– रितु वर्मा
तब्बल दोन महिन्यांनी भावना ऑफिसमध्ये गेली होती. पण तिला स्वत:ला तिचा चेहरा एखाद्या कार्टूनप्रमाणे वाटत होता. भावनाला वाटले की जर आता मास्कच लावून राहायचे आहे तर मेकअपची काय गरज आहे? तिने असा विचार करून आपले केस विंचरले, मास्क लावला आणि निघाली. ऑफिसमध्ये प्रत्येकजण तिला विचारत होते, ‘‘अरे काय झाले, एवढी उदास का वाटते आहेस?’’ भावनाला समजात नव्हते की हे असे का विचारत आहेत?
जेव्हा तिने घरी येऊन मास्क काढला, तेव्हा तिला कळले की ते बरोबर म्हणत होते. असे वाटत होते जणूकाही चेहऱ्यावर शोककळा पसरली आहे. भावनाला कळत नव्हते की या अशा दु:खी चेहऱ्याने ती छान कशी दिसेल?
रविताचे प्रकरण वेगळेच आहे. लॉकडाऊन सुरु होता, वेतन कपात सुरु झाली. रविताच्या डोक्यात भूत शिरले होते की कशाप्रकारे बचत करायची. म्हणून तिने स्वस्त दराचे मास्क खरेदी करून बचत करून फायदा मिळवला. मास्क लावूनच राहायचे आहे तर काय गरज आहे लिपस्टिक, सनस्क्रिन वा अन्य प्रसाधनांची. एका आठवडयाच्या आत रविताच्या चेहऱ्यावर अॅलर्जी व काळे चट्टे उमटले. जेव्हा रविता डॉक्टरकडे गेली, तेव्हा कळले की मास्कच्या मटेरिअलमुळे चेहऱ्यावर अॅलर्जी आली आणि सनस्क्रिन न लावल्याने काळे चट्टे उमटले.
लॉकडाऊन उठत आहे आणि यासोबत ऑफिसही सुरु होऊ लागले आहे. जर तुम्ही बाहेर जात असाल तर मास्क लावणे अनिवार्य झाले आहे. पण याचा अर्थ हा नाही की मास्क तुमच्या सौंदर्याच्या मधला अडथळा आहे. जर आपण लहानसहान गोष्टींकडे लक्ष दिले तर तुम्ही मास्क ब्युटीचा नवा ट्रेंड सुरु करू शकता.
रंगीबेरंगी मास्क
बाजारात २० रुपयांपासून ते ४५० रुपयांपर्यंत मास्क उपलब्ध आहेत. पण रोज रोज एकच मास्क लावणे महिलांना डल व कंटाळवाणे वाटते. तुम्ही काही रंगीबेरंगी मास्क आरामात घरातच बनवू शकता. प्रत्येक दिवसासाठी एक नवीन मास्क. घरात तुमच्या पडलेल्या जुन्या टीशर्टच्या बाह्यांपासून तुम्ही अतिशय सहजतेने मास्क बनवू शकता. सुती जयपुरी दुपट्टयांपासूनसुद्धा तुम्ही मनाजोगते मास्क बनवू शकता. पण मास्क बनवताना हे अवश्य लक्षात ठेवा. कापडाचा दर्जा मऊ आणि रंग पक्का असावा. मास्क तुमच्या चेहऱ्यावर एक नवे तेज आणतील.
अॅक्सेसरीजकडे दुर्लक्ष करू नका
मोकळया केसांवर मास्क लावल्यास केस खूपच वाईट दिसतात. तसेही नंतर तुम्ही स्पा वा कॅराटिन करू शकणार नाही. म्हणून केसांचा पोनीटेल बांधून मास्क लावा. मास्कच्या रंगाला मिळत्या जुळत्या अॅक्सेसरीज तुम्हाला एक वेगळाच लूक प्रदान करतील.
डोळयांना एक वेगळीच परिभाषा द्या
आता जोवर चेहऱ्यावर मास्क राहील तोवर सगळे काम डोळयांनीच करावे लागेल. चांगल्या कंपनीच्या वॉटरप्रुफ लायनरने आपल्या डोळयांचे सौंदर्य वृद्धिंगत करा. उष्ण हवामान असल्याने काजळ वापरणे टाळा. आयब्रोजना घरीच कात्री व प्लकरने आकार द्या. लक्षात ठेवा डोळयांभोवती जमा झालेले जंगल कोणालाही आकर्षक वाटत नाही.
ओठांकडेसुद्धा लक्ष द्या
मास्क लावलेला असल्याने लिपस्टिक लावणे टाळले तरी चालेल, पण ओठांची काळजी घेणे नाही. रोज रात्री ओठांवर ग्लिसरीन अवश्य लावा. मास्क लावण्याआधी ओठांवर न्यूड लीपबाम अवश्य लावा. हे ओठांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
सनस्क्रीनशी मैत्री कायम ठेवा
सनस्क्रिन न लावता घरातून चुकूनही बाहेर निघू नका. मास्क केवळ कोरोना व्हायरसपासून आपले रक्षण करेल, सूर्याच्या किरणांपासून नाही.
अशाच काही लहान सहान टीप्स अवलंबून तुम्ही मास्कच्याबाबतीत एक नवा ब्युटी ट्रेंड आणू शकता.