* पूनम अहमद

साडी हा भारतातील सर्वात प्राचीन आणि पारंपरिक पोशाख आहे. काहींना वाटतं की साडीमध्ये आकर्षक, ग्लॅमरस दिसता येत नाही. पण असं मुळीच नाहीये. तुम्ही साडीमध्येही सेक्सी, ग्लॅमरस दिसू शकता. ‘ये जवानी है दिवानी’ सिनेमात दीपिकाचा साडीतील अवतार आणि ‘देसी गर्ल’मधला प्रियांकाचा बोल्ड लुक आठवतो ना.

साडीचा टे्न्ड परत आलाय. चला तर मग जाणून घेऊया, साडीमध्ये आकर्षक दिसण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

साडीचं कापड

तुम्हाला फॅब दिसायचं असेल तर टिपिकल सिल्क साडी किंवा इतर कोणतंही कापड निवडू नका. शिफॉन साडी किंवा शीयर साडी हा उत्तम पर्याय आहे. लाइट फॅब्रिक कॅरी करणं सोपं असतं. शीयर फॅब्रिकची तर फॅशन आहेच, पण शिफॉन साडी ही तर बॉलीवूडची ट्रेडिशनल फॅशन आहे.

साडीच्या प्रिंट आणि पॅटर्न्सवरही लक्ष दिलं गेलं पाहिजे. प्रिंटेड साडीपेक्षा प्लेन साडीमध्ये जास्त ग्लॅमरस दिसता येतं. आजकाल हाफ साडी पॅटर्नही खूप लोकप्रिय आहे. यामध्ये अर्ध्या साडीवर प्रिंट असते आणि अर्धी साडी प्लेन असते.

साडी नेसणे

साडी योग्यप्रकारे नेसणं आवश्यक आहे. कमरेपासून नेसायला सुरूवात करा. यामुळे तुमच्या शरीराचा बांधा दिसेल. तुम्हाला कंबर दाखवायची असेल तर निऱ्यांसोबत स्लीक ड्रेप करा. तुम्हाला कंबर लपवायची असेल तर फुल टॅ्रप उत्तम.

ब्लाउज

साडी आकर्षक दिसण्याचं श्रेय मॉडर्न ब्लाउजला जातं. आजकाल मिक्स अॅन्ड मॅचची फॅशन आहे. ब्लाउजमुळे साडीची स्टाइल उठून दिसेल. आकर्षक दिसण्यासाठी खालील पॅटर्नचे ब्लाउज वापरून पाहा.

* हॉल्टर नेक ब्लाउज

* स्पॅगेटी स्टे्रप ब्लाउज

* फुलस्लीव्ह किंवा थ्री-फोर्थ बॅकलेस ब्लाउज

* वाइड नेक ब्लाउज

* स्टाइलिश रॅपअप साडी ब्लाउज

* एम्बॉस्ड एम्ब्रॉयडरीचा ब्लाउज

* मॉडर्न चोली ब्लाउज डिझाइन

* शीयर बॅक साडी ब्लाउज

साडीवरच्या अॅक्सेसरीज

कमीत कमी अॅक्सेसरीज घातल्याने तुम्ही जास्तीत जास्त हॉट आणि ग्लॅमरस दिसाल. सेक्सी साडीसोबत स्टेटमेंट इयरिंग्ज पुरेशा आहेत. स्टेटमेंट क्लच विसरू नका. यावर पेन्सिल हिल्स घातल्या तर जास्त ग्लॅमरस दिसता येईल.

साडीवर हेअरस्टाइल

हाय बन हेअरस्टाइल : तुम्ही मोठा नेकनीस किंवा स्टे्रपलेस ब्लाऊज घालणार असाल तर हे चांगले दिसेल.

स्टे्रट हेअरस्टाइल : ही कमी वेळात होणारी सिंपल आणि एलिगंट हेअरस्टाइल आहे.

बँग्ज हेअरस्टाइल : ही स्टाइल लांब केसांसाठी फॅशनमध्ये आहे. ही स्टाइल वेस्टर्न ड्रेसेज आणि साडी दोन्हीवर छान दिसते.

सिंपल शॉर्टकट  हेअरस्टाइल : यासाठी मंदिरा बेदीचं कौतुक केलं पाहिजे. तिनेच ही स्टाइल लोकप्रिय बनवली. यावर मोठे कानातले आणि नेकपीस शोभून दिसतात.

सिंपल पोनीटेल : पोनीटेलसोबत एक स्टायलिश ब्लाउज सर्वांचं लक्ष वेधून घेईल. पोनी व्यवस्थित बांधली तर क्लासिक लुक मिळेल. साडीसोबत पोनी चांगली वाटते. तुमचं सौंदर्य खुलून दिसेल. तरुण मुलींमध्ये ही हेअरस्टाइल प्रसिद्ध आहे.

या प्रसिद्ध डिझायनर्सनी डिझाइन केलेल्या साड्यांना एक नवी ओळख तर मिळालीच. पण या साड्यांनी परदेशातही नाव कमावलं.

सत्यपाल : आपल्या प्रिंटेड फंकी डिझाइन्ससाठी ओळखले जातात.

मनीष मल्होत्रा : बॉलीवूड आणि फॅशन इंडस्ट्री यांना सुलतान ऑफ साडी म्हणते.

सब्यसाची मुखर्जी : साड्यांच्या क्षेत्रात हे एक मोठं नाव आहे.

तरूण तहलियानी : हे ब्रायडल साड्यांसाठी ओळखले जातात.

गौरांग शाह : हे हैदराबादचे डिझायनर आहेत. यांची जामदानी वीवर्सची एक मोठी क्रिएटिव्ह टीम आहे जी त्यांनी डिझाइन केलेले हँडमेड मास्टरपीस बनवते.

ऋतु कुमार : हे साडी आणि लहंग्याच्या हेवी ब्राइडल रेंजसाठी प्रसिद्ध आहे.

यांच्याशिवाय अनिता डोंगरे, अर्पिता मेहता, रोहित बल, नीत लुल्ला इत्यादी नावे आहेत, ज्यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात साडी नेऊन पोहोचवली आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...