* गरिमा पंकज

भारतात घटस्फोटाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. १० वर्षांपूर्वी एक हजार लोकांमध्ये एक व्यक्ती घटस्फोट घेत होती, तिथे आता ती संख्या हजारावर १३पेक्षा जास्त झाली आहे. घटस्फोटांसाठी अर्ज पहिल्यापेक्षा दुप्पट संख्येने दाखल होत आहेत. विशेषत: मुंबई, बंगळुरू, कोलकाता, लखनौसारख्या मोठया शहरात हा ट्रेंड जास्त पाहायला मिळत आहे. या शहरांमध्ये केवळ पाच वर्षांत घटस्फोटाचे अर्ज फाइल करण्याच्या प्रकरणांत तिप्पटीने वाढ नोंदविण्यात आली.

२०१४मध्ये घटस्फोटाच्या ११,६६७ केस फाइल करण्यात आल्या. याउलट २०१०मध्ये ही संख्या ५,२४८ होती. अशा प्रकारे २०१४मध्ये लखनौ आणि दिल्लीमध्ये क्रमश: ८,३४७ आणि २,००० केसेस फाइल करण्यात आल्या. याउलट २०१० मध्ये ही संख्या क्रमश: २,३८८ आणि ९०० होती.

घटस्फोटांच्या प्रकरणांची वाढणारी संख्या आणि दाम्पत्यांमध्ये वाढत्या मतभेदाचे कारण काय आहे, नाते का टिकत नाहीत, अशी काय कारणे आहेत, जी नात्यांचे आयुष्य संपवितात?

या संदर्भात अमेरिकेचे मानसशास्त्रज्ञ आणि विवाह तज्ज्ञ जॉन गॉटमॅनने ४० वर्षांचा अभ्यास आणि अनुभवांच्या आधारावर निष्कर्ष काढलाय की मुख्य रूपाने अशी चार कारणे आहेत, ज्यामुळे दाम्पत्यामध्ये संवादहिनतेची स्थिती निर्माण होऊ लागते. या स्थितीच्या चार वर्षांत त्यांचा घटस्फोट होतो.

टीकात्मक वागणे : तसे तर कधी ना कधी सर्वच एकमेकांवर टीका करतात. अर्थात, पतिपत्नीमध्ये ही सामान्य गोष्ट आहे. मात्र समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा टीका करण्याची पद्धत एवढी वाईट असते की समोरच्याच्या मनालाच जखमा होतात. कोणत्याही परिस्थितीत एकजण दुसऱ्याला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावर आरोपांवर आरोप केले जातात. अशा वेळी पतिपत्नी एकमेकांपासून एवढे दूर निघून जातात की तिथून परतणे शक्य नसते.

घृणा : जेव्हा आपल्या मनात जोडीदाराबाबत घृणा आणि तिरस्काराच्या भावना निर्माण होऊ लागतात, तेव्हा समजून जा की हे नाते जास्त दिवस टिकणार नाही. घृणा व्यक्त करताना टोमणे मारणे, नक्कल करणे, एकेरी बोलणे यासारख्या अनेक गोष्टी सामील असतात. ज्यामुळे समोरच्याला महत्त्वहिन वाटते. अशा प्रकारचे वागणे नात्याच्या मुळावरच घाव घालते.

स्वत:चा बचाव करणे : जोडीदारावर आरोप करून स्वत:चा बचाव करणारे वागणे नात्याला शेवटाकडे नेते. पतिपत्नीकडून अपेक्षा केली जाते की त्यांनी प्रत्येक परिस्थितीत एकमेकाला साथ द्यावी. मात्र ते एकमेकांच्याच विरोधात उभे राहात असतील, तर त्यांचे नाते कोणीही वाचवू शकत नाही.

संवादहीनता : जेव्हा व्यक्ती आपल्या जोडीदारा प्रति उदासीनता दाखवू लागतो, संवाद संपुष्टात आणतो आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागतो, तेव्हा दोघांमध्ये निर्माण झालेली ही दरी नात्यातील उरलेसुरले आयुष्यही संपवून टाकते.

