* ललिता गोयल

स्मार्टफोन आपल्या सगळयांच्या जीवनाचा एक अभिन्न अंग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण याच्यावर अवलंबून असतो, मग गोष्ट सकाळच्या अलार्मची असो, ऑनलाईन पेमेंटची, शॉपिंगची, बोअर झालं की संगीत ऐकणे किंवा चित्रपट बघणे, एखादा महत्वाचा मेल करायचा असो किंवा आपल्या मित्रांशी व नातेवाईकांशी कनेक्ट राहायचे असो. आपणा सगळयांचा पूर्ण संसार या लहानशा वस्तूत  सामावलेला आहे. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की या लहानशा वस्तूशी आपली ही जवळीक आपल्या दैनंदिन वर्तणुकीत कित्येक समस्यासुद्धा निर्माण करत आहे? जर तुम्ही स्मार्टफोनमधून महत्वाची माहिती काढू शकला नाहीत तर तुम्ही त्रासून जाता. जर तुमच्यापर्यंत मेसेज किंवा कॉल पोहोचत नसेल, तर तुम्ही बेचैन होऊ लागता. जर तुमच्याकडे प्रीपेड कनेक्शन असेल, तर स्मार्टफोनमध्ये बॅलेंस कमी होताच तुम्ही घाबरून जाता. कित्येक व्यक्तींमध्ये इंटरनेटचं स्पीडही टेन्शन वाढवतो.

फेसबुक वा अन्य सोशल नेटवर्किंग साईटवर स्वत:चा स्टेटटस अपलोड करू न कल्याने वा इतरांचा स्टेटस वाचू न शकल्यानेही अस्वस्थता जाणवते.

याव्यतिरिक्त काही लोकांना नेहमी आपला स्मार्टफोन हरवणार असल्याची भीती सतावत राहते. याचा अर्थ जर एक मिनिटही फोन त्यांच्या नजरेपासून दूर झाला तर ते बेचैन होऊ लागतात. आपला स्मार्टफोन हरवल्याच्या भीतिने त्यांच्या हृदयाची धडधड वाढते.

नोमोफोबिया नावाचा आजार

लोवा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये अलीकडेच लावलेल्या शोधानुसार स्मार्टफोन लोकांमध्ये नोमोफोबिया नावाचा आजार निर्माण करत आहे. या रोगाच्या व्यक्तीला सतत आपला मोबाईल हरवण्याची भीती वाटत राहते आणि कित्येकदा तर हा फोबिया माणसांवर एवढा वरचढ होतो की टॉयलेटमध्येसुद्धा ते आपला मोबाईल बरोबर घेऊन जातात आणि दिवसातून कमीतकमी ३० पेक्षा जास्त वेळा आपला फोन चेक करतात. प्रत्यक्षात त्यांना भीती वाटत असते की फोन घरी विसरलो तर त्यांचा एखादा महत्वाचा मेसेज किंवा कॉल मिस होईल आणि त्यांची हीच भीती त्यांच्या वर्तणूक आणि व्यक्तिमत्वातील बदलाचे कारण बनते. या भीतिने त्रस्त लोकांना वाटत राहते की फोनविना आपला सगळया जगाशी काहीच संपर्क राहणार नाही.

फोनविना जीवन अपूर्ण

लंडनमध्ये झालेल्या एका दुसऱ्या संशोधनात म्हटलं आहे की नोमोफोबिया आजच्या काळातली एक गंभीर समस्या आहे आणि यांच्या गांभीर्याला समजून घेण्यासाठी जवळपास १००० लोकांवर संशोधन झालं, ज्यात ६६ टक्के लोक म्हणाले की त्यांना आपला मोबाईल हरवण्याची भीती त्रास देत राहते. संशोधनात असंही दिसून आले की १८ ते २४ वर्षांमधील तरुणांमध्ये मोबाईलप्रति सर्वाधिक जवळीक आहे. या वयातील साधारणत: ७७ टक्के लोक मोबाईलविना एक मिनिटसुद्धा राहू शकत नाहीत. अशा लोकांना वाटतं की मोबाईलविना आपलं जीवन अपूर्ण आहे. ते याच्याशिवाय राहू शकणार नाहीत. संशोधनात असेही दिसून आले की नोमोफोबिया झालेली व्यक्ती दिवसातून कमीतकमी ३७ वेळा आपला मोबाईल चेक करते.

उपाय काय

मानलं की स्मार्टफोनचे टेक्निक तुम्हाला स्मार्ट आणि अपडेट ठेवते, पण त्याबरोबरच हे लक्षात ठेवायची गरज आहे की ही टेक्निक तुमची सुविधा बनण्याऐवजी डोकेदुखीचे कारण न बनो. मोबाईल फोनच्या या व्यसनातून बाहेर निघायला आवश्यक आहे की तुम्ही तुमच्या जीवनाचं काहीतरी ध्येय ठरवावं. स्वत:ला आपल्या आवडीच्या छंदात व्यस्त ठेवायचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये काम करताना फोन एरोप्लेन मोडवर ठेवा. असे केल्याने तुम्ही फालतू कॉल्स आणि मेसेजेसपासून दूर राहाल. आपल्या सगळया सोशल मिडिया अॅपचे नोटिफिकेशन बंद ठेवा. सोबतच फोनमध्ये फालतू अॅप्स ठेवू नका. यामुळे तुम्ही फोनवर अवलंबून राहणार नाही. काल्पनिक जगातले संबंध निभावण्याऐवजी खऱ्या जीवनातल्या मित्रांबरोबर वेळ घालावा. शक्य तितके स्वत:ला फोनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...