– पारुल भटनागर

सूर्याच्या तीव्र किरणांचा थेट परिणाम महिलांच्या त्वचेवर होतो. यामुळे त्वचा काळवंडणे यासोबतच खाज, जळजळ व लाल चट्टे पडू लागतात. याला सनबर्न म्हणतात. यात हळूहळू त्वचेची आर्द्रता संपण्यासोबतच त्वचा रुक्ष व मृतवत होऊ लागते. इतकेच नव्हे तर सूर्याच्या अल्ट्रावायलेट किरणांच्या अधिक संपर्कात आल्याने त्वचेला सुरकुत्या पडण्याने वयदेखील जास्त दिसू लागते.

जर तुम्हीसुद्धा सनबर्नने त्रस्त असाल तर घाबरू नका. उलट आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगू, ज्याद्वारे तुम्हाला काही दिवसांतच सनबर्नच्या तक्रारीपासून मुक्तता मिळेल.

घरीच सनबर्नच्या समस्येचे निवारण करा

जर सनबर्नची समस्या आहे तर सनबर्न झालेल्या जागी कच्च्या बटाटयाचा उपयोग केल्याने चेहऱ्यावरचे डाग व चट्टे दूर होतात व वर्णदेखील उजळतो. याशिवाय तुम्ही बटाटयाचा रसदेखील घेऊ शकता, जो त्वचेची सूज कमी करण्यासोबतच त्वचेमध्ये होणारी जळजळदेखील कमी करतो. यासाठी तुम्ही एक बटाटा धुवून त्याची साल काढून किसून एका बाऊलमध्ये त्याचा ज्यूस काढा. नंतर यात काही थेंब लिंबाचा रस मिसळून कापूस बुडवून त्याला चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून तसेच राहू द्या. नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. याचा नियमित वापर केल्याने सनबर्नची समस्या ठीक होऊन जाते.

बटाटयात व्हिटॅमिन, मिनरल, फायबर व नॅचरल ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात. तसेच यात व्हिटॅमिन सीचे कॉम्बिनेशन असल्याने हे पिगमेंटेशन घालवण्यासोबतच त्वचेचा वर्णसुद्धा उजळण्याचे काम करते.

एलोवेरा, लाल मसूर व टोमॅटोचा पॅक

लाल मसूरचा पॅक सनबर्नसाठी बराच चांगला उपाय मानला जातो. यासाठी फक्त जेव्हा तुम्हाला हा पॅक चेहऱ्याला लावायचा असेल, तेव्हा एक तास आधी डाळ पाण्यात भिजवून ठेवा. ज्यामुळे स्मूथ पेस्ट बनवणे सोपे होईल. नंतर यात जवळपास एक चमचा टोमॅटोचा रस व थोडेसे एलोवेरा जेल मिसळून ही पेस्ट सनबर्न असलेल्या जागी लावून पाच मिनिटे मसाज करा. नंतर तीस मिनिटे लावून तसेच ठेवा व नंतर धुवा. लावल्यानंतर काहीच दिवसात तुम्ही त्वचेत बदल पाहू शकाल.

ते अशासाठी की लाल मसूरमध्ये विटामिन सी असते, जे सनबर्न घालवण्यासोबतच त्वचेचा पोतदेखील सुधारण्याचे काम करते. सोबतच यातील पोषक तत्वांमुळे हे ड्राय पॅचेससुद्धा हटवते. याला स्किन क्लिंजरदेखील म्हणतात, ज्यामुळे त्वचा निरोगी टवटवीत व उजळ बनते. शिवाय कोरफडीत व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अमिनो अॅसिड, सॅलिसिलिक अॅसिड, अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचा काळपटपणा व सुरकुत्या दूर करण्यासाठी उत्तम मानले जातात.

बेसन व हळदीचा पॅक

त्वचेचा वर्ण उजळण्यासाठी बेसन व हळदीच्या पॅकचा वापर तर वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. अशात तुम्ही उजळपणासोबतच डागरहित त्वचा व सनबर्नपासून सुटका मिळवू इच्छिता, तर तुम्ही बेसन व हळदीचा पॅक जरूर लावा. यासाठी तुम्हाला एक छोटा चमचा बेसन, अर्धा लिंबू, एक छोटा चमचा मधात चिमुटभर लिंबाचा रस मिसळावा लागेल. नंतर या तयार पेस्टला चेहऱ्यावर तीस मिनिटे लावून तसेच ठेवा. सुकल्यानंतर दुसऱ्यांदा स्क्रब करा. यामुळे काही मिनिटांमध्ये चेहरा उजळण्यासोबतच दर वेळच्या लावण्याने सनबर्न हळूहळू कमी होऊ लागेल. चांगल्या परिणामांसाठी हा पॅक आठवडयातून तीन ते चार वेळा लावावा लागेल.

बेसन नॅच्युरल एक्सफोलिएटरच्या रूपात काम करते, ज्यामुळे त्वचेच्या मृतपेशी निघून जाण्यासोबतच त्वचेत जिवंतपणा येतो. हळद चेहऱ्यावर चमक आणण्यासोबतच पिगमेंटेशन दूर करण्याचेदेखील काम करते. मधात त्वचेच्या पेशी वेगाने भरून काढणारी तत्त्वे असतात, ज्याने त्वचेचा गेलेला वर्ण पुन्हा येऊ लागतो.

आईस क्यूब ट्रीटमेंट

आईस क्यूब प्रत्येक घरी सहज उपलब्ध असतात. सन बर्न ठीक करण्यासाठी हे चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला थंडपणा मिळण्यासोबतच ती घट्ट होईल व त्यावर तेजसुद्धा दिसू लागेल. बर्फात थंडपणाचे गुणधर्म असल्याने ते त्वचेच्या उष्णतेला शोषून घेऊन थंडपणा पोहोचवण्याचे कामदेखील करते, ज्यामुळे जळजळदेखील कमी होते. सोबतच काळया वर्तुळांपासूनदेखील सुटका होते.

