– डॉ. एच.एस. छाबडा, इंडियन स्पाइनल इंजरीज सेंटरमध्ये स्पाइन सर्विचे प्रमुख आणि मेडिकल डायरेक्टर
स्पाइनल इंजरी कोणाच्याही आयुष्याची त्रासदायक घटना असू शकते. यामुळे व्यक्ती एकप्रकारे लकवाग्रस्त होऊ शकते. इंजरी जर मानेत असेल तर यामुळे टेट्राप्लेजिया होऊ शकतं. इंजरी जर मानेच्या खाली असेल तर यामुळे पाराप्लेजिया म्हणजेच दोन्ही पाय आणि इंजरीने खालच्या शरीरात लकवा होऊ शकतो. केंद्रीय स्नायुतंत्राचा भाग असल्यामुळे स्पाइनल कॉर्डवरच संपूर्ण शरीर अवलंबून असतं. इंजरीने लैंगिक सक्रियतादेखील प्रभावी होऊ शकते. स्पाइनल कॉर्ड इंजरी उंचावरून खाली पडल्याने, रस्ते अपघात, हिंसा वा खेळांच्या घटनांमुळेदेखील होऊ शकते. स्पाइनल कॉर्ड इंजरीच्या नॉनट्रोमेटिक कारणांमुळे स्पाइन आणि ट्यूमरचा टीबी यांसारख्या संसर्गाचा समावेश आहे.
लैंगिक सक्रियता महत्त्वाची
स्पाइनल इंजरीने पीडित व्यक्तिला यथासंभव आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न व्हायला हवा. भारतीय समाजाच्या एका मोठ्या वर्गात लैंगिक आरोग्यावर चर्चा करणं तसं वर्जित विषय मानला जातो, त्यामुळे या विषयावर लोक चर्चा करायला तसे संकोचतात आणि रुग्ण शांतपणे हे सर्व सहन करत राहातो. शिक्षा, ज्ञान आणि जागरूकतेच्या अभावामुळे लोक अशा रुग्णाच्या बाबतीत असा विचार करू लागतात की ते यौनेच्छा वा लैंगिक समस्येने पीडित आहेत. परंतु वास्तव हे आहे की सर्वसामान्य व्यक्तिप्रमाणेच स्पाइनल इंजरीने पीडित व्यक्तिसाठीदेखील लैंगिक सक्रियता तेवढीच गरजेची आहे.
साथीदाराचा अभाव
खरंतर, स्पाइन इंजरी इच्छाशक्तीवर परिणाम करत नाही. मात्र, एखाद्या व्यक्तिच्या लैंगिक गोष्टींवर नक्कीच परिणाम करते. अनेकदा असं जोडीदाराच्या अभावामुळेदेखील होतं. इतर बाबतीत मात्र हे मांसपेशींवर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यायामाच्या अभावामुळेदेखील होऊ शकतं. लैंगिक अनिच्छा लिंगाच्या आधारावरदेखील वेगवेगळी असू शकते. पुरुषाला जिथे उत्तेजनेच्या अभावामुळे त्रास होतो, तिथे स्त्रियांना साधारणपणे शिथिल जोडीदारामुळे थोडाफार त्रास होतो, खासकरून भारतीय समाजात. परंतु स्पाइनल इंजरीने पीडित व्यक्तिंच्या लैंगिक अनिच्छेला सेक्श्युअल रिहॅबिलिटेशन प्रोग्राम आणि निरंतर अभ्यासाने अधिक प्रमाणात दूर करता येऊ शकतं.
समस्येकडे दुर्लक्ष
अशा रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि लैंगिक गोष्टींबाबत त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणं खूपच गरजेचं असतं. यामध्ये तंबाखू पूर्णपणे निषिध असायला हवा. शारीरिक हालचालींचा अभाव आणि वेदनेबरोबरच एससीआय रुग्ण आकर्षण, संबंध आणि प्रजननाची क्षमतासारख्या इतर कारणांवरूनदेखील चिंतित राहातात. काळाबरोबरच रुग्ण आपल्या नवजात शिशूसोबत जगणं शिकतात आणि बाकीच्या आयुष्याचादेखील स्वीकार करतात, मात्र आपल्या लैंगिक गरजांबाबत ते अनभिज्ञ राहातात. रुग्णाच्या शरीराच्या अशा हरविलेल्या गोष्टी बहाल करण्यासाठी मोठ्या रिहॅबिलिटेशन प्रोग्रामच्या दरम्यानदेखील लैंगिक समस्येकडे दुर्लक्षच केलं जातं.
स्वत:हून पुढाकार घेत नाहीत
एससीआयच्या प्रकरणात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांसाठी अनेकदा सेक्श्युअल पार्टनर बनणं अधिक सहजसोपं होतं. हे सर्व फक्त शारीरिक रचनेमुळे नाही तर सक्रियतेच्या स्तरावरदेखील शक्य होतं. भारतासारख्या रूढिवादी समाजात स्त्रियांकडून कामेच्छाची आशा करणं कठीण आहे. भारताच्या ९० टक्के स्त्रिया पॅसिव्ह सेक्श्युअल पार्टनर असतात ज्या स्वत:हून पुढाकार घेत नाहीत. म्हणूनच पुरुषांच्या तुलनेत त्यांच्यासाठी लैंगिक स्वास्थ पुन्हा मिळवणं अधिक सहजसोपं ठरतं आणि त्यांचं मुख्य लक्ष्य लैंगिक सक्रियता पुन्हा मिळवणं तसंच संभोग करण्याची क्षमता मिळवणं हेच असतं.
