* प्रतिनिधी

  • मी २९ वर्षांची असून एका मुलीची आई आहे. आम्हाला आणखी २-३ वर्षं दुसरे मूल नको आहे. मी कॉपर टीबद्दल ऐकले आहे. माझ्या वहिनीने सांगितले की, ती लावल्यानंतर वां होण्याची भीती असते आणि सेक्सुअल लाईफवरही विपरित परिणाम होतो. हे खरे आहे का? कॉपर टी किती सुरक्षित आहे?

कॉपर टी इंग्रजी अक्षर टी या आकाराचे डिव्हाइस आहे. यात पुढच्या बाजूने धागा निघालेला असतो, जो अगदी सहजपणे व्हर्जायनामध्ये इंसर्ट केला जातो. कॉपर टी ६-७ वर्षांपर्यंत काम करू शकते. गर्भधारणा टाळण्यासाठी हा सोपा व उत्तम पर्याय आहे.

यामुळे वांझपण येत नाही आणि सेक्सुअल लाईफवरही विपरित परिणाम होत नाही. हे एक चांगले गर्भनिरोधक आहे पण, बहुसंख्य महिलांना याबाबत जास्त माहिती नसते आणि त्या ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवतात.

आशियात केवळ २७ टक्केच महिलाच आययूडी गर्भनिरोधक वापरतात. यावरून हे स्पष्ट होते की, जनजागृतीचा अभाव हे यामागचे कारण आहे. प्रत्यक्षात हे लावणे अतिशय सोपे आहे आणि जेव्हा गर्भधारणेची इच्छा होईल तेव्हा महिला ती सहजपणे काढूनही टाकू शकतात.

कॉपर टी लावणे व काढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरकडेच जावे. बाजारात सहजपणे उपलब्ध असलेल्या कॉपर टीमुळे मासिक च्रकावर कोणताच दुष्परिणाम होत नाही.

  • मी २५ वर्षांची आहे. २-३ महिन्यांनंतर माझे लग्न होणार आहे. नवरा मनमोकळेपणाने वागणारा आणि रोमँटिक आहे. पण त्याने सांगितले की त्याला इंटरकोर्सआधी ओरल सेक्स अधिक आवडते. मला हे माहिती करून घ्यायचे आहे की, ओरल सेक्समुळे काही नुकसान तर होत नाही ना?

शारीरिक स्वच्छता म्हणजे हायजीनकडे लक्ष दिल्यास ओरल सेक्समुळे कुठलेच नुकसान होत नाही. उलट हे सेक्स आणखी मजेदार करते.

‘कामसूत्र’मध्येही ओरल सेक्स ही एक स्वाभाविक क्रिया असल्याचे म्हटले आहे आणि याच्या विविध आसनांबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली आहे.

अजिंठा, एलोरा लेण्यांमध्ये आजही अशा मूर्ती पहायला मिळतील ज्या नरनारीमधील या प्रक्रियेला नजाकतीने दाखवत याचे समर्थन करतात की, शेकडो वर्षांपूर्वीही ओरल सेक्स म्हणजे मुख मैथुनाचे वेड होते.

ओरल सेक्समध्ये सेक्स पार्टनरला आपल्या तोंडाच्या मदतीने सेक्सचे समाधान मिळवून द्यायचे असते. त्यासाठी पार्टनरचे सेक्स आर्गन तोंडात घ्यावे लागते. या क्रियेत तोंडाचा वापर करून एकमेकांच्या डोळयात पाहून ओरल सेक्स करणे फारच रोमांचक अनुभव असतो.

पण ओरल सेक्ससाठी एकमेकांची परवानगी असणे खूपच गरजेचे आहे.

  • मी २७ वर्षांची विवाहिता असून प्रायव्हेट कंपनीत नोकरी करते. पतीचा स्वत:चा व्यवसाय आहे. माझे पती सरळ स्वभावाचे असून माझ्यावर खूप प्रेमही करतात. पण गेल्या काही महिन्यांपासून ते माझ्यावर संशय घेऊ लागले आहेत. गुपचूप माझा मोबाइलही तपासून पाहतात. मला नवऱ्याला गमवायचे नाही. सांगा, मी काय करू?

प्रेमात संशय हा असा एक काटा आहे जो दु:ख तर देतोच सोबतच नात्यामध्ये तिरस्कार निर्माण करतो. संशयामुळे सुखी वैवाहिक जीवन उद्वस्त व्हायला वेळ लागत नाही.

तुमचे पती गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यावर संशय घेऊ लागले असतील तर हे स्पष्ट आहे की, पूर्वी सर्व व्यवस्थित होते पण आता कदाचित असे काही घडत असेल ज्यामुळे ते संशय घेऊ लागले असतील.

अशावेळी तुम्ही एकांतात पतीकडून यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण, एखादी गोष्ट मनातल्या मनात ठेवून कुढत बसण्याने समस्या सुटणार नाही, उलट दोघांमध्ये गैरसमजाची भिंत उभी राहील.

तुमचे पती सतत आणि गुपचूप तुमचा मोबाइल तपासून पाहत असतील तर एक गोष्ट स्पष्ट आहे की, तुम्ही गरजेपेक्षा जास्तवेळ मोबाइल पाहत असाल. पती असेल तर गरजेपुरताच मोबाइलचा वापर करा.

पतीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. सुख-दु:ख शेअर करा. तरीही पतीचे वागणे बदलत नसेल तर एखाद्या समुपदेशकाची मदत घेता येईल.

  • मी २३ वर्षांची तरुणी असून एका विवाहित पुरुषावर माझे प्रेम आहे. आमच्यामध्ये फिजिकल रिलेशनही आहे. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि सांगतो की, आपण लग्न करूया. मी काय करू?

तुम्ही ज्या आगीशी खेळत आहात ती एकाच वेळी अनेक कुटुंबाना जाळू शकते. तुमचा तथाकथित प्रेमी तुम्हाला मुर्ख बनवत आहे. या नात्याला येथेच पूर्णविराम देऊन चांगले भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करणे, हेच योग्य ठरेल.

आता राहिली गोष्ट एका विवाहित पुरुषाशी लग्न करायची तर, कायद्यानुसार हे लग्न बेकायदेशीर ठरेल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...