव्ह आरसे

डेकोरेटिव्ह आरशांच्या वापरामुळे घरात अतिरिक्त जागेचा भास होतो आणि प्रवेश करतेवेळची छाया प्रतिबिंबित करतो. यामुळे घरात सकारात्मक उर्जेचा प्रवेशही होतो. या लहान परंतु कलात्मक वस्तूंनी तुम्ही घराचे सौंदर्य वाढवू शकता.

दस्तकारी आरशांचा वापर घराला विशेष सौंदर्य मिळवून देतो. तुम्ही बाजारात उपलब्ध आरसे जसे बाथरूममधील आरसा, विंटेज किंवा डेकोरेटिव्ह आरसा यापैकी योग्य पर्याय निवडावा.

बनवा घर हवेशीर

* गरिमा

सुंदर आणि मोठ्या घराचे स्वप्न प्रत्येकालाच असते. पण मोठ मोठ्या शहरांत अशा घरांचे स्वप्न मात्र पूर्ण होणे कठीण आहे. लहान घरात राहण्यावाचून काही पर्यायच नसतो. पण जर काही टीप्स आणि सजावटीच्या प्रकारांवर लक्ष दिले तर लहान घरात राहूनही मोठ्या आणि हवेशीर घरात राहण्याचा अनुभव घेऊ शकाल.

घर ठेवा व्यवस्थित : तुम्ही तुमचे घर जितके व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवाल, तितकी खोलीत जास्त जागा दिसेल. सर्व सामान कोपऱ्या कोपऱ्याने ठेवून, निरूपयोगी सामान काढून टाकले तर भरपूर जागा रिकामी होऊ शकते.

पांढऱ्या आणि फिकट रंगाचा वापर करा : गडद रंग मोठ्या जागेचा प्रभाव कमी करतात. म्हणूनच घराच्या भिंतीना पांढरा रंग द्या. फर्निचरदेखील फिकट रंगाचे निवडा. जर भिंतीवरील पांढरा रंग आवडत नसेल तर फिकट हिरवा, गुलाबी, निळा, पिवळा इत्यादी रंगांची निवड करा. एकच रंग लावा. मग बघा खोली किती मोठी दिसते.

घरातील दिवे योग्य निवडा : घरात अधिकाधिक प्रकाश येऊ द्या. कारण घरातील प्रकाश घर उजळलेले आणि मोठे दाखवण्यासाठी मदत करते. आपल्या घरात रंगांचा प्रभाव दाखवण्यासाठी मदत करते. लॅम्पस लावू शकता. यामुळे घर आकर्षक दिसेल.

मल्टिपर्पज फर्निचरचा वापर करा : असं फर्निचर विकत घ्या, जे बहुउद्देशीय असेल. अशाप्रकारचे फर्निचर तुमच्या खोलीत व्यवस्थित दिसेल आणि जागाही जास्त दिसेल. उदाहरणार्थ, स्वयंपाक घरात अशा बहुउद्देशीय मेजचा वापर करू शकता. ज्यात बरेचसे रकाने असतील. यात स्वयंपाकघरातील सामानासह, दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टी ठेवू शकता. म्हणजे सामान अधिक जागा व्यापून घेणार नाही.

घरात आरशांचा उपयोग करा : आरशाच्या वापराने तुम्ही खोलीला मोठे असण्याचा आभास देऊ शकता. फोकल पॉईंटचा उपयोग करून आरसा अशा ठिकाणी बसवा ज्यामुळे घराची खोली अधिक दिसेल. घराच्या खिडकी समोरील भिंतीवर आरसा लावा. प्रकाशाच्या  प्रतिबिंबामुळे तुमच्या खोलीचे क्षेत्र मोठे  दिसेल.

स्ट्राइप्सचा वापर करा : घराच्या डेकोरेशनमध्ये काही फेरबदल करून घराचे रूप बदलू शकता. उदाहरणार्थ, स्ट्राइप्स कारपेटमुळे खोली लांब असल्याचा आभास होतो. अशाप्रकारे घराचे पडदेदेखील स्ट्राइप्स डिझाइनचे निवडून घर मोठे दाखवू शकता.

मार्गांना ब्लॉक करू नका : घरातील छोटे प्रवेशमार्ग, लॉबी किंवा हॉलमध्ये अरूंद कॉन्सोल टेबलचा वापर केल्यास घराचे प्रवेश स्थान मोठे असल्याचा आभास होतो. मार्गांना ब्लॉक करू नका किंवा प्रवेश इतके अरूंद करू नका की लोकांना तेथून ये-जा करण्यासाठी त्रास होईल. जितक्या दूरून तुमचे डोळे खोलीला पाहू शकतात, खोली तितकीच मोठी असल्याचे तुम्हाला जाणवेल.

