* गरिमा पंकज

२०२० हे भारतासह संपूर्ण जगासाठी अतिशय भयावह वर्षाच्या रूपात सरत आहे. अर्थव्यवस्था कोसळल्या आहेत. कोरोना कहरात मृत्यूच्या आकडेवारीत वाढ होत आहे आणि त्याबरोबरच आपल्या प्रियजनांबद्दल लोकांची चिंताही वाढत आहे. कोरोना साथीच्या संकटाने समाजात विज्ञान आणि संशोधनाचे महत्त्व सिद्ध केले आहे. आपल्याला विज्ञान या साथीतून बाहेर येण्याची योजना सांगेल, जेव्हा जगात कोरोना विषाणूची लस विकसित केली जाईल. परंतु तोपर्यंत वैज्ञानिक आणि संशोधक हा व्हायरस कोठून आला, तो कसा पसरला आणि कोणत्या प्रकारचे उपचार त्यावर प्रभावी ठरू शकतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

जगात जेव्हा-जेव्हा अशा प्रकारचे धोके येतात, मग भले तो साथीचा रोग असो, भूकंप असो, पर्यावरणीय संकट असो की इतर काही, मनुष्याला विज्ञानाचा आधार असतो. जग विज्ञानाच्या मार्गाने जाते, परंतु अशा प्रकारच्या संकटाच्या परिस्थितीतही बहुतेक भारतीय अंधश्रद्धेचा मार्ग स्वीकारतात. धार्मिक चालीरिती, धार्मिक विधी आणि उपवास यांच्याद्वारे संकट समाप्त करण्यासाठी उपाय शोधतात.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने २००८ मध्ये यंग सायंटिस्ट्स कम्युनिटीची सुरुवात केली होती. आता २०२० मध्ये जगातील १४ देशांतील एकूण २५ तरुण शास्त्रज्ञांचे चेहरे समोर आले आहेत, जे संशोधन व शोधांद्वारे जगाचे रूपडे बदलण्याचे काम करतील. आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की या २५ तरुण शास्त्रज्ञांपैकी १४ महिला आहेत, म्हणजेच जगातील महिला विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात वेगाने पुढे सरकत आहेत, परंतु यामध्ये भारतीय महिला खूपच मागे आहेत.

अंधश्रद्धा आणि भारतीय महिला

भारतीय महिलांविषयी म्हणाल तर हे सर्वश्रृत आहे की भारतीय स्त्रियांना नेहमीच धर्म, ढोंगीपणा आणि अंधश्रद्धा यांच्या बंधनात अडकवण्यात आले. त्यांच्या प्रगत साधणाऱ्या पायांवर नेहमीच धर्माची बंधने घातली गेली. गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ आणि समाजसेविका अनुजा कपूर सांगतात, ‘‘जरा विचार करा, महिलांनी या निर्बंधांमुळे आपले अस्तित्व गमावले नाही काय? स्वत:ला बलात्कार, अपहरण किंवा खुनाचा बळी बनवले नाही का? शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान नाही झाले का? अंधश्रद्धेमुळेच राम रहीम, चिन्मयानंद आणि आसारामसारखे लोक पुढे आले, ज्यांनी महिलांच्या अंधश्रद्धेच्या प्रवृत्तीचा फायदा उचलून आपला बँक बॅलन्स वाढवला आणि त्यांच्या आयुष्याशी खेळले.

बऱ्याच भारतीय महिला फारशा शिक्षित नसतात, म्हणून त्यांची मने फारशी मोकळी नसतात. जरी ती स्त्री शिक्षित असेल, तरीही ती ज्या समाजात राहते, त्या समाजात तिला तिच्या मनाचा आणि ज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याची परवानगी नसते. घरात सासू-सासरे असतात, तिथे शेजारी-पाजारीही असतात. प्रत्येकजण तिच्याशी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवण्याबद्दल बोलतो. प्रत्येकाशी लढण्यास आणि आपला मुद्दा कायम ठेवण्यास तिला इतका वेळ किंवा धैर्य नसते. परिणामी तिला सर्वकाही स्वीकारावे लागते.

तसंही स्त्रिया पटकन फसवणूकीत अडकतात आणि त्यामागील कारण त्यांचे भावनिक होणे आहे. त्यांना मूर्ख बनविणे सोपे आहे. जरी त्या शिकलेल्या असल्या तरीही त्या ढोंगीपणामध्ये लवकर अडकतात. आपण पहा, बाजारपेठा स्त्रियांच्या कपडयांनी आणि दागिन्यांनी सुशोभित मिळतील, परंतु पुरुषांच्या वस्तू कमी प्रमाणात विकल्या जातील. महिला सर्वाधिक हमखास खरेदीदार आहेत. यामागील कारण म्हणजे त्यांच्यामध्ये मोठया प्रमाणात स्विकारभावाची इच्छा असते. कुठे न कुठेतरी दागदागिनेसारख्या वस्तू विकत घेऊन आणि आपला मेकअप करुन त्या सुंदर दिसू इच्छितात. त्यांना वाटते की असे केल्याने त्यांना स्विकारले जाईल. त्या विसरतात की ही स्वीकृतीची भावना कपडयांमधून, शिक्षणाद्वारे किंवा फॅशनमधून नव्हे तर आतून येते. अशाचप्रकारे त्या प्रथा व संस्कार निभावून समाजात आपली मान्यता वाढवू इच्छितात. पण याचा परिणाम खूप वाईट निघतो.

