– गरिमा पंकज

लग्नसोहळा असो, सणसमारंभ किंवा काही खास प्रसंग, भारतीय घरात खरेदीही तशीच खास असते. सणादिवशी सर्वात हटके आणि खास दिसावे. सर्वांच्या कौतुकाच्या नजरा आपल्यावरच खिळून राहाव्यात असे प्रत्येक महिलेला वाटत असते. परंतु या अतिउत्साहात हे विसरू नका की सणांदरम्यान चांगले दिसण्यासोबतच आरामदायकतेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. कपडे असे असावेत की तुम्ही सर्व धावपळ सहजपणे करू शकाल, प्रथापरंपरा पार पाडू शकाल आणि सुंदर दिसण्यासोबतच उत्सवात उठून दिसाल.

अशावेळी भारतीय पारंपरिक पेहराव करण्यात जो आनंद मिळतो, तो कदाचितच इतर कुठला पेहराव केल्यामुळे मिळू शकेल. तर मग चला, या फेस्टिव्ह सीझनला प्रत्येक प्रथापरंपरा पारंपरिक फॅशनसोबत साजरी करुया.

यासंदर्भात डिझयनर शिल्पी गुप्ता सांगतात की या सीझनमध्ये खूप साऱ्या  पारंपरिक फॅशन उपलब्ध आहेत. पारंपरिक पेहरावाचे कितीतरी उपप्रकार आहेत जसे की, गुजराती पारंपरिक पोषाख, राजपुताना पारंपरिक पोषाख, पंजाबी पारंपरिक पोषाख, मराठी पारंपरिक पोषाख, इस्लामिक पारंपरिक पोषाख इत्यादी.

या टीप्स वापरून तुम्ही सणउत्सवांत पारंपरिक लुकमध्येही परफेक्ट दिसू शकाल:

मिनिमम लुक

सण-उत्सवांत तुम्ही पाहुणचार करण्यात थोडे व्यस्त असता. अशावेळी भारदस्त पेहरावामुळे थकवा येऊ शकतो. म्हणून हलकी प्रिंटेड साडी ही प्रिंटेड श्रगसोबतचा चांगला पर्याय आहे. हा पेहराव तुम्हाला पारंपरिकतेसह मॉर्डन लुकही देईल.

शायनिंग सिल्क

सिल्कमधील पारंपरिक पेहराव खूपच सुंदर दिसतो. अलिकडच्या काळात डिझाइनर, सेलिब्रिटी आणि इतर अनेकांनी सिल्क ड्रेसेसवर लक्ष केंद्रित केले आहे. बनारसी किंवा डाऊन साऊथ स्टाईलने फॅशन जगतात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सिल्कचा ब्लाऊज, घागरा किंवा साडीत तुम्ही पारंपरिक लुक मिळवू शकता.

अनारकली आणि चुडीदारचा क्लासिक कॉम्बो

वलय आणि ग्लॅमर हे अनारकली सूटसाठी दोन शब्द आहेत. हे चुडीदारसोबत घालतात. भरतकाम असो किंवा ब्रोकेड वर्क अथवा इतर कोणताही पॅटर्न, भारतीय पारंपरिक पोशाखांची ही शैली पर्यायांच्या रूपात नंबर वन आहे.

ट्रेडिशन विथ मॉडर्न लुक

बॉलीवूड स्टार आपल्या ट्रेडिशन विथ मॉडर्न लुकच्या पारंपरिक पेहरावाद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. साडी, लेहेंगा किंवा सूट अशा सर्व पोशाखांमध्ये थोडासा मॉडर्न लुक वापरून तुम्ही पारंपरिक पेहरावातही सर्वांपेक्षा वेगळे दिसू शकता.

शॉपक्लूजच्या कॅटेगरी मॅनेजमेंटच्या प्रमुख रितिका तनेजा सांगतात की भारत शेकडो भाषा, संस्कृती, पाककृती आणि उत्सव असलेला एक देश आहे. वर्षभर, देशातील काही भागात एक खास सण साजरा केला जातो, परंतु खास फेस्टिव्ह सीझन प्रत्येक वर्षाच्या अखेरीस सुरू होतो. अशावेळी सुंदर आणि इतरांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी तशाच प्रकारचे कपडे खरेदी करणे हे महिलांसाठी खूप मोठे काम असते.