असे ठेवा, किटाणूमुक्त घर

* सोमा

‘स्वच्छ घरातच सुदृढ कुटुंब नांदते’ असे म्हटले जाते. हे बरोबरदेखील आहे. ऋतु कोणताही असो, प्रत्येकाने घर किटाणूमुक्त ठेवणे गरजेचे आहे. कारण याचा प्रभाव थेट आपल्या स्वास्थ्यावर पडतो. केवळ एखाद्या विशेष प्रसंगी नाही तर प्रत्येक दिवशी साफ-सफाई करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही अनेक आजार जसे की श्वाससंबंधी, किटकांमुळे पसरणारे आजार, वायरल फ्लू इत्यादींपासून दूर राहू शकता.

जर घरात लहान मुले आणि वृद्ध असतील तर घर किटाणूरहीत असणे गरजेचे आहे.

मुंबईतील सॅरिनिटी पीसफुल लिव्हिंगचे डिझायनर आणि को फाऊंडर अमृत बोरकाकुटी सांगतात की जर्म फ्री घर असणे खूप गरजेचे आहे. कारण आजकाल अनेक प्रकारचे व्हायरल आपल्या आजूबाजूला वावरत आहेत. ज्यामुळे अनेक प्रकारचे व्हायरल फ्लू होतात. यावर योग्यवेळी उपचार न झाल्यास ते जीवघेणे सिद्ध होऊ शकतात.

या काही टीप्सवर लक्ष द्या, ज्यामुळे तुम्ही किटाणूमुक्त घर ठेवू शकता :

* घराची नियमितपणे साफ सफाई करा. जेणेकरून घर पूर्णत: जर्म फ्री होईल. पुसणी किंवा डसटिंगसाठी अरोमा आणि युक्लिप्टस ऑइलचा वापर करा. यामुळे बॅक्टेरियाला निर्मितीची शक्यता उरणार नाही. तसेच यामुळे छोटे छोटे किडे नष्ट होतात.

* सफाई केल्यानंतर तो कपडा चांगल्या पद्धतीने साबणाने धुवून ऊन्हात वाळत घाला. यामुळे पुसणी किंवा डस्टिंग कापड साफ आणि दुर्गंध विरहित राहील.

* स्वंयंपाकघर आणि इतर खोल्यांसाठी वेगेवगळे डस्टिंगचे कापड ठेवा. यामुळे घर हायजिनिक राहील. पुसताना फ्लोर क्लिनर लिक्डिचा वापर नक्की करा. सर्वाधिक किटाणू हे जमिनीवरच आढळतात.

* किचन घरातील विशेष हिस्सा असतो. जिथे जंतू किटाणू सहजपणे प्रवेश करतात. वापरलेली भांडी वेळच्या वेळी धुवा. जर तुमची भांडी दुसऱ्या दिवशी कामवाली धुवत असेल तर सर्व भांडी डिर्टजंटच्या पाण्यात भिजवून ठेवा. अशा भांड्यांकडे किडे लवकर आकर्षित होतात.

* जिथे अधिक ओलावा असतो, तिथे बॅक्टेरिया, बुरशी आणि इतर जंतू सहजपणे उद्भवतात आणि दुसऱ्या ठिकाणी पसरू लागतात. अशावेळी या जागेतून ओलावा दूर करण्यासाठी तो भाग धुवून झाल्यानंतर पंखा लावून ठेवा.

* चादरी आणि टॉवेल गरम पाण्यात आणि डिर्टजंटमध्ये नियमितपणे धुवा. जेणेकरून जर्म फ्री राहील.

* पडदे आणि पंख्यांची सफाई वॅक्युम क्लिरनने महिन्यातून एकदा तरी नक्की करा. बऱ्याचदा या ठिकाणी धूळ, माती सहजपणे जमते. मग किटाणू सहजपणे आकर्षित होतात.

* कोणत्याही भांड्यात किंवा डब्यात पाणी जास्त दिवस साठवून ठेवू नका. यामुळे मच्छर आणि किटाणू उद्भवतात. १-२ दिवसात पाण्याचा उपयोग करून पुन्हा स्वच्छ पाणी भरा.