अंधश्रद्धा भीती निर्माण करते

आयुष्य अधिक चांगले कसे जगावे हे आपल्याला समजून घेतले पाहिजे. अंधश्रद्धा आणि त्यातून उद्भवलेल्या भीतीपासून मुक्त कसे व्हावे. आपल्या समाजात अंधश्रद्धेने रूढी-प्रथांच्या माध्यमातून आपली मुळे खोलवर रुजवली आहेत. एक स्त्री आजारी आहे, तिच्या शरीरात त्राण नाही, तरीही तिला भूकेले राहून उपवास करावे लागतात. करवाचौथ ही एक अशी प्रथा आहे, जिच्यानुसार एक स्त्री दिवसभर आपल्या तोंडात अन्नाचा एक दाणाही घेवू शकत नाही. या प्रथेच्या मागे लपलेल्या अंधश्रद्धेने लोकांच्या मनात भीती भरुन टाकली आहे की जर स्त्रीने उपवास तोडला असेल तर तिचे सौभाग्य हिरावेल. अंधश्रद्धेची ही भीती बहुतेक वेळा स्त्रियांच्या जीवनावर भारी पडते. अशा परिस्थितीत हे महत्वाचे आहे की आपण कोणत्याही प्रथेला बुद्धीने समजून घ्यावे. आपण शिक्षणाद्वारे मिळवलेल्या ज्ञानाचेदेखील चिंतन करावे, तरच आपली मेंदूची कवाडं उघडतील आणि आपण या भीतीपासून मुक्त होऊ.

त्याचप्रमाणे कोणत्याही समस्येचे व्यावहारिक निराकरण शोधले पाहिजे. कुटुंबाच्या आनंदासाठी काही सांस्कृतिक प्रथा निभवा. परंतु याच्याशी संबंधित भीतीला मनात थारा देऊ नका. स्वत:च्या मनामध्ये आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करा. नवीन मार्ग शोधा. अशी कोणतीही समस्या नाही, जिचे निराकरण उपलब्ध नाही. हृदयाच्या जाळयात अडकू नका. हृदय आपल्याला अंधविश्वासावर विश्वास ठेवण्यास प्रेरित करते, तर मन योग्य मार्ग दाखवते, शोध करण्याचा आणि रस्ता शोधण्याचा मार्ग दर्शविते. केवळ मनानेच हृदयाला हरवू शकतो. समाजातल्या ज्या गोष्टी योग्य वाटतील, त्याच गोष्टी पाळाव्यात.

उदाहरणासाठी कोव्हिड -१९चे घ्या. यावेळी सकारात्मक विचार ठेवणे महत्वाचे आहे. खबरदारी घ्यावी. पण यामागे वेडे होऊ नये. इच्छाशक्तीने रिकव्हरी सुलभ होते. स्वत:वर विश्वास असावा, अंधश्रद्धा असू नये.

मेंढरांच्या कळपागत आहे अंधश्रद्धा

आपण लोकशाही समाजात राहतो आणि प्रत्येकाला त्याच्या मनातील विचार बोलण्याचा अधिकार आहे. लोक आपल्या या अधिकाराचा फायदा घेतात आणि बोलतात. परंतु हा विचार करित नाहीत की ही गोष्ट संशोधनावर आधारित आहे की नाही. आपण आपला मुद्दा स्टिरिओटाइप करतो. हे सांगायला विसरतो की ही वैज्ञानिक बाब नाही तर आपले विचार किंवा इतर लोकांकडून ऐकलेली गोष्ट आहे. लोकांनी आपले म्हणणे ऐकावे व आपल्याला ज्ञानी समजावे अशी आपली इच्छा असते. आपल्या समाजाची आणि राजकारणाची अशीच परिस्थिती आहे. आज शिक्षित नसलेले अर्ध्याहून अधिक लोक देश चालवत आहेत.

तसेच शिक्षण आपल्याला किती बुद्धिमान बनवते हेदेखील विचार करण्यासारखे आहे. आपण शिकून ज्ञान तर घेतो, परंतु जोपर्यंत आपण ते योग्य अर्थाने ग्रहण करत नाहीत, मनापासून स्वीकारत नाही तोपर्यंत त्याचे महत्त्व नाही.