इन्डोवेस्टर्न फ्यूजन वापरा

फेस्टिव्ह सीझनमधील विविध इव्हेंट्समध्ये रंग भरण्यासाठी इंडोवेस्टर्न फ्यूजन नक्कीच वापरुन पाहा. यावेळी वेस्टर्न लुककडे कमी आणि भारतीय लुकवर अधिक लक्ष केंद्रित करा. म्हणजे तुम्ही तुमच्या लुकला केवळ हलका वेस्टर्न टच द्या. तुम्ही हरम पँटसह अनारकली सूट घालू शकता किंवा त्यासह डेनिम वेस्ट जाकीट घालू शकता.

ब्राईट कलर्ससह आकर्षक लुक
या सीझनमध्ये डल कलरपासून दूर राहा आणि पिवळसर, लाल, गुलाबी इत्यादी उजळ कलर वापरा किंवा या कलरचे मॅचिंग करा. हा असा फेस्टिव्ह सीझन आहे, जिथे तुम्ही रंगांसह बरेच प्रयोग करू शकता.

स्टायलिश स्लिटवाला कुर्ता

स्लिटवाले कुर्ते खूपच आकर्षक असतात. ते अधिक आकर्षक बनवण्यासाठी साइड स्लिट, फ्रंट स्लिट आणि मल्टीपल स्लिटवाले कुर्ते तुम्ही वापरु शकता. तुमच्या संपूर्ण लुकला अधिक आकर्षक टच देण्यासाठी हे तुम्ही स्कर्ट, बेल पँट, प्लाझा किंवा सैल पँटसह सहज घालू शकता.

हेमलाइनचा आनंद घ्या

अनइव्हन, अनमॅच आणि लेयर्ड हेमलाइन्स या सीझनमध्ये खूपच लोकप्रिय आहेत, कारण त्या अधिक आरामदायक आणि आकर्षक लुक देतात. तुम्ही रफल्स आणि मल्टीपल लेसवाल्या कुर्तींचे विविध प्रकार वापरू शकता. तुम्ही ते स्लिम पँट, सैल पँट किंवा स्कर्टसहदेखील घालू शकता. कुटुंबीय आणि मित्रांसह उत्सव साजरा करण्यासाठी हा चांगला लुक आहे.

आकर्षक प्रिंट्स

रेट्रो काळातील प्रिंट डिझाईन्स अतिशय आकर्षक, स्टायलिश आणि क्रिएटिव्ह लुक देतात. फ्लोरल मोटिफ, ब्लॉक प्रिंट्स खूपच ट्रेंडी दिसतात आणि बाहेर जेवायला व खरेदीला जाताना घालण्यासाठी ते उपयुक्त आहेत.

पारंपरिक लुकमध्ये परफेक्ट कसे दिसावे याबद्दल मोंटे कार्लोच्या कार्यकारी संचालिका मोनिका ओसवाल यांच्याकडून जाणून घेऊया :

योग्य फॅब्रिक आहेत सर्वात महत्त्वाचे

पोशाख निवडताना सर्वप्रथम आपण फॅब्रिककडे लक्ष द्यायला हवे. विशेषत: पारंपरिक पेहरावाबाबत फॅब्रिक एक एनहान्सरचे काम करते आणि तुमचे रूप अधिक खुलवते. कल्पना करा, तुम्ही सिल्कची साडी नेसला आहात आणि त्यासोबत जर एक छान ब्रॉकेड ब्लाऊजही असेल तर किती छान दिसेल. जेव्हा पारंपरिक पेहरावांबाबत बोलले जाते, तेव्हा सिल्क हा एक उत्तम पर्याय आहे. तसेही क्लासिक फॅब्रिक जसे की सिल्क, लिनेन, कॉटन, शिफॉन, लेस इत्यादी नेहमीच ट्रेंडमध्ये असतात आणि त्यावरील खर्च एखाद्या गुंतवणुकीसारखा असतो.

फिटिंगलादेखील असते महत्व

फॅब्रिकसह फिटिंगदेखील महत्त्वाची असते, कारण यामुळे पोषाख खुलनू दिसतो. सैल कपडे कितीही चांगले असले तरी ते कधीच खास दिसत नाहीत. खूप घट्ट कपडेदेखील चांगले दिसत नाहीत, कारण अनावश्यक लक्ष वेधण्यासाठी ते परिधान केले असावेत असे वाटते. अशावेळी तुम्ही निप आणि टक करून अगदी सहजपणे आणि कमी वेळात कपडयांची फिटिंग करू शकता किंवा मग टेलरकडून फिटिंग करून घेऊन तुमच्या लूकला परफेक्ट बनवा.

