* गरिमा पंकज

नवीन वर्षाच्या नवीन फॅशन ट्रेंड्सपासून तुम्ही वंचित राहावे, अशी आमची इच्छा नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला केवळ ड्रेसच नाही तर त्यासोबत ज्वेलरी, बॅग्स, फूटवेअर, हेअरस्टाईल अशा सर्वांचीच लेटेस्ट माहिती देत आहोत.

फॅशन डिझायनर आशिमा शर्मा यांनी अशा काही टीप्स आणि ट्रेंड्सबद्दल सांगितले, ज्याकडे लक्ष दिल्यास तुम्ही फॅशनेबल दिसू शकता :

लेयर्ड फॅशन : अशा प्रकारच्या स्टाईल स्टेटमेंटमध्ये तुम्ही हवे तितके कपडे परिधान करू शकता. परंतु कोणता रंग किंवा डिझाइन तुम्ही कोणत्या कपडयासोबत मॅच करून परिधान करणार आहात, याकडे लक्ष द्या. लेयर्ड फॅशनमध्ये ब्लॅक पँट आणि सफेद शर्टसोबत गडद तपकिरी रंगाचे सैलसर स्वेटर आणि शॉर्ट बूट अशा प्रकारचे लेयरिंग करता येईल. जर तुम्हाला स्कार्फ किंवा मफलर घालायला आवडत असेल तर तुम्ही बॉयफ्रेंड जीन्ससह डीपनेक स्वेटरचे कॉम्बिनेशन करून त्याला आवडत्या मफलरसह कव्हर करू शकता. असा लुक तुम्ही मेसी बनसह करू शकता.

टी-शर्टसह बेलबॉटम पँट्स : जर तुम्हाला एखाद्या पार्टीत जायला आवडत असेल तर ही फॅशन तुमचे स्टाईल स्टेटमेंट असायला हवे. या लुकसाठी तुम्ही ब्लॅक स्कॅलोप हेम बेलबॉटम पँटसह अॅनिमल प्रिंट टॉप घालू शकता. तुमच्या पँटला मॅचिंग बोल्ड आणि पॉपी नेलपेंट लावा, सोबतच गोल डिझाईनचे इयररिंग्ज घाला. राहिली गोष्ट मेकअपची तर तो शक्य तेवढा लाईट करा.

पेन्सिल स्कर्टसह ओव्हरसाईज शर्ट : हा लुक ऑफिससाठी अतिशय परफेक्ट आहे. पेन्सिल स्कर्ट घाला जो बॉडीकोन असेल आणि पुढच्या बाजूला मॅचिंग बटणे असतील. यासह ओव्हरसाईज चेक शर्ट घाला. केसांचा सैल पोनीटेल बांधा. लेस पीप टो बुटांसह तुम्ही हा गेटअप कॅरी करू शकता. तो तुम्हाला कॅज्युअल लुक देईल.

ब्लेर ड्रेस : फ्लोरल, प्रिंटेड आणि रफल ड्रेस तर तुम्ही अनेकदा वापरले असतील. पण आता जिप ब्लेझर ड्रेस वापरून पाहा. या ड्रेसला तुमच्या नवीन कलेक्शनमध्ये नक्की स्थान द्या. अशा प्रकारच्या ड्रेससोबत तुम्ही अँकल स्ट्रैप चंकी हिल वापरू शकता. केसांना कलर करून हा लुक आत्मविश्वासपूर्वक कॅरी करा.

फ्लाउंस स्लीव टी : फ्लाउंस स्लीव टी ही ऑफिससाठी थोडी हटके फॅशन ठरू शकते. सोबतच पार्टी आणि डेटसाठीही उत्तम पर्याय आहे. फ्लाउंस स्लीव टीसोबत कुठलाही लुक खुलून दिसतो. तुम्ही मिनी स्कर्ट किंवा डेनिम जीन्ससह फ्लाउंस स्लीव टी परिधान करू शकता. डेनिम जीन्ससह हे परिधान करणार असाल तर अतिशय लाईट मेकअप करा. सोबतच हायहिल वापरा.

