* शिखा जैन
वेळेच्या अभावामुळे नाती निभावण्याच्या पद्धतीत अनेक बदल झाले आहेत. व्यस्ततेमुळे अलीकडे लोक मोबाइल इंटरनेट इत्यादींच्या वापरामुळे एकमेकांच्या संपर्कात राहातात. परंतु जरा विचार करी की मित्रांना भेटून गप्पा मारणं आणि त्यांच्या घरी जाऊन मजा करण्याची कमी इंटरनेट वा फोन पूर्ण करू शकतात का? नाही ना? मग जे तुम्ही बऱ्याच दिवसांपासून केलेलं नाहीए ते आता का करू नये? तर चला, तुमच्या मित्रांच्या आणि नातेवाइकांच्या घरी सरप्राइज व्हिझिट करूया.
अनेक लोकांना वाटतं की बऱ्याच दिवसांपासून आपल्या नातेवाइकांकडे जायचं तर आहे परंतु वेळ नसल्यामुळे जाता येत नाही. परंतु एकदा का तुम्ही ठरवलंच आहे की सरप्राइज व्हिझिट करायचीच आहे तर ती कराच. परंतु असं करतेवेळी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे; कारण तुम्ही तिथे मौजमजा करायला जात आहात, त्यांना त्रास द्यायला नाही.
चला तर सरप्राइज व्हिझिट देऊन ती संस्मरणीय कशी करायची ते जाणून घेऊया.
त्यांच्या सुविधेचीदेखील काळजी घ्या : मित्र आणि नातेवाइकांकडे अचानक जाणं चांगली गोष्ट आहे. परंतु असं करतेवेळी या गोष्टीची काळजी घ्या की कोणाच्याही घरी वीकेंडलाच जा म्हणजे त्यांना त्रास होणार नाही आणि ते तुम्हाला पूर्ण वेळ देऊ शकतील.
युक्तीने माहिती काढा : ज्यांच्या घरी तुम्हाला जायचंय ते त्यांच्या घरी आहेत की नाही? त्यांचा त्या दिवशीचा एखादा प्रोग्राम तर नाही ना? त्यांच्या घरी दुसरा कोणी पाहुणा तर येणार नाही ना? हे सर्वप्रथन जाणून घ्या. त्यासाठी सर्वप्रथम त्यांच्याशी फोनवरून इकडच्यातिकडच्या गप्पा मारून घ्या. त्यानंतर आज ते काय करत आहेत याबाबतदेखील माहिती घ्या आणि नंतर त्यानुसार जाण्याचा प्रोग्राम ठरवा.
पाहुणचार करून घेऊ नका : तुम्ही त्यांच्या घरी अचानक जात आहात, तेव्हा या गोष्टीचीदेखील काळजी घ्या की त्यांना कामालाच जुंपू नका, उलट तुम्ही काही वेळासाठी तिथे गेला असाल तर गप्पागोष्टी आणि थट्टामस्करीदेखील करा. फक्त खाणंपिणं करत राहू नका. मिठाईबरोबरच खाण्यापिण्याच्या वस्तूदेखील घेऊन जा.
जुन्या आठवणींना उजाळा द्या : खूप दिवसांनंतर भेटला आहात मग काय झालं, हिच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या छानशा आठवणींना उजाळा देऊ शकता. आपल्या मित्रांशी आपल्या मनातील गोष्टी शाळाकॉलेजप्रमाणेच शेअर करा. अशा काही गोष्टी ज्या त्यांच्या आणि तुमच्यादेखील आवडत्या होत्या, त्यादेखील आठवा. अधिक वेळ लावू नका. सरप्राइज व्हिझिट नेहमी छोटीशी ठेवा. २५-३० मिनिटापेक्षा अजिबात जास्त नाही आणि या दरम्यान भरपूर थट्टामस्करी करून घ्या.
रागरूसवेदेखील दूर करा : तुम्ही जर खूप काळानंतर भेटत असाल आणि यापूर्वी काही गोष्टींवरून तुमच्यामध्ये काही वाद असतील ज्याचा प्रभाव तुमच्या नात्यांवर पडला असेल तर ते सर्व आता मिटवून टाका. तुमच्या मनातील सर्व गोष्टी त्यांच्याशी शेअर करा आणि त्यांचं ऐका. विश्वास ठेवा, तुमचे नातेसंबंध नक्कीच सुधारतील.
गिफ्ट खास असावं : तुमच्या नातेवाइकांकडे जाणार असाल तर गिफ्ट, खाण्यापिण्याच्या वस्तू म्हणजेच जे काही नेणार असाल ते त्यांच्या पसंतीचं असायला हवं वा मग उपयोगी असावं. जसं की तुम्ही त्यांच्यासाठी मिठाईच्या ऐवजी ड्रायफ्रूट घेऊन जा, जे ते अनेक दिवस खातील आणि तुमची आठवण कढतील. गिफ्ट द्यायचं असल्यास ऑर्गेनिक गिफ्टदेखील देऊ शकता. जसं की ऑर्गेनिक, चहा, कॉफी, सोप क्रीम, हेअर अॅण्ड स्किन केअर रेंज वा प्लांट्स इत्यादी. गिफ्ट कोणतंही असो, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की ते त्यांना नंतरदेखील लक्षात राहील असं असतं.
