* समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

  • माझ्या चेहऱ्यावर केस उगवत आहेत, ज्यामुळे मी कुठेही यायला जायला संकोचते. कृपया काही उपाय सांगा, ज्यामुळे हे केस नाहीसे करता येतील?

चेहऱ्यावरील केसांच्या समस्येच्या मागे हार्मोनल चेंज असू शकतो. यासाठी डॉक्टरशी संवाद साधा आणि उपचार करा. केसांना हाताने उपटायचा प्रयत्न अजिबात करू नका. तुम्ही जितके केसांना उपटाल, तितक्या दुप्पट वेगाने ते उगवतील. तुम्ही वाटले तर ब्युटी पार्लरमधून वॅक्सिंग करू शकता. जर चेहऱ्याच्या केसांचा कायमचा इलाज करायचा असेल तर तज्ञाद्वारे लेझर ट्रीटमेंट करा.

  • क्रीमचा वापर केल्याने चेहरा काळा पडतो आहे, काय करू?

सर्वात आधी तर केमिकलयुक्त क्रीम चेहऱ्यावर गरजेपेक्षा जास्त लावणे बंद करा. यानंतर घरी तयार केलेले फेसपॅक आणि स्क्रबच्या साहाय्याने चेहरा रोज साफ करा. तुमचे हरवलेले सौंदर्य परत येईल.

  • माझ्या ओठांवर पांढरे डाग येत आहेत. कसे ठीक होऊ शकतील?

लिंबू, संत्र यासारख्या आंबट फळांचे रस पाण्यात मिसळून ओठांवर लावल्याने डाग कमी करण्यास फायदेशीर ठरतात. हे रस तुम्ही कापसाच्या मदतीने डागांवर लावू शकता. या सोप्या घरगुती उपायांच्या वापराने काही दिवसातच डाग नाहीसे होऊ लागतात. तुमच्या आहारात लसणीचा वापर वाढवल्याने पांढरे डाग कमी करण्यास मदत होईल.

  • प्रेगनन्सीनंतर केस खूप विरळ होत चालले आहेत. असे का?

गर्भावस्थेत महिलांच्या शरीरात एस्ट्रोजन नामक हार्मोनचे संतुलन बिघडते, ज्यामुळे केससुद्धा वेगाने गळतात. गर्भावस्थेच्या काळात खाण्यापिण्यावर लक्ष दिले तर काही प्रमाणात हे कमी केले जाऊ शकते.

माझ्या चेहऱ्यावर तीळ आहे आणि माझी त्वचा कोरडी आहे. मी काय करू, ज्यामुळे माझा चेहरा ग्लो करेल आणि डागांपासून सुटका मिळेल?

चेहऱ्याच्या डाग असलेल्या भागावर लिंबाचा रस लावा. तो ३० मिनिट ठेवल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. लिंबाचा रस चेहऱ्यावरील डाग नाहीसे करण्यास मदत करतो. २ महिन्यांपर्यंत असे केल्याने आपल्याला फरक दिसून येईल.

  • सेंसिटिव्ह त्वचेची काळजी घेण्यास काही घरगुती उपाय सांगा?

जर तुमची त्वचा सेंसिटिव्ह आहे तर तुम्ही त्वचारोग तज्ज्ञाकडे जाऊन आपल्या त्वचेचे चेकअप करून घ्या. तुम्हाला तुमच्या त्वचेबाबत माहिती असायला हवी की कोणत्या कारणांमुळे तुमची त्वचा इतकी सेंसिटिव्ह होत आहे. त्वचारोग तज्ज्ञाला दाखवल्यानंतर तुमच्याकडे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी चांगले उपाय आणि साधन असतील.

तुमची त्वचा सेंसिटिव्ह आहे तर याची विशेष काळजी घ्यायला हवी. उन्हात बाहेर जाण्याआधी त्वचेवर सनस्क्रीन लावा. पाणी भरपूर प्या आणि प्रथिनयुक्त आहार घ्या.

  • माझे केस कुरळे आहेत आणि जेव्हा ओले असतात फक्त तेव्हाच सुंदर दिसतात. वाळले की खूप कडक होतात. मी काहीही करून माझे केस नेहमीकरीता स्मूद आणि सॉफ्ट करू इछिते. काही उपाय सांगा?

केसांना मुलायम करण्याकरिता आणि त्यांना चमकदार करण्याकरिता अंडे उपयुक्त आहे. हे इतके प्रभावी आहे की एकदाच वापरून तुम्हाला फरक दिसून येईल. यात योग्य प्रमाणात प्रथिने, फॅटी अॅसिडस् आणि लॅक्टीन असते, जे केसांचे पोषण करते. यात ऑलिव्ह ऑइल मिसळून लावले तर फायदा होईल.

  • दातांचा पिवळेपणा कसा दूर करता येईल?

तुळस तोंड आणि दातांच्या रोगांपासून आपले रक्षण करते. तुळशीची पाने उन्हात वाळवून पावडर तयार करा. नंतर टूथपेस्टमध्ये मिसळून रोज ब्रश करा. पिवळेपणा नाहीसा होईल. मिठात सोडियम आणि क्लोराईड दोघांचे मिश्रण असते, जे दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत करते. परंतु याचा अतिवापर दातांच्या इनेमलला इजा पोहचवू शकतो. तसे मीठ आणि मोहरीचे तेल दातांना चमकावण्याचा फार जुना उपाय आहे. बस्स चिमूटभर मिठात २-३ थेंब तेल मिसळून दात स्वच्छ करा.

  • माझे वय २८ वर्ष आहे. मी खूप जास्त बारीक आहे. माझी मानसुद्धा खूप बारीक आहे, ज्यामुळे कोणताही नेकपीस मला सूट होत नाही. कृपया सांगा की कोणत्या प्रकारचे नेकपीस आणि एक्सेसरीज वापरू?

जसे की तुम्ही तुमच्या शरीराचे वर्णन केले त्यावरून असे वाटते की तुमची मान लांब असावी. लांब मान असणाऱ्या महिलांना लांब चेन छान दिसते. उंच व सडपातळ महिलांना मध्यम आकाराचे दागिने शोभतात. साधारणत: दागिने कपडयाच्या हिशोबाने घातले जातात. यात लक्ष देण्याची गोष्ट फक्त ही आहे की तुमच्या टॉप कुर्ती किंवा ब्लाउजच्या गळयाच्या डिझाईनवरसुद्धा तुमच्या नेकपीसचा लुक अवलंबून असतो. ड्रेसच्या गळयाच्या आकाराची माळ गळयात नको. म्हणजे गोल गळयाच्या ड्रेस सोबत गोल आकाराची माळ घालायला नको. मोठा गोल गळा असलेल्या ड्रेससोबत लहान चेन आणि व्ही नेकच्या ड्रेससोबत लहान गोल किंवा अंडाकृती माळ घालायला हवी.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...