आणखीही काही कारणे

क्वालिटी टाइम : इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज, बंगळुरूद्वारे केल्या गेलेल्या रिसर्चनुसार, पतिपत्नीतील दुराव्याचे मुख्य कारण म्हणजे, ड्युअल कॅरिअर कपल (पतिपत्नी दोघेही नोकरदार असणे)ची वाढती संख्या. या अभ्यासामध्ये एक खास गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे, ५३ टक्के महिला आपल्या पतीशी भांडतात, कारण त्यांचे पती त्यांना क्वालिटी टाइम देत नाहीत, तसेच ३१.७ टक्के पुरुषांना आपल्या नोकरदार पत्नीविषयी तक्रार असते की त्यांच्याकडे कुटुंबासाठी वेळ नसतो.

सोशल मिडिया : नुकतेच अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासात आढळून आले की, सोशल मिडियामध्ये जास्त वेळ घालविण्याच्या प्रवृत्ती व घटस्फोटांची टक्केवारी यात परस्पर संबंध आहे.

व्यक्ती जेवढी जास्त सोशल मिडियामध्ये अॅक्टिव्ह असते, तेवढी संसार मोडण्याची भीती जास्त असते.

त्याची मुख्यत: दोन कारणे असतात. पहिले म्हणजे, सोशल मिडियामध्ये जास्त वेळ घालविणारी व्यक्ती आपल्या पत्नीला जास्त वेळ देत नाही. तो संपूर्ण वेळ नवीन मित्र बनविण्यात व लाइक व कमेंट्स मिळविण्यात बिझी असतो. दुसरे म्हणजे, अशा व्यक्तींचे विवाहबाह्य संबंध निर्माण होण्याची शक्यता वाढते. सोशल मिडियावर फ्रेंड रिक्वेस्ट अक्सेप्ट करणे आणि मैत्री पुढे चालू ठेवणे खूप सोपे असते.

धर्माचा नात्यावर होणारा परिणाम

सामान्यपणे नात्यांमध्ये कधी कडू-गोड क्षण येतच राहतात. पण याचा अर्थ हा नव्हे की आपण आपल्या चुकांकडे दुर्लक्ष कराल आणि मग मार्ग काढण्यासाठी बुवा-बाबांकडे धाव घ्याल. बुवा-बाबा पतिपत्नीच्या नात्याला ७ जन्माच्या बंधनात बांधतात. नाते वाचविण्यासाठी ते नेहमी स्त्रीलाच सल्ले देतात की, तिने दबून राहावे, कशालाही उत्तर देऊ नये.

खरे तर अशा धर्मगुरूंची इच्छा असते की व्यक्ती ७ जन्माच्या फेऱ्यात अडकून राहावा आणि गृहक्लेशापासून मुक्ती मिळविण्यासाठी तो वेगवेगळया प्रकारचे धार्मिक यज्ञ व पूजाअर्चनेमध्ये पाण्यासारखा पैसा त्याने खर्च करत राहावा.

स्त्रिया जास्त भावुक असतात. जप-तप व दान-पुण्यावर विश्वास ठेवतात. याचाच फायदा उठवून धर्मगुरू त्यांच्याकडून हे सर्व करवून घेतात, जेणेकरून त्यांना दानाचा फायदा मिळत राहील.

नुकताच एक संसार यासाठी मोडला, कारण गृहक्लेशापासून वाचण्यासाठी एक स्त्री तांत्रिकाकडे गेली.

