* डॉ. यतिश अग्रवाल

 प्रश्न : मी ३६ वर्षीय विवाहिता आहे. लहानपणापासून रात्री झोपण्याअगोदर दूध प्यायची सवय आहे. पण आता काही महिन्यांपासून ना मला पिशवीचे दूध पचतेए ना म्हशीचे. जेव्हा पण दूध पिते, पोटात गडबड होते. गॅस बनायला सुरूवात होते आणि म्हणून आता तर दूध प्यायची भीती वाटू लागली आहे. कृपा करून मला सांगा की या अचानक आलेल्या बदलाचे काय कारण असू शकते. दुधाची उणीव कुठल्या घरगुती उपायाने दूर येईल?

उत्तर : आपल्या छोटया आतडीतल्या आतल्या भागात एक पाचक एन्जाइम बनत असते. ज्याच्या मदतीने आपण दूधात मिळणाऱ्या नैसर्गिक साखरेला पचवू शकतो. हे एन्जाइम लॅक्टेजच्या नावाने ओळखले जाते आणि याचे कार्य दूधात उपस्थित लॅक्टोज शुगरला पचवून सरळ ग्लूकोज आणि लॅक्टोजमध्ये स्थरांवरीत करणे हे असते.

काही लोकांमध्ये हे पाचक एन्जाइम जन्मापासून नसते तर काहींमध्ये हे किशोरावस्थेत किंवा वयस्क वयात पोहोचल्यावर बनायचे बंद होते. ही समस्या नेहमी आनुवंशिक असते. व्यापक स्तरावर केल्या गेलेल्या आणि सामूहिक संशोधनानुसार, आशिया खंडातील ५० टक्के लोकांमध्ये ही समस्या असते.

आपल्याप्रमाणेच या लोकांमध्येही दूध आणि अन्य डेअरी उत्पादनं ग्रहण केल्याने वेगवेगळया समस्या निर्माण होतात. पोटदुखी, गॅस बनणे, पोट फुगणे, पोट गडबडणे इत्यादी सर्व याच समस्येचा भाग आहेत.

छोटया आतडीतल्या आतल्या भागातील पाचक पातळीवरचा हा विकार लॅक्टोज इंटोलरन्स म्हणून ओळखला जातो. आतापर्यंत असे कुठलही रामबाण औषध तयार झाले नाही की ज्याच्यात अशी ताकत असेल की जे घेतल्यावर छोटया आतडीतील लॅक्टोज एन्जाइम पुन्हा बनू लागेल. असा कोणताही फॉर्मुला शोधलेला नाही, जो आतडयातील एन्जाइमची भरपाई करु शकेल. नशीब समजा की तुम्ही इतकी वर्ष या विकारापासून मुक्त राहू शकलात.

या समस्येपासून तुमचा बचाव व्हावा म्हणून फक्त एकच उपाय आहे की दूध आणि इतर डेअरी उत्पादनं वर्ज करा. ही तुम्ही गोष्ट दही आणि योगर्टवर लागू नाहीए. हे खरे आहे की हीसुद्धा दुधापासून बनलेली उत्पादने आहेत, पण ज्यावेळेस ही बनवली जातात त्यावेळेस लॅक्टोबॅक्टेरीया यात असलेल्या लॅक्टोज शुगरला पचवतात, ज्यामुळे हे लॅक्टोजमुक्त होतात.

बाजारात लॅक्टोजमुक्त दूधसुद्धा मिळते. हे सामान्य दुधापेक्षा महाग असते. आपण हे अगदी आरामात पिऊ शकता. सोयाबीन दूधसुद्धा लॅक्टोज मुक्त असते. दूध आणि अन्य डेअरी उत्पादन बंद केल्यानंतर शरीरात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होण्याचा धोका वाटतो. म्हणून त्याच्या भरपाईसाठी एक तर कॅल्शिअमयुक्त जेवण घ्या किंवा पूरकतेसाठी गोळया घ्या. प्रोटीनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डाळी, अन्न, मासे, मटण इत्यादी चांगले स्त्रोत आहेत.