अडचणीवर उपाय
पुरुषांच्या बाबतीत अडचणी या उत्तेजनेचा अभाव आणि स्खलनशी संबंधित असतात. त्यांची उत्तेजनक्षमता आणि स्खलनमध्ये बदल होण्याव्यतिरिक्त कामोत्तेजनांचे लैंगिक समाधानदेखील एक असं क्षेत्र आहे जे एससीआयपीडित पुरुषांसाठी चिंतेचं कारण आहे. दुसरं चिंतेचं कारण म्हणजे स्पर्मच्या गुणवत्तेवर पडणारा प्रभाव आणि स्पर्म काउंटबाबतचा आहे. स्पाइनल इंजरीच्या प्रकरणात अनेकदा वियाग्रासारख्या औषधांनी उत्तेजनेची समस्या दूर केली जाऊ शकते. काही प्रकरणांत व्हॅक्यूम ट्यूमेसेंस कन्स्ट्रक्शन थेरेपी (वीटीसीटी) वा पॅनाइल प्रोस्थेसिससारख्या उपकरणांचीदेखील गरज पडू शकते.
गैरसमज
सेक्श्युअल काउन्सलिंग आणि मॅनेजमेंट विकासशील देशांमध्ये एससीआयच्या सर्वात उपेक्षित गोष्टींपैकी एक आहे. लेखकांच्या एका संशोधनानुसार आढळलंय की एससीआयने पीडित ६० टक्के रुग्णांनी आणि त्यांच्या ५६ टक्के जोडीदारांनी सेक्श्युअल काउन्सलिंग घेतलेलं नाही. ज्या गोष्टींकडे खूपच कमी लक्ष दिलं जातं, त्यापैकी एक आहे जागरूकता आणि सांस्कृतिक बदल. पती आणि पत्नींमध्ये लैंगिक संबंधाचा हेतू फक्त मुलांना जन्म देणं एवढंच मानलं जातं. सेक्सबाबत चर्चा करणं वाईट मानलं जातं. लैंगिक समस्या सर्वसामान्य झाल्या आहेत तसंच सेक्सकडे दुर्लक्ष, सेक्सबाबतच्या चुकीच्या धारणा आणि नकारात्मक विचारसरणीदेखील याची प्रमुख कारणं मानली जातात. पारंपरिक वर्जनादेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारते. सेक्श्युआलिटीला प्रभावित करणाऱ्या इतर सामाजिक, पारंपरिक फॅक्टर्समध्ये लैंगिकसंबंधांची विचारसरणी, आईवडिलांबाबत आदर तसंच इतर कारणांचा समावेश आहे. सेक्सला वाईट समजलं जातं आणि पुरुष तसंच स्त्रियांसाठी वागणुकीचे दुहेरी मापदंड असतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची अवस्था अधिक बिकट असते.
आत्मविश्वासाचा अभाव
एका संशोधनानुसार विकसित देशांच्या तुलनेत भारतासारख्या देशात स्पाइनल, कॉर्ड इंजरीने पीडित व्यक्तिंच्या लैंगिक गोष्टींची वारंवारता कमी असते. अनेक रुग्ण इंजरीच्या पूर्वीच्या तुलनेत आपल्या सेक्स लैंगिक आयुष्याकडे दुर्लक्ष करतात. हे कदाचित एससीआयच्या समस्या, इंजरीनंतर पार्टनरची असंतुष्टी, लैंगिक क्रीडेच्या दरम्यान जोडीदाराचं असहकार्य, आत्मविश्वासाचा अभाव तसंच अपर्याप्त सेक्श्युअल रिहॅबिलिटेशन कारणंदेखील असू शकतात. पाश्चिमात्य देशांतील प्रकरणांप्रमाणे खूपच कमी जोडीदार समाधानी असतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया लैंगिक समाधानाच्या अभावाची तक्रार अधिक करतात. यामागे एक प्रचलित सांस्कृतिक मान्यता आहे की एखाद्या आजारी बाईशी लैंगिक संबंध ठेवणं नैतिकतेविरुद्ध आहे आणि यामुळे पुरुष जोडीदारालादेखील लागण होऊ शकते. भारतीय समाजात स्त्रियांची वाईट अवस्था, जोडीदारांची वेगळी विचारसरणी, पचनशक्ती इत्यादींची गडबड आणि वैयक्तिक आयुष्याचा अभावदेखील याची काही संभावित कारणं असू शकतात.
लैंगिक जीवनाला अंत नाही
स्पाइनल इंजरीला लैंगिक जीवनाचा शेवट मानू नये. यामुळे इंजरीपीडित व्यक्तिला आपल्या नवीन शरीरात लैंगिकसुखाचा स्वीकार करण्यात मदतीची गरज असते आणि अनेकदा त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज असते. परिवर्तित संवेदनशीलता, शारीरिक स्वीकृती वा मसल कंट्रोलसारखे फॅक्टर समजून घेतल्याने स्पाइनल इंजरी रुग्णाला निरामय कामजीवन बहाल करण्यात मदत मिळू शकते. त्याच्या सेक्श्युअल रिहॅबिलिटेशनसाठी मेडिकल प्रोफेशनल्सच्या मदतीची गरज असते. याबाबतीत जागरूकता वाढविण्याची गरज आहे. खासकरून भारतीय समाज तसंच प्रोफेशनल्समध्ये.