लेअरिंगचा जलवा

कोण म्हणते की लेअरिंग केवळ वेस्टर्न आउटफिटमध्येच चांगले दिसते? पारंपरिक पोषाखातही लेअरिंग तितकेच महत्त्वपूर्ण असते, जे अभिजातपणा वाढवते. तुम्ही सामान्य कुर्तीवर मल्टी ह्यूड जाकीट घातले तर ते खास लुक देईल. साडीवर वेलवेट कॅप घालून तुम्ही आपले फॅशनिस्टाचे स्वप्न साकार करू शकता. याशिवाय एक साधा दुपट्टाही तुमच्या पोशाखात उठाव आणू शकतो. ही लेअरिंग सूज्ञपणे करा आणि मग पाहा की तुम्ही कसे प्रत्येकाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरता ते.

मिक्स अँड मॅच

तुम्हाला बऱ्याचदा असे वाटते की तुमच्याकडे पारंपरिक इव्हेंटसाठी पुरेसे कपडे नाहीत. अशावेळी तुम्ही तुमचा वॉर्डरोब पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की तिथे अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्यांना मिक्स आणि मॅच करून तुम्ही खास प्रसंगासाठी एक उत्तम पोशाख तयार करू शकता. चुडीदारऐवजी प्लाझा ट्राय करा किंवा लाँग कुर्तीसह शिमरी घागरा घालून पेहरावात नाविन्य आणा.

अविस्मरणीय ठरेल स्टेटमेंट

असा एक सर्वसामान्य समज आहे की पारंपरिकता म्हणजे भरपूर दागदागिन्यांचा वापर. नखशिखांत दागिनेच दागिने. पण हे योग्य नाही. जर तुम्ही नववधू नसाल तर दागिन्यांच्या निवडीकडे वेगळया दृष्टीने पाहा. खूप साऱ्या दागिन्यांऐवजी स्टेटमेंट पीस निवडा आणि सोबर लुकसह आकर्षकही दिसा.

फॅशन डिझायनर आशिमा शर्मा यांनी सांगितले की पेस्टल शेड पुन्हा ट्रेंडमध्ये आहेत. या रंगाची क्रेझ सण-उत्सवाच्या काळात तरुणींमध्ये दिसून येते. मजेन्टा किंवा डार्क पिंक या दिवसांमध्ये फ्यूजन वेअर लुकसाठी ट्रेंडमध्ये आहेत. भारतीय महिलांमध्ये फेस्टिव्ह लुकसाठी या मनपसंत शेड्स आहेत.

फेस्टिव्ह लुकसाठी इंडोवेस्टर्न किंवा फ्यूजन वेअरदेखील खूपच ट्रेंडमध्ये आहे. लहंगासाडीही एक उत्तम पर्याय आहे. इंडोवेस्टर्न कुर्ती लुकही फेस्टिव्ह चॉईस म्हणून खूपच लोकप्रिय आहे. अनारकली ट्रेंडदेखील उत्तम फेस्टिव्ह लुक देते.

इंडोवेस्टर्न बेल्टेड साडी नेसूनही तुम्ही सण-उत्सवांदरम्यान सर्वांचे लक्ष वेधू शकता. प्लेटेड स्कर्टसह इंडोवेस्टर्न टॉपही एक स्मार्ट चॉईस आहे.

आजकाल काही महिलांनी जोधपुरी पॅन्टसह शॉर्ट कुर्ती घालणे सुरू केले आहे, जे त्यांना हटके लुक देते. एम्ब्रॉयडरीची प्लेन चिकन कुतीर्देखील आवडता फेस्टिव्ह फॅशन ट्रेंड आहे आणि त्याला सर्व वयोगटांतील महिलांची पसंती मिळत आहे.

या फेस्टिव्ह सीनसाठी ज्वेलरी ट्रेंड

या मोसमात फ्लोरल ज्वेलरी सर्वात लोकप्रिय ट्रेंडिंग ज्वेलरी ट्रेंड आहे. फुलांचे नेकपीस आणि मांगटिकाही जास्त प्रमाणात घातली जात आहेत. स्टेटमेंट नेकपीस आणि इयररिंग्जही फेस्टिव्ह लुकसाठी पसंत केले जात आहेत. मॅचिंग इअररिंग्जसह डायमंड आणि क्रिस्टल ज्वेलरीदेखील फेस्टिव्ह सीझनची पहिली पसंती आहे. व्हाईट गोल्ड ज्वेलरीही ट्रेंडमध्ये आहे. अनेक सेलिब्रिटी ही ज्वेलरी घातलेले दिसतील.

