* गरिमा पंक

पावसाच्या मोसमात म्हणजेच मान्सूनमध्ये प्रत्येकीच्या मनातला मोर हा जणू पिसारा लावून थुई थुई नाचत असतो. या मोसमात काही वेगळया प्रकारचे फॅशनेबल कपडे परिधान करण्याची मजा काही औरच असते. आशिमा एस कुटोरच्या संस्थापक आणि फॅशन डिझायनर आशिमा शर्मा सांगत आहेत की मान्सूनला अनुरूप तुमच्या वॉर्डरोबमध्ये कुठल्या प्रकारचे ड्रेसेस असले पाहिजेत. तसेच हे ड्रेसेस स्टायलिश लुकसोबत कंफर्टेबलसुद्धा असतील :

बेल स्लीव्ह ड्रेस

बेल स्लीव्ह ड्रेस हे तुम्हाला फेमिनाइन आणि सेक्सी लुक देतात. शॉर्ट्स किंवा रफ्ड जीन्सबरोबर तुम्ही हे सहज घालू शकता. या मान्सूनमध्ये तुम्ही सैल आणि सिल्हूट टाइपचे कपडे घाला. कारण हे या मोसमात सर्वात जास्त आरामदायक असतात.

बॉडीकोन ड्रेसेस

बॉडीकोन ड्रेसेस घालून तुम्ही सेक्सी आणि बाहुलीसारख्या दिसाल. महिला खासकरून असे ड्रेस पार्टी किंवा रात्रीच्या डेटसाठी घालणे पसंत करतात. बॉडीकोन घालून त्याच्यावर कंबरेच्या चारी बाजूला शर्ट बांधून घ्या. हा पेहराव तुम्हाला ९०च्या दशकातील लुक देईल. तुम्ही याच्यासोबत स्नीकर्स घालून तुमचा लुक पूर्ण करू शकता. ग्राफिक बॉडीकोनवर तुम्ही टीशर्टही घालू शकता. फक्त टीशर्टच्या एका बाजूस गाठ मारा जेणेकरून तो सैलसर आणि अजागळ वाटणार  नाही. तुम्ही सफेद स्नीकर्स सोबतही दीर्घकाळ वापरू शकता.

वनपीस शर्ट ड्रेस

ओव्हर साइज ड्रेस हा मान्सूनकरता एक उत्तम पर्याय आहे. हा ड्रेस बऱ्यापैकी सैल आणि लवचिक असतो आणि तो तुम्हाला आकर्षक आणि फंकी लुक देतो. कॉटन शर्टसोबत सफेद स्नीकर्स परिधान करा.

कुलोट्स

हल्ली हे ड्रेसेस खूप ट्रेंडमध्ये आहेत. हे कंफर्टेबल असण्यासोबत प्रोफेशनल लुकही देतात. तुम्ही हे ड्रेसेस परिधान करून सहज मिटिंगला जाऊ शकता. कुलोट्समध्ये खूप व्हरायटी उपलब्ध असते. तुम्ही हे लिनन क्रॉप टॉपसोबत डेनिम जॅकेट्ससोबतही परिधान करू शकता. हे ड्रेसेस तुमचे गरमीपासूनही रक्षण करतील.

टॅसल आणि फ्रींजवाले कपडे

६० च्या दशकात फ्रींजची फार चलती होती. पण हाच ट्रेंड काही बदल होऊन आता पुन्हा अवतरला आहे. हल्ली बाहूंवर आणि कपडयाच्या खाली फ्रींज ड्रेस घालून तुम्ही पार्टीलाही जाऊ शकता. यासोबत लांब बूट आणि मॅचिंग ज्वेलरी घाला.