* जर घरात लहान मुले किंवा वृद्ध असतील तर जास्त काळजी घेणे आवश्यक असते, कारण कोणताही आजार त्यांना लवकर होतो. साफसफाईनंतर अरोमायुक्त कँडल किंवा अगरबत्ती नक्की लावा.

* बाथरूम आणि वॉश बेसिनची सफाई नियमितपणे करा. यासाठी ब्लीचच्या ऐवजी साबण आणि पाणी वापरणे योग्य राहील.

* टाईल्सची स्वच्छता करण्यासाठी कोणत्याही डिटर्जंट आणि पाण्याचा वापर करू शकता. जर कुठे अधिक मळ जमा झाला आसेल तर त्याला जुना ब्रश आणि साबणाच्या सहाय्याने घालून स्वच्छ करा.

* दरवाजे खिडक्या आठवड्यातून एकदा साबणाच्या पाण्याने धुवून कोरड्या कपड्याने पुसून काढा. जेणेकरून त्यावर धुळ, माती चिकटू नये आणि किटाणू आकर्षित होऊ नयेत.

असे निवडा पडदे

* ललिता गोयल

पडदे घराच्या इंटीरियरचा महत्त्वाचा भाग आहेत. हे घरात प्रवेश करणाऱ्या पाहुण्यांच्या मनात घराच्या सजावटीच्या बाबतीत जिज्ञासा उत्पन्न करतात. म्हणजेच प्रवेशद्वाराची खासियत हे पडदेच असतात. सप्तरंगी पडद्यांनी घराची शोभा तर वाढतेच परंतु ते खोल्यांच्या पार्टीशन व एकांतपणा राखण्यातदेखील मदतनीस ठरतात. आकर्षक पडद्यांमुळे घराच्या भिंती, दरवाजे, खिडक्या व फर्नीचरची शोभा वाढते.

चला तर मग पडद्यांची निवड जी तुमची क्रिएटिव्हिटी दर्शविण्याबरोबरच घराचं सौंदर्यदेखील कसं वाढवितं ते जाणून घेऊया :

  • पडद्यांची निवड करतेवेळी ते घराच्या भिंती, फर्नीचर, कारपेण्टशी मिळतेजुळते असावेत याची काळजी घ्या.

 

  • तुमच्या घरात ऊन येत असेल तर लायनिंगच्या पडद्यांची निवड करावी. हे उन्हापासून संरक्षण करण्याबरोबरच खोलीलादेखील सोबर लुक देतात.

 

  • तुम्ही जर २ लेयरच्या पडद्यांची निवड करणार असाल तर एक फॅब्रिक लाइट तर दुसरं फॅब्रिक हेवी निवडा जसं कॉटनसोबत टिश्यू.

 

  • दिवसा खिडक्यांचे पडदे एकत्र करून ते आकर्षक दोरीने बांधू शकता.

 

  • खोलीत ऊन येत नसेल तर खिडक्यांसाठी हलक्या रंगाच्या पडद्यांची निवड करा. अर्क शेपच्या खिडक्यांसाठी नेट, कशिदाकारी, बॉर्डर व लेसने सजलेल्या आकर्षक पडद्यांची निवड करू शकता.

 

  • किचन, बेडरूम व लिव्हिंगरूमसाठी वेगवेगळ्या पडद्यांची निवड करावी, किचनसाठी पातळ लायनिंगचे, बेडरूमसाठी कॉटनचे आणि लिव्हिंगरूमसाठी सॅटिन व कॉटन पॉलिस्टरसारख्या हलक्या मिश्रित फॅब्रिकची निवड करू शकता.

 

  • बेडरूमच्या खिडकीसाठी हलक्या म्हणजेच कॉटनच्या पडद्यांची निवड करा म्हणजे बाहेरच्या हवेची मजा घेता येईल.

 

  • पडद्यांना नवीन लुक देण्यासाठी त्यावर लेस व बटन लावा. यामुळे घराच्या सजावटीला नवीन लुक मिळेल. हवं असल्यास तुम्ही पडद्यावर घुंगरूदेखील लावू शकता. हवेसोबत पडदे हलताच ते विंड चाइमचं काम करतील.

 

  • पडद्यांची निवड करण्यापूर्वी घरातील दरवाजेखिडक्यांची लांबीरुंदी मोजून घ्या.

 

  • छोटं घर मोठं दिसण्यासाठी लेमन, ग्रीन, बेबी पिंक, स्काय ब्लू, इत्यादी रंग निवडा. छोट्या घरात गडद रंग निवडू नका.

