* किरण आहुजा
खाद्याला मिठी मारणे किंवा एखाद्याकडून आलिंगन मिळणे ही सर्वात आनंददायक भावना आहे. ही अशी भावना आहे, जी कोणत्याही मनुष्याच्या हृदयाच्या खोलीला स्पर्श करते. कितीही त्रासलेले असलात तरी कुणा आपल्या जवळच्या माणसाला मिठी मारून खूप छान वाटते. यालाच जादूची मिठी म्हणतात.
भले ही आपण आपल्या जोडीदाराच्या बाहूमध्ये असलात किंवा आपल्या मुलाला मिठी मारली असेल किंवा आपण आपल्या मित्रालाच जादूची मिठी दिली असेल, एखाद्याला मिठी मारणे किंवा कुणाकडून आलिंगन मिळणे आपल्याला नेहमी चांगुलपणाची आणि आनंदाची जाणीव करून देते. आपल्याला सुरक्षितता आणि प्रेमाचा अनुभव होतो.
जादुई मिठी
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाच्या शेवटी एक दृश्य होते, जेव्हा संजय दत्त आणि सुनील दत्त पहिल्यांदाच एकमेकांना मीठी मारतात. या चित्रपटात सुनील दत्तचा संवाद होता, ‘‘आपल्या आईला नेहमीच जादूई मिठी देत आलास, आज वडिलांनाही दे.’’ त्यावेळी दोघेही एकमेकांना मिठी मारून रडू लागतात.
या चित्रपटात ज्या प्रकारे मुन्नाला पारंपारिक पद्धती ऐवजी प्रेम, आपुलकी आणि जादूई मिठीने रूग्णांना बरे करण्याचा प्रयत्न करताना दाखवले आहे, ते खरोखर दर्शविते की एखाद्याला मिठी मारल्याने किती प्रभाव पडतो.
आपण म्हणू शकतो की मिठी मारणे, केवळ भावना व्यक्त करण्यासाठीच नाही तर हेल्थ बूस्टरदेखील आहे आणि ही गोष्ट वैद्यकीय शास्त्रानेदेखील सिद्ध झाली आहे. हृदयापासून मारलेली एक मिठी आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते.
आजच्या आधुनिक जीवनशैलीत आपल्याकडे सामाजिक संवाद आणि स्पर्श करण्याच्या फारच कमी संधी आहेत कारण आपण एकटे आणि व्यस्त आयुष्य जगतो, तर थेरपिस्ट म्हणतात की जगण्यासाठी आपण १ दिवसातून ४ वेळा मिठी मारली पाहिजे.
जर आपल्याला स्वत:बद्दल चांगले वाटून घ्यायचे असल्यास, आपला तणाव कमी करू इच्छित असल्यास, आपले संभाषण प्रभावी बनवू इच्छित असाल, आनंदी राहू इच्छित असाल आणि याशिवाय निरोगी आयुष्य जगू इच्छित असाल तर मग मिठी मारणे आणि हृदयाशी घेणे दोन्ही करण्याची हीच योग्य वेळ आहे.
केवळ फायदे
आपल्या शरीराच्या त्वचेत लहान-लहान प्रेशर पॉईंट्स आहेत, ज्यास पॅसिनीयन कॉर्पसल्स म्हणतात. या पॉइंट्समुळे शारीरिक स्पर्श जाणवतो आणि मेंदूपर्यंत व्हॅगस मज्जातंतूद्वारे सिग्नल पोहोचतो. व्हॅगस मज्जातंतू हृदयासारख्या शरीराच्या अनेक भागाशी जोडलेले असतात. हे ऑक्सिटोसिन रिसेप्टर्सशीदेखील जोडलेले असतात आणि ऑक्सिटोसिन (हॅप्पी हार्मोन) ची पातळी वाढवतात.
एखाद्याला मिठी मारल्यामुळे आपल्या शरीरात ऑक्सिटोसिन हार्मोन स्त्राव होऊ लागतो आणि यामुळे आपल्याला खूप आराम मिळतो आणि शरीरात स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी कमी होते, ज्यामुळे आपल्याला हृदयरोग किंवा हृदयविकाराचे झटके येण्याचा धोका कमी होतो.
