* आश्मीन मुंजाल

केस सुंदर असतील, चेहऱ्याच्या आकारानुसार कापलेले असतील तर पर्सनॅलिटीचे सौंदर्य दुपट्टीने वाढते. पण केस सुंदर, सुटसुटीत दिसावेत यासाठी कोणत्या टीप्स आजमाव्यात या जाणून घेऊ या :

हेअर सिरम

केसांना सुटसुटीत ठेवण्यासाठी तेलाच्या ऐवजी हेअर सिरम लावावे. हे कमी तेलकट असते, ज्यामुळे केस सुटसुटीत वाटतात. कोरड्या, रूक्ष आणि खराब केसांसाठी हेअर सिरम एका जादूच्या छडीसारखे आहे. हेअर सिरममध्ये सिलिकॉन असते, जे केसांत मिसळून त्यांना चमकदार बनविते. तसेच हे लावल्याने सूर्याची युवी किरणे, प्रदूषण आणि वातावरणातील आद्रता केसांवर कुठलाही वाईट प्रभाव करू शकत नाही.

हेअर सिरम लावल्यामुळे केस मोकळे आणि निरोगी दिसतात. हेअर सिरमला केसांच्या लांबीनुसार कव्हर करून लावले पाहिजे. याला केसांच्या मुळाशी लावले जात नाही नाहीतर केस ऑयली होऊन जातात. चांगला परिणाम मिळण्यासाठी सिरम ओल्या केसांमध्येच लावले पाहिजे.

ड्राय शँपू

जर आपण आपले ब्लो आऊट किंवा आयर्निंग जास्त वेळेपर्यंत चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत आहात तर अशा स्थितीत ड्राय शँपूचा उपयोग करणे फायदेशीर ठरेल. ड्राय शँपू केस आणि स्कॅल्पमधून चिकटपणा आणि ऑईल शोषून घेतो, ज्यामुळे असे वाटते की आपण केस आताच धुतले आहेत. परंतु लक्षात ठेवा की ड्राय शँपू पाण्यावाचून केस धुण्याचा ऑप्शन नाही आहे, तर केस धुण्याचा वेळ वाचवण्यासाठी किंवा जेव्हा आपण घाईत असाल फक्त तेव्हाच याचा उपयोग करा.

ड्राय शँपूचा सगळयात मोठा फायदा हा आहे की पाण्याने केस न धुतासुद्धा आपण स्वच्छ आणि सुगंधित केस प्राप्त करू शकता. याशिवाय ड्राय शँपूचा उपयोग केल्यानंतर केसांना चांगला वॉल्युम मिळतो. ज्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची हेअरस्टाईल कॅरी करू शकता. ड्राय शँपू स्प्रे केल्यानंतर केसांत सफेद पावडर राहून जाते. पण आपल्या बोटांनी विंचरल्यावर तीही निघून जाते आणि आपल्याला मिळतात निरोगी दिसणारे केस तेही केवळ थोडयाच मिनिटांतच.

फ्लफी इफेक्टसाठी केसांना शँपू केल्यानंतर कंडिशनर लावावे. जेव्हा हलकेसे सुकुन जातील तेव्हा मुळापासून डोक्यापर्यंत मूस लावावे. पेडल ब्रशच्या सहाय्याने ब्लो ड्राय करा. आता एक राउंड थर्मो ब्रिसल ब्रशने हळू-हळू केसांना स्ट्रेट करा. स्टाइलिंग स्प्रे टाका. नंतर छोटया-छोटया सेक्शनमध्ये विभागून सेल्फ होल्डिंग थर्मो रोलर्स लावावे. हीट देऊन १० मिनिटापर्यंत सेट करा. रोलर्स हटवून ब्रशने हलक्या हाताने वोल्युम देत केसांना सेट करा. दुरून शाईन स्प्रे करा.

फिनिशिंग टचसाठी

घरातून बाहेर जाताना आपल्या डोक्याला फ्लिप करा आणि केसांना चांगल्याप्रकारे हलवा. यामुळे भरल्या-भरल्यासारखे वाटतात. यानंतर केसांमध्ये हेअर स्प्रे करा. ओल्या ऋतूत हेअर जेलचा वापर करू नका, कारण हे क्रिमी असते. या उत्पादनाचा वापर केल्यावर आपला लूक असा दिसेल जसे आपण नुकतेच केसांमध्ये ऑईल मसाज केला आहे.

हेअर स्टाईल कशी ठेवावी

केसांना मॅनेज करणेसुद्धा एक मॅनेजमेंट आहे. चिकट हवामानात आपले केस मोकळे सुटसुटीत राहावेत म्हणून आपल्या पर्सनॅलिटीत हेअरस्टाइलची मोठी भूमिका आहे. परंतु थोडया महिलाच आहेत, ज्या हेअरस्टाईलची काळजी घेतात. जर हेअरस्टाईलला प्रसंगाच्या हिशोबाने बदलले गेले तर आपण फुलासारख्या टवटवीत आणि नवीन दिसाल.
सर्वप्रथम परफेक्ट हेअरकटच्याद्वारे आपण आपल्या पर्सनॅलिटीमध्ये सहजपणे व्हिजिबल चेंज आणू शकता. यासाठी आपण गरजेपेक्षा जास्त तेल लावून कसून बांधलेल्या अंबाडा किंवा वेणीपासून सुटका मिळवत आपल्या फेसकट आणि प्रोफेशननुसार हेअर कट करवून त्यात ग्रे हेअरला लपवण्यासाठी सिंपल ब्लॅक व ब्राऊन कलरच्या जागी रिच कलर हायलाइटिंगचा उपयोग करा.

केसांना नेहमी मोकळे ठेवल्याने ते खराब होऊ शकतात. यासाठी वेगवेगळी हेअरस्टाईल बनवून केसांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण पोनीटेल किंवा फ्रेंच वेणी ट्राय करू शकता, जी बघण्यास खूप ट्रेंडी वाटते. याशिवाय केसांना अंशत: बांधून बाकी केसांना मोकळे सोडले जाऊ शकते.

लूप्ड पोनीटेल

आपण केसांमध्ये पोनीटेलचा ऑप्शनही चूज करू शकता. ही स्टाईल पोनीटेलला फोल्ड करून बनवली जाते. ही पाठीमागून एक लो बनसारखी दिसते, मात्र वास्तविक पोनीटेल असते. आपण टंबल्ड टेलही बनवू शकता. ही एक फिश प्लेटवाला लूक देईल. ही बनवण्यासाठी सोपी आहे.

केसांची साइड पार्टींग

जर आपले केस पातळ आहेत, तर साइड पार्टींग करून त्यांना बाउंसी लुक दिला जाऊ शकतो किंवा मग सगळया केसांना एका बाजूला करून घ्या. यामुळे केसांचा वॉल्युमही जास्त वाटू लागतो.

केसांमध्ये चांगल्या वेव्ससाठी

काही वेगळे ट्राय करू पाहताय तर मग स्विमिंग वेव्स बनवू शकता. यासाठी सर्वप्रथम केसांवर लाइटली स्टायलिंग क्रीम लावावी. यात साइडने पार्टींग काढून थ्री किंवा फोर फ्लिक्सला कर्ल करा. यांना फेसच्या एका बाजूला सेट करा. इतर शिल्लक केसांचे स्मॉल लो बन बनवा.

केसांना सुंदर लूक देण्याचे जलद उपाय तेव्हा अवलंबा जेव्हा वेळेची कमतरता असेल, कारण केसांची सुंदरता बनवून ठेवण्याचा कोणताही शॉर्टकट नाहीए.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...