* रिता बक्षी, स्त्रीरोग तज्ज्ञ, इंटरनॅशनल फर्टिलिटी सेंटर
प्रश्न : मी ५३ वर्षीय महिला आहे. माझा मेनोपॉज अजून आला नाही आहे. मला माहीत करून घ्यायचे आहे की शरीर या बदलाकडे वाटचाल करत आहे का?
उत्तर : मेनापॉजचे सरासरी वय ४५ ते ५५ वर्ष असते, म्हणून शक्यता आहे की तुमचीसुद्धा या बदलाकडे वाटचाल होत असावी. असे आवश्यक नाही की सगळयाच महिलांचा मेनापॉज या वयात यायला हवा. अनेक अशी कारणं आहेत जी याला प्रभावित करतात. जसे ताण, दैनंदिन जीवनशैली, योग्य आहार इत्यादी. जर तुम्हाला काही लक्षणं जसे योनीमार्गाचा शुष्कपणा, त्वचा कोमेजणे, पोटावर सूज, थकवा आणि मूड स्विंग अनेकदा जाणवत असेल तर, शक्यता आहे की तुमच्या हार्मोन्समध्ये बदल होत आहे. असे होत असेल तर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या आणि एखाद्या स्त्री रोगतज्ज्ञाला भेटा.
प्रश्न : मी ४८ वर्षांची महिला आहे. मी कामेच्छा प्रबळ होण्यासाठी सप्लीमेंट घेऊ शकते का? ४-५ वर्षांपूर्वी आंशिक हिस्टे्रक्टॉमी झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून मला माझ्यात मेनोपॉजची लक्षणं जाणवत आहेत. मला असे वाटते की सर्वात स्पष्ट लक्षण सेक्स ड्राइव्ह कमी होणे हे आहे. सांगा मी काय करू?
उत्तर : लिबीडो म्हणजे कामेच्छा कमी होणे, मेनोपॉजदरम्यान अत्यंत सामान्य असते आणि यात अनेक गोष्टी आपले योगदान देत असतात. मेनोपॉजच्या काळात एस्ट्रोजन हार्मोन्स कमी होणे हे प्रमुख कारणांपैकी एक आहे. हार्मोनल चेंज शरीरावर मोठा ताण आणतो, म्हणून ऊर्जेचा स्तर कमी होतो. एस्ट्रोजनचा स्तर कमी होणे आपल्या मन:स्थितीला प्रभावित करु शकते. यासाठी जडीबुटी, मॅका आणि ब्लॅक रास्पबेरीचे सेवन लाभकारक होऊ शकते.
प्रश्न : मी ४० वर्षीय महिला आहे आणि माझा मेनोपॉज काळ सुरु झाला आहे. लवकर मेनोपॉज आल्याने माझ्या पोटावर खूप ब्लॉटिंग होत आहे. मी काय करू?
उत्तर : मेनोपॉजमध्ये सूज, ब्लॉटिंग अगदी सामान्य गोष्ट आहे. आणि हा त्रास इतर अनेक कारणांमुळे होऊ शकतो. एस्ट्रोजन हार्मोनचा खालावता स्तर, पचनाला प्रभावित करू शकतो, ज्यामुळे सर्व काही मंदगतीत चालते. यामुळे सूज येते. खालावता एस्ट्रोजनचा स्तर कार्बोहायड्रेटच्या पचनावरसुद्धा परिणाम करू शकतो, ज्यामुळे स्टार्च आणि शुगरचे पचन होणे आणखी कठीण जाते व यामुळे अनेकदा थकवासुद्धा जाणवू शकतो.
रोज नियमित चालणे तुमच्यासाठी सहाय्यक ठरेल. यामुळे तुमची पचनशक्ती बळकट होईल. याशिवाय खोल श्वास घ्या आणि शरीराला टोन करा. पास्ता, केक, बिस्कीट आणि पांढरे तांदूळ खाणे टाळा. जर दीर्घ काळ हे दुखणे बरे झाले नाही तर एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटा.
प्रश्न : माझा मेनोपॉज सुरु झाला आहे. मी फॅमिली प्लॅनिंगबाबत सतर्क असायला हवे का?
उत्तर : तुमचा मेनापॉज आताच सुरु झाला आहे. त्यामुळे शक्यता आहे की १ वर्षांपासून तुमची मासिक पाळी आली नसेल. अशावेळी जेव्हा महिलेची वर्षभर मासिक पाळी येत नाही, तेव्हा त्यांनी फॅमिली प्लॅनिंग म्हणजे कंडोम वगैरेचा वापर करायला हवा. मेनोपॉजनंतरसुद्धा स्त्रियांमध्ये लैंगिक संक्रमणाची जोखीम कमी करण्यासाठी कंडोम इत्यादीचा वापर करत रहायला हवे.
प्रश्न : तीन महिन्यांपासून माझी मासिक पाळी आली नाही आहे. आता एकदम एक आठवडयापासून ब्लीडींग होते आहे. हे बरोबर आहे की चूक आणि अशा परिस्थिती मी काय करायला हवे?
उत्तर : अनेक महिलांमध्ये कितीतरी महीने एवढेच नाहीतर वर्षभरसुद्धा मासिक पाळी येत नाही आणि नंतर परत सुरु होते. हा बदल तेव्हाच होतो जेव्हा हार्मोन, ताण, अती व्यायाम, आहारात बदल होतो. अशा परिस्थितिचा सामना करण्यासाठी तुम्ही थोडया दिवसांसाठी आयर्न टॉनिकचा आधार घ्या. जर तरीही या समस्येतून सुटका झाली नाही तर लवकरात लवकर एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाला भेटा.
प्रश्न : मेनोपॉजच्या काळात मी कसा आहार घ्यायला हवा? मी खूप ठिकाणी याबाबत वाचले आहे, पण अजूनपर्यंत एखाद्या योग्य आहारापर्यंत पोहोचले नाही. कृपया सांगा की या परिवर्तनादरम्यान कसा आहार घ्यायला हवा?
उत्तर : मेनोपॉज संपूर्ण शरीरावर फार मोठा परिणाम करत असतो. म्हणून जितकी जास्त तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्याल तेवढे उत्तम. ताजी फळं, ब्राऊन राईस, मोड आलेली कडधान्य असलेला आहार आपल्या जेवणात जास्त समाविष्ट करा. गव्हाच्या पिठाचे सेवन कमी करा, कारण काही महिलांमध्ये गव्हाचे पचन करण्याची प्रक्रिया मंदावते आणि वजन वाढू लागते. आपल्या आहारात जास्त प्रथिने आणि जर तुम्ही शाकाहारी नसाल तर मांस आणि मासेसुद्धा खाऊ शकता. जर शाकाहारी असाल तर दररोज प्रोटीन शेक पिऊ शकता. पण हे निश्चित करा की यात साखर कमी वा नसल्यातच जमा असावी.
प्रश्न : मी ५७ वर्षाची आहे. मेनोपॉजमुळे माझ्या चेहऱ्यावर खूप केस उगवत आहेत. मला सांगा की मी काय करायला हवे?
उत्तर : मेनोपॉजचे अनेक साईड इफेक्ट्स असतात. नकोसे केस उगवणे यापैकी एक आहे. बॉटनिकल सप्लिमेंट्स मेनोपॉजच्या भक्ष्य असलेल्या महिलांमध्ये एस्ट्रोजनचे प्रमाण नियंत्रित करते.