* नवजात मुलास हॅग केल्याने मुलाचा शारीरिक आणि मानसिक विकास सहजपणे होतो. याशिवाय मिठी मारणे मुलाला मानसिक मनशांती देते, ज्यामुळे मुलाला हे समजते की कोणीतरी त्याच्या जवळ आहे आणि ही भावना मुलाचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व वाढीसाठीदेखील फायदेशीर आहे.
* मीठी मारल्याने ताण कमी होतो. याव्यतिरिक्त, मिठी मारल्याने इंफेक्शन होण्याचा धोका कमी होतो. एका संशोधनानुसार ताणतणावामुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होते, परंतु मिठी मारल्याने ती पुन्हा पूर्ववत होऊ शकते. ज्यामुळे ताण-तणावाबरोबरच इंफेक्शनही दूर होते.
* हॅग केल्याने, शरीरात वाहणाऱ्या रक्तात ऑक्सिटोसिन हार्मोनचा स्त्राव होतो, ज्यामुळे वाढलेला रक्तदाब कमी होतो, ज्यामुळे मनुष्याचा तणाव आणि चिंताग्रस्तपणा टळतो. यासह, मेंदूच्या नसा मजबूत होतात आणि स्मरणशक्ती वाढते.
* सेरोटोनिन नावाचा न्यूरोट्रांसमीटर, जो आपला मुड बनने-बिघडण्यास कारणीभूत असतो, तो मिठी मारल्याने वाढतो. हे संप्रेरक उदासीनतेशी संबंधित आहे. म्हणून जेव्हा आपण एखाद्याला मिठी मारतो तेव्हा आपला मूड त्वरित खूप चांगला होतो.
* संवाद सामान्यत: शब्दांद्वारे किंवा चेहऱ्यावरील हावभावातून उद्भवतो, परंतु शास्त्रज्ञांनी हे सिद्ध केले की एक अज्ञात माणूस कुणा दुसऱ्या व्यक्तीस, त्याच्या शरीराच्या वेगवेगळया भागांना स्पर्श करून अनेकप्रकारच्या भावना व्यक्त करू शकतो. या भावना राग, चिडचिडेपणा, प्रेम, कृतज्ञता, आनंद, दु:ख आणि सहानुभूतीसारख्या असू शकतात. मिठी मारणे हा एक अतिशय आरामदायक आणि हृदयास मन:शांती देणारा स्पर्श आहे.
आपल्या जोडीदाराला मिठी मारल्याने परस्पर संबंध वाढतात. शारीरिक स्पर्शाने आपणास एकमेकांशी अधिक कनेक्ट असल्याचे जाणवते, आत्मीयता वाढते, निष्ठेची भावना वाढते आणि परस्पर विश्वास वाढतो जो केवळ शब्दांद्वारे व्यक्त केला जाऊ शकत नाही.
* संशोधनाने हे सिद्ध झाले आहे की शारीरिक स्पर्शात वेदना कमी करण्याची क्षमता आहे. अशा लोकांना ज्यांना फिब्रोमायल्जियाच्या, जी एक प्रकारची शारीरिक वेदना असते, उपचारासाठी शारीरिक स्पर्श दिला गेला आणि यामुळे त्यांची वेदना आश्चर्यकारकपणे कमी झाली.
* जेव्हा आपण एखाद्यास मिठी मारता तेव्हा यामुळे त्यांच्या शरीरात रक्त परिसंचरण वाढते, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी आणि प्रवाह योग्य राहतो. यामुळे हृदयाशी संबंधित आणि ब्लड प्रेशरच्या आजारांचा धोका कमी होतो.
* हग केल्याने एखाद्याला मनापासून आनंद होतो, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. संशोधनानुसार, आपण एखाद्या जवळच्या माणसाला मिठी मारल्याने आपल्या वेदनेत बराच आराम जाणवतो. याशिवाय एखाद्याचा प्रेमाने हात धरल्यासही वेदना कमी होते.
आपण आपल्या प्रेमी जोडीदारासह राहत असल्यास किंवा विवाहित जोडपे असल्यास आपण आपल्या जोडीदारास जास्त काळ मिठी मारावी. याने आपल्या दोघांनाही आनंद मिळेल आणि आपल्यातील जवळीक वाढवेल. कदाचित आपले परस्परांतील भांडणदेखील केवळ एका मिठीनेच दूर होईल.
एखाद्याला मिठीत घेण्याने खरोखर छान वाटते. मिठी मारल्याने आपल्याला स्पेशल फील होते आणि कोणाला स्पेशल फील करणे आवडत नाही.