गेल्या २५ मे ला दिल्लीच्या पालम भागात एका मुलाने आपल्या आईची चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या केली. ६३ वर्षांची आई म्हणजेच प्रेमलता आपल्या मुलगा आणि सुनेसोबत राहात होती. प्रत्येक छोटया-मोठया समस्येसाठी ती तांत्रिक आणि ज्योतिषाकडे जात असे. घरात रोज-रोज होणाऱ्या भांडणांच्या कचाटयातून सुटण्यासाठी ती तांत्रिकाकडे गेली आणि मग त्याने सांगितलेले उपाय घरी येऊन आजमावू लागली. हे सर्व पाहून सुनेला वाटले की ती जादूटोणा करतेय. त्यामुळे तिने ही गोष्ट पतीला सांगितली. मग त्या गोष्टीवरून घरात खूप भांडण झाले आणि मुलाने भाजी कापायच्या चाकूने आईवर हल्ला केला.

नाते मजबूत बनवा

नाते जोडणे खूप सोपे असते, पण ते निभावणे खूप कठीण असते. जॉन गॉटमॅनच्या मतानुसार, नाते मजबूत बनविण्यासाठी दाम्पत्यांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

लव्ह मॅपचा फंडा : लव्ह मॅप मानवाच्या मेंदूतील तो भाग आहे, जिथे व्यक्ती आपल्या जोडीदाराशी संबंधित प्रत्येक प्रकारच्या सूचना उदा. त्याच्या समस्या, अपेक्षा, स्वप्नांसह इतर महत्त्वपूर्ण तथ्य आणि भावनांना जमा करून ठेवते. गॉटमॅनच्या मतानुसार, दाम्पत्य लव्ह मॅपचा उपयोग एकमेकांप्रती समंजसपणा, जिव्हाळा आणि प्रेम प्रदर्शित करण्यात करू शकतात.

नेहमी साथ द्या : जीवनसाथीच्या जीवनाशी संबंधित प्रत्येत लहान-मोठया प्रसंगी त्याच्यासोबत उभे राहा. संपूर्ण उत्साह आणि प्रेमाने त्यांच्या प्रत्येक सुखदु:खाचे भागीदार बना.

महत्त्व स्विकारा : कोणत्याही प्रकारचा निर्णय घेताना किंवा कोणतेही महत्त्वपूर्ण काम करताना जोडीदाराला विसरू नका. त्याची परवानगी अवश्य घ्या.

तणाव दूर करा : पतिपत्नीमधील तणाव दीर्घकाळ राहू देऊ नये. जोडीदार आपल्या एखाद्या गोष्टीने दुखावला गेला असेल, तर गोड शब्दांचा लेप जरूर लावा. एकमेकांसोबत सामंजस्याने वागा. तडजोड करायला शिका.

दुरावा वाढू देऊ नका : अनेक वेळा पतिपत्नीमधील विवाद एवढा टोकाला जातो की त्यांचे जवळ येण्याचे सर्व मार्ग खुंटतात. जोडीदारामध्ये एकटेपणाची भावना येते. दोघेही याबाबत एकमेकांशी बोलतात, पण काही सकारात्मक उपाय काढू शकत नाहीत. प्रत्येक भांडणानंतर ते जास्तच तणावात येतात.

गॉटमॅन सांगतात की कधी अशी वेळ येऊ देऊ नका. पतिपत्नीचे भांडण यामुळे विकोपाला जाते, कारण त्यांच्या बोलण्यात माधुर्य, उत्साह आणि जिव्हाळयाची कमतरता असते. त्यांना तडजोड करायची नसते. यामुळेच ते भावनात्मक दृष्टीने एकमेकांपासून दूर निघून जातात. हा दुरावा कितीही वाढो, परंतु दाम्पत्याने हे जरूर जाणून घेतले पाहिजे की भांडणाचे मूळ काय आहे आणि ते कसे दूर करता येईल.

जोडादाराला सुखद अनुभूती द्या : पतिपत्नीने या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की त्याच्या जोडीदाराला काय आवडते, तो कोणत्या गोष्टीने खूश होतो. वेळोवेळी जीवनसाथीसोबत घालविलेल्या आनंदांच्या क्षणांना उजाळा द्या. जेणेकरून तेच प्रेम तुम्ही पुन्हा अनुभवाल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...