मान्सून सीजनमध्ये तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये कशाप्रकारे फॅशनेबल ट्विस्ट आणू शकता हे सांगत आहेत रंगरीतीचे एमडी, सिद्धार्थ बिंद्रा :

गोल्ड फॉइल प्रिंट

मान्सूनमध्ये हलक्या मटेरियल आणि पेस्टल शेड्स फार खुलून दिसतात. जर  तुमच्या पेस्टल कुर्तीला गोल्ड फॉइल प्रिंटने तुम्ही एक हलकासा शिमर टच दिलात तर तुमचं सौंदर्य अधिकच खुलून दिसेल. या मोसमात सुंदर दिसण्याचा हा सर्वोत्तम पर्याय आहे. हलक्या चंदेरी कॉटनसारख्या मटेरियलवर गोल्ड फॉइल प्रिंट्स या मोसमात फार सुंदर दिसतात. तुम्ही टक्वाइश डस्ट पिंक, टील ब्ल्यू आणि ब्राइट पिंक यासारख्या कलर्सची निवडही करू शकता.

चमकदार रंग

जेव्हा तुमचा वॉर्डरोब बेसिक ब्लॅकसारख्या रंगाने भरलेला असेल तेव्हा तुम्हाला तयार होण्यात मजा येणार नाही. चमकदार रंगांनी आपला वॉर्डरोब फॅशनेबल बनवा. मान्सूनमध्ये मेटॅलिक आणि लेदरपासून मात्र दूर रहा.

लेयरिंग

मान्सूनमध्ये लेयर्ससाठी श्रग्ससारखे अनेक पर्याय उपलब्ध असतात, जे तुमचे सौंदर्य वाढवू शकतात. मान्सूनमध्ये लेयरिंगचा एक चांगला पर्याय म्हणजे एथनिक क्विल्टेड जॅकेट. बाजारात याचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. हे क्विल्टेड एथनिक जॅकेट तुम्हाला चिक लुक तर देतेच आणि हवेपासून सुरक्षितही ठेवते.

कोलाज/मिक्स अन्ड मॅच प्रिंट

थोडेसे मिक्स अन्ड मॅच तुमचे सौंदर्य अनेक पटींनी वाढवते. मान्सूनमध्ये विविध रंग आणि प्रिंट यांना मिक्स मॅच करून वापरा. मान्सून स्लिम पँटला ब्लॅक इंडी टॉपसह मॅच करा आणि त्यावर एथनिक प्रिंट क्विल्टेड जॅकेट घाला आणि दाखवा तुमची स्टाइल.

फूटवेअरसुद्धा असावेत खास

लिबर्टीच्या अनुपम बन्सल यांच्या मते, मान्सूनसाठी तुमचे फुटवेअर कलेक्शन हे आकर्षक असण्याबरोबरच पावसासाठीही अनुकूल असलं पाहिजे.

बूट : बूट मान्सून सीजनमध्ये फॅशनेबल आणि कंफर्टेबल असतात. बुटांच्या अनेक प्रकारच्या व्हरायटीज बाजारात उपलब्ध असतात जसे की प्रिंटेड, लेस्ड किंवा बकल्ड, रबर सोलचे बूट मान्सूनमध्ये वापरण्यास योग्य असतात.

फ्लिपफ्लॉप : या मोसमात रस्ते हे धूळ आणि चिखल यांनी माखलेले असतात. अशात फ्लिपफ्लॉप खूप आरामदायक असतात. हल्ली सर्व रंगात फॅन्सी फ्लिपफ्लॉप उपलब्ध असतात. हे डेनिमबरोबर छान दिसतात आणि टिकाऊही असतात.

फ्लोटर सँडल : फ्लोटर सँडल हे मान्सूनमध्ये विशेष आरामदायी असतात. खासकरून तेव्हा जेव्हा तुम्हाला सार्वजनिक वाहनाने प्रवास करायचा असतो. तुम्ही हे जीन्स किंवा सेमी फॉर्मल कपडयांसोबत घालून स्मार्ट दिसू शकता.

क्लॉग : या मान्सूनमध्ये द्या आपल्या पावलांना क्लॉगचा आराम. हे मान्सूनसाठी असलेले सर्वात कूल फुटवेअर आहेत. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे पावसाच्या सीजनमध्ये यांना दुर्गंध येत नाही. या मोसमाचा आनंद घेण्यासाठी क्लॉग्स हे सर्वात आरामदायी फुटवेअर आहेत.

