– सुमन बाजपेयी

‘‘बिचारी ३५ वर्षांची झाली. पण अजून सिंगल आहे.’’

‘‘दिसायला तर सुंदर आहे. मोठी अधिकारी आहे. काय माहीत अजून लग्न का नाही झालं?’’

सोमा आपल्या सोसायटीत शिरताच हे शब्द तिच्या कानावर पडले. खरंतर या गप्पा तिच्यासाठी नवीन नव्हत्या. तिला आता याची सवय झाली होती. पण तरीही कधीकधी तिला या गोष्टींचा त्रास व्हायचा. लोक तिच्या आयुष्यात हस्तक्षेप का करतात? तिला तिचं आयुष्य शांततेने जगू का देत नाहीत? तिच्या प्रत्येक हालाचालीवर लक्ष ठेवलं जातं. जसं काही सिंगल असणं हा गुन्हाच आहे. तिने स्वत:हून असं

आयुष्य निवडलं असेल तर समाजाला याचा त्रास का होतो? तिचं तर सगळं छान चाललंय.

आपल्या मोठ्या बहिणीचं फसलेलं लग्न पाहूनच सोमाने एकटं राहण्याचा निर्णय घेतला. किती बंधनं आहेत तिच्यावर. कोणतंही काम ती आपल्या पतीच्या परवानगीशिवाय करू शकत नाही. सोमाने रीनाला निरखून पाहिलं. पस्तीशीतही ती साठीतली दिसत होती.

सोमासारख्या सिंगल विमेन आजकाल कमी नाहीत. कारण त्या आपल्या मर्जीने लग्न न करण्याचा निर्णय घेत आहेत. त्यांना त्यांच्या पद्धतीने आयुष्य जगायचं आहे. मग एखादवेळेस लग्न नाही जरी झालं तरी एकटयाने आनंदात जगता येतं. पण जगण्याची पद्धत माहीत असायला हवी.

सोमा म्हणते, ‘‘लग्न झालंच पाहिजे असं काही नाही. काहीवेळा असं होतं की इच्छा असूनही योग्य जोडीदार न मिळाल्याने तुम्ही लग्न करू शकत नाही. कोणी आवडलंच तरी त्या व्यक्तिसोबत संपूर्ण आयुष्य काढता येण्याची खात्री नसते. माझ्यासोबतही

असंच काहीसं झालं. हे खरं आहे की प्रेम हा एक सुंदर अनुभव आहे. पण तुम्हाला कोणी जोडीदार मिळाला नाही तर त्याचा अर्थ असा नसतो की तुम्ही सुखी नाही. फक्त समाजाला तसं वाटत असतं. तुम्ही सिंगल असाल तर तुमचं आयुष्य अपूर्ण आहे असं मानणं चुकीचं आहे. लग्न म्हणजेच सर्वस्व नाही. आयुष्यात अनेक शक्यता असतात. फक्त त्या शोधणं आणि त्यांचा योग्य वापर करणं जमलं पाहिजे.’’

तुमचे मित्र, नातेवाईक, आईवडिल, भावंडं आणि समान यांना कायम असं वाटतं की तुम्ही सिंगल आहात म्हणजे तुम्ही दु:खी आहात. त्यामुळे ते तुम्हाला सेटल होण्याचा सल्ला देतात. तुम्हाला लग्न करायचं नसेल किंवा तुमच्या एकटं राहण्याचं कारण काहीही असलं तरीही तुम्ही हेच मानून चाला की तुम्ही एकट्यानेही खूश राहू शकता. एकटं राहण्याचा निर्णय तेव्हाच घ्या, जेव्हा तुमच्या मनाची पूर्ण तयारी असेल.

बंधनमुक्त होण्याचा आनंद लुटा : लग्न झालं म्हणजे तुम्ही सुखीच राहाल असं काही नाही. जबाबदाऱ्यांसोबत अडचणीही आपोआप येतात. सिंगल असाल तर ना

कोणती जबाबदारी, ना कसली कमिटमेंट. मग आयुष्य साजरं करा. एखाद्या कपलला हातात हात घालून बसलेलं पाहून नाराज होऊ नका. स्वत:साठी जगा आणि मोकळा श्वास घ्या. सिंगल स्टेटसचा त्रास करून घेण्यापेक्षा तुमच्यावर कोणंतंही बंधन नाही याचा आनंद माना, तुम्ही कधीही कुठेही येऊजाऊ शकता. यासाठी फक्त स्वत:मध्ये आत्मविश्वास बाळगा आणि लोकांचं बोलणं ऐकून दु:खी होणं किंवा काही प्रतिक्रिया देणं बंद करा.

स्वत:ला वेळ द्या : तुम्हाला स्वत:साठी खूप वेळ मिळेल. विवाहित स्त्रियांच्या मनात जी अपराधीपणाची भावना असते, ती तुमच्या मनात नसेल. नवरा, मुलं, घर-कुटुंब यामुळे महिलांना स्वत:साठी वेळच मिळत नाही. पण सिंगल असण्याचा फायदा हा आहे की तुम्ही स्वत:ला वेळ देऊ शकता. सजा, फिरा आणि आवडतं गाणं ऐका वा पुस्तक वाचा. कोणी अडवणार नाही. शिवाय एकटेपणाची भावना मनात डोकावणारही नाही. स्वत:ची ओळख करून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि स्वत:ला घडवता येतं. कोणती आशा-अपेक्षा नसल्याने विरोधाभास, हेवा यांना स्थान नसते.

