– शोभा कटारे

माझ्या शेजारी राहणाऱ्या मीराला कशाचीच कमी नाहीये. सर्व काही तर आहे तिच्याकडे दोन दोन घरं, मोठमोठ्या गाड्या, भरपूर महागडे कपडे, दागिने. परंतु अलीकडे ती खूपच दु:खी दिसतेय, सर्व काही असून देखील ती आनंदी नाहीये. शेवटी अशी कोणती गोष्ट आहे, जी मिळताच ती आनंदी होईल. घरातील सर्व लोकं तिला समजून घेताहेत आणि शक्य तेवढे त्यावर उपाय करत आहेत. अलीकडच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक जण अशी गोष्ट शोधत आहे तर ती आहे आनंद आणि तो मिळवण्यासाठी सर्व काही करायला तयार आहेत. परंतु हे मिळविण्यात ते अयशस्वी होत आहेत. असं म्हटलं जातं की पैशाने सर्वकाही विकत घेतलं जाऊ शकतं परंतु कदाचित आनंद नाही. शेवटी कोणती आहे ती पद्धत वा मार्ग जे मिळवून तुम्ही आनंदी राहू शकता.

रहा निरोगी

जर आनंदी राहायचं असेल तर निरोगी राहणं गरजेचं आहे, कारण असं म्हटलं जातं की निरोगी शरीरानेच आनंदी राहू शकता. लक्षात ठेवा चांगलं आरोग्य पैशाने बनवता येत नाही परंतु एक चांगलं आरोग्य पैशाने कमावलं जाऊ शकतं आणि सोबतच आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात.

यासाठी नियमित व्यायाम करणं, समतोल आहार घेणं आणि भरपूर ६ ते ७ तासाची झोप घेणं गरजेचे आहे. परंतु अलीकडच्या धावपळीच्या दिनचर्येमध्ये हे स्वीकारणं व करणं कठीण होत चाललंय. ज्यामुळे आपण कमी वयात देखील आजारी पडत आहोत आणि मनात असूनदेखील आनंदी राहू शकत नाहीत.

ओळखा आपला आनंद

सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद मिळतो, जसं एखाद्याला चांगलं खाण्याने आनंद मिळतो, कोणाला चांगले कपडे घालण्याने, कोणाला फिरायला जाण्याने, तर कोणाला मंदिरात जाऊन सेवा करण्याने, कोणाला अभ्यास करण्याने, कोणाला कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याने, तर कोणाला संगीत ऐकल्याने, तर कोणाला पैसा कमविण्याने आणि स्वत:चा बँक बॅलन्स वाढवण्याने इत्यादी. आनंदी राहण्यासाठी सर्वात गरजेचं आहे की तुम्ही तुमचा आनंद ओळखा.

साजरे करा छोटे छोटे आनंद

अलीकडची तरुणाई मोठमोठी सुखं आणि आनंदाच्या शोधामध्ये फिरत असते, परंतु छोट्या छोट्या गोष्टींकडे ते लक्ष देत नाहीत. म्हणून आपण इथे बोलूया तोच आनंद जो आपल्या आजूबाजूलाच असतो परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून आपला आनंद ओळखण्याचा प्रयत्न करा.

शेवटी तुम्ही काय केल्याने, कोणत्या लोकांसोबत उठबस केल्याने, बोलल्याने तुम्हाला आनंद मिळतो, फोटोज क्लिक केल्याने, तुमच्या घराच्या बागेची देखभाल करण्याने, वा घर सजविल्याने, जेवण बनवल्याने त्या सर्व गोष्टींची तुम्ही स्वत: अनुभूती घ्या.

अनेकदा आपण सुखाच्यादेखील योजना बनवतो की मी असं करेन वा तसं करेन तेव्हा मला आनंद मिळेल, जसं जर मी पैसे साठवेन, नवीन घर विकत घेईन, नवीन कार घेईन तर मला आनंद मिळेल. परंतु आपण त्या आनंदाबाबत बोलतच नाही वा त्याकडे दुर्लक्ष करतो ज्या आपल्याला विनासायास मिळतात. तुम्ही नोकरदार आहात आणि अचानक तुम्हाला सुट्टी मिळाली, एखादी हरवलेली वस्तू अचानक सापडली, जुन्या कपड्यांमधून काही पैसे मिळाले, अचानक काही फ्री गिफ्ट मिळाले तर हे खूप आनंद देणारा आहे, ज्याला आपण आपल्या आनंदामध्ये समावेश करू शकत नाही म्हणून हे गरजेचं नाही की आपण आपला आनंद शोधण्यासाठी कुठे जावं. हे तर आपल्या आजूबाजूलाच असतं. फक्त गरज आहे तुम्ही ते वाटण्याची आणि उपभोगण्याची देखील.

