* शशि बाला

लग्नानंतर प्रत्येक मुलीला एकच काळजी असते ती म्हणजे जेवण बनवताना अशी काही गडबड व्हायला नको ज्यामुळे सासरकडील मंडळी नाराज होतील.

या टीप्स तुमची काळजी दूर करण्यासाठी खूपच उपयोगी पडतील :

* दही पातळ झाले असेल तर त्यात पाण्याऐवजी दूध मिसळावे.

* तव्यावर हलकेच भाजून मग कसुरी मेथीचा वापर करावा.

* घरी पनीर बनवले असल्यास उरलेले पाणी मठरी, भटूरे, नान यांचे पीठ  मळण्यासाठी वापरावे.

* कोफ्ते बनवताना सुकं आलुबुखारा फळ किंवा चिंच घालून रोल करावा.

* लोणच्याचा मसाला चाळणीने चाळून घ्यावा. मसाल्यात चवीनुसार मीठ घालून हिरव्या मिरचीत भरून जेवणासोबत वाढावे.

* ज्या तव्यावर डोसा बनवायचा असेल त्यावर रात्रीच तेल लावून ठेवावं. डोसा चिकटणार नाही.

* पराठ्याच्या प्रत्येक बाजूवर तूप लावून कोरडं पीठ भुरभुरावं.

* खीर जास्त पातळ झाली असेल तर थोडी कस्टर्ड पावडर मिसळावी.

* तंदूरी रोट्या उरल्या असतील तर तव्यावर तूप लावून भाजून घ्या. पराठ्यांसारख्या लागतील.

* राजमा, चवळीच्या शेंगा, काळे चणे, छोले हे जर एक वाटी बनवत असाल तर त्यात १ वाटी टोमॅटो प्यूरी घाला, ग्रेव्ही छान बनेल.

* भाजीत जर कच्चे पनीर घालणार असाल तर हळद घातलेल्या पाण्यात भिजवून वापरावेत.

* राजमा उकडून पाणी गाळून घ्यावे. मसाले परतून राजमा घालून ५ मिनिटं परतावे. मसाला चांगला मुरेल. मग उरलेले पाणी घालून शिजवावे.

* पुलावसाठी मीठ टाकून तांदूळ शिजवावेत. भाज्या फ्राय करून घ्या. मिक्स करा. पुलाव मोकळा होईल.

* पीठ मळण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर पीठ भिजून ठेवावे. १५ मिनिटांनंतर तेलाचा किंवा तुपाचा हात घेऊन मळून घ्यावे. २ मिनिटांत पीठ तयार होईल.

* बटाटे वडा, कोबी, पनीरचे भजी बनवताना बेसन पीठात चिमूटभर खाण्याचा सोडा घालावा. यामुळे भजी कुरकुरीत होतील.

* बटाटे उकडून फ्रिजमध्ये ठेवावेत. मनासारखे आकार कापून सोनेरी रंगावर तळून घ्या. आंबटगोड चटणीसोबत वाढावे.

* पोहे पाण्यात भिजवावेत. दूध उकळल्यानंतर त्यात पोहे, साखर व सुकेमेवे घालावेत. झटपट खीर तयार होईल.

* गोड चटणीत कृत्रिम रंग न टाकता थोडी बेडगी मिरची घालावी.

* डिंकाची पावडर बनवून घ्या. पीठ भाजून झाले की त्यात डिंक घालून मिसळून घ्या. डिंक रव्यासारखा फुलून येईल. वाटलेली साखर मिसळून लाडू वळून घ्या.

* गुळाचा काही पदार्थ बनवणार असाल तर आधी थोड्या पाण्यात मिसळून गरम करावा. त्यात काही कचरा असेल तर तो तळात बसेल. मग गाळून घेऊन वापरावा.

* कपड्यांवर जर तेल वगैरे सांडलं तर पटकन् त्यावर पीठ, मैदा, टाल्कम पावडर वगैरे टाकावी. काही वेळाने ब्रशने स्वच्छ करून साबणाने धुवून घ्यावे.

* गॅस शेगडीवर तेलाचा चिकटपणा साचला असेल तर त्यावर खाण्याचा सोडा पसरावा व चोळून स्वच्छ करून घ्यावा.

* स्वयंपाक घरातील काम आटोपले की ओल्या हातांवर पीठ किंवा बेसनपीठ रगडावे. सर्व मळ निघून जाईल.

* गोड चटणी बनवली की त्यात चिमूटभर मीठ टाकावे. चटपटीत चटणी बनवली की अर्धा चमचा साखर घालावी.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...