क्रॉप टॉप विथ डे्रप्ड स्कर्ट : पांढरा रंग सर्वांवरच खुलून दिसतो आणि जर तुम्ही चेक अँड क्रॉप टॉपचे चाहते असाल किंवा ते परिधान करायच्या विचारात असाल तर ब्लॅक अँड व्हाइट चेक क्रॉप टॉप घ्या, ज्याच्या मागच्या बाजूला नॉट डिझाईन असेल, जी तुम्हाला थोडे बॅकलेसचेही फील देईल. यासोबत तुम्ही स्कर्ट घालू शकता. हा महिलांचा आवडता ड्रेस बनला आहे. या लुकला सेक्सी बनविण्यासाठी हाय हिल्स घाला. सोबत बोल्ड लिपस्टिक लावा, जी तुमच्या पूर्ण आऊटफिटलाच क्लासिक बनवेल.

रंगरीतीचे सीईओ संजीव अग्रवाल यांनी फॅशनच्या नव्या ट्रेंडबाबत दिलेल्या टीप्स :

पेस्टल कलर पुन्हा इन : पेस्टल कलर केवळ दिसायलाच कुल नसतात तर सोबर आणि स्टायलिश लुकही देतात. पार्टी ड्रेस असो किंवा ऑफिस ब्लेझर, बेधडकपणे लॅव्हेंडर कलर निवडा.

वाइड लेग लेंट्स आणि ट्राउर्स : ९० च्या दशकातील फॅशन परत आली आहे. वाइड लेग पँट आणि ट्राउझर्समध्ये तुमच्या आवडीचा एक पॅक निवडा, तो कोणत्याही क्रॉप टॉप टीज, लाँग स्लीव्ह शर्टसोबत मॅचिंग करा आणि ग्लॅमरस दिसा.

वाइल्ड आणि आउटगोइंग प्रिंट :  कलर ब्लॉक्ड प्रिंट्स 2020 मध्ये फॅशनमध्ये होते. याच बोल्ड आणि बिनधास्त प्रिंट्ससह तुम्ही 2021 मध्येही स्वत:ला आकर्षक आणि सुंदर लुक देऊ शकता.

फ्रिंजेज : हे पार्टीवेअरसह सर्व प्रकारच्या पेहरावांवर मॅच होते. शिमरी फॅब्रिकचे एक छोटेसे फॅब्रिकही याच्या सौंदर्यात भर घालते.

कॅप्स आणि पोंचो : स्टायलिश पारंपरिक पोंचो आणि रंगीबेरंगी कॅप्स हा २०२० चा सर्वात आकर्षक फॅशनेबल ट्रेंड आहे. पारंपरिकच  नाही तर प्रासंगिक आणि वेस्टर्न कॅपही तुमचे लुक अपग्रेड करते.

प्लाझाला करा बाय बाय : आता प्लाझाची जागा शराराने घेतली आहे. तुमच्या वॉर्डरोबमध्ये नवीन डिझाईनचे शरारा नक्की ठेवा. 2021 मध्ये तुमच्या कोणत्याही कुर्त्यासोबत शरारा मॅच करा आणि पार्टीची शान बना.

पारंपरिक भारतीय वर्कचे स्कार्फ : स्कार्फ जवळपास सर्वच भारतीय पेहरावांशी मॅच होतात. ब्लॉक प्रिंट्स, बाटिक आणि कांथायुक्त स्कार्फ आजकाल बरेच ट्रेंडमध्ये आहेत. जानेवारीच्या हिवाळयात एक लांबलचक गरम स्कार्फ तुम्हाला उबदारही ठेवेल आणि स्टायलिश लुकही देईल. अशाच प्रकारे उन्हाळयात तुम्ही टॅनिंगपासून वाचण्यासाठी ब्लॉक प्रिंट्सचा कॉटनचा स्कार्फ वापरू शकता.

मेकअप ट्रेंड

सौंदर्य तज्ज्ञ भारती तनेजा यांनी काही खास मेकअप ट्रेंडविषयी सांगतात :

यावर्षी नॅचरल मेकअपचा ट्रेंड मागे पडेल आणि ब्राईट मेकअप ट्रेंड येईल. हेअरस्टाईलमध्येही रेट्रो लुक यावर्षी आऊट होऊ शकतो. २ ते ६ महिन्यांच्या टेम्पररी ब्युटी प्रोसेसऐवजी दीर्घकालीन ब्युटी ट्रीटमेंट पसंतीस उतरतील.

मागील वर्षी न्यूड मेकअप ट्रेंडमुळे लाईट मेकअपची जास्त मागणी होती, ज्यामध्ये मेकअप करण्याची प्रत्येकाचीच इच्छा होती, परंतु तो दिसू नये असे त्यांना वाटत होते. त्यामुळेच काळया आणि पांढऱ्या रंगाची चलती होती. परंतु यावर्षी लाईट किंवा न्यूड मेकअप कमीच पाहायला मिळेल.

