* सोमा घोष
स्त्रियांना स्वत:च्या आरोग्याबाबत अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो जे त्यांना पुरुषांच्या तुलनेमध्ये काही स्थिती आणि आजार विकसित होण्याच्या हायरिस्कमध्ये टाकतं. म्हणूनच स्त्रियांनी आरोग्याला प्राथमिकता देणं खूपच गरजेचं आहे. यापैकी एक ओवेरियन कॅन्सर आहे, जो सुरुवातीपासून ओळखल्यास रोगाचे निदान आणि यशस्वी उपचाराची शक्यता असते.
केरळच्या कार्किनोस हेल्थकेअरच्या स्त्रीरोग ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अवस्थी नाथ सांगतात की स्त्रीरोग संबंधी कॅन्सरशी पिडीत स्त्रियांमध्ये ओवेरियन कॅन्सर मृत्यूचं सर्वात प्रमुख कारण असतं आणि हे स्त्रियांमध्ये अनेकदा मृत्यूचं पाचवं सर्वात मोठं कारण आहे. भारतात ओवेरियन कॅन्सरचे रुग्ण २०२० मध्ये ४३,८८६ मिळाले, ज्यामुळे २०२५ मध्ये ४९,६४४ होण्याची शक्यता आहे अशावेळी हे महत्त्वाचं आहे की ओवेरियन कॅन्सर लवकरात लवकर ओळखला जावा.
कारण काय आहे
डॉक्टर अवस्थी सांगतात की ओवेरियन कॅन्सर स्त्रियांच्या अंडाशयामध्ये उत्पन्न होतो. ओवरीज, अंडी आणि हार्मोनच्या उत्पादनासाठी जबाबदार असतात. अंडाशयाच्या वेगवेगळया भागांमध्ये कॅन्सर कोशिका विकसित होतात, ज्यामध्ये सर्वात सर्वसाधारण प्रकार एपीथेलीयल ओवेरियन कॅन्सर आहे, जो अंडाशयाच्या बाहेरच्या थरावरती बनतो.
खरंतर ओवेरियन कॅन्सरचं खरं कारण आतापर्यंत पूर्णपणे समजू शकलं नाहीये. असं मानलं जातं की हा अनुवंशिक आणि पर्यावरणीय कारकांचा एक एकत्रित परिणाम आहे. काही ज्ञात रिस्क फॅक्टर्समध्ये ५० वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या स्त्रियांमध्ये याचा समावेश होतो. खासकरून मोनोपॉज नंतर.
ओवरी वा स्तन कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री, अनुवंशिक परिवर्तन, मोनोपोजनंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपीचा दीर्घकाळपर्यंत वापर आणि अशा स्त्रिया ज्या कधी गर्भवती झाल्या नाहीत वा ज्यांना गर्भावती होण्यामध्ये त्रास आहे इत्यादीचा समावेश आहे. जीवनशैलीमध्ये परिवर्तन जसं की धूम्रपान, लठ्ठपणा, आहार आणि पर्यावरणीय एजंट जसं की कीटकनाशकांच्या संपर्कात आल्यामुळे देखील ओवेरियन कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
लक्षणं
पोटात सूज, जेवण करतेवेळी पोट लवकर भरल्याची जाणीव होणं, वजन घटणं, पेल्विक एरियामध्ये बैचेनी, थकवा, पाठदुखी, बद्धकोष्ठता, वारंवार लघवी येणं इत्यादी.
डायग्नोसिस
ओवेरियन कॅन्सरच्या डायग्नोसिसच्या प्रक्रियेमध्ये शारीरिक परीक्षण एक कॉम्बिनेशनप्रमाणे होतं. इमॅजिन परीक्षण उदाहरणार्थ, अल्ट्रासाउंड या सिटी स्कॅन आणि रक्त तपासणी यांचा देखील समावेश असतो. या व्यतिरिक्त ट्यूमर मार्कर (एक तपासणी जी टिश्यू, रक्त, मूत्र वा शरीराच्या इतर तरल पदार्थांमध्ये ट्यूमर मार्कर नामक पदार्थांच्या प्रमाणाला मोजते ) होतात, जे उपचारांमध्ये मदत करण्यासोबतच कॅन्सरची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी देखील डायग्नोसिस करतात.
जर ही तपासणी ओवेरिंग कॅन्सरचा संकेत देत असेल तर सिटी स्कॅनमध्ये आजाराच्या आधारावर एक सर्जरी वा बायोप्सी केली जाते. एकदा डायग्नोसिस झाल्यानंतर कॅन्सरच्या स्टेजिंग केलं जातं.
उपचार
डॉक्टर अवस्थी सांगतात की ओवेरियन कॅन्सरचा उपचार कॅन्सरचे स्टेज आणि प्रकारच्या सोबतच रुग्णाचं पूर्ण आरोग्य या कंडिशनवर अवलंबून असतं. प्राथमिक उपचारांमध्ये सर्जरी, किमोथेरेपी आणि टारगेटेड थेरेपीचा समावेश असतो. सर्जरी अनेकदा पहिलं पाऊल असतं, ज्याचं लक्ष जेवढं शक्य होईल तेवढं कॅन्सरच्या रुग्णाचा कॅन्सर शरीरापासून दूर करणं असतं.
हे खरं आहे की या उपचारांचे शारीरिक आणि भावनात्मक साइड इफेक्ट होऊ शकतात, ज्यामध्ये केस गळती, थकवा आणि प्रजनन संबंधी समस्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, उपचाराची कॉस्ट अनेक कुटुंबीयांसाठी महत्त्वाचं आर्थिक ओझ होऊ शकते. ज्यामध्ये त्यांना योग्य देखभाल मिळणं कठीण होऊ शकतं. यातून जाणाऱ्या स्त्रियांना हेल्थकेअर देणारे आणि त्यांचे प्रियजन दोघांकडून सहकार्य मिळणं खूपच गरजेचं असतं.
अर्ली डिटेक्शन आहे गरजेचं
डॉक्टर अवस्थी सांगतात की ओवेरियन कॅन्सरच्या अर्ली डिटेक्शनच्या महत्वांना इग्नोर करता कामा नये कारण जेवढं शक्य होईल तेवढं याचा आजार समजेल तेवढाच तो लवकर बरा करणे सहजसोपं होईल. दु:खाची गोष्ट ही आहे की ओवेरियन कॅन्सर लास्ट स्टेजमध्ये डायग्नोसिस होतो.
हा याच्या लक्षणांच्या कारणांमुळे होतो जसं की पोट फुगणं, लवकर भरलेलं जाणीव होणं, पोट आणि पेल्वीसमध्ये वेदना आणि वारंवार लघवी येण्याची समस्या ज्याला अनेकदा इरिटेबल बाऊल सिंड्रोम, युरिन इन्फेक्शन इत्यादी समजून दुर्लक्ष केलं जातं, ज्यामुळे वेळेतच शोध लागणं शक्य होत नाही.





