* शिखर चंद जैन

अलीकडच्या काही वर्षांत खाण्यापिण्याशी निगडित अनेक समजुती प्रचलित झाल्या आहेत पण त्यामध्ये आता नवीन शास्त्रोक्त रिसर्च आणि विचारांमुळे बरेच बदल घडत आहेत. वर्षांनुवर्षांचा अनुभव आणि विज्ञानाच्या कसोटीवर उतरल्यानंतर आता शास्त्रज्ञ पुन्हा त्याच गोष्टींवर परतले आहेत जे पूर्वी आपले पूर्वज म्हणायचे. जसं की नेहमी स्वस्थ राहाण्यासाठी ते तूप, दूध, दही, कडधान्य, नैसर्गिक तेल (रिफाइंडरहित), कच्च्या भाज्या, फळं इत्यादींचं सेवन करायला सांगायचे, तसंच आता हेल्थ एक्सपर्टही म्हणू लागले आहेत.

मग या, जाणून घेऊया अलीकडचे ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या ताज्या सर्वेक्षणात, खाण्यापिण्याच्या कोणकोणत्या गोष्टींबद्दल काय काय म्हटलं गेलं आहे.

शेकमध्ये दुधाचा वापर

पूर्वधारणा : लाभदायक.

तज्ज्ञांचं मत : आयुर्वेदानुसार दुधाबरोबर आंबा, केळी, नारळ, बोर, अक्रोड, डाळिंब, फणस आणि आवळ्याचा वापर करू नये. आयुर्वेद ग्रंथांमध्ये याला आहाराच्या विरूद्ध म्हटलं गेलं आहे. अशा प्रकारचं सेवन केल्याने बेशुद्धी, पोटफुगी, जलोदर म्हणजे पोटामध्ये पाणी भरणं, भगंदर, रक्ताची कमतरता, शरीर सुकणे, ताप, जुनी सर्दी, नपुंसकता आणि आंधळेपणा यांसारखे रोग होऊ शकतात.

लोणी

पूर्वधारणा : लोणी अपायकारक असतं. म्हणून शक्यतो हे खाणं टाळलं पाहिजे. त्याच्याऐवजी लो फॅट असलेलं पॉलीअनसॅचुरेटेड स्प्रेड घ्या.

नवीन सल्ला : ‘‘कमी प्रमाणात लोणी खाणं फायदेशीर ठरतं. कमी प्रमाणात डेरी फॅट घेतल्याने कोलेस्ट्रॉल लेवल वाढत नाही,’’ डॉ. मायकल मोस्ले, सायन्स जर्नलिस्ट.

किती घ्यावं : सामान्य प्रमाणात.

अंडी

पूर्वधारणा : अंड्यांमध्ये भरपूर कोलेस्ट्रॉल असतं.

नवीन सल्ला : ‘‘अंडी आरोग्यासाठी खूप चांगली असतात. डाएटरी कोलेस्ट्रॉलने रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल लेवल वाढत नाही. यामध्ये न्यूट्रीएंट आणि व्हिटॅमिन असतात,’’ मेल बेकमॅन, सीनियर व्याख्याता न्यूट्रीशन, बर्मिंघम सिटी यूनिव्हर्सिटी.

किती घ्यावं : आठवड्यातून ३-४ वेळा.

दूध

पूर्वधारणा : दूध कायम सेमीस्किम्ड किंवा स्किम्ड (मलईरहित) घ्यावं.

नवीन सल्ला : फुल फॅट दुधामध्ये हेल्दी फॅट असतात, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात. फॅट म्हणजे ते अन्न अपायकारक असतं हे जरुरी नाही.

किती घ्यावं : दिवसभरात साधारणपणे अर्धा लीटर.

ब्रेड

पूर्वधारणा : ब्रेड आरोग्यासाठी चांगला असतो.

