*प्रतिनिधी
- मी विवाहित युवक आहे आणि एका मुलाचा बाप आहे. मी आपल्या वैवाहिक जीवनाबाबत खूप चिंतीत आहे. माझ्या बायकोने आधी एका तरुणाबरोबर मैत्री केली आणि हळूहळू त्यांच्यातली जवळीक इतकी वाढली की दोघांमध्ये लैंगिक संबंधही निर्माण झाले. मला जेव्हा बायकोच्या या व्यभिचाराबद्दल कळलं तेव्हा प्रथम आमच्यात खूप भांडणतंटे झाले. एकत्र राहत असूनही आम्हा दोघांमध्ये दुरावा वाढू लागला आणि एक दिवस ती मुलाला माझ्याजवळ सोडून निघून गेली. आता ३ वर्षांनंतर ती अचानक परत आली.
वाटतं की त्या मित्राने तिला दगा दिला आहे, म्हणून ती परत आली आहे. ती आल्यानंतर मी नॉर्मल राहण्याचा खूप प्रयत्न केला, पण एवढं करूनही ती माझ्याशी ना मोकळेपणाने बोलते ना शरीर संबंधांना होकार देते. एकाच छताखाली राहूनही आम्ही दोघे अपरिचितासारखे वावरतो. मी काय करू?
आता हे तर म्हणू शकत नाही की तुमच्या बायकोला तिच्या कुकर्माचा पश्चाताप होत असेल आणि म्हणून ती नॉर्मल होत नाही आहे. तुम्ही आशा करा की काही काळानंतर ती स्वत:च सामान्य व्यवहार करू लागेल. जर असे झाले नाही तर तुम्ही एखाद्या मनोविकारतज्ज्ञाचा सल्ला घ्या. काउन्सिंलिंगमुळे कळेल की बायकोच्या मनात काय आहे. कायदा हातात घेणं सोपं नाही, कारण न्यायालय अशा बायकांचंही अधिकिने ऐकून घेतं.
- मी २५ वर्षांची विवाहिता आहे. माझं वैवाहिक जीवन सुखी नाही. याचं कारण मी स्वत: आहे असं मी मानते. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात. मीसुद्धा त्यांच्यावर प्रेम करते. पण सगळा दिवस छान गेल्यावर रात्री मी पतीला उदास आणि नाराज करते. कारण जेव्हा पण ते माझ्या सहवासाची अपेक्षा करतात, मी बिथरते.
सहवास तर दूर त्यांना चुंबन आणि मिठीही मारू देत नाही. यामुळे त्यांचं नाराज होणं स्वाभाविक आहे. हास्यास्पद हे आहे की जेव्हा ते माझ्याजवळ नसतात, तेव्हा माझं मन त्यांच्यासाठी व्याकुळ होतं. त्याच्याशी संबंध ठेवायची इच्छाही होते. मी काय करू की माझ्या पतिला शारीरिक सुख देऊ शकेन?
तुमच्या समस्येचा उपाय तुमच्याच जवळ आहे. तुम्हाला हे कळायला हवं की सेक्स हा सहजीवनाचा कणा आहे. म्हणून जेव्हा पती तुमच्या सहवासाची अपेक्षा करतो, तेव्हा इच्छा नसतानाही तुम्ही त्याला समर्पित व्हायला हवं. स्त्रीची शारीरिक रचनासुद्धा अशी असते की प्रयत्न न करताही ती पतीची कामेच्छा पूर्ण करू शकते.
तुम्हाला मानसिकदृष्टया थोडं सक्रिय व्हायची गरज आहे आणि तुमच्याकडून शारीरिक सुख घेणं हा तुमच्या पतीचा अधिकार आहे. म्हणून तुम्ही त्यांना यापासून वंचित ठेवता कामा नये. सहवासात तुमच्या सक्रियतेने तुम्हाला असा अनुभव येईल की तुमचं सहजीवन छान बहरेल.
मी २५ वर्षीय युवक आहे. माझं लग्न होऊन ३ वर्ष उलटली आहेत. एक दिड वर्षांची मुलगीसुद्धा आहे. माझ्या पत्नीशी विवाह झाल्यावर पहिली २ वर्ष खूप छान गेली किंवा असं म्हणा की खूपच रोमँटिक गेली. आम्ही दोघे खूप फिरलो, दिवस रात्र रोमान्समध्ये बुडालेलो असायचो. माझे मित्र आम्हाला लव्हबर्ड म्हणत असत. कारण आम्ही नेहमी रोमँटिक मूडमध्ये असायचो. वाटायचं की आम्ही आजन्म असेच राहू. २ वर्ष उलटता उलटता ती एका मुलाची आई झाली आणि तिच्या पत्नी म्हणून वर्तणुकीत जमीन अस्मानाचा फरक पडला. आता तिची सेक्समधील रुची समजा की संपत चालली आहे. आधी ती सहवासासाठी व्याकुळ असायची. ती आता सेक्सकडे पाठ फिरवते आणि मी रुची दाखवली तरीही खास उत्साह दाखवत नाही.
कित्येकदा मला जाणवतं की मी बलात्कार करत आहे. सहवासालासुद्धा ती इतर कामांप्रमाणे आटोपून टाकायचा प्रयत्न करते. मी शोधत राहतो की पूर्वीची उर्जा, आधीचा उत्साह अचानक कुठे हरवला? काय सगळया जोडप्यांमध्ये असंच होतं?
थोडं व्यावहारिक होऊन विचार कराल तर लग्नाच्या सुरूवातीच्या काळाची तुलना करून नाराज होणार नाही. तुम्हाला कळायला हवं की लग्नाच्या सुरूवातीच्या काळात तुम्ही बिनधास्त होऊन रोमान्स यामुळे करू शकला कारण त्यावेळेस कोणती जवाबदारी नव्हती. तुम्ही फक्त स्वत:च्या दृष्टींने नाही तर बायकोच्या दृष्टीनीही बघायला हवं. गर्भावस्थेचे कठीण ९ महिने मग प्रसूती आणि नंतर लहान बालकाचं संगोपन. या सगळयामुळे जर तुमची बायको तुमच्याकडे थोडं दुर्लक्ष करत असेल तर अजाणता का होईना तुम्ही तिची परिस्थिती समजून घ्यायला हवी.
हे फार छान होईल जर तुम्ही बाळाला सांभाळण्यात किंवा घराच्या बारीक सारीक कामात मदत केलीत. आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल तर एखादी कामवाली बाई ठेवा. यामुळे तिला थोडा आराम मिळेल आणि तुम्हाला तक्रार करायला संधी मिळणार नाही.
याशिवाय बाळ थोडं मोठं झाल्यानंतरही तुमचं सहजीवन आपोआप मार्गी लागेल. लग्नाच्या सुरवातीच्या दिवसांप्रमाणे नाही, पण खूप छान वाटेल तुम्हाला. थोडा धीर धरा.