– प्रतिनिधी

नवनवीन फॅशन करून पाहणं आवडत असेल तर रेग्यूलर आयलायनर स्टाइलला बायबाय म्हणून आयलायनरच्या लेटेस्ट स्टाइलला आपलेसे करा. हल्ली आयलायनरच्या कोणकोणत्या स्टाइल टे्न्डमध्ये आहेत हे जाणून घेऊ मेकअप आर्टिस्ट मनीष केरकरकडून :

फ्लोरल आयलायनर

डोळ्यांच्या मेकअपमध्ये सूपर कुल लुक देण्यासाठी फ्लोरल आयलायनर हा एक छान पर्याय आहे. आय मेकअपमध्ये बहुतांशी काळे किंवा ब्राऊन शेडचे आयलायनर अधिकीने वापरले जाते. पण फ्लोरल आयलायनर स्टाईलमध्ये पांढऱ्या रंगापासून पिवळा, गुलाबी, लाल, जांभळा असे बोल्ड शेड्स मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

या रंगीबेरंगी आयलायनर्सनी पापण्यांवर वेगवेगळ्या फुलांची डिझाइन काढली जाते. म्हणून याला फ्लोरल आयलायनर स्टाइल म्हणतात. पूर्ण पापणीवर किंवा दोन्ही पापण्यांच्या सुरूवातीला किंवा टोकाच्या बाजूला फुलांची डिझाइन काढली जाते. आयलायनरची ही स्टाईल डे पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे. फ्लोरल डिझाइनला योग्य आकार देण्यासाठी पेन आणि लिक्विड आयलायनरचा वापर करा.

क्रिस्टल आयलायनर

तुमच्या डिझायनर डे्सवर परफेक्ट मॅच होण्यासाठी क्रिस्टल आयलायनर हल्लीच फॅशनमध्ये आले आहे. यासाठी सर्वात आधी काळे, ब्राउन किंवा निळे असे घातलेल्या पेहरावाला मॅचिंग असणारे कोणत्याही एका शेडचे आयलायनर पापणीवर व खालीसुद्धा लावू घ्यावे.

हे व्यवस्थित वाळून सेट झाल्यानंतर आयलायनरच्या जवळ किंवा वर गोल्डन किंवा सिल्वर शेडच्या छोट्या छोट्या टिकल्या ओळीत चिकटवा. यामुळे तुमच्या आयलायनरला क्रिस्टल इफेक्ट मिळेल आणि लाइट पडताच तुमचा आयमेकअप चमकू लागेल. लग्नप्रसंगी किंवा नाईट पार्टी, काही विशेष सोहळ्यांसाठीही क्रिस्टल आयलायनर स्टाइल अतिशय बेस्ट आहे.

स्टिक ऑन आयलायनर

जर तुम्हालाही आयलायनरच्या वेगवेगळ्या शेड्स ट्राय करून पाहायच्या असतील, पण कुठल्याही प्रोफेशनलच्या मदतीशिवाय स्वत: वेगळ्या स्टाइलचा आयमेकअप करायची हिंमत होत नसेल किंवा आयलायनरला योग्य आकार देता येत नसेल तर समजून घ्या की स्टिक ऑन आयलायनर खास तुमच्याचसाठी आहे.

बाजारात उपलब्ध वेगवेगळ्या शेड्स आणि डिझाइनचे स्टिक ऑन आयलायनर लावून तुम्ही तुमच्या आय मेकअपला आकर्षक लुक देऊ शकता. यासाठी तुम्हाला फार काही करायची गरज नाही. फक्त आयलायनर स्टिकर पापण्यांवर योग्य जागी चिकटवायचे असते. स्टिक ऑन आयलायनर दिवसा असणाऱ्या कार्यक्रमांऐवजी रात्रीच्या कार्यक्रमात जास्त आकर्षक व उठून दिसते.

कॅन्डी केन आयलायनर

जर तुम्ही मजा मस्तीच्या किंवा सुट्टीच्या मूडमध्ये असाल व तुमच्या आय मेकअपला तुम्हाला वेगळा लुक द्यायचा असेल तर कॅन्डी केन आयलायनरद्वारे तुम्ही आय मेकअपला कॅन्डी केन लुक देवू शकता. या आयलायनर स्टाइलसाठी तुम्हाला फार काही करायचे नाही. फक्त व्हाईट आणि रेड शेड्च्या पेन्सिल, लिक्विड, पेन आयलायनर जे तुम्हाला आवडेल ते खरेदी करा. मग त्यावर रेड शेडच्या आयलायनरने थोड्या थोड्या अंतरावर तिरक्या रेषा बनवा.

डे पार्टी किंवा गेटटुगेदरमध्ये फंकी लुकसाठी कॅन्डी केन आयलायनर लावू शकता. सुंदर लुक दिसणारे हे कॅन्डी केन आयलायनर तेव्हाच लावा, जेव्हा तुमच्या डे्रसचा रंग व्हाईट आणि रेड असेल.

बबल आयलायनर

जर तुम्ही नेहमीसारखे स्टे्ट आयलायनर लावून कंटाळला असाल तर बबल आयलायनर ट्राय करून पाहा. स्टे्ट आयलायनर प्रमाणेच हे आयलायनरही तुम्ही नेहमी लावू शकता. यासाठी नेहमी वापरण्यात येणारे ब्लॅक आयलायनर नेहमीप्रमाणे स्टे्ट न लावता डॉट डॉट करून बबलप्रमाणे बनवावेत म्हणजे ती सरळ लाईन न दिसता वर खाली दिसू लागेल.

तुम्हाला आवडत असेल तर बबलच्या मधोमध व्हाईट पेन आयलायनरने डॉट बनवून त्याला अधिक आकर्षक लुक देऊ शकता. बबल आयलायनर तुम्ही रोज लावू शकता व दैनंदिन आऊटफिटसोबत ते मॅचसुद्धा होते.

रिबन आयलायनर

स्टे्ट, राऊंड आणि फिश कटशिवाय काही वेगळी आयलायनर स्टाइल ट्राय करायची असेल तर रिबन आयलायनर स्टाइल ट्राय करून पाहा. यासाठी वरच्या पापणीवर ब्लॅक लिक्विड वा जेल आयलायनर लावा. आता खालील पापणीवर ब्लॅक आणि ब्राउन किंवा अन्य एखाद्या शेडचे पेन आयलायनर लावा आणि शेवटच्या टोकाला जाताच वर लावलेल्या ब्लॅक आयलायनरला रिबीनप्रमाणे लपेटून लावल्याप्रमाणे लावा.

रिबन आयलायनर स्टाइल तुम्ही कुठल्याही विशेष प्रसंगी किंवा रेग्यूलर दिवशीही लावू शकता. पारंपरिक कपड्यांपेक्षा वेस्टर्नवर हे स्टायलिश दिसते.

ग्लिटर आयलायनर

ग्लिटर लिपस्टिक, ग्लिटर आयशॅडो आणि ग्लिटर हेअर हायलायटर याबरोबरीनेच सध्या ग्लिटर आयलायनरचीसुद्धा चलती आहे. हे पारंपरिक व वेस्टर्न वेअरवरही सूट होते. हे फक्त वर किंवा वर खाली दोन्ही पापण्यांना लावू शकता. केवळ ग्लिटर आयलायनर किंवा ब्लॅक, ब्राऊन, ब्लू यांसारख्या दुसऱ्या शेडचे आयलायनर लावून त्यावरही ग्लिटर आयलायनर लावू शकता.

सिल्वर, गोल्डन याबरोबरच पिंक, ब्लू, पर्पल, रेड, यलो असे शेड्ससुद्धा या ग्लिटर आयलायनरमध्ये उपलब्ध आहेत. आकर्षक दिसण्यासाठी जेल आयलायनर वापरा. नाईट पार्टी किंवा समारंभात मेकअप हायलाइट करण्यासाठी ग्लिटर आयलायनर स्टाइलहून उत्तम पर्याय असूच शकत नाही.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...