नवीन सल्ला : ‘‘फक्त होलग्रेन ब्रेडच चांगला असतो. मैद्यापासून निर्मित ब्रेड अपायकारक असतो. कायम लेबल वाचूनच ब्रेड घ्या,’’ मेल बेकमॅन, वरिष्ठ पोषणतज्ज्ञ.

किती घ्यावं : दिवसभरात २-४ स्लाइस खाणंच योग्य ठरतं.

ऑलिव्ह ऑइल

पूर्वधारणा : ऑलिव्ह ऑइल आरोग्यासाठी खूप चांगलं असतं.

नवीन सल्ला : ‘‘ऑलिव्ह ऑइल कोशिंबिरीवर तर ठीक आहे, पण हे फ्राय करण्यासाठी वापरल्यावर हे कार्सनोजेनिक (कॅन्सरकारी) होऊ शकतं. फ्राइंगसाठी रेपसीड ऑइल चांगलं असतं. याचेही अनेक फायदे आहेत,’’ डॉ. ग्लेनीज जोन्स, न्यूट्रीशनिस्ट.

किती घ्यावं : ‘‘दिवसभरात एक मोठा चमचा; पण फ्राइंगसाठी नाही.’’

फ्रूट ज्यूस

पूर्वधारणा : फळांचा रस आरोग्यासाठी खूप चांगला असतो.

नवीन सल्ला : डबाबंद फळांचा रस साखरेने भरलेला असतो. त्यामध्ये नैसर्गिक रंग आणि चव असण्याचीही शक्यता असते. अनेक फ्रूट ज्यूसमध्ये तर सॉफ्ट डिंकसारखं शुगर कंटेंट असतं.
किती घ्यावं : डबाबंद अजिबात घेऊ नका. ताज्या फळांचा रस तेही स्वत: बनवून घ्या.

कार्बोहायडे्रट

पूर्वधारणा : दिवसभरात जेवणामध्ये ५० टक्के कार्बोहायडे्रट सामील करावं.

नवीन सल्ला : ‘‘ब्राउन कार्बोहायडे्रट चांगले असतात. पण पांढरे खूपच अपायकारक असतात. कार्बोहायडे्रट घ्या, पण अख्ख्या धान्याच्या रूपात. पांढरा स्पॅगेरी, ब्रेड, तांदूळ हे सगळं चांगलं नाही,’’ मेल बॅकमॅन, ज्येष्ठ पोषण तज्ज्ञ.

किती घ्यावं : होलग्रेन कार्बोहायडे्रट दिवसभरातील अन्नाच्या ५० टक्के असावं.

योगर्ट

पूर्वधारणा : दही कायम लो फॅटचं घ्यावं.

नवीन सल्ला : ‘‘फुल फॅट जास्त चांगलं असतं. फुल फॅट योगर्टने डायबिटीज आणि हार्ट डिसीझचा धोका कमी असतो. फुल फॅट योगर्टने वेट लॉस करण्यासाठी मदत मिळते,’’ डॉ. मायकल मोस्ले, सायन्स जर्नलिस्ट.

किती घ्यावं : नियमितपणे फुल फॅट योगर्ट घ्यावं.

सुपर फूड

पूर्वधारणा : सुपर फूडसारखी कोणतीच गोष्ट नाही.

नवीन सल्ला : ‘‘काही विशेष आहार, जसं की फळं आणि भाज्या भरपूर पोषक असतात, पालक आणि बीटसारख्या तर व्हिटॅमिन आणि मायक्रो न्यूट्रीएंटने पुरेपूर असतात,’’ डॉ. मायकल मोस्ले, सायन्स जर्नलिस्ट.

किती घ्यावं : हवं तितकं खा.

डार्क चॉकलेट

पूर्वधारणा : चॉकलेट आरोग्यास अपायकारक असतं.

नवीन सल्ला : डार्क चॉकलेट हृदयासाठी फायदेशीर असतं. एका नवीन सर्वेक्षणानुसार डार्क चॉकलेटचं कमी प्रमाण खाल्ल्याने ब्लडप्रेशर कमी होतं. पण मिल्क चॉकलेट खाऊ नका. कारण त्यामध्ये कोकोआ कमी आणि फॅट व शुगर जास्त असतं.

