* भारतभूषण श्रीवास्तव
जुन्या भोपाळमध्ये कोहेफीजा हा एक घनदाट लोकवस्तीचा परिसर आहे. येथील आरके टॉवरमध्ये राहणारा मुजीब अली मागील १४ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता थोडया वेळासाठी त्याच्या एका मित्राला भेटायला गेला होता. पण तो परत येईपर्यंत चोरटयांनी दिवसाढवळया त्याच्या १ लाखांचे दागिने व रोख रक्मम घेऊन पोबारा केला होता.
चोरांना चोरी करण्यासाठी फारसा प्रयत्न करावा लागला नाही. काही मिनिटातच त्यांनी घराच्या खोल्या तपासल्या आणि कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम खिशात भरून आरामात चालते झाले. पण एक धडा मागे शिकवून गेले की काही तास किंवा काही दिवस घराबाहेर जायचे असेल तर अशा सोप्या ठिकाणी मौल्यवान वस्तू ठेवू किंवा लपवू नका, जेथे चोरांचे हात सहज पोहोचतात आणि ते त्यांच्या कार्यात यशस्वी होतात.
त्याचप्रमाणे भोपाळच्या गेहुखेडा भागातील रॉयल भगवान इस्टेटचे परवेझ खान, जे एका कंपनीत मार्केटिंग मॅनेजर आहेत, १८ सप्टेंबर रोजी आपल्या मोठया मुलाच्या साखरपुडयात सामील होण्यासाठी मुंबईला गेले होते. जेव्हा ते साखरपुडा आटोपल्यानंतर परत आले तेव्हा हे पाहून आश्चर्याने स्तब्ध झाले की घराच्या दरवाजाचे मध्यवर्ती लॉक तोडलेले आहे. घराच्या आत गेल्यावर कळले की चोरटयांनी अजून ४ कुलूपे तोडून कपाटात ठेवलेले दागिने, मौल्यवान घडयाळे आणि अडीच लाख रुपये चोरले आहेत. हे दृश्य पाहून परवेझकडे पश्चात्ताप करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. चोरटयांनी एकाच झटक्यात ६ लाखांचा माल लुटला होता.
त्यांना माहित असते
भोपाळमधील या दोनच नाही तर देशभरात चोरीच्या बऱ्याच घटनांमध्ये एकसारखी बाब म्हणजे घराच्या मौल्यवान वस्तू कोठे ठेवल्या जातात हे चोरांना माहित असते. म्हणूनच, तुमच्या कष्टाच्या पैशावर हात साफ करण्यात त्यांना कोणतीही अडचण येत नाही.
लोक घरांच्या भारीभक्कम दारावर मोठं-मोठे कुलूपे लावतात आणि निश्चिंतच मनाने निघून तर जातात, परंतु जेव्हा ते परत येतात तेव्हा हे पाहून आपले डोके बडवतात की, कमनशिबी लुटारु चोरांनी, माहित नाही कसे महागडया कपाटाचे सेफही तोडले आहे आणि त्यात ठेवलेल्या मौल्यवान वस्तू आता त्यांच्या मालकीच्या राहिल्या नाही आहेत.
आधुनिक आणि सुरक्षित मानल्या जाणाऱ्या महागडया शेल्फ आता अजिबात सुरक्षित राहिल्या नाहीत, कारण बहुतेक प्रकरणांमध्ये चोर त्यांनाच थेट टार्गेट करतात, कारण त्यांना माहित असते की माल येथेच ठेवला जातो किंवा ठेवला आहे. त्यांची ही कल्पना बहुधा चुकीचीही ठरत नाही.
जेव्हा कपाटाची तिजोरी सहज तुटू शकते तेव्हा घरातील इतर ठिकाणे अजूनही असुरक्षित होतात. उदाहरणार्थ, बॉक्सचा पलंग किंवा दिवाण ज्यामध्ये लोक दागिने आणि पैसे लपवतात, ते ही नेहमी चोरांच्या निशाण्यावर असतात. हा विचार करणे चुकीचे ठरेल की तिजोरी किंवा कपाटामध्ये माल सापडला नाही तर चोर दिवाण सोडतील, ज्यामध्ये कपडे आणि अंथरुणादरम्यान लोक मौल्यवान वस्तू चपळाईने आणि सुरक्षितपणे ठेवतात.
म्हणजेच, मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी लोक कोणकोणत्या जागा आणि पद्धती वापरतात हे चोरांना माहित असते. म्हणूनच त्यांना चोरी करण्यात कोणतीही विशेष अडचण येत नाही.
मग कुठे ठेवायचे
गोष्ट खरी आहे की घरात मौल्यवान वस्तू कुठे-कुठे असू शकतात याची कल्पना चोरांना असते तेव्हा कोणीही त्यांना चोरी करण्यापासून रोखू शकत नाही.
तथापि, चोरी टाळण्यासाठी बरेच लोक दागिने व इतर मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवतात. परंतु हेदेखील कमी अडचणीचे काम नाही. त्याचे कारण एकतर बँक लॉकर स्वस्त नसतात, दुसरे म्हणजे वर्षात असे २-४ प्रसंग येतात, जेव्हा दागदागिने काढावेच लागतात.
हे एक त्रासदायक काम आहे की जेव्हा पण आपल्याला एखाद्या समारंभात किंवा लग्नाला जायचे असेल तेव्हा बँकेत जाऊन दागदागिने काढा आणि पुन्हा ते ठेवण्यासाठी परत जा.