येणाऱ्या काळात मेकअप किटचा भाग बनलेले रंग आहेत – जांभळा, केशरी, रस्ट, पोपटी हिरवा, निळा यासारखे ब्राईट रंग. कारण मेकअपचे सर्व प्रोडक्ट्स निसर्गाशी साधर्म्य साधणारे असतील. थोडे जास्त कलरफूल व्हावेसे वाटणाऱ्यांसाठी गुलाबी, गुलाबाचा, ट्यूलिपसारख्या फुलांचा रंग २०२० मध्ये इन होईल. डोळयांच्या मेकअपमध्येही लायनरपासून आयशॅडोपर्यंत एमराल्ड ग्रीनला महत्त्व मिळू शकते.

थ्री डी आणि फॅन्टसी आय मेकअप ट्रेंडमध्ये राहील. यामध्ये पापण्यांवर विविधांगी चित्र काढण्याचा ट्रेंड असेल. वृक्ष, फुलपाखरू, फुले, पक्षी अशी चित्रे काढली जातील. यासाठी कलर, क्रिस्टल, स्पार्कल आणि ग्लिटर वापरला जाईल. ब्राइट कलर्ससह ड्रामॅटिक आय मेकअपचा वापर केला जाईल.

होय, कॅट आय मेकअप ट्रेंडमध्ये राहील, परंतु कलरफूल आयलायनरसह. नैसर्गिक घारे डोळे ट्रेंडबाहेर जातील. स्मोकी आईजलाही कमी पसंती मिळण्याची शक्यता आहे.

लिप मेकअपमधील ऑक्सब्लूड पंपकिन रेड, फ्यूशिया, मेटॅलिक शेड्स ट्रेंडमध्ये राहतील. दोन टोनची लिपस्टिक लावण्याचा ट्रेंडही सेट होईल, ज्यामध्ये वरच्या ओठाला वेगळी आणि खालच्या ओठाला वेगळी शेड लावली जाऊ शकते. गुलाबी आणि लाल रंगाची शेड वापरुन ओठांना बोल्ड डायमेंशन लुक देता येईल.

हेअरस्टाईलची मागणी वाढणार

येणाऱ्या काळात इझ टू कॅरी हेअरस्टाईलची मागणी वाढेल. अशी स्टाईल डिमांडमध्ये असेल, जी कोणत्याही मेहनतीशिवाय सहज करता येईल. केस कलर करण्यावर भर असेल. २०२०च्या हिवाळयात हॉट आणि बोल्ड हेअर कलर शेड्सची चलती असेल. त्यानंतर वसंत ऋतूसोबतच हेअर शेड्सही बदलतील. या ट्रेंडमध्ये तुम्हाला जर जेट ब्लॅक किंवा इंक ब्लॅक कलर करायचा नसेल तर अॅश ग्रे हेअर शेड निवडू शकता. यासाठी केस अशाप्रकारे डाय करा की जे मुळांकडे डार्क असतील आणि जसे वर वाढत जातील तसे लाईट होत जातील. या लुकमुळे तुम्ही सर्वांपेक्षा हटके दिसाल.

चेस्टनट ब्राऊन शेड मेन्टेन ठेवणे फारच सोपे आहे आणि हे हटके लुक देते. यासाठी यात स्लीक गोल्डन हायलाइटही चांगले दिसू शकते. हादेखील २०२० मध्ये पसंतीस उतरणारा रंग असेल.

जर तुम्ही ट्रेंडनुसार एखाद्या कुल रंगाचा हेअरकलर शेड ट्राय करू इच्छित असाल तर केसांवर ब्लोंड हेअर कलरही लावू शकता. यामुळे तुम्हाला नवा लुक मिळेल. चॉकलेट रोज गोल्ड हायलायटिंग महिलांची पहिली पसंती असते. येत्या वर्षातही तुम्ही हे ट्राय करू शकता. केसांच्या टोकांना गुलाबी आणि तपकिरी टोनचा टचअप देऊन वर्षभर ट्रेंड करा.

अॅक्सेसरीज म्हणून केसांमध्ये फुले, ऑर्किड, गुलाब, कमळ वापरले जातील. बहुसंख्य हेअरस्टाईलवर व्हिक्टोरियन लुकचा प्रभाव पाहायला मिळेल, जिथे हेड गियरचा जास्त वापर असेल. ऐंजेलिक लुकवरही भर असेल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...