 

फॅब्रिक व मटेरियलची निवड

  • बाजारात पडद्यांची अनेक व्हरायटीज उपलब्ध आहेत. तुम्ही तुमची आवड व गरजेनुसार निवड करू शकता.
  • अलीकडे पडद्यांमध्ये वेल्वेट, पॉलिस्टर क्रश, कॉटन, सिथेंटिक मिक्स, विस्कोस, सॅटिन सिल्कच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध आहेत.
  • राजसी लुकसाठी सिल्क व वेल्व्हेट पडद्यांची निवड करा.
  • कंटेम्पररी लुक व छोट्या घरासाठी सिल्क सॅटिन, कॉटन पॉलिस्टर, सिल्क पॉलिस्टर फॅब्रिकची निवड करू शकता.
  • * एका रंगाच्या फर्निचरसोबत प्रिण्टेड वा टेक्सचरवाले पडदे निवडा. परंतु घराचं फर्नीचर प्रिण्टेड वा टेक्सचर असेल तर एका रंगाचे पडदे निवडा. प्लेन पडद्यांचं कॉम्बिनेशनदेखीव बनवू शकता.
  • प्रायव्हसीसाठी लायनिंगचे वा हलक्या प्रकाशासाठी ट्रान्सपरण्ट पडदे निवडा.
  • तुम्ही तुमच्या जुन्या सिल्कच्या बॉर्डरवाल्या साड्यांनादेखील पडद्याचा लुक देऊ शकता.

पडद्यांची देखभाल

  • वेळोवेळी पडद्यांची स्वच्छता करत राहा. स्वच्छता पडद्यांच्या फॅब्रिकनुसार करा. वेल्व्हेट व सॅटिनचे पडदे घरी धुण्याऐवजी ड्रायक्लिनिंग करून घ्या. कॉटन व कॉटन मिक्स फॅब्रिक घरी धुऊ शकता.

निसर्गाच्या थीमवर घर सजवा

* नसीम अन्सारी कोचर

युग शोबाजीचे आहे. प्रत्येकजण एकमेकांपेक्षा चांगली स्थिती दर्शविण्यास उत्सुक आहे. सोशल साइट्स आणि इंटरनेटच्या युगाने शहरी राहणीमानात बराच बदल घडवून आणला आहे. फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवर टाकण्यात आलेल्या चित्रांमध्ये स्वत:च्या फोटोपेक्षा पार्श्वभूमीत कोणकोणत्या सुंदर आणि मौल्यवान वस्तू दिसून येतात यावर अधिक लक्ष दिले जात आहे. हे एखाद्या व्यक्तिची स्थिती दर्शवते. आमच्या गृहिणींवर या गोष्टींचा सर्वाधिक परिणाम होतो, ज्या त्यांच्या गोड घरांना अजून अधिक गोड बनविण्याच्या नादात असतात.

कमी बजेटमध्ये घर कसे सुंदर बनवायचे, आपल्या ड्रॉईंग रूममध्ये अशा कोणत्या अनोख्या गोष्टी लावल्या की भेट देणारे पाहुणे कौतुक केल्याशिवाय राहू शकणार नाहीत, याचा शोध चालू आहे. तसे, सुंदर दिसण्यात-दाखवण्यात काही चूकही नाही.

निसर्गाच्या आश्रयात परत या

चला, आम्ही आपले घर सुंदर बनविण्यास मदत करतो. आजकाल, धूळमाती आणि प्रदूषणांनी भरलेल्या वातावरणात धावते जीवन निसर्गाच्या आश्रयाकडे परतू इच्छिते. हिल स्टेशनांवरील लोकसंख्या वाढत असताना, निसर्गाच्या कुशीत मनुष्याला मनशांति मिळते हे समजणे कठीण नाही. परंतु आपल्या घरात जर आपल्याला ही मनशांति मिळाली तर…

एका रंगाच्या भिंती, खिडक्या आणि दारावर समान रंगाचे पडदे, बाबांच्या काळातील फर्निचर बदलण्याची वेळ आली आहे. आता हे इंटीरियर बदला. आपल्या आयुष्यात आणि घरात निसर्गाचे वातावरण निर्माण करण्यासाठी, आपल्या घराचा कोपरांकोपरा निसर्गाच्या थीमवर सजवा. प्राणी, पक्षी, पर्वत, बर्फ नद्या, हिरवे गवत, झुलणारी झाडे, जर तुमच्या डोळयांसमोर असतील तर मनाला खूप आराम व मनशांती मिळेल. दिवसभर कार्यालयात काम केल्यावर, जेव्हा कंटाळलेला माणूस संध्याकाळी अशा घरात प्रवेश करेल, तेव्हा त्याला मोठा आराम आणि आनंद वाटेल.

