* गरिमा पंकज

रात्री १० वाजता मायाच्या घरासमोर एक मोठी गाडी येऊन थांबली. स्लीव्हलेस टॉप व जीन्स परिधान केलेली माया दणादण तिच्या फ्लॅटच्या पायऱ्यावरून खाली उतरत होती. तेवढयात रुना आंटी समोर धडकली. रुना आंटी तिच्या आईची सर्वात जवळची मैत्रीण आहे. आपली जबाबदारी ओळखून तिने मायाला टोकले, ‘‘मुली, एवढया रात्री तू कुठे जात आहेस? लोक काय म्हणतील याचा विचार करा.’’

मायाने हसतच आंटीचा खांदा थोपटला आणि मग म्हणाली, ‘‘आंटी, मी ऑफिसला जात आहे. माझ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी, माझी पत्रकाराची जबाबदारी पार पाडण्यासाठी. लोक काय म्हणतील याची मला कधीच चिंता नव्हती. माझं आपलं स्वत:चं आयुष्य आहे, मला स्वत:ची प्राधान्ये आहेत, माझी आपली स्वत:ची जगण्याची पद्धत आहे. याशी लोकांना काय देणे-घेणे? मी कधी लोकांना विचारले आहे का ते कधी आणि काय करीत आहेत म्हणून?’’

रुना आंटीला मायाकडून असे उत्तर अपेक्षित नव्हते. ती शांतपणे उभी राहिली आणि माया जीवनाला नवीन उद्देश देण्याच्या लालसेने पुढे गेली.

३२ वर्षीय माया दिल्लीत एकटीच राहते. रात्रीसुद्धा तिला बऱ्याचदा कामाच्या संदर्भात बाहेर जावं लागतं. रुना आंटी नुकतीच तिच्या सोसायटीत शिफ्ट झाली आहे.

प्रत्येक वेळी हटकणे

बहुतेकदा वडीलधारी मंडळी मायासारख्या मुलींना वेगवेगळया सूचना देतांना दिसतात. उदाहरणार्थ, ‘‘असे कपडे घालून तू कुठे जात आहेस? जरा विचार तर कर की लोक काय म्हणतील? अगं, इतक्या मुलांबरोबर तू एकटी का जात आहेस? तुला समाजाची काही पर्वा नाही का? क्लबमधील मुलांबरोबर नाचण्यात तुला लाज वाटली नाही? लोक काय म्हणतील याचाही विचार केला नाहीस? एवढया रात्री एकटी कुठे जात आहेस? एवढी मोठी झाली आहेस पण एवढाही विचार करत नाहीस की लोक काय म्हणतील.’’

लोकांचे काय घेऊन बसलात, जर मुलगी एकटीच राहत असेल तरी ते चिंतातुर, लिव्ह-इनमध्ये राहत असेल तरी ते कष्टी, मुलं होत नसेल तरी ते चिंतातुर, नोकरी करत असेल तरी त्यांना त्रास, मुलांबरोबर हसून गप्पा मारल्यात तरी त्यांना वैताग, रात्री उशीरा क्लबमध्ये गेलात तरी ते चिंतातुर, एवढेच काय तर नवरा असूनही परक्या पुरुषाकडे डोळे भरून पाहिलेत तरीसुद्धा त्यांना त्रास होतो.

समाजाची काळजी कशाला

लोकांची चिंता करू नका, कारण आपण मनुष्य आहोत, प्राणी नाहीत. आपण सर्वजण आपल्या स्वत:ची वेगळी ओळख आणि विचारसरणी घेऊन जन्माला आलो आहोत. आपण केवळ यासाठी जमावाचे अनुकरण करू शकत नाही, कारण समाजाला असे हवे आहे. आपल्या सर्वांची वेग-वेगळी स्वप्ने आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा आपल्या सर्वांना अधिकार आहे.

