* रिटा गुप्ता

रमोला आणि अक्षतच्या प्रेम विवाहाला जवळजवळ ४ वर्षे झाली होती. दोघांना एक छोटी मुलगी होती, परंतु असं वाटत होतं की दोघांमधलं प्रेम कापरासारखं उडून गेलंय. दोघेही तापट होते. त्यांचं भांडण कधीही, कोणत्याही जागी सुरू व्हायचं. जेव्हा दोघे रागात असायचे तेव्हा त्यांना याची देखील जाण नसायची की ते कोणासमोर भांडत आहेत. जेव्हा ते एकमेकांवर दोषारोप करत होते तेव्हा मुलगी त्यांच्याकडे घाबरून बघत राहायची.

एकदा रमोलाची आई मुलीच्या घरी आली होती. सतत दोघांच्या सवयीनुसार तिच्यासमोर देखील वाद होऊ लागले. जास्त वाद तर घरगुती कामांवरून होत होते. रमोलादेखील नोकरीला होती. त्यामुळे तिला वाटत होतं की अक्षतने तिला मदत करावी. परत अक्षत थोडा मनमौजी होता. त्याला जेव्हा वाटायचं तेव्हा तो मदत करायचा, नाही तर नाही.

त्यांच्या घरी कलहाच्या वातावरणाने घाबरून रमोलाची आई एकदिवशी म्हणाली, ‘‘जर तुमचं पटत नसेल तर तुम्ही वेगळे व्हा. जबरदस्तीने एकमेकांसोबत राहून दुखी राहू नका. मुली वरतीदेखील याचा वाईट परिणाम होतोय.’’

‘‘परंतु अगोदर हा विचार करा की एकमेकांच्या कोणत्या चांगल्या गोष्टी पाहून तुम्ही दोघांनी प्रेम विवाह केला होता. आम्हाला तर वाटलं होतं की तुम्ही एकमेकांना पसंत करत असाल, परंतु तुम्हा दोघांच्या वागण्यावरून तर असं वाटत नाहीये. अशावेळी वेगळं होणंच चांगलं आहे.’’

छोट्या छोट्या गोष्टींवरती भांडण

इथे दोघांचे स्वभाव सारखेच असल्यामुळे आणि संयोगाने त्यांचं पटल्यामुळे अनेकदा एक नव्या जोडप्यांमध्ये कोणी एक रागीट स्वभावाचा असतो. हे रागीट वागणं कोणाचंही असू शकतं. असे वागणूक असणारे दुसऱ्यांवरती हावी होतात. छोट्या छोट्या गोष्टींवरती त्यांचा पारा चढतो. अशी लोकं आपल्या जोडीदाराबाबत खूपच कटू होतात. प्रेम, आदर, संवेदनशीलता यांच्या शब्दकोशात नसतेच जणू.

रम्या आणि संदीपचं लग्न ४-५ वर्ष जुनं झालं होतं. रम्या सुशिक्षित तरुणी होती परंतु सासरच्या इच्छेचा मान ठेवत तिने नोकरी केली नाही आणि एकत्र कुटुंबात ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करू लागली. संदीप तर खूपच रागीट होता. एकुलता एक असल्यामुळे तो लाडवलेला देखील होता. सतत कधी खाण्याचे ताट उडवून द्यायचा, तर कधी पार्टीमध्ये जायला तयार असलेल्या रम्याला कुरूप म्हणायचा. त्यावर रम्याची सासू म्हणाली, ‘‘पुरुष आहे ना, त्याचा हक्क आहेच तुझ्यावर. आपल्या बायकांच्या आयुष्यात सहन करणंच लिहिलंय.’’

रम्याने स्वत:च्या वागण्याने खूपच प्रयत्न केला की संदीप समजून घेईल की ती त्याच्या पायातली वहाण नाहीये. परंतु संदीपचा यावर काहीच परिणाम झाला नाही. शेवटी रम्याने शांतपणे नोकरीसाठी बायोडेटा पाठवायला सुरुवात केली आणि नोकरी लागल्यावरती कोणाची परवानगी न घेता ती जाऊ लागली. आत्मविश्वासासोबतच ती प्रतिकार करायला देखील शिकली.

लग्नाचा पाया

काही मनोरुग्ण असे देखील असतात ज्यांना क्षणात संशय आणि नाराजीचा दौरा पडतो आणि मग ते सगळं ओकून टाकल्यावर पश्चाताप करत राहतात आणि माफी देखील मागू लागतात. अनेकदा मॅरेज कौन्सिलर व मानसोपचार तज्ञांना भेटल्यावर देखील समस्याचं समाधान मिळतं. अशा प्रकारे प्रत्येक जोडप्याच वेगळं समीकरण असतं. सर्वांचीच गोष्ट एकमेकांपेक्षा वेगळी असते.

लग्नाचा पाया आपापसातील प्रेम आणि ताळमेळावरती टिकलेला असतो. दोन लोकं मग ते पूर्वपरिचित असो वा सर्वदा अपरिचित जेव्हा एकत्रित राहू लागतात तेव्हा सुरुवातीला त्रास होतो. अनेकदा लग्नाच्या काही वर्षानंतर देखील प्रेमाचा ज्वर उतरतो, तेव्हा पार्टनर एक वेगळ्याच रूपात दिसू लागतो. म्हणून म्हटलं जातं की एवढे देखील कटू होऊ नका की लोक थूकतील आणि एवढे देखील गोड होऊ नका की ते तुम्हाला गिळून टाकतील.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...