– सुमन बाजपेयी
आपल्या वैवाहिक जीवनात असंतुष्ट असल्याने घटस्फोट घेणे नि:संशय. त्यावेळी एखाद्या बंधनातून मुक्त झाल्यासारखे वाटते, पण त्यानंतरचे आयुष्य सहजसोपे होईल किंवा जीवनात परत आनंद निर्माण होईल, असा विचार करणे एक चूकच आहे. म्हणून घटस्फोटाचा निर्णय घेण्याआधी त्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.
जर तुम्ही घटस्फोट घेण्याचा विचार करत असाल, तर हे नक्की आहे की तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये काहीतरी कुरबुर आहे अथवा लहानसहान समस्या एवढया मोठया झाल्या आहेत की तुम्हाला असे वाटू लागले आहे की आता एकत्र राहणे अशक्य आहे. या गोष्टी विचारांमधील संघर्ष निर्माण होण्यापासून तर विवाहबाह्य संबंधांपर्यंत निगडीत असतात नाहीतर मुलांचे संगोपन वा आर्थिक प्रश्नांमधून उत्पन्न झालेल्या असू शकतात. म्हणजे ही लहानलहान भांडणं काळानुसार ना केवळ जोडप्यांमधील दुरावा वाढवतात तर त्यांना वेगळे होण्यास विवश करतात.
जुळवून न घेणे किंवा मानसिक स्तरावर अवलंबून असल्याने वेगळे होणे नि:संशय एक सोपा मार्ग वाटतो, पण त्यासाठी ज्या कायदेशीर, सामाजिक आणि भावनात्मक त्रासाचा सामना करावा लागतो, तो काही कमी यातना देणारा नसतो. जर एखादे जोडपे लग्नाला यातना समजत असेल, तर त्यातुन सुटका मिळवण्यासाठीसुद्धा कमी यातना सहन कराव्या लागत नाही.
मूल्यांकन करा
घटस्फोट घेण्याआधी असा विचार करा की त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्रास देत आहेत. शक्य आहे की त्या आपण सुधरवू शकू. मग हे ठरवा की वास्तवात तुम्ही त्यात बदल घडवून आणू इच्छिता का? आपल्या विवाहसोबत तुम्हाला याचेही मूल्यांकन करावे लागेल की हा विवाह तुम्हाला वाचवायचा आहे का? घटस्फोटाकडे वाटचाल करताना स्वत:ला अवश्य विचारा की जी असमाधानाची भावना तुमच्यात रुजते आहे ती थोडया काळासाठी आहे, जी काळानुसार दूर होणार आहे का? घटस्फोट दिल्यावर तुम्ही परत नवे संबंध निर्माण करणार आहात का? तुमच्या मुलांवर याचा काय परिणाम होईल आणि ते या निर्णयात तुम्हाला पाठिंबा देतील का?
अनेक लोक यासाठी वेगळे होतात की, कारण ते खूपच लवकर लग्नाच्या बंधनात बांधले गेलेले असतात, आणि नंतर त्यांना अशी जाणीव होते की ते एकमेकांसाठी बनलेले नसतात. अनेक दशक ते एकत्र राहतात आणि मुलं स्थिरस्थावर झाल्यावर त्यांना असे वाटे की आता सोबत राहण्यात कोणतीच विवशता नाही व ते वेगळे होतात.
सर्वात महत्वाचे कारण जोडीदाराने विश्वासघात करणे हे असते. अनेक जोडप्याना असे वाटते की आता त्यांच्यात प्रेम राहिले नाही. पैसा आणि विचारामध्ये मतभेद असल्यामुळे ते नेहमी भांडत असतात. काही जोडप्याना वाटते की त्यांना आयुष्याकडून आणखी वेगळे काही हवे आहे, आता ते या नात्याशी तडजोड करू शकत नाही.
सिनिअर क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. भावना बर्मी यांच्या मते, ‘‘घटस्फोटाच्या वाढत्या दराची काही प्रमुख कारणं आहेत. व्यावसायिक पातळीवर स्त्री आणि पुरुष दोघांच्या सतत वाढत्या महत्वकांक्षा, ज्यामुळे त्याच्या प्राथमिकता परिवारपासून दूर जात करिअरवर क्रेंद्रित होतात. आपापसात बोलायलासुद्धा त्यांच्याकडे वेळ नसतो. ते काम आणि कुटुंब या ताळमेळ साधू शकत नाहीत. दोघांची अर्थिक निर्भरता एकमेकांवर कमी असते. सहनशक्ती कमी असणे महानगरांमध्ये वाढत्या घटस्फोटाचे एक मोठे कारण आहे. घटस्फोट घेताना तुम्हाला हे माहीत असायला हवे की तुमचे आयुष्य आपापसात बांधले गेले आहे आणि हे तुटणे दोघानाही एका विस्कळीत मार्गावर आणू शकते. समाजापासूनसुद्धा तुटण्याची शक्यता यामुळे वाढते.
तुम्ही हा बदल स्वीकारायला तयार आहात का?
तुमचे घटस्फोट घेण्याचे कारण, एकत्र घालवलेला वेळ, तुमची संपत्ती, मुलं या सगळया गोष्टी तुमच्या निर्णयासाठी महत्वाच्या असतात. पण सर्वात महत्वाचे हे समजून घेणे आवश्यक आहे की तुम्ही हे कशा प्रकारे हाताळणार आहात. या कारणास्तव आयुष्यात होणाऱ्या बदलांचा सामना करायला तुम्ही तयार आहात का? घटस्फोट जीवनातील अत्यंत महत्वचं वळण असते, ज्याचा नंतर येणारा बदल सुखद वा दु:खद काहीही असू शकतो. म्हणून विचार करून हा निर्णय घ्यायला हवा. शक्य आहे की मॅरेज कौन्सिलरला भेटल्यावर तुम्ही तुमचा हा विचार मनातून काढून टाकाल.