अचानक बनविलेला प्रोग्राम छान असतो : अनेकदा आपण प्लान करून जेव्हा एखादा प्रोग्राम बनवितो तेव्हा अनेकांची परवानगी घेण्याच्या वादात प्रोग्राम बनतच नाही वा मनातील गोष्ट पूर्ण न झाल्यामुळे कोणती ना कोणती व्यक्ती असमाधानीच राहाते. परंतु जेव्हा आपण अचानक एखादा प्रोग्राम बनवितो तेव्हा अधिक विचार करण्याचा आणि प्लानिंग करण्याचा वेळच मिळत नाही. अशावेळी थोड्याच काळात जे काही होतं ते द बेस्ट होतं. मग ती कोणाच्या घरी जाऊन खाण्यापिण्याची गोष्ट असो वा मग एन्जॉय करण्याची.
सरप्राइज व्हिझिटचे फायदे
* बिघडलेली नाती वा गोष्टी पुन्हा सुरळीत होण्याचे चान्सेस अधिक असतात.
* एन्जॉय करण्याची अधिक संधी.
* तुम्हाला अचानक आलेलं पाहून नातेवाइकांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहायला मिळतो ती गोष्ट वेगळीच असते.
* मित्र आणि नातेवाइकांच्या या जुन्या तक्रारी दूर होतील की तुम्ही आता आमच्याकडे येतजात नाही.
* आज तुम्ही सप्राइज व्हिझिट केलीय, उद्या ते करतील. अशाप्रकारे पुन्हा एकदा येण्याजाण्याची परंपरा सुरू होईल; जी पूर्वी कधी तुटली होती.
* अगोदर तुम्ही कळवून गेला असता तर कदाचित त्यांना डिनर वगैरे करण्याच्या औपचारिकतेत १० गोष्टी बनवाव्या लागल्या असत्या, त्यामुळे त्यांना त्रास होऊ शकला असता. परंतु तुमच्या अचानक येण्याने खाण्यापिण्याची औपचारिकता कमी होईल. कदाचित ते बाजारातून काही तयार मागवतील वा तुम्ही काही पॅक करून न्या.
* संपूर्ण कुटुंब आणि जवळचे नातेवाईक, मित्रांसोबत अशाप्रकारे टाइम स्पेंड केल्याने तुमच्या नात्यात नवीन ऊर्जा येईल.
* मुलांमध्येदेखील इमोशनल बॉडिंगच्या भावनेचा विकास होणं खूपच गरजेचं आहे आणि हे सर्व तुम्ही जेव्हा तुमच्या नातेवाइकांकडे येताजाता तेव्हाच शक्य होतं. तुम्हाला अशाप्रकारे सामाजिक व्यवहार करताना पाहून तेदेखील हे शिकतील.
सरप्राइज व्हिझिटमुळे नुकसान
* कदाचित अचानक तुम्हाला आलेलं पाहून त्यांना आवडणार नाही.
* हा विचार करूनच चला की जर मित्र वा संबंधी घरी नसतील तर तुम्ही नाराज होणार नाही. त्यामुळे एकाच दिशेच्या २-३ जणांकडे जाण्याच्या तयारीनेच जा.
* कदाचित त्यांना दुसऱ्या कोणाची अपेक्षा असेल आणि तुम्ही गेलात तर त्यांचा मूडदेखील ऑफ होऊ शकतो.
सरप्राइज केव्हा देऊ शकता
तसंही हे सरप्राइज केव्हाही कोणत्याही वीकेंडला देऊ शकता, परंतु जवळच्या लोकांचा बर्थ डे, लग्नाचा वाढदिवस, एखादा सण वगैरे असेल तर तुमचं असं अचानक मिठाई वा केक घेऊन पोहोचणं त्यांना खूप छान वाटेल आणि त्यांच्या मनात तुमच्याबद्दल पूर्वीपेक्षा अधिक प्रेम आणि सन्मान वाढेल; कारण तुम्ही त्यांचा स्पेशल दिवस लक्षात ठेवला आणि त्यांच्यासोबत सेलिब्रेट केलं.
नववर्ष असो, होळी असो वा मग दिवाळी, शुभेच्छा देण्याची संधी आपण सोडत नाही. परंतु या क्षणी शुभेच्छा देण्यासाठी आपण नेहमी सोशल साइट्स आणि तंत्रज्ञानाची मदत घेतो आणि खास दिवसांच्या शुभेच्छा आपल्या मित्रांना आणि नातेवाइकांना पाठवतो तेव्हा समोरून लाइक, थँक्स वा रिप्लाय ग्रीटिंग पाहून आपल्याला तेवढ्यापुरता आनंद होतो मात्र प्रत्यक्षात भेटण्याचा आनंद खूप काही देऊन जातो. मग यावेळी स्वत:हून आपले मित्र, नातेवाइकांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्या द्या. मग पहा, त्यांना खूप आनंद होईल अणि नवीन आनंद अधिक दिवगुणित होईल.