प्रश्न : मी २६ वर्षीय तरूण आहे. नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीतून लॉची डिग्री पूर्ण केल्यानंतर आता एका मोठया लॉ कंपनीमध्ये असोसिएटच्या रूपात काम करतोय, ज्यामुळे माझे स्लिप क्लॉक बिघडले आहे. अंथरुणात झोपल्यानंतरही उशिरापर्यंत झोप येत नाही. दिवसभराच्या घटना डोक्यात थैमान घालत असतात. कृपया काही असे व्यावहारिक उपाय सांगा, ज्यामुळे मला पहिल्यासारखी छानशी झोप यायला लागेल.

उत्तर : हे  खरे आहे की जगात झोपेसारखी दुसरी प्रिय गोष्ट नाही. पुरेशी झोप घेतल्यामुळे मानसिक पातळीवर ताजेतवाने वाटते. शरीरात एक प्रकारची स्फूर्ती येते आणि जेव्हा सकाळी डोळे उघडतात, तेव्हा नसा-नसात उत्साह भरून जातो. वयस्क जीवनात ६ ते ८ तासांची झोप चांगले स्वास्थ्य व दीर्घायुष्यासाठी आवश्यक आहे.

रात्री उशिरापर्यंत काम करणे ही तुमची विवशता आहे, चांगली झोप येण्यासाठी खालील उपाय लाभदायक ठरू शकतात :

ताण-तणावाचे जग मागे सोडून या : झोप येण्यासाठी मन शांत असणे जरूरी आहे. त्याच्यावर कुठलाही दबाव नको. ऑफिसातून परत आल्यावर थोडी मौज-मस्ती करावी. मन थोडे मोकळे सोडावे, ज्यामुळे  दिवसभराचा तणाव दूर होईल.

मनामध्ये शांतीचे स्वर जागवा : झोपण्याअगोदर असं काही करा की ज्यामुळे मनामध्ये सुख शांतता नांदेल. मग भले ही त्यासाठी रिलॅक्सिंग म्युझिक ऐका, एखादे पुस्तक वा मासिक वाचा आणि जेव्हा डोळे जड व्हायला लागलीत, तेव्हा झोपी जा.

टीव्ही आणि कंम्प्युटर झोपेचे साथी नाहीत : झोपण्याच्याअगोदर उशिरापर्यंत टीव्ही बघणे वा कंम्प्युटरवर काम करणे झोपेमध्ये बाधक ठरू शकते. ज्याच्या तीव्र प्रकाशामुळे मेंदूचे सर्किट जागृत अवस्थेत राहते. साखर झोप हवी असेल तर झोपण्याच्या तास-दीड तास आधी ही साधने बंद करावीत.

हलके जेवण चांगले : झोपण्याअगोदर हलके जेवण घेणे कधीही चांगले. पोट वरपर्यंत भरलेले असेल आणि शरीर पचनाकार्यात व्यस्त असेल तर झोप कशी येणार?

चहा आणि कॉफी घेणे टाळा : संध्याकाळी उशिरा चहा आणि कॉफी घेतल्याने झोप लागत नाही. यातील कॅफिन मेंदूला आराम घेऊ देत नाही.

अंघोळ करावी : अंथरुणात जाण्याच्या १ तास अगोदर अंघोळ केल्यास शरीराला शेक मिळतो आणि पेशी रिलॅक्स होतात. हा थकवा दूर करण्याचा सोपा उपाय आहे.

योगनिद्रा आहे तणावमुक्तीचे उत्तम औषध : झोपण्याअगोदर काही मिनिटे योगनिद्रेत घालवल्याने त्याचा विशेष फायदा होतो. असे केल्याने शरीर आणि मन-मेंदू शांत अवस्थेत पोहोचते आणि लगेच झोप येते.

सकारात्मक विचार मानसिकता ठेवावी. दिवसा काही वेळ व्यायामासाठीही काढावा. वजनावर नियंत्रण ठेवावे. शक्य असेल झोपेची वेळ निश्चित करावी. हे सगळं केल्यावर निश्चितच तुम्ही पुन्हा पूर्वीसारखा साखर-झोपेचा आनंद घेऊ शकाल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...