लॉफर्स : या मोसमात शर्ट्स आणि शॉर्ट्स हा सर्वात कॅज्युअल परिधान आहे. यासोबत लॉफर्स मॅच करून तुम्ही पावसाच्या मोसमातही कूल आणि स्मार्ट दिसाल.

हील : मान्सूनमध्येदेखील हील घालून तुम्ही स्मार्ट आणि सुंदर दिसू शकता. जर तुम्हाला पार्टीमध्ये जायचे असेल तर तुम्ही टिकाऊ पीवीसी सोल किंवा जेली स्ट्रिप्स सोबत हील घाला.

वेज : हील नेहमीच आरामदायी नसतात. अशात जर तुम्हाला आरामदायी हील घालायच्या असतील तर वेज हील निवडा. या जीन्स, टाइट्स, जेगिंग्स अशा सर्वप्रकारच्या पेहरावांसोबत शोभून दिसतात.

गम बूट : या मोसमात चहूकडे पाणी साठते. अशात गम बूट तुमच्या पायांना सुरक्षित ठेवतात. यातील रबर पाणी आत शिरू देत नाही आणि आपण यांना सहज पुसून साफही करू शकतो.

मान्सूनमध्ये करा फॅशनच्या रंगांची उधळण

शॉपक्ल्युजच्या संचालिका रितिका तनेजा सांगत आहेत  मान्सूनमध्ये अशाप्रकारे करा फॅशनच्या रंगांची उधळण :

१. मान्सूनच्या मोसमात आपल्या हेअरस्टाइल आणि मेकअपवर कमी आणि पेहरावावर अधिक फोकस करा.

२. पेस्टल कलर्समध्ये क्रॉप हेम स्टाइल्स, टॉप्स आणि पँट्स इ. वापरा, ज्यामुळे पावसाच्या मोसमाचा सामना करण्यास तुम्ही सज्ज व्हाल.

३. आपल्या सर्व ब्राउन आणि ब्लॅक बेसिक्सना बाजूला सारा आणि सर्व इंडिगोज आणि ग्रीन्स या मोसमात वापरा.

४. काहिलीपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या प्लेन कॉटन आणि टँक टॉप्सवर स्प्लॅश इलेक्ट्रिक फ्लोयुरोसेंटसोबत आपला पेहराव चमकदार बनवा.

५. स्टाइलशी तडजोड न करता पावसाचे पाणी आणि धूळमाती यातही कूल राहण्यासाठी बेसिक रिप्ड डेनिम शॉर्ट्स वापरा.

६. ज्या मुलींना एथनिक ड्रेसेस आवडतात, त्या जरदोजीचा वापर या दिवसात करू शकतात.

७. तुम्ही क्रॉप्ड पॅन्टवर सुंदर बोटनॅक टॉप घालू शकतात आणि लाइट बीडेड नेकपीस किंवा हँडकफ घालू शकतात.

८. मान्सूनमध्ये पर्पल, ऑरेंज, यलो कलर घालायला मागेपुढे पाहू नका. आपण कामाच्या ठिकाणी    आकर्षक दिसण्यासाठी ब्लेजर आणि कुलोट्सच्या मॅचिंगकडे लक्ष द्या.

९. चालताना त्रास होऊ नये म्हणून आरामदायी हील किंवा कंफर्ट स्लाइड्स घाला आणि आपले सामान सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ बॅग सोबत ठेवा.

१०. कपडयांच्या ट्रेंड्ससोबतच तुम्ही या मोसमात पूर्ण भिजणार नाही ही खबरदारी घेणेदेखील आवश्यक आहे आणि हे तुम्ही फॅशनेबल पद्धतीने करू शकता. कलरफुल छत्री आणि वॉटरप्रूफ बॅग दोन्ही तुमच्या फॅशनला मोसमारूप ठेवतील आणि महत्त्वाच्या वस्तू भिजणारही नाहीत.

११. कलरफुल प्लास्टिक मान्सून बॅलेट फ्लॅट्स (शूज) वापरा. यामुळे तुमचे महागडे फुटवेअर खराब होणार नाहीत. या मोसमात लेदर शूज वापरू नका. पारदर्शक कपडे घालणेही टाळा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...