* सुनील शर्मा
महिलांना २ गोष्टी सर्वात जास्त आवडतात- निरोगी शरीर आणि मेकअप. यामुळे केवळ त्यांची त्वचाच उजळत नाही तर त्या स्मार्ट आणि अॅक्टिव्हही दिसतात आणि ऑफिसमध्ये काम करत असतील तर त्या आपल्या सौंदर्याची जास्तच काळजी घेतात.
या सतर्कतेमध्ये चांगले अन्न आणि योग्य मेकअप खूप महत्त्वाचे असते अन्यथा स्वातीसारखी परिस्थितीसुद्धा येऊ शकते.
स्वाती एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करते, पण ऑफिसमध्ये कोणता मेकअप करायचा आहे किंवा काय खायचे-प्यायचे आहे याबद्दल ती बेफिकीर होते. एकतर ती तिच्या आकाराने काहीशी जास्तच हेल्दी आहे आणि त्यावर मेकअपही भडक करते, त्यामुळे तिच्या पाठीमागे तिची खूप टिंगळ केली जाते.
पण यावर उपाय काय? ऑफिससाठी काही खास प्रकारचा मेकअप असतो का? योग्य आहार कुणा ऑफिस गर्लला सर्वांची चाहती बनवू शकतो का? असे काय करावे की एखादी महिला आपल्या कार्यालयात हसण्याचे कारण बनू नये?
या सर्व प्रश्नांची उत्तरे देताना आहारतज्ज्ञ आणि मेकअप आर्टिस्ट नेहा सागर म्हणतात, ‘‘मुलीसाठी, विशेषत: ऑफिस गर्लसाठी चांगले खाणे-पिणे आणि मेकअप यामध्ये संतुलन राखणे हे काही रॉकेट सायन्स म्हणजे कठीण काम नाही. ऑफिसमध्ये कामाचा ताण असल्यामुळे आपल्या आहाराकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे, काही छोटयाछोटया गोष्टींची काळजी घेतल्यास कोणतीही ऑफिस गर्ल स्वत:ला निरोगी ठेवू शकते.
‘‘जिथपर्यंत मेकअपचा प्रश्न आहे तर ऑफिसमध्ये जास्त हेवी मेकअप आवश्यक नाही. तुमच्या रंगरुपानुसार आणि बॉडीच्या आकारानुसार मेकअप केल्यानेदेखील प्रभाव पडू शकतो.’’
ऑफिस गर्लने तिच्या डाएट आणि मेकअपची काळजी कशी घ्यावी. यासाठी नेहा सागर काही टीप्स देत आहे, ज्या तुम्ही विचारात घेतल्या पाहिजेत :
आहार टीप्स
* ऑफिसला जाण्यापूर्वी नाश्ता जरूर करा.
* नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यांशिवाय दिवसभरात फळांचे सेवन अवश्य करा. हंगामातील प्रत्येक फळ खा. याने शरीरात मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण पूर्ण होते. फळे हे नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाव्यतिरिक्त इतर वेळी खाण्याचा प्रयत्न करा.
* ऑफिससाठी रेडी टू इट मिलसोबत ठेवण्याचा प्रयत्न करा. जसे फळांमध्ये केळी, सफरचंद, पेरू, नाशपाती इत्यादी. खूप वेळेपूर्वी कापलेली फळे खाऊ नका.
* फळांव्यतिरिक्त, भाजलेले मखाने, चणे आणि सुका मेवादेखील तयार जेवणात समाविष्ट केले जाऊ शकतात.
* दररोज भरपूर पाणी प्या, बाहेरचे उघडे पाणी पिऊ नका, कारण त्यामुळे आजारी पडण्याचा धोका असतो.
* भोजनासाठी किमान १५ मिनिटे वेळ द्यावा. चावूनचावून खावे, नेहमी निरोगी अन्न खावे. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते.
सौंदर्य टीप्स
* ऑफिससाठी नेहमी हलका आणि न्यूड मेकअप केला गेला पाहिजे, ज्यामध्ये हलक्या रंगाच्या आयशॅडो आणि हलक्या रंगाची लिपस्टिक वापरावी.
* ऑफिसमध्ये फाउंडेशनही वापरता येते, पण चेहऱ्यावर हायलाइटर वापरू नका,
* ऑफिसमध्ये लिपस्टिक किंवा लिपग्लॉसची विशेष काळजी घ्या की ती अजिबात वेगळया रंगाची नसावी. ऑफिससाठी गुलाबी, पीच, माउव्ह आणि न्यूड ब्राऊन रंग वापरा.
* ऑफिससाठी त्वचेच्या रंगानुसार चेहऱ्यावर फाउंडेशन वापरण्याचा प्रयत्न करा. दिवसा लिक्विड फाउंडेशन वापरा.
* त्वचा तेलकट असेल तर ३-४ तासांनी चेहरा कोरडया टिश्यू पेपरने हलक्या हाताने स्वच्छ करा.