फेस्टिव्ह लूकसाठी मल्टिपल कलर पीसेसऐवजी सिंगल कलर ज्वेलरी पीस जास्त चांगले दिसतात. सणांदरम्यान हेवी पीसऐवजी हलके वेट नेक पीस जास्त पसंत केले जातात. फेस्टिव्ह ज्वेलरीसाठी आकर्षक मोत्यांचा ट्रेंड आहे. खरे आणि आर्टिफिशिल दोन्ही प्रकारचे मोती घेतले जातात. हँड क्राफ्टेड आणि क्रिएटिव्ह लुक ज्वेलरीदेखील फेस्टिव्ह सीझनची पहिली पसंती आहे. इंडोवेस्टर्न लुकसह मेटॅलिक अथवा ब्राँझ ज्वेलरी कम्लिट फेस्टिव्ह लुक देते. समुद्री शिंपल्यांनी बनविलेली ज्वेलरीही पारंपरिक फेस्टिव्ह ड्रेससोबत परफेक्ट लुक देते. रंगरीतीचे सीईओ संजीव अग्रवाल यांनी पारंपरिक पेहरावांसंबंधी पुढील टीप्स दिल्या आहेत:

पारंपरिक पोशाखांना द्या नवा ट्विस्ट

या सीझनमध्ये पारंपरिकता आणि आधुनिकतेचं फ्युजन ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही लांब मॅक्सी ड्रेससह गडद रंगाची धोती पँट घालू शकता किंवा कुर्तीसोबत धोती अथवा पँट मॅच करू शकता. वाटल्यास स्टायलिश कुर्ता फ्लेयर्ड प्लाझा पँटसह घालू शकता.

स्टायलिश कुर्ता आणि पँटसह तुम्ही पारंपरिक जाकीटदेखील घालू शकता. गडद, पेस्टल किंवा मिश्रित रंगांसह तुमचे मनपसंद रंग निवडू शकता. या सीझनमध्ये पेस्टल ग्रीन, मिंट ग्रीन, क्रीम, डल पिंक, पावडर ब्लूसारखे कलर फॅशन ट्रेंडमध्ये आहेत. जे फ्रेश आणि लाइट फीलिंग देतात.

पारंपरिक फॅशन

पारंपरिक ड्रेसेस भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. या सणांमध्ये तुम्ही विविध रंग, पॅटर्न आणि डिझाइनचे पारंपरिक आऊटफिट जसे की सलवारसूट, कुर्तीप्लाझा, हेवी दुपट्टा, कुर्ती स्लिम पँट, कुर्ती स्कर्टसारखे फ्यूजन वापरू शकता. वेगवेगळे रंग आणि डिझाइनसह तुम्ही नवे प्रयोगदेखील करू शकता.

कृर्ता ड्रेस

आजकाल महिलांमध्ये कुर्ता ड्रेस खूप लोकप्रिय आहे. टाय आणि डाय प्रिंटचा शॉर्ट कुर्ता किंवा मॅक्सी कुर्ता यासारखा पोशाख तुम्हाला या उत्सवांमध्ये एक नवा लुक देईल.

डबल लेयरिंग

लेअरिंगला २०१९ ची नवीन फॅशन म्हणता येईल. याची पारंपरिक आणि पाश्चात्य दोन्ही प्रकारच्या ड्रेससमध्ये चलती आहे. सण-उत्सवात वावरताना आरामदायी वाटावे यासाठी तुम्ही टी-शर्टसह नेट किंवा कॉटनचा स्टायलिश श्रग घालू शकता. आरामदायी आणि सुंदर असे हे लेअर्स स्टायलिश लुकदेखील देतात.

कोणताही ड्रेस निवडताना आरामदायकतेला सर्वात जास्त महत्त्व दिले पाहिजे. तुम्ही पाश्चात्य किंवा पारंपरिक पोशाख परिधान करणार असाल तर त्यात आरामदायी वाटणे सर्वात महत्त्वाचे असते. सणांमध्ये तुम्हाला कामदेखील करावे लागते आणि डान्सही. अशावेळी ड्रेस असा असावा की तुम्ही सहजपणे काम आणि डान्सही करू शकाल. शिवाय हे सर्व करताना दीर्घकाळ तुम्हाला आरामदायीही वाटेल. अशा प्रसंगी क्लासी पण हलक्या वजनाचे ड्रेस निव

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...