* गरिमा पंकज

सुंदर दिसण्यासाठी आकर्षक वेशभूषा आणि मोहक अदांसोबतच केस स्टायलिश आणि निरोगी दिसणेही गरजेचे आहे. दिल्ली प्रेसमध्ये आयोजित फेबच्या कार्यक्रमात हेअर आणि केमिकल आर्टिस्ट नाजिम अली यांनी अॅडव्हान्स हेअर कटिंग, थ्री डी हायलायटिंग, केरोटिन स्मूथनिंग ट्रीटमेंट, टेंपररी रोलर सेटिंग आदींबाबत सविस्तर माहिती दिली.

दिल्लीस्थित गांधी नगरातील ‘साहिबसाहिबा ब्यूटी सलून’चे मालक नाजिम अली यांनी भारतात पहिल्यांदा फायर हेअरकट लोकप्रिय केला. फायर हेअरकट एक नवीन ट्रेंड आहे जो मुले आणि तरुणाईला आकर्षित करतो. यात वॅक्सशिवाय जेल, स्प्रेद्वारे केसांना फंकी लुक दिला जातो.

अॅडव्हान्स हेअरकट

अॅडव्हान्स हेअरकट अनेक प्रकारचे असतात. जसे की डायमंड कट, लाँग हेअरकट, ग्रॅज्युएशन कट इत्यादी. यात कानापासून कानापर्यंत केसांचे चार भाग करून त्यांना मल्टिलेअर दिले जातात. त्यानंतर टेक्स्चरायजिंग केले जाते. यामुळे पातळ केसही भारदस्त दिसू लागतात आणि बाऊन्सी होतात.

थ्री डी हायलायटिंग

यात सर्वप्रथम केसांना प्रीलाईट करतात. त्यानंतर त्यात थ्री डी (लाल, हिरवा, निळा असे तीन वेगवेगळे रंग) घेऊन हायलायटिंग केले जाते. यामुळे केस स्टायलिश आणि आकर्षक दिसू लागतात.

केरॅटिन स्मूदिंग ट्रीटमेंट

या उपचार पद्धतीत सर्वात आधी केसांना शाम्पू करतात. त्यानंतर केस ८० टक्यांपर्यंत सुकवतात. मग केसांवर सेक्शन टू सेक्शन ट्रीटमेंट अप्लाय करून ४५ मिनिटे केस तसेच ठेवतात. त्यानंतर १०० टक्के ब्लो ड्राय केले जाते. मग फाईनफाईन म्हणजे केसांचे बारीक बारीक सेक्शन घेऊन आयरनिंग केले जाते. त्यानंतर ग्राहकाला दोन दिवसांनी बोलावून शाम्पू करून कंडिशनर आणि मास्क लावले जाते. त्यानंतर कोल्ड ड्रायरने सुकवून सीरम लावतात. हे केसांना ३० टक्क्यांपर्यंत स्ट्रेट करते, तसेच केस रिपेअर करण्याचेही काम करते.

खबरदारी : एखाद्या चांगल्या कंपनीचा शाम्पू आणि कंडिशनरचाच वापर करा, जेणेकरून दीर्घकाळपर्यंत केस सरळ ठेवता येतील.

ओलाफ्लेक्स

यात कलर रिबॉण्डिंग केलेल्या केसांना ट्रीटमेंट देऊन त्यांना मुलायम आणि सिल्की बनवले जाते.

टेंपररी रोलर सेटिंग

सर्वात आधी केसांना हेअर स्प्रे करतात. त्यानंतर त्याचे सेक्शननुसार रोलर लावतात. यामुळे सरळ केस कुरळे आणि जाडसर दिसू लागतात.

थ्री डी बेबी लाँग ब्रँड हेयरडू

या हेअरस्टाइलची सुरुवात पुढे पफ काढून केली जाते. त्यानंतर केसांमधून थ्री डी लेयर काढून काही केस फ्रंट स्टायलिंगसाठी वापरले जातात. मागील उरलेल्या केसांमधून एक एक करून लेयर काढून त्याला कर्व म्हणजे वक्राकार आकार देतात. ते एकावर एक अशाप्रकारे सजवून तुम्ही आकर्षक हेयरडू बनवू शकता.

शेवटी तुमच्या आवडीची हेअर अॅक्सेसरीज किंवा हेअर ज्वेलरी वापरून तुम्ही त्याला अधिकच सुंदर बनवू शकता. कर्वच्या मधोमध रिकाम्या ठिकाणी अॅक्सेसरीज लावून ते अधिक मनमोहक बनवू शकता.

पॅटर्न हाय बन विथ रोजेस

सर्वप्रथम केसांच्या मध्यभागापासून दोन भाग करून पुढचे केस सोडून देतात. नंतर मागील भागातील केस डोक्यावर घेऊन उंच पोनी बांधतात. त्या पोनीचे चार भाग करून एक क्रॉस म्हणजे फुल्लीचा आकार देतात. त्यानंतर त्या पोनीवर एक मोठा डोनट आणि एक छोटा डोनट बनवून पिनअप करतात. त्यानंतर चार भागातील एक भाग घेऊन रोज म्हणजे गुलाबाचा आकार तयार करतात. त्यानंतर त्यात एक कर्व म्हणजे वक्राकार वळण घेऊन यू आकार देतात आणि त्या भागाला रोजखाली घेऊन जातात. हीच पद्धत उर्वरित तीन भागांसाठी वापरतात.

पुढच्या केसांचे काटयाच्या मदतीने तीन भाग घेऊन थ्री डी लेअरिंग काढून क्लिपच्या मदतीने त्याला आकार देतात. अशाप्रकारे तुम्हाला मिळतो मनाजोगता हेअरडू.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...