* पारुल भटनागर

अचानक मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीत जायचं ठरलं आणि आपल्याकडे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल किंवा आपल्या घरात कोणताही फेस पॅक नसेल, जो लावून आपण काही मिनिटांत चमकू शकता, पण अशावेळी आपण असा विचार कराल की या कोमजलेल्या चेहऱ्यासह पार्टीला कसे जायचे. अशा परिस्थितीत बेसन एक अशी वस्तू आहे, ज्याद्वारे आपण काही मिनिटांत चमकदार त्वचा मिळवू शकता आणि लोकांची वाहवा घेऊ शकता.

बेसनाचे सौंदर्य लाभ

कोरडया त्वचेला मॉइश्चराइज करा : जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही बेसनात पिठात थोडी मलई किंवा दुधात मध आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट तयार करा. मग हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे कोरडे होण्यासाठी सोडून द्या. हा पॅक तुमची त्वचा स्वच्छ ठेवण्याबरोबरच त्वचेची मॉइश्चराइज्ड पातळी राखण्यासाठीदेखील कार्य करतो. यामुळे त्वचेला नवीन जीवन मिळते.

तेलकट त्वचेला नैसर्गिक लुक द्या : जर आपल्या त्वचेवर नेहमी तेल दिसत असल्यास चेहरा आकर्षक दिसणार नाही. अशा परिस्थितीत बेसन पॅक आपल्या त्वचेतून जास्तीचे तेल काढून टाकण्यासाठी आणि तिला मऊ बनविण्यासाठी कार्य करते. यासाठी तुम्ही बेसनात गुलाबाच्या पाण्याचे काही थेंब मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. नंतर कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने ते स्वच्छ करा. यामुळे तुम्हाला आपल्या त्वचेमध्ये सुधारणा जाणवेल.

डाग मिटवणे : जर चेहऱ्यावर डाग दिसत असतील तर चेहरा सुंदर दिसत नाही. अशावेळी त्यांना काढून टाकण्यासाठी आपल्याला बेसनात मध मिसळणे आणि चेहऱ्यावर लावणे आवश्यक आहे. आपण हा पॅक आठवडयातून ३-४ वेळा चेहऱ्यावर लावू शकता, कारण त्यात अँटीमायक्रोबिक गुणधर्म आहेत, तो मुरुमांच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतो. यामुळे त्वचा फ्रेश दिसून येते.

टॅनिंग हटवा : उन्हाळयात त्वचेची सर्वाधिक टॅनिंगची समस्या उद्भवते. अशावेळी आपल्याला बेसनामध्ये लिंबाचा रस, हळद आणि गुलाब पाणी घालून पेस्ट तयार करण्याची आवश्यकता आहे. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडी झाल्यानंतर पाण्याने धुवा. ही केवळ आपल्या त्वचेचा टोन सुधारत नाही तर त्वचा मुलायम आणि चमकदारदेखील बनवेल.

अशाप्रकारे तुम्ही बेसनाने चमकदार त्वचा मिळवू शकता.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...