मग काय करावे आणि चोरांपासून वाचण्यासाठी मौल्यवान वस्तू कोठे ठेवाव्यात? या प्रश्नाचे उत्तर देणेदेखील सोपे काम नाही. परंतु हे अशा प्रकारे सुलभदेखील केले जाऊ शकते की जेव्हा चोर घरात प्रवेश करतील, कपाटे आणि तिजोरी तोडत असतील तेव्हा त्यांच्या हाती चिड-चिडण्याशिवाय दुसरे काहीचलागणार नाही. घरात मौल्यवान वस्तू अशा ठिकाणी ठेवा, जिथे त्यांचे हात पोहोचणारच नाहीत.
जर महागडया वस्तू तिजोरीत सापडल्या नाहीत तर चोर दिवानाला बघतील, फर्निचर खंगाळतील, फ्रीज, इतर शेल्फ आणि ड्रॉवर उघडतील, परंतु येथेही त्यांना कागद आणि कपडे वगळता काहीच सापडले नाही, तर ते आपल्या गरिबीला किंवा युक्तीला कोसत परत जातील.
जुने मार्ग आजमावून पहा
चोरी टाळण्यासाठी जुने मार्ग आजमावून पहा. या पद्धती मुळीच कठीण नाहीत, परंतु कपाट आणि तिजोरीपेक्षा जास्त सुरक्षित आहेत. सर्वात प्रचलित जुनी पद्धत म्हणजे जमिनीत दागदागिने गाडणे. हे खरं आहे की आजकाल बहुतेक घरे पक्क्या सिमेंटची बनलेली आहेत, जी खोदली जाऊ शकत नाहीत पण जर वृद्ध लोकांची समजदारी नव्या पद्धतीने आजमावून पाहिली तर काम बनू शकते. घराच्या बांधकामाच्या वेळी किंवा नंतर शयनगृहात, बेडच्या खाली दोन फरशा उपटून एक खड्डा बनविला जाऊ शकतो आणि त्याचप्रमाणे भिंतींमध्येही एक गुप्त जागा बनविली जाऊ शकते.
भोपाळच्याच पिपलानी भागातील ६४ वर्षीय दक्षिण भारतीय महिला एस.लक्ष्मीला वर्षातून एकदा आंध्र प्रदेशला जावे लागते. लक्ष्मीकडे २० तोळे सोने असून ते आजपर्यंत चोरीला गेले नाही, वस्तुत: दोनदा असे झाले की जेव्हा ती आंध्र प्रदेशहून परत आली तेव्हा चोरटयांनी घरात घरफोडी केली होती पण त्यांच्या हाती अपयशाखेरीज काहीच लागले नव्हते.
खरं तर लक्ष्मी जाण्यापूर्वी तिचे दागिने वीस लिटर तेलाने पूर्ण भरलेल्या कॅनमध्ये ठेऊन जाते. चोर स्वयंपाकघरापर्यंत आले आणि त्यांनी बॉक्स व डबेही उघडून पाहीले, पण त्यांना काहीच सापडले नाही. तेलाच्या कॅनवर त्यांचे लक्षच गेले नाही की दागिने यातही ठेवले असतील म्हणून.
लक्ष्मीप्रमाणे तुम्हीही थोडेसे शहाणपण दाखवू शकता आणि चोरांच्या नजरेपासून मौल्यवान वस्तू वाचवू शकता.
येथे मौल्यवान वस्तू लपवा
घरात अशी बरीच ठिकाणे आहेत, जिथे आपण मौल्यवान वस्तू ठेवून बिनधास्तपणे कोठेही येऊ-जाऊ शकता आणि परत येऊन त्या वस्तू सुरक्षितपणे बघू शकता.
* तेलाच्या किटलीसारखी सुरक्षित जागा म्हणजे पाण्याची टाकी असते, जिच्याकडे सहसा चोरांचे लक्ष जात नाही. प्रत्येक घरात पाण्याची टाकी अशा ठिकाणी असते, जेथे चोर कपाटाप्रमाणे सहज पोहोचू शकत नाहीत. दागदागिने त्यात लपविता येतील.
* घरात अधिक रोख रक्कम ठेवू नये पण काही कारणास्तव आपल्याला ठेवावी लागली तर घराबाहेर परताना ती वर्तमानपत्रांच्या रद्दीत तुकडया-तुकडयात ठेवली पाहिजे. हे काम आपण रद्दीच्या मध्यभागी केल्यास ते आणखी चांगले आहे.
* स्टोअररूम घरात एक अशी जागा आहे, ज्यामध्ये जगभरातील कचरा भरलेला असतो. यामध्ये दाग-दागिने इत्यादी कोठेही लपविता येतील. चोरी करताना चोरांकडे मर्यादित वेळ असतो. म्हणून ते स्टोअररूममधील प्रत्येक वस्तूत शोधणार नाही.
* सहसा चोरांचा असा विश्वास असतो की मौल्यवान वस्तू घराच्या आतच कोठेतरी ठेवल्या असणार. म्हणूनच ते घराच्या प्रवेशद्वारास किंवा पहिल्या खोलीस लक्ष्य करीत नाहीत. दागिने, रोकड वगैरे इथे लपविता येऊ शकते. मग भलेही ते शूज रॅक असले तरीही.
* पक्क्या घरांमध्ये खड्डे करणे शक्य नाही. परंतु कुंडया रिकाम्या करून त्यात दाग-दागिने भरून वरून ओली माती त्यांच्यावर टाकली जाऊ शकते.
* मुलांच्या शालेय पिशव्यादेखील मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
* लहान-लहान अंगठया आणि इतर लहान वस्तू औषधांच्या मोठया कुपीत टाकून वाचविता येतील.