* डॉक्टर श्वेता गोस्वामी
प्रश्न : माझं वय ३४ वर्षं आहे. मला एक ५ वर्षांचा मुलगादेखील आहे. मला पीरिएड्सनंतर हलकासा घट्ट असा पांढरा पाण्यासारखा डिस्चार्ज व्हायचा. वारंवार लघवीला जावं लागायचं. डॉक्टरांना दाखविल्यानंतर समजलं की तांदळाच्या दाण्यासारख्या मूतखड्याची तक्रार आहे, ज्याच्यावर उपचार सुरू आहेत. हे बरं झाल्यानंतर मला पुन्हा आई व्हायचंय. परंतु माझा मुलगा जेव्हा दीड वर्षांचा होता तेव्हा मी गर्भपात केला होता. तेव्हापासून मी गर्भवती झालेली नाही. मला लवकरच दुसरं मूल हवंय. पुन्हा आई होण्यासाठी मी कोणते उपचार करून घ्यायला हवेत? माझं पहिलं मूल सिझेरियनने झालं होतं?
उत्तर : तुम्ही आता गर्भवती होऊ शकता परंतु सुरक्षित गर्भधारणेसाठी मूतखडा काढायला हवा. कदाचित तुमची फॅलोपियन टयूब बंद झाली असावी ज्यामुळे तुम्ही गर्भपातानंतर गर्भवती होऊ शकला नाहीत. यासाठी तुम्हाला एक्स रे, ज्याला एलएसजी म्हणतात, ते करायला हवं. यामुळे तुम्हाला लॅप्रोस्कोपीची गरज आहे का आयवीएफची ते समजेल.
तुमच्या पतींच्या सेमेनचीदेखील तपासणी करून घ्या. तुमचे रिपोर्ट नॉर्मल असतील तसंच तुमची फॅलोपियन ट्यूब उघडी असेल तर इंट्रायूट्रीन इंसेमिनेशन करू शकता. हे सर्व करायला अधिक खर्च येत नाही. ३ ते ६ सायकलमध्ये हे पूर्ण होऊ शकतं. जर आययूआय टेस्ट फेल झाली तर तुम्ही आयवीएफ पद्धतीचा अवलंब करू शकता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचे उपचार एखाद्या खास फर्टिलिटी सेंटरमधूच करुन घ्या.
प्रश्न : मी एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करते. आता मी आणि माझे पती परिवार नियोजनासाठी तयार नाही आहोत. मला हे जाणून घ्यायचंय की जर मी गर्भनिरोधक गोळ्यांचं सेवन सुरू केले तर माझ्या पतींनादेखील कंडोमचा वापर करावा लागेल का?
उत्तर : जन्म नियंत्रक क्रिया म्हणजेच गर्भनियंत्रक गोळी आययूएस वा गर्भनिरोधक इंजेक्शन इत्यादी नको असलेला गर्भ रोखण्यात प्रभावी आहे. परंतु हे सर्व यौनरोग वा यौनसंक्रमणपासून कोणत्याही प्रकारचं संरक्षण देत नाहीत तर कंडोमपासून यौनरोगांपासून संरक्षण होतं आणि नको असलेल्या गर्भ समस्येचंदेखील निराकरण होतं. म्हणून सुरक्षित यौनसंबंधांसाठी कंडोमचा वापर करणं योग्य ठरेल.
प्रश्न : माझं वय २४ वर्षं आहे. मी एका कन्सल्ट्न्सीमध्ये काम करते. माझ्या प्रियकरासोबत माझे शारीरिकसंबंध होते. यासाठी आम्ही सुरक्षेचीदेखील खास काळजी घ्यायचो. परंतु मला अजूनही भीती वाटते. कृपया मदत करा.
उत्तर : तुम्ही एका चांगल्या स्त्री-रोगतज्ज्ञांकडे जा आणि तुमची तपासणी करून घ्या. तुमच्या गर्भावस्थेची चाचणीदेखील केली जाऊ शकते.
प्रश्न : मी ३३ वर्षांची असून मी आणि माझे पती बाळासाठी प्रयत्न करत आहोत. माझ्या मासिकपाळीची तारीख उलटून पाच दिवस झाले आहेत. मी प्रेगनन्सी टेस्ट करू शकते का?
उत्तर : नॉर्मल यूरिन प्रेगनन्सी टेस्ट पीरिएड मिस झाल्याच्या १५ दिवसांनंतरच करायला हवी तेव्हाच पिझटिव रिझल्ट येतो. परंतु तुमच्याजवळ दुसरा ऑप्शनदेखील आहे की तुम्ही ब्लड बीएचसीजीची टेस्ट करू शकता. त्यामुळे तुम्ही प्रेग्नण्ट आहात की नाही ते समजेल.
प्रश्न : मी ३९ वर्षांची आहे. गेल्या ३ महिन्यांपासून मी नोवेलॉन औषध घेतेय; कारण माझ्या उजव्या ओवरीमध्ये सिस्ट आहे. या औषधांनी सिस्ट जाईल का? कृपया मला गर्भधारणा होण्यासाठी कोणती ट्रीटमेण्ट घ्यायला हवी तेदेखील सांगा?
उत्तर : तुम्हाला सोनोग्राफी करून घ्यायला हवी. यामुळे तुमच्या सिस्टच्या आकाराची माहिती मिळेल आणि एकदा फर्टिलिटी स्पेशालिस्टलादेखील दाखवायला हवं. त्यामुळे ते तुम्हाला सायकल प्लॅन करण्यात तुम्हाला मदत करू शकतील आणि लॅप्रोस्कोपीच्या मदतीने तुम्हाला तुमच्या रिप्रोडक्टिव ऑर्गनच्या कंडीशनची माहिती मिळेल.
प्रश्न : माझे वय ३० वर्षं आहे. मी शारीरिकरित्या निरोगी आहे आणि माझ्या वैद्यकीय तपासण्यादेखील करून घेतल्या आहेत. तरीदेखील नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा करू शकत नाहीए. बीजाणूंशिवायदेखील पीरिएड्स येऊ शकतात?
उत्तर : होय, असं होऊ शकतं की बीजांडाशिवायदेखील पीरिएड येऊ शकतो. तुम्हाला जर नैसर्गिकपणे गर्भधारणा होत नसेल तर तुम्ही एखाद्या चांगल्या फर्टिलिटी सेंटरमध्ये जाऊन फॉलिकल्सची वाढ आणि बीजांडासंबंधित तपासणी करून घ्यायला हवी.
प्रश्न : माझं वय ३० वर्षं असून पतींचं वय ३३ वर्षं आहे. आम्ही दोघेही निरोगी आहोत. आम्ही गेल्या दीड वर्षांपासून दुसऱ्या बाळासाठी प्रयत्न करत आहोत, परंतु गर्भधारणा होत नाहीए. माझं मॅसुरेशन सायकलदेखील सामान्य आहे. कृपया योग्य सल्ला द्या.
उत्तर : कधीकधी बाळाच्या जन्मापासून त्रास उद्भवू शकतो. तरीदेखील तुम्ही दोघांनी एकदा स्त्री-रोगतज्ज्ञांना दाखवायला हवं आणि तुमच्या बीजांडाच्या दिवसांबद्दल माहिती घ्यायला हवी. एकदा तुमच्या पतींची टेस्टदेखील करून घ्या.