दही पॅक

सनबर्नपासून वाचण्यासाठी दही खूप उपयुक्त ठरते. यात असणारे प्रोबायोटिक्स त्वचेची सूज कमी करून त्वचा स्वच्छ करतात. यासाठी तुम्ही दही दहा ते पंधरा मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा व नंतर धुवा. यामुळे रोमछिद्रे मोकळी होतात व त्वचा स्वच्छ होऊन जाते. दह्यात झिंक व अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीजदेखील असतात, ज्यामुळे त्वचेची जळजळ बऱ्यापैकी कमी होते. तुम्ही हा पॅक आठवडयातून चार वेळा नक्की लावा.

हनी मिल्क पॅक

सनबर्न घालवण्यासाठी तुम्हाला एका बाऊलमध्ये एक मोठा चमचा मधात लिंबाच्या रसाचे काही थेंब घालावे लागतील. पेस्ट बनवण्यासाठी यात दूध मिसळा. नंतर हे २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. सुकल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून धुवून टाका. रोज असे केल्याने तीव्र सनबर्नदेखील ठीक होतात. जिथे मधात अँटी टॅन एजंट असतात, तिथे दूध त्वचेला आर्द्र बनवण्याचे काम करते, ज्यामुळे त्वचेच्या तक्रारीही दूर होतात.

राईस वॉटर पॅक

सनबर्नसाठी राईस वॉटर पॅक उत्तम आहे. यासाठी तांदूळ शिजवा व त्याचे पाणी फेकू नका, तर एक दिवस तसेच ठेवा. मग त्यात इसेन्शियल ऑईल घालून त्याचा पॅक बनवा, जेणेकरून त्याची घाण निघून जाईल. नंतर त्यात टिशू पेपर घालून चेहऱ्यावर वीस मिनिटे ठेवा. याला सनबर्न ट्रीटमेंट असेही म्हणतात. याने खूप लवकर सन बर्न ठीक होतो.

या नॅच्युरल बाथ थेरपीजदेखील तुम्हाला सनबर्न व वेदना, जळजळ यापासून आराम देण्यासाठी उपयुक्त ठरतील :

* आपल्या बाथटबमध्ये अर्धा कप अॅप्पल साइडर व्हिनेगर घाला. यामुळे सन बर्न त्वचेची पीएच लेवल पातळीत येण्याने त्वचा भरून येण्यात मदत होते.

* अंघोळ करते वेळी पाण्यात इसेन्शियल ऑईल, जसे की गुलाबजल, लव्हेंडर घाला. यामुळे वेदनेपासून बराच आराम मिळतो.

* थोडा बेकिंग सोडा घातलेल्या पाण्याने अंघोळ केल्याने सनबर्नमुळे झालेली जळजळ व वेदना कमी होतात.

* एक कप ओट्स पाण्यात भिजवण्यासाठी ठेवून द्या. नंतर ह्याने अंघोळ करा. यामुळे त्वचेची जळजळ दूर होण्यासोबतच त्वचेची गेलेली आर्द्रतादेखील परत येऊ लागते.

काही अत्याधुनिक ट्रीटमेंट्सदेखील आहेत ज्यांची माहिती करून घेऊया त्वचारोग तज्ञ डॉक्टर भारती तनेजा यांच्याकडून :

फ्रुट बायोपील फेशियल बरेच परिणामकारक

फेशियल तर तुम्ही पुष्कळ करून घेतले असतील, परंतु टॅनिंग वा सनबर्नसाठी फ्रुट बायोपील फेशियलसारखं उत्तम काही नाही. कितीही तीव्र सनबर्न का असेना, याच्या एका एप्लीकेशनने बऱ्याच प्रमाणात दूर होतो. जसे पपईचा वापर केला जातो. त्यामुळे त्वचा एका वेळेतच खूप सुंदर बनते.

व्हाइटनिंग फेशियल

व्हाइटनिंग फेशियलसुद्धा सनबर्नसाठी पुष्कळ लोकप्रिय फेशियल आहे, कारण यात व्हिटॅनॉल घातलं जातं. त्यामुळे याला व्हाइटनिंग फेशियल म्हणतात. यामुळे त्वचेवर कितीही तीव्र सनबर्न असेल, तरी तो आरामात निघून जातो, कारण यात अँटिऑक्सिडंट व पोषक तत्वे जी असतात, जी त्वचेतून मेलानिन कमी करून त्वचेचा वर्ण सुधारण्यासोबतच उजळण्याचेदेखील काम करतात.

लेर ट्रीटमेंट

चेहऱ्यावरील केस लेझरद्वारे काढण्याबद्दल तुम्ही ऐकलेच असेल, परंतु आता तीव्र सनबर्नदेखील १-२ सीटिंग्समध्ये लेझर ट्रीटमेंटद्वारे हटवले जाऊ शकते. जेव्हा त्वचा लाल तसेच सोलवटून निघण्यासोबतच ताप, प्रभावित भागावर फोड येतात, तेव्हा लेझर ट्रीटमेंटची गरज पडते. यात स्किन पिगमेंटेशन लेझर ट्रीटमेंटद्वारे एकाच खेपेत त्वचेतून ८० टक्के मेलानिन हटवले जाते. फ्रॅक्सील लेझर ट्रीटमेंटने हायपर पिग्मेंटेशन, एजिंग व अॅक्ने व्रण यांना सहजतेने हटवून नवीन निरोगी त्वचा मिळवली जाऊ शकते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...