* गरिमा पंकज

चहाच्या घोटासोबत, या जोडूया काही निवांत क्षण, मैत्रीचा सुगंध आणि आपलेपणातल्या आनंदाचे क्षण.’

आपल्या घरी कुणी पाहुणे आले तर त्या बहाण्याने, कधी पावसाचे टपोरे थेंब पडू लागले की गरमागरम भजी सोबत पिण्याच्या बहाण्याने किंवा कधी शरीराचा थकवा, मरगळ दूर करण्यासाठी, ताजेतवाने वाटण्यासाठी, चहा पिण्यासाठी कारण लागत नाही. अतिशय सुंदर क्षणांचा सोबती होतो चहाचा कप. म्हणूनच तर ढाबा असो की मोठमोठी रेस्टॉरंट्स, चहा सगळीकडे मिळतोच. फक्त तो बनवायच्या पद्धती वेगवेगळया असू शकतात. चीनमध्ये याला वेलकम ड्रिंकचे नाव दिले आहे तर जपानमध्ये पाहुणे आल्यावर ‘टी सेरेमनी’ केला जातो.

चहाचा इतिहास

चहाचा इतिहास फार जुना आहे. सर्वात प्रथम चीनमध्ये चहा पिण्यास सुरुवात झाली. नंतर सहाव्या शतकात चीनमधून चहा जपानमध्ये पोहोचला. तिथे चहाला फार पसंती मिळाली. एशियामध्ये चहाचे आगमन हे १९व्या शतकात झाले. आज भारत हा चहाचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे.

चहाचे फायदे

चहा हृदय तंदुरुस्त ठेवतो. हा अँटी इंफ्लेमेटरी, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी डायबिटिक अशा गुणांनी परिपूर्ण आहे. दातांसाठीही चहा चांगला असतो. चहामध्ये पोटॅशिअमसह इतर अनेक खनिज पदार्थ असतात. चहात असेलेले कॅटेचिन, पॉलिफिनॉल आणि अँटी ऑक्सिडंट्स याला आरोग्यपूर्ण बनवतात. भारतात चहाची लागवड ही प्रामुख्याने उत्तर भारतात कौसानी, दक्षिणमध्ये निलगिरीचे पठार क्षेत्र, उत्तरपूर्वेचे दार्जिलिंग आणि आसाम आणि दक्षिण भारतातील काही ठिकाणी केली जाते.

ब्लॅक टी : ब्लॅक टी हा पूर्ण ऑक्सिडेशनच्या प्रक्रियेने निर्माण होतो. यात कॅफिनचे प्रमाण हे ५० ते ६५ टक्के असते. ब्लॅक टी ही चहाची सर्वात कॉमन व्हरायटी आहे आणि संपूर्ण जगात ७५ टक्के लोक याचा वापर करतात.

फायदे : हा चहा हृदयरोगाचा धोका कमी करतो. डायबिटीजच्या रुग्णांनाही हा फायदेशीर असतो. ब्लॅक टी रोमछिद्रांमध्ये तरतरी आणतो आणि लाल रक्त पेशींचे रक्षण करतो.

ओलोंग टी : चीनी भाषेत ओलोंगचा अर्थ आहे ब्लॅक ड्रॅगन. यात कॅफिन कन्टेन्टचे प्रमाण हे ग्रीन टी आणि ब्लॅक टी यांच्या मधले असते. याला स्वत:चा असा वेगळा सुगंध असतो. तसा तर हा ब्लॅक टी सारखाच असतो, पण याचे फर्मेंटेशन हे कमी वेळ केले जाते ज्यामुळे याचा स्वाद फार सुंदर लागतो.

फायदे : हा वजन कमी करायला मदत करतो. फॅट कमी करतो. त्वचेवर वयाचा दिसणारा प्रभाव कमी करतो.

ग्रीन टी : ग्रीन टी मध्ये केवळ १० ते ३० टक्के कॅफिनच असते. यात स्वादासाठी लिंबू, पुदिना किंवा मध मिसळता येतो, पण साखर घातली जात नाही.

फायदे : कॅटेचिन नामक अँटीऑक्सिडंटने परिपूर्ण असलेला हा चहा तुम्हाला कॅन्सरपासून हृदय रोगासारख्या आजारांपासून वाचवतो. एका अभ्यासानुसार दररोज १ कप ग्रीन टी घेतल्याने कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजचा धोका १० टक्क्यांपर्यंत कमी करतो. लट्ठपणा कमी करायचा असेल तर दिवसातून ३ वेळा ग्रीन टी जरूर प्या.

मसाला टी : मसाला चहा हा काळी मिरी, लवंग, वेलची, दालचिनी इ. वाटून बनवला जातो. यात मसाला पहिल्यापासूनच तयार ठेवला जातो. चहा बनवायचा असतो  तेव्हा तयार मसाल्यातील थोडासा कपात टाकला जातो.

व्हाइट टी : व्हाइट टी हा अगदी माइल्ड फ्लेव्हरवाला असतो. याचा स्वादही शानदार असतो. याच्या एका कपात फक्त १५ मिलिग्रॅमपर्यंतच कॅफिन असते.

फायदे : हा कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजपासून संरक्षण देतो आणि कॅन्सरशी लढायलाही सहाय्य करतो. एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करायलाही मदत करतो.

हर्बल टी : हर्बल टी हे खरंतर काही ड्रायफ्रुट्स आणि हर्ब्स यांचे कॉम्बिनेशन आहे. यात कॅफिन नसते आणि साखरेची आवश्यकताही नसते. याला वेगळाच सुगंध आणि स्वाद असतो.

फायदे : जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार दररोज २ ते ३ कप हर्बल टी चे सेवन केल्यास हायपर टेन्शनच्या रुग्णांना ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत करतो.

लेमन टी : लेमन टीसुद्धा फॅशनमध्ये आहे. यात साखर किंवा मध, पुदिना, सुंठ किंवा पावडर, काळे मीठ जे काही आवडत असेल ते घालून पिता येतो. हा चहाही फायदेशीर असतो. यातून लिंबाचे होणारे लाभ शरीराला मिळतात.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...