* रितू वर्मा

रिमाचं नवीन लग्न झालं होतं. सेक्स जे तिच्यासाठी नवीन होतं. आता लग्नानंतर अचानक ती रोमांचित झाली होती. रीमाला तिच्या आयुष्यात झालेल्या या बदलांबद्दल कोणासोबत तरी बोलायचं होतं. तिला जाणून घ्यायचं होतं की तिला जसं वाटतं ते तसंच सर्वांबाबत होतं का?

रीमाने आनंद आणि रोमांचित झाल्यामुळे स्वत:ची बेडरूम सिक्रेट्स म्हणजेच गुपितं आपल्या मैत्रिणींना सांगितली. जेव्हा रिमा आणि तिचा पती जय हे तिची मैत्रीण श्वेताकडे जेवायला गेले होते तेव्हा श्वेताने जयसमोरच अशा गोष्टी बोलायला सुरुवात केली होती ज्या अश्लीलतेच्या परिघात येत होत्या. जय समजून गेला की रिमाने त्यांच्या दोघांमधील वैयक्तिक गोष्टी सार्वजनिक केल्या आहेत. या गोष्टीसाठी तो रीमाला अद्यापही माफ करू शकला नव्हता. इकडे श्वेतादेखील जेव्हा संधी मिळेल तेव्हा रीमाला तिच्या बेडरूमची गुपितं विचारायची आणि तिखटमीठ लावून पूर्ण ग्रुपला सांगत असे.

भूमिकाचं जेव्हा लग्न झालं तेव्हा तिची विवाहित मैत्रीण एकता तिची जणू काही सेक्स गुरुच बनली. भूमिका निरागसपणे तिच्या प्रत्येक छोटया मोठया गोष्टी एकताला सांगत होती. एकता जी तिच्या पतीपासून समाधानी नव्हती. भूमिकाची बेडरूम सिक्रेट्स ऐकून तिच्या पतीकडे आकृष्ट झाली. संधी मिळतात एकताने भूमिकाच्या पतीला स्वत:कडे खेचलं होतं. आता भूमिका त्या दिवसाला दोष देत होती जेव्हा तिने एकतासोबत तिच्या बेडरूममधली सिक्रेट्स सांगायला सुरुवात केली होती.

आजदेखील अनेक नवविवाहित जोडपी लग्नापूर्वी सेक्सपासून दूर राहतात. म्हणून जेव्हा लग्नानंतर या नव्या जगतात पाऊल ठेवतात तेव्हा त्यांना समजत नाही की त्यांच्या गोष्टी कोणासोबत शेअर कराव्या. मनात हुरहूर, भीती असते, काही गोष्टी माहित नसतात, काही रहस्य असतात तेव्हा समजत नाही की कोणासोबत बोलावं. अशावेळी आपल्या मित्र मैत्रिणींशिवाय कोणीच दुसरं सुचत नाही. आपल्या मित्रांसोबत बेडरूम सिक्रेट शेअर करणं अनेकदा फायदेशीरदेखील होऊ शकतं.

जसं की मोहिनीने तिच्या परफॉर्मन्सबाबत खूपच स्ट्रेसमध्ये होती. मात्र जेव्हा एके दिवशी बोलता बोलता तिने तिची मैत्रीण वर्षाला याबद्दल सांगितलं तेव्हा मोहिनीला समजलं की ती विनाकारण याबद्दल स्ट्रेस घेत होती.

मुली लग्नानंतर सेक्सशी संबंधित गोष्टी आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करण्याबाबत कम्फर्टेबल असतात. परंतु आपले बेडरूममधील गुपितं आपल्या मैत्रिणींशी कोणत्या सीमेपर्यंत शेअर कराव्यात हे मात्र ठरवायला हवं. आपल्या बेडरूम सिक्रेट शेअर करण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जर तुमच्या पतीनेदेखील तुमच्या बेडरूम लाईफबद्दल आपल्या मित्रांना सांगितलं तर तुम्हाला कसं वाटेल?

त्यामुळे प्रयत्न करा की जेवढं शेअर करायचं आहे ज्यामुळे तुमच्या पार्टनरची छबी वाईट होता कामा नये आणि ना ही त्यांचं हसू व्हावं.

या गोष्टी चुकूनही शेअर करू नका

सेक्शुअल फॅन्टसी : तुमच्या जोडीदाराची एखादी वाइल्ड सेक्शुअल फॅन्टीसी असू शकते. तुमचा जोडीदार तुमच्यावर विश्वास ठेवूनच ही फॅन्टीसी तुमच्यासोबत शेअर करतो. परंतु जर तुम्ही या गोष्टी तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर केल्या आणि जर ते पार्टनरला समजलं तर ते आयुष्यभर तुमच्यासमोर कधीच मोकळे होणार नाहीत. त्यांना नेहमी ही भीती लागून राहील की न जाणो तुम्ही कधी कोणासमोर या गोष्टी सांगून मोकळे व्हाल.