जोखीम घेऊ इच्छित नाही

जोखीम घेण्यास लोक घाबरतात. त्यांना जोखीम घेण्याची भीती वाटते. अर्थात जिथे भीती आहे, तेथे अंधश्रद्धा आहे. आपण शिक्षित असलात तरीही आपण अंधश्रद्धाळू असू शकता, कारण आपण अशा समाजात राहता, जेथील लोक अंधश्रद्धाळू आहेत. ते तुम्हालाही अंधश्रद्धाळू बनवण्याचा प्रयत्न करतात. आपण आजारी आहात, मूल होत नाही किंवा पतीशी भांडण होत आहे तेव्हा लोकांचे सल्ले मिळू लागतात, ‘त्या बाबांकडे जा आणि जादूटोणा करा,’ ‘सोळा सोमवार उपवास करा,’ ‘मंदिरात ५१ हजार अर्पण करा,’ ‘विधी करा’ इ. लोकांकडे हजारो कथा असतात हे ऐकवायला की समस्या कोठे व कशी दूर झाली किंवा कृपादृष्टी झाली.

अशा परिस्थितीत आपण हे समजून घेणे महत्वाचे आहे की आपण सुशिक्षित आहात तर स्वत:साठी, केवळ स्वत:चा व्यवसाय चालवण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी नाहीत. शिक्षणाचा परिणाम आपल्या विचारसरणीत आणि वागण्यातही दिसून यावा. अंधश्रद्धाळू असल्याने आपण आपल्या व्यक्तिमत्त्वाचे किंवा कुंटुंबाचे नुकसान करीत असल्यास हे चुकीचे आहे. आपले ज्ञान वापरा. डोळे बंद करून ढोंगीपणा आणि जादूटोण्यावर विश्वास ठेवणे निंदनीय आहे. एक अंधश्रद्धाळू व्यक्ति खरंच वेडगळ व्यक्तिमत्त्व बनते, जे फक्त एकाच गोष्टीवर विश्वास ठेवू लागते. म्हणून असे बनणे टाळा.

बाबांच्या ढोंगीपणाची सत्यता ओळखा. लोकांशी बोला, नवीन शोध करा आणि आपली समस्या टाळण्यासाठी मार्ग शोधा. आपल्याकडे कोव्हिडसारख्या समस्या हाताळण्याचे अनेक मार्ग आहेत. आज भारतातदेखील अशा काही स्त्रिया आहेत, ज्या या दिशेने आपले मार्गदर्शन करीत आहेत.

ही लढाई जिंकण्यासाठी भारताच्या या ५ महिला (डॉक्टर, आयएएस, वैज्ञानिक) कोव्हिड -१९ विरुद्ध लढयाचं नेतृत्व करत आहेत आणि आठवडयातून सातही दिवस चोवीस तास काम करीत आहेत.

  1. प्रीती सुदान

आंध्र प्रदेश कॅडरच्या १९८३ बॅचच्या आयएएस अधिकारी सुदान या सहसा रात्री उशिरा आपल्या कार्यालयाबाहेर निघताना दिसून येतात. त्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव आहेत. त्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी, सरकारची धोरणे राबविण्यासाठी सर्व विभागांशी समन्वय साधण्याचे काम करीत आहेत. त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह तयारीच्या नियमित आढाव्यातदेखील सामील आहेत.

2) डॉ निवेदिता गुप्ता

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. निवेदिता गुप्ता देशासाठी उपचार आणि चाचणी प्रोटोकॉल तयार करण्यात व्यस्त आहेत.

3) रेणू स्वरूप

स्वरूप गेल्या ३० वर्षांपासून विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या बायोटेक्नॉलॉजी (डीबीटी) मध्ये कार्यरत आहेत. एप्रिल २०१८ पर्यंत, त्यांना वैज्ञानिक ‘एच’ हे पद मिळाले होते, जे एक कुशल वैज्ञानिक असल्याची ओळख आहे. त्यानंतर त्यांची सेक्रेटरी म्हणून नियुक्ती झाली होती. रेणू आता कोरोना विषाणूची लस विकसित करण्याच्या संशोधनात गुंतली आहे.

4) प्रिया अब्राहम

प्रिया अब्राहम सध्या आयसीएमआरशी संलग्न असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी(एनआयव्ही) पुणेच्या प्रमुख आहेत. कोव्हिड-१९ साठी सुरुवातीला एनआयव्ही हे देशातील एकमेव चाचणी केंद्र होते.

5) बीला राजेश

तामिळनाडूच्या आरोग्य सचिव या नात्याने राज्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राजेश सगळयात अग्रणी राहिल्या. नुकतीच त्यांनी पोस्ट केली की विषाणू कोणालाही प्रभावित करू शकतो. एकमेकांबद्दल संवेदनशील रहा आणि कोव्हिड १९ विरूद्ध एक समन्वित लढा द्या. तसे तामिळनाडू सरकारने अलीकडेच डॉ. बीला राजेश यांना राज्याच्या आरोग्य सचिव पदावरून काढून वाणिज्य कर व नोंदणी विभागाच्या सचिव पदावर नियुक्त केले आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...