सोशल व्हा : स्वत:चं सोशल सर्कल बनवा. हे आवश्यक आहे कारण कंटाळा आला की पार्टीला किंवा रेस्टॉरन्टमध्ये जाता येईल. कितीही सोशल झालात तरी कोणावरही अवलंबून राहू नका की कोणी सोबत आलं तरच सिनेमा बघायला जाल किंवा लंचला जाल. कोणाच्या सोबतीची कशासाठी अपेक्षा ठेवायची? पण तरीही आपला आवाका कशासाठी वाढवत राहा. जेणेकरून गरजेच्यावेळी नि:संकोचपणे मदत मागता येईल.

संपूर्ण लक्ष करिअरवर द्या : सिंगल असाल तर करिअरवर व्यवस्थित लक्ष देऊ शकता. मेट्रो सिटीमधल्या मुली करिअर करण्यासाठी आणि महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी एकटं राहणंच पसंत करतात.

एका एमएनसीमध्ये काम करणारी ३७ वर्षीय अनुभा सांगते, ‘‘मी ठरवून लग्न केलं नाही. मी सुरूवातीपासूनच माझ्या करिअरबाबत आग्रही होते आणि मला माहीत होतं की लग्नानंतर तडजोड करावी लागेल. कदाचित नोकरी सोडावी लागेल. मधे ब्रेक घेतल्याने करिअर ग्राफवर परिणाम होतो आणि प्रत्येकवेळी नव्याने सुरूवात

करावी लागते. आधीची मेहनत वाया जाते. त्यामुळे मी माझं सगळं लक्ष करिअरवर केंद्रित केलं आणि आज मी यशस्वी आहे. माझ्या या यशाचा मी संपूर्ण आनंद घेते.’’

सिंगल वूमन करिअरमध्ये जास्त यशस्वी असतात हे आता सिद्ध झालं आहे आणि आजकाल खासगी कंपन्या त्यांनाच प्राधान्य देत आहेत. कारण त्या कामासाठी जास्त वेळ देतात आणि जास्त फोकस्ड असतात. त्या मन लावून काम करतात.

छंद जोपासा : सिंगल असाल तर संपूर्ण वेळ तुमचा असतो आणि यामध्ये तुम्ही तुमचे छंद जोपासू शकता. बागकाम करा, बाइक चालवा किंवा गेम्सखेळा. तुम्ही हवं ते करू शकता, कोणाच्याही हस्तक्षेपाविना. कोणी असं म्हणणार नाही की हे काय वय आहे का हे सगळं करायचं? पेंटिंग करा किंवा एखादा कोर्स करा. तुम्ही एखादा तरी छंद जोपासू शकाल. स्वत:ला नवनव्या गोष्टींबद्दल अपडेट ठेवा.

आपल्या मनाचं ऐका : सायकलिंग टे्रकिंग करा. वीकेंडला लाँग राइड्सवर जा किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा. आनंदी आणि समाधानी आयुष्य जगणं

हेच तुमचं ध्येय असायला हवं. तुम्हाला लोकांनाही हेच दाखवायचं आहे की सिंगल असूनही तुम्ही किती खूश आहात.

सोलो ट्रिपवर जा : फिरायला कोणाला नाही आवडत? कोणी अडवलंय तुम्हाला? निघा, आपल्या आवडत्या ठिकाणी, तुम्हाला हवं तसं ट्रेकिंग करायला किंवा एखाद्या रिसॉर्टमध्ये आराम करायला. खरंच तुम्हाला मजा येईल. हे नक्की करू, ते नक्की करू, अशी कसलीच किटकिट नाही. म्युझिक फेस्टिव्हलला जा किंवा नाटक पाहा. कोणीही अडवणार नाही. विवाहित महिला हे सगळं करण्याचा विचारही करू शकत नाहीत.

खरेदी करा : तुम्ही कमवत असाल तर स्वत:वर खर्च करा. स्वत:च्या पैशांनी खरेदी करण्याची मजाच वेगळी असते. स्वत:वर पैसे खर्च करताना कोणता अपराध भाव मनात नसेल, जे हवं ते खरेदी करू शकता आणि काही खरेदी करण्यासाठी कोणाचाही दबाव नसेल. जे आवडेल ते खरेदी करण्याची मोकळीक असेल. सतत इतर कुणाची तरी किंवा नवऱ्याची परवानगी घेण्यापेक्षा आपल्या मर्जीनुसार खा-प्या आणि मजा करा.

तडजोड नको : तुम्हाला कोणासाठीही आपल्या आनंदात तडजोड करावी लागणार नाही, लोक तुम्हाला स्वार्थी म्हणू शकतात. पण यात वाईट काय आहे. थोडं स्वार्थी असण्याचीही गरज आहे. कारण आयुष्य तडजोडीच्या चक्रात अडकते तेव्हा सुख कमी  दु:खच जास्त जाणवते. कुढत जगण्याचा काय फायदा? स्वत: निर्णय घ्या. अखेरीस तुमचा आनंद दुसऱ्यावर अवलंबून का असावा? आयुष्य मोकळेपणाने जगा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...