साईज डिस्कशन : तुमच्या जोडीदाराच्या पेनिसचा आकार डिस्कस करणं एक खूप वाईट गोष्ट आहे. थोडा विचार करून बघा जर तुमच्या जोडीदाराने तुमचे स्तन व एखाद्या दुसरा अंगाच्या आकाराचा उल्लेख त्यांच्या मित्रांसमोर केला तर तुम्हाला कसं वाटेल? तुमच्या जोडीदाराचं असं डिस्कशन त्यांना तुमच्या मैत्रिणींमध्ये डिजायरेबलदेखील बनवू शकता. नंतर एखादी गोष्ट घडली तर तेव्हा ती पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे.

इरॅक्शन प्रॉब्लेम : जोडीदाराचे इरॅक्शन प्रॉब्लेम म्हणजेच नपूसंकता उघड करणे, खूपच संवेदनशील विषय आहे. जर तुम्हाला मदत हवी असेल तर मैत्रिणीऐवजी डॉक्टरांची मदत घ्या. अशा गोष्टी प्रत्येक मैत्रिणीसोबत डिस्कस करणे योग्य नाहीये. तुमचे फ्रेंड्स तुमच्या बेडरूम लाईफला पब्लिकदेखील करू शकतात आणि अशा गोष्टींचा फायदा काही चुकीची लोकं देखील घेऊ शकतात. ज्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण होऊ शकतं.

सेक्शुअली व्होकॅबुलरी आहे खूप वैयक्तिक : जोडीदाराचं सेक्शुअल व्होकॅबुलरी मैत्रिणीसमोर उघड करणं एक वाईट गोष्ट आहे. लक्षात ठेवा, तुमचं बेडरूम लाईफ तुमचं आणि तुमच्या जोडीदाराचे खूप वैयक्तिक क्षण आहेत. त्यांना तुमच्या सर्व फ्रेंड्सना सांगत बसू नका. कदाचित तुम्ही तुमचं बेडरूम लाईफ डिस्कस करतेवेळी तुमच्या मैत्रिणीसमोर असं पिक्चर पेंट करता ज्या पेंटिंगचा त्या अनाहूतपणे एक भाग बनतात.

परंतु बेडरूम सिक्रेट्स शेअर केल्यामुळे नेहमीच नुकसान होतं असं काही नाहीये. जर तुम्ही विचारपूर्वक विश्वासाने मैत्रिणींसोबत तुमचे सिक्रेट्स शेअर केले तर या गोष्टींचे फायदेदेखील होऊ शकतात :

बेडरूम लाइफला स्पायसी बनविण्यात मदतनीस : अनेकदा मैत्रिणींसोबत बोलता बोलता तुम्हाला काही गोष्टींबद्दल समजतं जे तुमच्या बेडरूम लाईफला स्पायसी बनवू शकतं. कशा प्रकारची लॉन्जरी पार्टनरला आकर्षित करते वा कशा प्रकारचे परफ्युम बेडरूम लाईफला अधिक रोमांचक बनवितात. या सर्व गोष्टी आरामात तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत डिस्कस करू शकता.

फोरप्लेच्या नवीन पद्धती : फोरप्ले सेक्स ड्राईव्हला सर्वोत्तम बनवतं. याची कोणतीही सेट मेथड नसते. प्रत्येकाची फोरप्लेची पद्धत वेगवेगळी असते. ही माहिती तुम्ही एकमेकांसोबत शेअर करू शकता. परंतु लक्षात ठेवा माहिती खूपच जनरल पद्धतीने शेयर करावी. याला स्पेसिफिक करू नका.

ऑरगॅझमशी ओळख : ऑरगॅझमवर फक्त पुरुषांचा हक्क नाही तर स्त्रियांचादेखील मौलिक अधिकार आहे. नवीन लग्नामध्ये अनेकदा स्त्रियांना याची अपुरी माहिती असते. जर तुमच्या मैत्रीणीने तुम्हाला एखाद्या खास पोझिनबद्दल सांगितलं ज्यामुळे ऑरगॅझम मिळतं, तर तुम्ही पुढच्यावेळी तशी पोजिशन घेऊन ऑरगॅझम मिळवू शकता.

कन्फ्युजनपासून मिळू शकते सुटका : अशी अनेक रहस्ये आहेत वा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खूपच नॉर्मल असतात, परंतु नवीन लग्नामध्ये या खूप विचित्र वाटतात. पर्सनल हायजिनपासून सेक्स टॉइजपर्यंत सर्व कन्फ्युजन असतं. जे आपापसात बोलून सॉल्व करू शकता.

सेक्स लाईफची चांगली समज : सेक्स लाईफच्या चांगल्या समजूतीसाठी अनेकदा मैत्रिणींसोबत मोकळेपणाने बोलू शकता. परंतु दोन गोष्टी कायम लक्षात ठेवायला हव्यात. पहिली म्हणजे कोणत्याही मैफिलीत बसून तुमच्या सेक्स कथा सांगायला आरंभ करू नका. अन्यथा तुम्ही चेष्टेचा विषय व्हाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेक्सशी संबंधित गोष्टी शेअर करताना तुमच्या जोडीदाराचा उल्लेख करू नका.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...