* जोगेश्वरी सुधीर

नीताचं लग्न जेव्हा झालं तेव्हा तिचा दिर रवी बारावीत शिकत होता. नीता सुंदर आणि आकर्षक होती, लाजाळू रवीला वहिनीचीसोबत आवडू लागली. नातं मस्तीचं होतं त्यामुळे चेष्टा मस्करी चालायची. दोघे लवकरच मोकळेपणाने मोबाईलवर मेसेज एक्सचेंज व फॉरवर्ड करू लागले.

वहिनी सुखात होती, रवीचे भाऊ मोठया पदावर नोकरीमध्ये होते आणि उदार स्वभाव होता. रविदेखील वहिनीकडे आकर्षित होत चालला होता. यादरम्यान रवीच्या आईचे निधन झालं, तेव्हा रवी पूर्णपणे त्याच्या वहिनीवरतीच अवलंबून राहू लागला.

आता तो त्याचं शहर सोडून वहिनीजवळच राहू लागला आणि आई राहिली नाही, भाऊ उदास राहू लागला, वहिनी स्वच्छंद होत गेली. दिर कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता, त्यामुळे वहिनीशी प्रत्येक प्रकारच्या गोष्टी होत होत्या. रवीच्या मोबाईलमध्ये अनेक व्हिडिओ सेक्स आणि पॉर्नचे होते तेदेखील वहिनी गुपचूप पाहत असे.

सीमा विसरणं

ही जवळीक मर्यादा तोडू लागली. खरं तर काहीच रोखठोक नव्हती, त्यामुळे  वहिनी दिराने एकमेकांशी बोलणं केलं. रवीने चांगल्या मार्कांनी ग्रॅज्युएशन केलं. तो मेहनती होता, त्यामुळे त्याला नोकरीदेखील मिळाली. परंतु वहिनीच्या शहरात येणं जाणं चालूच होतं. जेव्हादेखील ते भेटायचे तेव्हा भरपूर गप्पा मारायचे. तिथपर्यंत ठीक होतं कारण दिरवहिनीच्या जवळकिच्या नात्यांना रोखणारं कोणीच नव्हतं. त्यामुळे ते आपले सीमा विसरून गेलेत.

खरंतर त्यांच्यामध्ये कोणीच आलं नाही तेव्हा त्यांना हे वाटू लागलं की ते जे काही करत आहेत ते चांगलं करत आहेत. बोल्ड झालेल्या मोकळया नात्यांवरती जेव्हा प्रश्न निर्माण झाले तेव्हा रवीचं लग्न झालं. २-३ वर्ष तर रवी त्याच्या पत्नीसोबत आनंदी होता, परंतु चंचल स्वभावाचा रवी कुठपर्यंत पत्नीसोबत आनंदीत राहणार.

वहिनीशी सेक्ससंबंध तरीदेखील चालूच होते. तो वहिनीला प्रत्येक गोष्ट विचारायचा आणि तीदेखील त्याला सांगायची की कसं काम करायचं आहे. हे सर्व रवीच्या पत्नीला अजिबात आवडत नव्हतं. परंतु याची पर्वा ना रवीला होती ना नीताला.

दिराशी जवळीक

नीताचे पती वयस्कर होते, ती तरुण होती. पती गंभीर होते, ती चंचल होती. पती तेवढे हँडसम नव्हते. ती जास्त सुंदर व चंचल होती. रवीदेखील सुंदर, हँडसम तरुण दीर होता. आपल्या सुंदर वहिनीची तो काळजी घ्यायचा आणि तिच्याशी नातंदेखील ठेवत होता. यामुळे किती आयुष्य उध्वस्त होत होती. त्या दोघांना याची काळजी नव्हती. सुंदर वहिनीचा प्रियकर आपल्या भावाला फसवत होता आणि आपल्या पत्नीशीदेखील प्रामाणिक नव्हता.

काही वर्षांत तर नीता वहिणी एक तरुण मुलीची आईदेखील बनली होती. परंतु तिला त्याची पर्वा नव्हती  कारण तिला वाटत होतं की ती श्रीमंत आहे, पती हातात आहे, तर दिराला ती साईड बिजनेस समजत होती. मुलगी बरंच काही पाहत होती.

वैवाहिक आयुष्यात साईड संबंध खतरनाक

विवाहिता आता काय लिविंग रिलेशनमध्येदेखील असे साईड बिझनेस खतरनाक परिणाम दाखवत आहे. खरंतर निताने आपल्या दिराला तेव्हाच अडवलं असतं आणि स्वत:च्या घरावर लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. जावेला जळविण्यासाठी तिने तिच्या शरीराचा वापर केला.

रवीची पत्नी सुधा सुंदर होती, परंतु पती जेव्हा पूर्णपणे वहिनीच्या मुठीत होता तेव्हा ती तडफडत होती. पूर्णपणे चिडचिड करत होती. रवी तिला कायम टोमणे मारायचा, चिडवायचा आणि ऑफिसमध्येदेखील वहिनीशी प्रत्येक तासाला फोन करायचा. अनेकदा व्हिडिओ चॅट करायचा.

ती तिच्या दिराच्या वैवाहिक आयुष्यात कायम लक्ष घालायची. यामुळे सुधा आणि रवीमध्ये वाद वाढू लागले. सुधा आपल्या मुलांना शिकविण्यात व्यस्त रहायची. परंतु मन तिचं पूर्णपणे खिन्न असायचं. पतीचं वहिनीमध्ये रमणं तिला खूप वाईट वाटत होतं.

ती मुलांना शिकवायची, घरातील कामे करायची, उदास गाणी गायची, परंतु तिचा पती चिडवून घराची शांती भंग करायचा. त्याला हे समजत नाही की आपल्या घरामध्ये काटे रोवून, आपल्या घराची शांती मिटवून तो आपल्या मुलांच्या आयुष्याशी खेळत आहे.

आता तर ती प्रत्येक वेळी ‘स्वत:चं काहीतरी करून घेईन’ म्हणायची परंतु तिच्या भाऊ-बहिणींचं म्हणणं होतं की तिचा संसार आहे, मुलं आहेत, त्यात रमून जा. वहिणीची जादू जेव्हा संपेल तेव्हा रवी घरात येईल. असं होईल, याची तिला शक्यता नव्हती.

अशा प्रकारे संबंधांवर अंकुश ठेवणं खूपच कठीण होतं आणि दीर वहिनीच्या मोकळेपणाला सर्व सहन करावं लागतं. स्वत:हून सर्व व्यवस्थित होईल हा आता एक गैरसमज राहिली आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...