- प्रतिनिधी

जगात अनेक प्रकारचे लोक आहेत. वेगवेगळी विचारधारा आणि पध्दतीचे काही लोक आपलं जीवन निमूटपणे व्यतित करतात. तर काही लोक असेही असतात, ज्यांना केवळ फिरायची आवड असते. अशा प्रकारचे लोक नेहमी संधीच्या शोधात असतात की कधी त्यांना संधी मिळेल आणि कधी ते कुठे फिरायला जातील.

परंतु या सर्वांमध्ये जेव्हा अनेकदा आपण परदेशी पर्यटनाचा विचार करतो, तेव्हा मनात पैशांचा विचार येतो आणि आपण पैशांचं तोंड पाहत राहतो व पैसा खर्च होईल या भीतिने आपण आपला प्लॅन रद्द करतो, पण आता आम्ही आपल्याला सांगतोय की आपणही परदेशी पर्यटनाला जाऊ शकता, तेसुद्धा कमी खर्चात...विश्वास बसत नाहीए ना तुमचा?

तर आम्ही आपल्याला हे सांगू इच्छितो की आता आपण या टेन्शनला निरोप द्या. कारण आपण परदेश यात्रा करू इच्छितो असाल आणि पैसाही समस्या असेल तर आम्ही आपणास  काही शहरांविषयी सांगू इच्छितो, जिथे जाऊन राहणे, खाणे, फिरणे आणि शॉपिंग करणे खूप स्वस्त आहे, परंतु आपल्याला तिथे प्रवासाला जायचं असेल, तर थंडीचा मोसम आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.

सेन मिगुएल डे अल्लेन्डे, मॅक्सिको

मॅक्सिकोमध्ये सेन मिगुएल डे अल्लेन्डे खूप सुंदर शहर आहे. नोव्हेंबर महिन्यात फिरण्यासाठी हे ठिकाण चांगले व स्वस्त सिध्द होऊ शकते. कारण सुरुवातीला वातावरण कोरडे असते. त्यामुळे इथे सूर्य आणि वातावरणाबाबत विचार न करता, आरामात आपण फिरायला जाऊ शकता आणि शहरातील सुंदर ठिकाणांचा आनंद घेऊ शकता.

पॅरिस, फ्रांस

पर्यटकांच्या लिस्टमध्ये पॅरिस सर्वात वरती असतं. परंतु उन्हाळ्यात इथे गर्दीमुळे पर्यटकांना कम्फर्ट झोन कमी मिळतो. तरीही लोकांना इथे जायला आवडतं. थंडीच्या काळात हे ठिकाण खूप कूल असतं. शॉपिंग आणि मौजमस्ती करणाऱ्यांसाठी हे ठिकाण एकदम परफेक्ट आहे.

काबो सान लुकास, मॅक्सिको

काबो सान लुकास शहरही मॅक्सिकोमध्ये थंडीच्या सुट्टीच्या काळात फिरण्यासाठी चांगलं ठिकाण आहे. अशावेळी इथे जास्त गर्दी होण्यापूर्वी आणि वस्तूंच्या किंमती वाढण्यापूर्वी आपण थंडी संपवण्याच्या आत इथे जाऊ शकता. काबोमध्ये आपल्याला मासे पकडणे आणि व्हेल मासा पाहण्याचा गोल्डन चान्स मिळेल.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...