आपण सर्वांना आनंदी ठेवू शकत नाही. आपण एखाद्याच्या नजरेत चुकीचे असाल तर याचा अर्थ असा नाही की प्रत्यक्षात तसे आहे. आपण प्रत्येकाच्या नजरेत योग्य असू शकत नाही, आपल्याकडे जास्त वेळ नाही, म्हणून कुणा दुसऱ्याच्या विचारसरणीनुसार जगण्यात आपला वेळ वाया घालवू नका.

पराभव केवळ आपलाच होईल. लक्षात ठेवा की आपल्या विजयाचे श्रेय घेण्यात लोक जरा ही वेळ गमावणार नाहीत परंतु आपल्या पराभवासाठी आपल्याच जबाबदार ठरवले जाईल. म्हणून ही भीती तुमच्या आयुष्यातून आणि तुमच्या मनातून काढून टाका की लोक काय म्हणतील.

प्रत्यक्षात कोणालाही तुमची काळजी नाही. लोकांच्या विचारसरणीनुसार चालूनही आपण जर कुठल्या अडचणीत अडकलात तरीही कोणी आपल्या मदतीसाठी पुढे येणार नाही. तुमची मदद तुम्हा स्वत:लाच करावी लागेल. तेव्हा इतर लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपणास जे काही करायचे आहे तेच करा.

जे लोक केवळ त्यांच्या हृदयाचे ऐकतात तेच यशस्वी होतात. जर आपण इतिहासाची पाने पालटून पाहिली तर आपल्याला आढळेल की कोणताही मनुष्य यशस्वी यासाठी झाला कारण त्याने त्याच्या स्वप्नांचा पाठलाग केला आणि कठोर परिश्रम घेतले.

हस्तक्षेप एक असह्य वेदना

जेव्हा आपण एखादे नवीन कार्य सुरू करणार असतो किंवा लोकांनी ठरवलेल्या निकषांपेक्षा काहीतरी वेगळं करणार असतो तेव्हा आपल्यातील बहुतेक लोक असा विचार करून घाबरायला लागतात की लोक काय म्हणतील. इथे ‘लोक’ या शब्दाचा अर्थ समाज आहे, ज्यास आपण एकत्र मिळून बनवले आहे. आपण समाजात एकत्र राहतो. बऱ्याच प्रकारे एकमेकांवर अवलंबूनही असतो. पण हे अवलंबन सकारात्मक अर्थाने असले पाहिजे. एक असे अवलंबन, जे एखाद्याच्या यशाचा मार्ग मोकळा करू शकेल, एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकेल. जिथे प्रत्येकजण एकमेकांच्या वाईट काळात हातभार लावू शकेल, जिथे ते एकमेकांचे दु:ख वाटून घेऊ शकतील आणि आनंदांना चौपट करु शकतील.

हे बऱ्याच वेळा पाहिले गेले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात यशस्वी होण्याची वेळ अगदी शिखरावर असते तेव्हाच काही संकुचित दृष्टिकोन असलेल्या लोकांच्या हस्तक्षेपाने त्या व्यक्तीची स्वप्ने धुळीस मिळतात. एक शल्य आयुष्यभर आपल्याला सतत बोचत राहते. काळ पुढे जातो, परंतु ते दु:ख त्या व्यक्तीच्या जीवनात घर करून राहते.

हस्तक्षेपाची मर्यादा निश्चित करा

आपल्या जीवनात लोकांच्या हस्तक्षेपासाठी एक मर्यादा निश्चित करा. आयुष्य तुमचं आहे. जर ध्येय तुमचे असेल तर निर्णयदेखील तुमचाच असावा. आपल्या भविष्याची चिंता आपले कुटुंब, मित्र आणि आपल्यापेक्षा जास्त इतर कुणालाही असू शकत नाही.

जरा विचार करा जेव्हा लोकांची पाळी येते तेव्हा ते त्यांच्या आयुष्यात तुमचा हस्तक्षेप स्वीकार करतात? नाही ना? तर मग तुम्ही का?

