* प्रतिनिधी

लाह्याची भजी

काय लागेल

* २ कप लाह्या

* पाव कप बेसन

* २ मोठे चमचे अरारोट

* २ छोटे चमचे हिरवी मिरची बारीक चिरलेली

* १ मोठा चमचा कोथिंबीर बारीक चिरलेली

* अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर

* पाव छोटा चमचा काळी मिरी कुटलेली

* अर्धा छोटा चमचा लाल तिखट

* पाव छोटा चमचा काळं मीठ

* अर्धा छोटा चमचा बडीशेप

* तळण्यासाठी सुमन कच्ची घानी मस्टर्ड ऑइल

* मीठ चवीपुरतं.

कसं कराल

तेल सोडून सर्व साहित्य एका बाऊलमध्ये टाकून व्यवस्थित एकत्रित करा. गरजेपुरतं पाणी टाकून बेसन आणि मसाले लाह्यावर व्यवस्थित लावा. मोठ्या आचेवर कढईत तेल गरम करा. लाह्याच्या मिश्रणाचा १-१ छोटा चमचा भजीप्रमाणे गरम तेलात टाकून आच मंद करा. सोनेरी होईपर्यंत भजी तळून हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

आवळा हर्बल ड्रिंक

काय लागेल

* २०० ग्रॅम आवळे

* अर्धा छोटा चमचा जिरा पावडर

* पाव छोटा चमचा काळीमिरी

* अर्धा छोटा चमचा काळं मीठ

* ३ मोठे चमचे मध

* १ मोठा चमचा साखर

* थोडं थंड पाणी

* थोडासा बर्फ कुटलेला

* थोडीशी पुदिना पाने.

कसं कराल

आवळ्याच्या बिया काढून मिक्सरमध्ये पाणी न टाकता बारीक करून घ्या. कपड्यांने गाळून मध आणि साखरेसोबत एक उकळी येईपर्यंत शिजवा. थंड झाल्यावर पुदिना कुस्करा व इतर साहित्य टाका. सर्व्हिंग ग्लासमध्ये पाव कप मिश्रण टाकून थंड पाणी टाका.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...