वॉल पेंटिंग आणि सजावट

सर्व प्रथम आपण घराच्या भिंतींबद्दल बोलूया. पांढऱ्या, पिवळया किंवा फिकट निळया रंगांच्या भिंतींचे दिवस संपले आहेत. आता तेजस्वी, नखरेबाज आणि खटयाळ रंगांचा कल आहे. आजकाल बाजारात हिरव्या वेल्वेटच्या बॅकग्राउंडवर उमलणाऱ्या सुंदर फुलांचे वॉल पेपर खूप विकले जात आहेत. जर घराचा ड्रॉईंगरूम चमकदार रंगाचा असेल तर तो सकारात्मक उर्जा आणि आशा प्रसारित करेल. निसर्ग-थीम असलेले वॉल पेपर आजकाल घरांमध्ये मोठया प्रमाणात वापरले जात आहेत. ते लावणेही सोपे आहे आणि स्वच्छ करणेदेखील.

गडद रंगाच्या वॉल पेपरने ड्रॉईंग रूमची एक भिंत आणि इतर तीन भिंती हलक्या रंगाच्या नैसर्गिक चित्रांच्या वॉल पेपरने सजवा. जर पडदे, सोफा कव्हर आणि कुशन कव्हर या रंगांशी जुळत असतील तर मग अप्रतिमच. आपण एका कोपऱ्यात बोंसाई किंवा सुंदर कुंडीत लहान रोपटे ठेवा तर खिडकीवरदेखील सुंदर लहान फुलांच्या कुंडया सजवा.

पडदे नेचर प्रिंटचे असावेत

घराच्या सौंदर्यात पडदे आपली विशेष भूमिका निभावतात. आपले घर सुंदर दिसण्यासाठी आपण आपल्या घरात हेवी, रेशमी आणि महागडे पडदे लावणे आवश्यक नाही. आजकाल, निसर्ग प्रिंट्स असलेले पडदेदेखील स्वस्त किंमतीत बाजारात उपलब्ध आहेत, जे दिसण्यात अतिशय सुंदर आणि डोळयांसाठी आल्हाददायक आहेत. घराच्या भिंतीशी मॅच करणारे पडदे बसवावेत. जर भिंतींवर गडद रंगाचा वॉल पेपर असेल तर पडदे किंचित फिकट शेडचे आणि छोटया-छोटया प्रिंटचे घ्यावेत.

फुलांच्या कुंडया सजवा

बागकाम हा एक चांगला छंद मानला जातो. हे केवळ मनालाच आनंदी ठेवत नाही तर जेव्हा आपल्या कठोर परिश्रमाने वाढवलेली झाडे जेव्हा घराच्या कोपऱ्यांना सजवतात-सुगंधित करतात तेव्हा त्यातून मिळणारा आनंददेखील अत्यधिक असतो, पायऱ्यांच्या बाजू, व्हरांडा आणि छतांना हंगामी फुलांच्या कुंडयांनी सजवा. असे केल्याने आपल्या घरात ताजेपणा आणि सौंदर्य वाढते. वनस्पतींना बेडरूममध्ये ठेवू नये कारण रात्री ते कार्बन डायऑक्साईड सोडतात, जे फुफ्फुसांसाठी चांगले नाही.

झाडे नेहमी मोकळया जागांवर किंवा खिडक्यांजवळच ठेवले पाहिजेत. बाल्कनीमध्ये टांगत्या कुंडया लावा. जर आपल्याला पेंटिंगची आवड असेल तर आपण आपल्या हातांनी कुंडयादेखील रंगवू शकता. यामुळे त्यांचे सौंदर्य वाढेल.

एक कोपरा असाही सजवा

ड्रॉईंगरूमचा किंवा व्हरांडयाचा एक कोपरा झाडे-वनस्पतींनी आणि पक्ष्यांच्या पिंजऱ्यासह असा सजवा की जेणेकरून त्यामध्ये मेणबत्त्या आणि दिवे मधे-मधे ठेवता येतील. या सुंदर रंगीत मेणबत्त्या काचेच्या छोटया सुंदर जारमध्ये मेण बसवून बनवता येतात. त्यांना संध्याकाळी पेटवा. आपण पहाल की घरातील सदस्यांची दृष्टी या कोपऱ्यावरून हटणार नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें