– दिपान्वीता राय बॅनर्जी

आज अदिती स्वत:चे लग्न वाचवण्यासाठी ज्या कौन्सिलरकडे चकरा मारत होती,  त्यामागे एक खूपच साधारण पण जटिल कारण आहे. अदिती आणि तिच्या पतिच्या सेक्स लाइफमध्ये खूप गुंतागुंत होती. कुठलाही मोकळेपणा नसल्यामुळे त्यांच्या संबंधात घुसमट व निराशा निर्माण झाली होती.

असे काय घडले की सेक्ससारखा मनोरंजक विषय घुसमटीचे कारण बनला? पतीपत्नीमधील शरीरसंबंध हे गहिऱ्या संबंधाचे लक्षण आहे. यात सुरक्षेची जाणीव, प्रेमळ अनुभूती, आपसातील सामंजस्य, प्रेमातील गहिरेपणा व ते सर्वकाही असायला हवे, जे स्थिर व आनंददायी संबंधांसाठी गरजेचे असते. पण यासाठी काही तडजोडीही कराव्या लागतात. उत्तम सेक्स जीवन व गहिऱ्या नात्याच्या अनुभूतीसाठी एकमेकांना स्पेस देण्याचे स्वातंत्र्य स्विकारावे लागते.

पतीपत्नी दोघांसाठी दैनंदिन कार्याप्रमाणे सेक्स करत राहणे ही सेक्स लाइफ कंटाळवाणी करणारी गोष्ट तर आहेच शिवाय यामुळे नातेबंध अयशस्वी होण्यातही काही कसर बाकी राहत नाही. शहर असो किंवा गाव भारतीय आणि मुस्लीम समाजात स्त्रियांनी सेक्सवर चर्चा करणं वा अन्य बाबतीत इच्छा व्यक्त करण्याला नीच मानसिकता ठरवून खच्चीकरण केलं जातं. ज्या स्त्रिया आपल्या जोडीदाराला सेक्सच्या बाबतीत आपल्या इच्छा मोकळेपणी सांगू इच्छितात, त्यांना सभ्य आणि सुसंस्कृत मानले जात नाही. मोठया शहरांतील बिनधास्त मुली सोडल्या तर अन्य मुली सेक्स म्हणजे पतीच्या सेवेचाच एक भाग मानतात, तसेच त्यांना आपली इच्छा अनिच्छा पतिला सांगण्याची गरज वाटत नाही.

भेदभाव का?

थोडया खोलात जाऊन विचार केलात की कळेल की सेक्सची इच्छा व क्षमतेला मानवी जीवनाचे प्रधान तत्त्व समजले जाऊ शकते. सेक्स जीवनाला नियंत्रित करण्यासाठी जीववैज्ञानिक, नैतिक, सांस्कृतिक, कायदेशीर, धार्मिक इ. विभिन्न दृष्टीकोनांचे योगदान असते, जेणेकरून सेक्स जीवन आणि याचे स्वातंत्र्य या बाबींचा खूप प्रभाव असतो.

जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्तिच्या लैंगिक आयुष्याच्या महत्वतेवर जोर देत याबद्दल सकारात्मक व स्विकारार्ह दृष्टीकोन बाळगावा असे म्हटले आहे. या संघटनेचे म्हणणे आहे की आपल्या जोडिदारासोबत लैंगिक संबंध कुठल्याही भेदभाव, हिंसा, शारीरिक, मानसिक शोषणाशिवाय व्हायला हवेत. पूर्ण उर्जा, इच्छा आणि भावनिक संतुलनासहित हे संबंध व्हायला हवेत.

प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की आपल्या देशात जिथे स्त्रियांवर सेक्स संबंधित बलात्कार, मानसिक शोषण, घरगुती हिंसा, राजरोजपणे सुरू आहे. स्त्रीचे लैंगिक अधिकार आणि सेक्सबद्दलचे उघड मत स्विकारार्ह आहे का?