किती घ्यावं : ७० टक्के कोकोआ असलेल्या डार्क चॉकलेटचे २ तुकडे पुरेसे असतात.

जेवणानंतर पाणी आणि मिठाई खाणं

पूर्वधारणा : कसलीच हरकत नाही.

तज्ज्ञांचा सल्ला : आयुर्वेदानुसार जेवणाआधी पाणी प्यायल्याने शरीर बारीक होतं, तर जेवणानंतर पाणी प्यायल्याने शरीर लठ्ठ होतं. जेवणाबरोबर थोडं थोडं पाणी पिणं योग्य ठरतं. त्याचबरोबर जेवताना सर्वात आधी गोड पदार्थ, त्यानंतर आंबट आणि खारट पदार्थ आणि सर्वात शेवटी तिखट, कडवट आणि तुरट पदार्थ खावेत. त्याने जेवण चांगल्या प्रकारे पचतं. आहाराच्या सुरुवातीला फळामध्ये पेयद्रव्य आणि सर्वात शेवटी खायच्या वस्तू घ्याव्यात.

दुधाबरोबर फरसाण

पूर्वधारणा : चालतं.

तज्ज्ञाचा सल्ला : आयुर्वेदात दुधाबरोबर मिठाचं सेवन निषेध आहे. फरसाण, बिस्किटं, भजी आणि इतर तेलकट, खारवलेले पदार्थ दुधाबरोबर खाऊ नयेत. असे बरेच पदार्थ बनवताना क्षार म्हणजे खायच्या सोड्याचा वापर होतो. त्यामुळे केवळ केस आणि डोळ्यांवरच परिणाम होत नाही तर आयुर्वेदानुसार खाण्याच्या सोड्यामुळे पुरुषाची पौरूष शक्ती जितकी कमी होते तितकी इतर कोणत्याच पदार्थाने होत नाही.

मध आणि पाण्याचं सेवन

पूर्वधारणा : फायदेशीर.

तज्ज्ञाचा सल्ला : मध गरम पाण्यात मिसळून पिण्याचा अर्थ आहे रोगांना आमंत्रण देणं. मध कधीही गरम वस्तूबरोबर सेवन करणं आहाराच्या विरूद्ध असतं. ताज्या पाण्यात जुनं मध मिसळून पिण्याने लठ्ठपणा कमी होतो. समप्रमाणात देशी तूप आणि मध पिणंही आहाराच्या विरुद्ध असतं.

ब्रेकफास्ट सीरियल्स

पूर्वधारणा : डबाबंद, ईजी टू यूज ब्रेकफास्ट सीरियल सकाळच्या नाश्त्याचे चांगले पर्याय आहेत.

तज्ज्ञांचा सल्ला : डबाबंद सीरियल्समध्ये हाय फ्रक्टोस कॉर्न सिरपचं प्रमाण जास्त असतं. बऱ्याच प्रोसेड फूडमध्ये स्वीटनर म्हणून याचा वापर केला जातो. ज्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. अगदीच नाइलाज असेल तरच प्रोसेस्ड फूडचा वापर करा.

कनोला ऑइल

पूर्वधारणा : हे शरीरासाठी फायदेशीर असतं.

तज्ज्ञांचा सल्ला : न्यूट्रीशनिस्ट सांगतात की, हे एक जेनेटिकली मॉडीफाइड तेल आहे, म्हणून हे आरोग्यासाठी चांगलं नाही. याच्या रिफाइनिंग प्रोसेससाठी भरपूर केमिकलचा वापर केला जातो जो शरीरासाठी फारच अपायकारक असतो. उत्तम पर्याय म्हणून राईचं तेल, बदामाचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल (कोल्ड प्रेस्ड) याचा वापर करावा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...