– सोमा घोष

उत्सवाचा काळ जवळ आला की महिला आपला चेहरा आणि स्किनचा ग्लो याबाबत सतर्क होतात, पण या मोसमात त्वचेला ताजेतवाने ठेवणे हे आव्हानात्मक असते. योग्य आहार आणि दिनचर्येमुळे हे शक्य होऊ शकते. याविषयी क्यूटिस स्किन स्टुडिओच्या तज्ज्ञ डॉक्टर अप्रतिम गोयल सांगतात की या मोसमात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते, ज्यामुळे मेकअप चेहऱ्यावर खुलून दिसेल. खालील टीप्स आजमावल्यास योग्य मेकअप केला जाऊ शकतो.

शरीरातून निघालेले टॉक्सिन्स आणि वातावरणातील प्रदूषणामुळे यामुळे त्वचा

निस्तेज होऊन जाते. अशात फक्त फेस वॉश याला नवचैतन्य देऊ शकत नाही. यासाठी पाण्यात भिजवलेले ओट्स आणि मूग डाळ यांनी दिवसातून एकदा चेहऱ्याचे स्क्रबिंग जरूर करा.

मेकअप रिमूव्हर

मेकअप योग्य प्रकारे चेहऱ्यावरून हटवणे अतिशय आवश्यक असते. यासाठी ऑइल, क्रीम किंवा फेस वॉश पुरेसा नाही, कारण यामुळे चेहऱ्याची आर्द्रता कमी होऊन त्वचा रुक्ष होते. यासाठी ड्राय कॉटन बॉलवर मिस्लर वॉटर घेऊन त्वचेच्या छिद्रांमध्ये असलेले मेकअपचे छोटे छोटे पार्टिकल्स चांगल्याप्रकारे साफ करावेत.

मॉइश्चराइजिंग

वेगवेगळया त्वचेसाठी वेगवेगळया मॉश्चराइझरची गरज भासते. म्हणजे ड्राय स्किनसाठी क्रीम, नॉर्मल स्किनसाठी लोशन आणि ऑइली त्वचेसाठी जेल वापरणे योग्य असते. आपली त्वचा कोणत्याही प्रकारची असो, रात्री झोपण्यापूर्वी मॉश्चराइझर जरूर लावावे.

मास्क

या ऋतूत चेहऱ्यावर फ्रुट मास्क लावल्याने खूप छान रिझल्ट मिळतो. पपई आणि केळयाचा मास्क त्वचेवरील प्रदूषण काढून ग्लो आणतो. ऑइली स्किनसाठी मुलतानी आणि क्लेचा पॅक योग्य असतो. याशिवाय मल्टीस्टेप फेशिअल मास्क आणि शीट मास्क यामुळेही त्वचेवर उभारी येते.

प्रोटेक्शन

सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे चेहऱ्याला उन्हापासून वाचवणे. घरातून बाहेर पडताना त्वचेचे धूळ आणि माती यांपासून संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन मॉइश्चराइझर, कॉम्पक्ट पावडर आणि फाउंडेशनचा जरूर वापर करा. याशिवाय फटाके फोडण्याआधी बॅरियर क्रीम लावायला विसरू नका.

सणावारी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे वर्कआउट, फिरणे, जिमला जाणे हे आधीपासूनच सुरू ठेवायला हवे. म्हणजे सणाच्या धावपळीनंतरही तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि तुमची त्वचाही तजेलदार राहील. स्वत:ला हायड्रेट करण्यासाठी पाणी आणि लिक्विड पदार्थांचे जास्त सेवन करावे.

स्किनवर वॉटर बेस्ड मॉइश्चराइझर लावावे, त्याचबरोबर ज्यांना डार्क सर्कल्स आहेत, त्यांनी व्हिटॅमिन सी असलेल्या सीरमने डोळयांच्या खाली हलक्या हाताने ३-५ मिनिटे मसाज करावा. काकडी आणि बटाटयाचे काप डोळयांखालील डार्क सर्कल्सवर ठेवल्याने पफीनेस आणि काळसरपणा कमी होतो.

मेकअप टीप्स

अप्रतिम सांगतात की जवळजवळ प्रत्येक महिलेला मेकअप करता येतोच, पण तो आकर्षक करण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते, जेणेकरून तुम्ही सर्वांपेक्षा हटके आणि सुंदर दिसाल :

* आपल्या स्किन टोननुसार योग्य मेकअप निवडणे सोपे नसते. याबाबतीत थोडे प्रयोगशील राहावे लागते, कारण कोणीही तुमच्या स्किन टोनसाठी योग्य उत्पादन कोणते हे सांगू शकत नाही. तुम्हाला जो ब्रँड आवडतो त्याचे अनेक शेड्स घेऊन ते चेहऱ्यावर लावून योग्य उत्पादन निवडा.

* मेकअपच्या आधी त्वचेला जरूर मॉइश्चराइझ करा.

* मेकअपच्या आधी प्रायमर बेसच्या रूपात लावा. यात इस्टाफिल जेल भरपूर असते, जे काही वेळाकरता तुमच्या चेहऱ्याची रोमछिद्रे बंद करते. ज्यामुळे मेकअप एकसारखा त्वचेवर बसतो आणि स्किनला सुरक्षाही मिळते.

* हल्ली बाजारात अनेक प्रकारचे कंसीलर उपलब्ध असतात. ग्रीन कलरचा कंसीलर चेहऱ्यावरील पातळ कोशिकांना लपवण्यासाठी कामी येतो, तर ब्राउन कलरचा कंसीलर ब्राउन पिगमेंटेशन आणि वांग यांना लपवतो. तर नॉर्मल स्किन कंसीलर डोळयांभोवतीचे डार्क सर्कल्स लपवतो. ऑइली स्किन करता मॅट फिनिश कंसीलर चांगला असतो.

* फाउंडेशनने चेहऱ्याचे कंटूरिंग करणे हाही एक चांगला मेकअप ट्रेंड आहे. यात ३ वेगवेगळया प्रकारच्या फाउंडेशन स्टिक्स मिसळून एका स्टिकमध्ये केले जाते.    ज्यात १ स्टिक ही स्किन टोननुसार असून २ स्टिक्स स्किन टोनपेक्षा २     शेड्स गडद लावल्याने एक वेगळा कलर मिळतो, जो कंटूरिंगसाठी चांगला पर्याय असतो.

* स्टिक आयशॅडोचा वापर डोळयांसाठी करा. हा चेहऱ्यावर सहज लावता येतो आणि याला कलर आयपेन्सिलच्या रूपातही वापरू शकता.

* काजळ आणि स्मज ब्रशचासुद्धा डोळयांसाठी वापर करा. स्मोकी लुकसाठी आयलॅशेसच्या खाली वर सजवा.

* लुकला नवेपण देण्यासाठी गालांवर फेस टींट लावा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...