– डॉ. डी.जे.एस. तुला, हेड ऑफ कॉस्मेटिक डिपार्टमेंट, प्राइम्स सुपर
होळी हा रंगांचा सण सर्वच वयोगटातील व्यक्तींना साजरा करावासा वाटतो. यामध्ये धर्म महत्त्वाचा नसतो. कारण प्रत्येकाला या सणामध्ये आनंदाने सहभागी व्हावंसं वाटतं.
रंगांचा हा सण आनंद देतो आणि मनोरंजन तर करतोच. पण हा सण काही कारणांमुळे शरीरासाठीही महत्त्वाचा आहे. होळी अशावेळी येते, जेव्हा वातावरण बदलत असतं आणि त्यामुळे मन आळसावत असतं. शरीरात शिथिलता जाणवते, ही शिथिलता दूर करण्यासाठी मोठ्या आवाजात संगीत ऐकणं, मोठ्या आवाजात गाणं आणि बोलणं हा उपाय आहे.
होळीला जुना इतिहास आहे. पूर्वी खऱ्या फुलांपासून बनवलेले रंग वापरले जात. पण गेल्या काही वर्षांत रासायनिक आणि नकली रंग या सणाचा एक भाग बनले आहेत. आजकाल होळीच्या रंगांमध्ये लँड ऑक्सिजन, इंजिन ऑईल, तांबा सल्फेट इत्यादींची भेसळ असते. यामुळे विविध प्रकारची एलर्जी आणि जळजळ होऊ शकते.
रंगांमुळे केसही खराब होतात. केसांमध्ये कोंडा होऊन ते गळू लागतात.
होळीच्या रंगांमुळे होणारे काही गंभीर त्वचाविकार खालीलप्रमाणे आहेत.
एक्झिमा : हा कृत्रिम रंगांच्या प्रभावामुळे होणारा सर्वाधिक किचकट विकार आहे. या एलर्जीमुळे त्वचेला सूज येते, ज्यामुळे चिडचिड होऊ लागते.
त्वचेची सूज : या एलर्जीमध्ये गंभीर वेदना, त्वचेला खाज येणे याशिवाय जखमेवर खपली तयार होते.
राइनायटिंग्ज : यामुळे नाकपुड्यांमध्ये सूज येते. नाकातील रक्त असुंतलित झाल्याने खाज आणि शिंका येतात.
दमा : कृत्रिम रंगांमुळे अस्थमा होऊ शकतो. यामुळे श्वसनात अडथळे येतात.
निमोनिया : श्वासाबरोबर रासायनिक रंग शरीरात गेल्याने आणखी एक विकार होऊ शकतो, ज्याचं नाव आहे निमोनिया. यामध्ये छातीत वेदना, थकवा, ताप आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
या सूचनांचा अवलंब करून होळीचा पुरेपूर आनंद लुटा.
* त्वचेवरील रंग लवकर निघावेत म्हणून एक दिवस आधी राईचं तेल लावा. खासकरून चेहरा, हात आणि पायांवर. होळीच्या रंगांच्या हानिपासून वाचवण्यासाठी केसांनांही रंग लावा. त्यामुळे केसांवर रंगांचा थर पातळ लागतो आणि केस सुरक्षित राहतात.
* शरीरावर सनस्क्रीन लोशन लावल्याने त्वचेवर रंगांचा वाईट प्रभाव पडत नाही.
* त्वचेवरील रंगांचा प्रभाव कमी करण्यासाठी होळी खेळण्याच्या अर्धा तास आधी थंड क्रिम, व्हॅसलिन, ऑलिव्ह किंवा नारळाचं तेल शरीरावर व्यवस्थित लावा.
* चेहऱ्यावरचा गुलाल काढण्यासाठी रगडण्याऐवजी क्लिजर वापरा, यानंतर त्वचेला मऊपणा आणणारं माइश्चराइजर वापरा. खास करून संवदेनशील त्वचेसाठी असलेलं माइश्चराइजर वापरावं.
* चोळू लावले गेलेले रंग काढण्यासाठी चेहरा साबणाऐवजी फेशवाशने धुवा. रंग काढण्यासाठी त्वचा हलक्या हातांनी चोळा. रगडू नका. त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते.
* पापण्या आणि डोळ्यांच्या आजूबाजूला सनस्क्रीन लोशन लावल्याने डोळ्यांवर रंगांचा कमी प्रभाव पडतो आणि डोळ्यांचं संरक्षण होतं.
* रंग धुतल्यानंतर डोळ्यांमध्ये गुलाबजल घातल्याने डोळ्यांना आराम मिळतो.
* डोळ्यांमध्ये सुका रंग पडल्याने डोळे स्वच्छ पाण्याने धुवा. डोळे रगडू नका. त्यामुळे जळजळ होईल.
निरोगी त्वचेसाठी उपाय
* अंघोळीआधी एक तास मुलतानी माती पाण्यात भिजवा. होळी खेळून झाल्यावर रंगलेल्या अंगावर याचा लेप लावा. सुकल्यानंतर गरम पाण्याने धुवा.
* खूप प्रयत्न करूनही एखादा रंग निघत नसेल तर मातीच्या तेलात कपडा भिजवून तो शरीरावर हलक्या हाताने रंगडा, रंग निघेल.
* बेसनात गोडं तेल, मलई आणि गुलाबपाणी मिसळून हा लेप आपल्या चेहरा, हात आणि पायांवर व्यवस्थित लावा. लेप व्यवस्थित सुकल्यानंतर हळूहळू चोळून तो काढा.
* अर्धी वाटी दह्यामध्ये २ चमचे लिंबाचा रस मिसळा. तो रंगांच्या डागांवर लावून हळूहळू चोळत कोमट पाण्याने धुवा. अंघोळीनंतर क्रिम लावायला विसरू नका.
* सोयाबीनच्या पिठात किंवा बेसनमध्ये दूध, मीठ, ग्लिसरीन आणि सुगंधी तेल काही थेंब टाकून मिश्रण तयार करा. हे मिश्रण शरीरावर लावा. हा लेप लावून तुम्हाला तजेलदार वाटेल.
* शरीरासोबत नखांचीही काळजी घ्या. रंगांचा त्रास होऊ नये म्हणून नखं आधीच कापा आणि त्यावर नेलपेंट लावा.
* दातांच्या सुरक्षेसाठी दंतटोपी लावा.
* त्वचेला रंगांपासून वाचवण्यासाठी संपूर्ण अंग झाकलं जाईल असे कपडे घाला. पांढरे किंवा फिकट रंगांचं कपडे घालणं टाळा. असे कपडे होळीचे रंग जास्त शोषून घेतात.
* त्वचा जळजळत असेल तर लगेच पाण्याने धुवा. एखादं चांगलं लोशन लावा.