जर थोडी सजगता आली आणि स्त्रियांनीही याबाबतीत स्वत:च्या भावनांना पूर्ण महत्त्व दिलं व जोडीदाराशी मोकळेपणे संवाद साधला तर खूप फायदे होऊ शकतील.

आपसात मैत्रीपूर्ण नाते
जर पतीपत्नी दोघांमध्ये मैत्रीची भावना निर्माण झाली तर त्यांच्यात उच्चनीच, लहान मोठे असे अहंकाराने भरलेले भेद आपोआप नाहीसे होतील. दोघांनीही एकमेकांशी सेक्स इच्छांबद्दल मोकळेपणाने मते व्यक्त केली तर ही बाब खूपच सोपी होईल.

व्यक्तिमत्त्वाचा विकास
स्त्री जर सेक्सच्या बाबतीत फक्त समर्पित न राहता  स्वत:ची आवडनावड व्यक्त करू लागली तर, ती जोडीदाराच्या हृदयात स्वत:प्रति आवड निर्माण करू शकते, जी व्यक्तिमत्त्व विकासासाठी सहाय्यक आहे.

आत्मविश्वासात वाढ
फक्त पुरूषाच्या इच्छेनुसार वागणे म्हणजे वैवाहिक व लैंगिकता आयुष्य यंत्रवत जगण्यासारखे आहे, पण जर स्त्रीनेही यात महत्वपूर्ण भमिका निभावली तर आयुष्यात पुन्हा एका नव्या उर्जेचा संचार होईल.

तसेही भारतीय संस्कृतीला अजून पारंपरिक बंधनांतून मुक्त होण्यास दिर्घकाळ लागेल, पण त्या त्या बाबींबद्दल बोलून मागासलेली मानसिकता काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो.

लहानपणापासूनच कौटुंबिक वातावरणात मुलींना हेच शिक्षण मिळते की सेक्स हे निरूपयोगी आहे आणि मुलींनी यापासून दूर राहिले पाहिजे.

सेक्ससोबत चारित्र्यही जोडले जाते. सेक्सची आपली इच्छा मारून त्याबद्दल आपले मत लपवणे यालाच चांगले चरित्र म्हटले जाते.

चारित्र्याला कुटुंबाच्या अब्रूशी जोडले जाते. मुलगी म्हणजे कुटुंबाची अब्रू असे समजले जाते. अर्थात सेक्सबद्दल वैयक्तिक मुक्त विचार बाळगणे हे चारित्र्यहिन असण्याचे लक्षण आहे, ज्यामुळे कुटुंबाची अब्रू चव्हाट्यावर येऊ शकते.

लग्नानंतर हेच संस्कार स्त्रीमध्ये रूजलेले असतात आणि त्यामुळे सेक्सबद्दल आपली इच्छा पतीने व्यक्त करण्यात तिला संकोच वाटू लागतो.

याबाबतीत पुरूषांची मानसिकताही पारंपरिक वर्चस्ववादी विचारांचा पगडा असणारी असते. त्यांना आपल्या पत्नीने सेक्सबद्दल मोकळेपणाने इच्छा व्यक्त करणे असभ्यपणा वाटतो. यामुळेच पुरूष स्त्रियांची यावरून चेष्टा करतात व त्यांच्या भावनांची कदर करत नाहीत. त्यावेळी स्त्रीला आपल्या कोषात राहण्याशिवाय काहीही पर्याय उरत नाही. नंतर हेच पुरूष सेक्सच्यावेळी स्त्री कशी मृतवत पडून असते अशी तक्रारही करतात. यामुळेच सबंधांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते.

स्त्री जेव्हा या साऱ्या समस्यांना पार करून मूल्य आणि अधिकारांचा आनंद घेऊ शकेल तेव्हा ती एखाद्या भोगवस्तूप्रमाणे नाही तर एका खऱ्या जोडीदाराप्रमाणे आयुष्यातील या अमूल्य क्षणांचा उपभोग घेऊ शकेल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...