समाधानी रहा

आनंदी राहण्यासाठी सर्वात गरजेचं आहे समाधानी राहणं. जर एखादी गोष्ट तुम्हाला मिळूनदेखील तुम्ही समाधानी नसाल तर तुम्ही नेहमी काही ना काही मिळवण्याच्या मागे राहाल आणि तुमचा वेळ असाच गमावून बसाल.

सकारात्मक रहा

आनंदी राहण्यासाठी तुमची विचारसरणी सकारात्मक ठेवा, दुसऱ्यांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. अनेकदा आपण दुसऱ्यांकडून जरा जास्तच अपेक्षा ठेवतो आणि जेव्हा ती पूर्ण होत नाही तेव्हा निराश आणि दु:खी होतो. खरंतर अनेकदा आपली ही निराशा आनंदावर हावी होते आणि आपण मनात असूनदेखील आनंदी राहू शकत नाही, जसं की त्यांनी आपल्या सोबत असं वागायला पाहिजे होतं, चांगलं जेवण बनवायला पाहिजे होतं, चांगलं गिफ्ट द्यायला पाहिजे होतं वगैरे वगैरे.

काही वेळ जिवलगांसोबत घालवा

अलीकडच्या धावपळीच्या दिनचर्येनंतर जेव्हा देखील मोकळा वेळ मिळतो तेव्हा आपण आपला मोबाईल घेऊन बसतो. आपला संपूर्ण वेळ या आभासी दुनियेमध्ये घालवतो, ज्यामुळे आपण पूर्ण जगाशी आणि लोकांशी जुळलेले राहतो परंतु आजूबाजूचं जग आणि जिवलगांपासून दूर राहतो. त्यामुळे कोणा दुसऱ्यासोबत वेळ घालवण्याची आपल्याला खूपच कमी संधी मिळते आणि आपल्याला एकटेपणा वाटतो.

जर आपण मनात आणलं तर हा एकटेपणा दूर करण्यासाठी आपला काही वेळ दुसऱ्यांना भेटणं, चेष्टा मस्करी, गप्पा मारण्यामध्ये घालवू शकतो आणि हा आनंद कायमचा आपल्या आठवणीत ठेवू शकतो.

शेअरिंगची सवय लावा

अलीकडे आपली असो वा तरुण पिढी स्वत:च्या मनातली गोष्ट असो वा एखादी समस्या ते एकमेकांसोबत शेअर करत नाहीत आणि मनातल्या मनात उदास राहतात आणि त्याचं समाधान स्वत: डिजिटल मीडियामध्ये शोधू लागतात. मग खरं खरं समाधान न मिळाल्यास त्रास होत राहतो. या गोष्टींमुळे अनेकदा आपल्याला निराशा वाटू लागते. यापासून वाचण्यासाठी एकमेकांसोबत तुमच्या गोष्टी शेअर करा. कदाचित तुम्हाला तुमच्या समस्येचा उपाय मिळेल, चिंता दूर होईल आणि तुम्हाला आनंद मिळेल.

मिनिमलिस्टिक लाईफस्टाईलचा स्वीकारा

मिनिमलिस्टीक लाईफस्टाईलचा अर्थ साधसुधं आयुष्य कोणत्याही चमकधमकी शिवाय कमीत कमी गोष्टींसोबत राहणं आणि खर्च कमी करणं.

या लाइफस्टाइलचा स्विकार करून तुम्हाला समजेल की कोणत्या गोष्टी शिवाय आपण राहू शकत नाही आणि कोणत्या गोष्टींची आपल्याला गरज आहे, कोणत्या गोष्टीची आपल्याला इच्छा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या लाईफस्टाईलपासून शिकायला मिळतं, ते म्हणजे तुमची इच्छा आणि गरजांमध्ये फरक करणं, कारण काही गोष्टी आपण आपल्या गरजेसाठी पूर्ण करतो आणि काही आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करतो.

भावना शब्दात व्यक्त करा

अलीकडे आपण सर्वांनी स्वत:ला डिजिटल स्क्रीन समोर कैद केलं आहे. आपापसात भेटणं बंद केलं आहे. आपापसात गप्पा मारण्याऐवजी आपण मेसेज, व्हाट्सअप आणि फेसबुकचा आधार घेत आहोत. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दान ऐवजी इमोजी आणि शॉर्टमध्ये शब्दांचा वापर करत आहोत.

त्यामुळे प्रयत्न करा की रात्रीचे जेवण एकत्रित एका टेबलवर बसून खा म्हणजे एकमेकांशी संवाद साधता येईल, तुमच्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करू शकाल तसंच तुमच्या मनातील गोष्टी एकमेकांसोबत शेअर कराल, जर कोणाला एखादी समस्या असेल तर ती सोडविण्यात एकमेकांना मदत कराल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...