पुरुषप्रधान समाजाची विचारसरणी

वास्तविक, पुरुषप्रधान समाजातील पुरुष स्त्रीला आपली संपत्ती मानतात. त्यांना स्त्रियांना त्यांच्या नियंत्रणाखाली ठेवून स्वत:चा मार्ग चालवायचा आहे. त्यांना त्यांच्या जीवनाचे निर्माते व्हायचे आहे. ते महिलेच्या ‘लैंगिक शुद्धते’च्या नावाखाली निर्बंधांचे जाळे विणतात, त्यात अडकून महिला तडफडत राहतात. धार्मिक नेते या मानसिकतेचा फायदा घेण्यास चुकत नाहीत. ते वेगवेगळया प्रकारे स्त्री-विरोधी नियमकायदे आणि निर्बंधांची लांबलचक यादी जारी करून त्यांचा स्वार्थ साधत राहतात.

शिकल्या-सवरलेल्या मुलीदेखील अशा लोकांचे ऐकणे सुरू करतील तर एक वेळ असेही येऊ शकते की त्यांचा कोंडमारा होऊ लागेल. स्वातंत्र्याच्या मोकळया हवेत श्वास घेणे तर दूर मुली त्यांची ओळखदेखील गमावतील.

इभ्रतेच्या मक्तेदारांची वास्तविकता

धार्मिक आदेश, महिलांचे रक्षण आणि जातीची इभ्रत या नावांनी ध्वज उंचावणारे आणि गप्पा मारणारे हेच लोक स्त्रियांसाठी सर्वात मोठे संकट आहेत. राजस्थान आणि हरियाणामध्ये मोठया संख्येने गर्भाशयात मुलींना ठार मारणाऱ्या या लोकांसह महिला कशा सुरक्षित राहतील ही विचार करण्यासारखी बाब आहे. त्यांना बाहेरील पुरुषांच्या आधी त्यांच्याच स्वत:च्या घरातील लोकांकडून धोका आहे. कधी त्यांना गर्भाशयातच ठार मारणे, कधी प्रेम केल्याची शिक्षा म्हणून जीव घेणे, कधी फोन वापरल्याबद्दल दंड ठोठावणे, तर कधी गिधाडासारखी बारीक नजर ठेवून आपल्याच घरातील स्त्रियांना बेअब्रु करणे. स्त्रियांच्या श्वासांवर या इभ्रतीच्या मक्तेदारांचा असा पहारा आहे, जो मृत्यूपेक्षा कितीतरी हजार पटीने अधिक भयानक आणि वेदनादायक असतो.

आजही आपला समाज २ प्रकारच्या जीवन मूल्यांनी संचालित होत आहे. एक जीवन मूल्य वर्णद्वेष-पितृसत्तेद्वारे स्थापित आहे. हे पूर्णपणे अन्याय आणि असमानतेवर आधारित आहे. ज्यात उच्च जाती आणि पुरुषांची सत्ता स्थापित केली गेली आहे. महिलांच्या विरोधात आदेश जारी करणाऱ्यांचे सामाजिक जीवन याच मूल्यांमुळे संचालित होत आहे.

दुसरीकडे, संविधानाने प्रदान केलेली जीवन मूल्ये आहेत. या जीवन मूल्यांमध्ये आधुनिकता, स्वातंत्र्य समानता आहे. यांच्यामुळेच आज महिला आगेकूच करीत आहेत.

या नासले-कुजलेल्या, असमानतेवर आधारित सामाजिक मूल्यांना कसे उद्ध्वस्त करायचे आणि समानतेची मूल्ये कशी स्थापित करायची हे देशापुढे सर्वात मोठे आव्हान आहे.

बहुतेकदा मुलींनाच लोकांच्या म्हणण्या-बोलण्याची काळजी घ्यावी लागते. लोकांच्या प्रश्नभरल्या नजरा त्यांच्यावरच येऊन थांबतात. केवळ मुलींच्या आचरणावरून प्रश्न उद्भवतात. पण हे किती काळ? आपण पितृसत्तात्मक संरचना मोडून, समान हक्कांच्या मार्गावर पुढे जाण्याची वेळ आता आली आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...