घटस्फोटाचा अर्थ आहे बदल आणि हे समजून घ्या की कोणत्याही परिस्थितीत बदलाचा सामना करणे सोपे नसते. अनेकदा मन वळून मागे पाहते, कारण नव्या प्रकारे आयुष्याची सुरवात करताना जेव्हा अडचणी येतात, तेव्हा मन पूर्वायुष्य आठवून अपराधी भावनेने दाटून येते. तुम्हाला स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे की तुम्ही कोणत्याही संकटाचा सामना करू शकता आणि तुम्ही घेतलेला निर्णय योग्य होता.
यादी बनवा
घटस्फोट घेण्याच्या कारणांची एक यादी बनवा. आपल्या संबंधातील चांगल्या वाईट दोन्ही बाजू लिहा. आपल्या जोडीदाराला खलनायकाच्या भूमिकेत ठेवू नका, कारण कमतरता तर तुमच्यातही असतील. घटस्फोट घेतल्यावर यशस्वी आणि सुंदर आयुष्य जगण्याची मी सकारत्मक मानसिकता ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हे गृहीत धरून चला की दोघांच्या चुकींमुळे आज वेगळे व्हायची वेळ आली आहे. म्हणून आपला राग आणि यातना रचनात्मक पद्धतीने हाताळा.
घटस्फोटानंतर तुम्हाला एका सपोर्ट सिस्टीमची आवश्यकता भासेल, ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून तुम्ही रडू शकाल. आपले मित्र आणि नातेवाईकांचा आधार घेण्यात संकोचू नका. जर आवश्यकता असेल तर थेरपिस्टकडे जा आणि आपल्या समस्या मोकळया करा. जेणेकरून तुमच्यावर कोणताही ताण रहाणार नाही.
मानसिकता व्यवहारी ठेवा
घटस्फोटानंतर आर्थिक समस्या सर्वात मोठी असते. जर तुम्ही कमावत्या असाल तरीसुद्धा ही अडचण असतेच. अभ्यासानंतर ही गोष्ट समोर आली आहे की ज्या स्त्रिया घटस्फोटीत असतात, त्यांच्या जीवनशैलीत ३० टक्के घट होते आणि पुरुषांच्या १० टक्के. मग स्त्री या वेगळे होण्यास कितीही तयार का असेना, ती आर्थिक पातळीवर स्वत:ला अक्षम मानू लागते.
योग्य हेच असते की आपल्या भावना नियंत्रणात ठेवून घटस्फोट घेण्याऐवजी व्यवहारीक मानसिकता ठेवून योग्य पावलं उचला. यामुळे फायदा जास्त आणि कमी हानी होते यावर लक्ष ठेवा. जर तुम्ही स्वावलंबी नसाल तर जाहीर आहे की नंतर तुम्हाला कोणावरतरी अवलंबून राहावे लागेल आणि अशाप्रकारे तुमच्या अभीमानाला ठेच लागेल.
घटस्फोटानंतर मुलांवर खोलवर परिणाम होतो, कारण त्यांच्यासाठी आईवडील दोघेही महत्वाचे असतात. वेगळे होणे त्याच्या मनाला जखम करते आणि कधीकधी तर ते वाईट मार्गाला लागतात. एकटी व्यक्ती आपल्याच समस्यांमध्ये गुंतला असल्याने त्यांच्याकडे नीट लक्ष देऊ शकत नाही.
स्वत:ला काही प्रश्न विचारा
* आपल्या जोडीदाराप्रती अजूनही तुमच्या मनात भावना आहेत का? जर असे असेल तर एकदा आपल्या नात्याला वाचवायचा अवश्य प्रयत्न करा.
* तुम्ही यासाठी एकत्र राहत आहात का, की समाजाचे प्रेशर आहे नाहीतर नेहमी भांडतच राहिलो असतो?
* तुम्हाला खरेच घटस्फोट हवा आहे का की केवळ ही धमकी आहे? केवळ राग प्रदर्शित करण्याकरिता वा अशाप्रकारे आपल्या जोडीदाराला इमोशनली ब्लॅकमेल करण्यासाठी तुम्ही हे पाऊल उचलता आहात. अशाप्रकारे संबंध बिघडतीलच.
* तुम्ही शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि भावनिक स्तरावर यासाठी तयार आहात का? तुम्ही यांच्या नकारात्मक परिणामांबाबत विचार केला आहे का? घटस्फोट तुमच्या साधनांमध्ये कमी आणू शकतो, ज्यामुळे तुमचे अनेक स्वप्न तुटू शकतात.
* तुमच्याजवळ एखादी सपोर्ट सिस्टीम आहे का? तुम्ही तुमच्या मुलांना समजावू शकाल का? आणि त्यामुळे होणारा त्रास दूर करण्यात सक्षम आहात का?
* तुम्ही तुमचे करिअर आणि आपले खाजगी आयुष्य यांचा समतोल राखू शकाल का?
घटस्फोट घेतल्यावर तुम्हाला नवे अनुभव, नवी नाती व नव्या घटना नव्या प्रकारे हाताळण्यासाठी तयार रहावे लागेल. आपले जीवन परत निर्माण करावे लागेल. जर तुम्हाला असे वाटत असेल की दुसरे लग्न केल्यास तुमच्या सगळया समस्या सुटतील, तर या भ्रमातून बाहेर या, कारण दुसरे लग्न यशस्वी होईल याची खात्री देता येणार नाही. नक्की नाही की या वेळी योग्य जोडीदार मिळेलच.