* रोहित

३८ वर्षीय आबिदा मेरठहून दिल्लीत नवीन आयुष्य आणि बऱ्याच अपेक्षेने आली. ती एक सुशिक्षित आणि आनंदी एकल आई होती. चार वर्षांपूर्वी तिच्या पतीचे कार्यालयातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते, यातूनच दोघांमध्ये वाद होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले.

प्रदीर्घ अशा ३ वर्षे चाललेल्या न्यायालयीन कामकाजात आबिदाची बाजू वरचढ ठरली. यादरम्यान तिने लढण्याचे धैर्यही मिळवले होते. आबिदा तिच्या माहेरी होती आणि प्रदीर्घ न्यायालयीन कामकाजात गुंतली होती. घटस्फोट झाल्यावर तिने ठरवले की, ती आता आई-वडिलांच्या घरीही राहणार नाही. ती स्वाभिमानी होती. त्यामुळे वहिनीच्या नजरेतील तिरस्कार तिला दिसत होता.

आई-वडील आणि सासरच्या मंडळींची बोलणी ऐकून घेण्यापूर्वीच तिने दिल्लीत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान ती नोकरीसाठी अर्जही करत राहिली. घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण होताच तिने स्थायिक होण्यासाठी आई-वडिलांकडून थोडी आर्थिक मदत घेतली आणि दिल्लीतील लक्ष्मी नगर भागात आपल्या मुलासोबत राहायला आली.

तिने काही काळ तिच्या आईलाही सोबत आणले होते, जेणेकरून सर्व व्यवस्थित होईपर्यंत आई रायनची काळजी घेईल. ती शिकलेली असल्याने तिला गुरुग्राममध्ये नोकरी मिळायला वेळ लागला नाही.

आबिदा अनेकदा दिल्लीत आली असली तरी स्वत:हून मोठी जबाबदारी घेऊन इथे येण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. तिच्या ८वीत शिकणाऱ्या मुलाचे शिक्षण ही तिच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. त्याला नवीन आणि चांगल्या शाळेत प्रवेश घेऊन देणे आणि नंतर स्वत:साठी चांगले मित्र-मैत्रिणी शोधणे तिच्यासाठी आवश्यक होते.

आबिदाने मुलाला ईडब्ल्यूएस म्हणजे आर्थिकदृष्टया दुर्बळ घटक असलेल्या कोटयाच्या आधारे केंद्रिय शाळेत प्रवेश घेऊन दिला. नवीन शाळेत गेल्यावर रायनने नवीन मित्र बनवले. त्याच्याच कॉलनीतला ऋषभ त्याचा खास मित्र झाला, जो रायनसोबत ये-जा करत असे. आबिदाची अडचण अशी होती की, ती नोकरी करत असल्याने एक आई आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून तिच्या मुलावर ती बारकाईने लक्ष ठेवू शकत नव्हती. तिला तिच्या मुलाबद्दलची माहिती तिच्या आईकडूनच मिळत होती.

याबद्दल विचार केल्यानंतर यावर उपाय म्हणून रायनच्या शाळेतील मित्रांशी किंवा त्याच्या मित्रांच्या पालकांशी ओळख वाढवायचे तिने ठरवले. याचे दोन फायदे झाले : एक म्हणजे तिचा मित्र परिवार वाढला आणि दुसरे म्हणजे तिला तिच्या मुलाच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्याच्या घराबाहेरील दिनक्रमाबाबत माहिती मिळू लागली.

चांगली गोष्ट म्हणजे तिची ऋषभची आई रिनाशी आधीच तोंडओळख झाली होती. तिला रिना वागण्या – बोलण्यात चांगली वाटली, पण ती रिनासोबत जास्त बोलली नव्हती. आता आबिदाने तिच्याशी बोलायला सुरुवात केल्यावर, रिनाच्या माध्यमातून, रायनचे आणखी बरेच शाळकरी मित्र आणि त्यांचे पालक तिच्या मित्र – मैत्रिणींच्या यादीत जोडले जाऊ लागले.

या माध्यमातून ते मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्या जवळ जात होते, सोबतच शाळेतील उणिवांवर चर्चा करायला आणि वेळ पडल्यास शाळा व्यवस्थापणाकडे तक्रारी पाठवायलाही ते मागेपुढे पाहात नव्हते. अशा प्रकारे ते आपल्या कामासोबतच मुलांची काळजी घेत होते.

असेच घडणे आवश्यक नाही

पालकांची मुलांच्या वर्गमित्रांच्या पालकांशी मैत्री किंवा ओळख होणे, ही मोठी गोष्ट नाही. मुलांना शाळेत सोडताना किंवा घरी आणताना अनेकदा भेट होतेच. दर महिन्याच्या पालक-शिक्षक सभेत अनेकदा ही बैठक मैत्रीपूर्ण होऊ लागते. अनेकदा असेही घडते की, कॉलनीत राहणारी मुले एकाच शाळेत असतात.

दुसरीकडे, इतर पालकांशी मैत्री करण्यासाठी पालकांवर आपल्याच पालकत्वाचा दबाव असतो. असे करणे चुकीचे नाही, कारण जेव्हा जेव्हा तुमचे मूल तुमच्या नजरेच्या टप्प्यातून बाहेर पडते तेव्हा तुम्हाला हे समजले पाहिजे की, ते त्याचा जास्तीत जास्त वेळ कोणासोबत घालवते? त्याचा सर्वात चांगला मित्र कोण? मित्राचा, त्याच्या आई-वडिलांचा स्वभाव कसा आहे?

मुलांची सर्वतोपरी काळजी घेतली जावी, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. त्यासाठी मुलाच्या मित्रांच्या पालकांशी मैत्री करणे, मैत्रीचे वर्तुळ वाढवणे चुकीचे नाही. ती तुमच्या आयुष्यातील जमेची बाब आहे. त्यांच्यासोबत तुम्ही दर्जेदार वेळ घालवू शकता, फिरू शकता आणि त्यांच्याशी संबंधित माहिती घेऊ शकता.

असे असले तरी इतर पालकांशी मैत्री करताना स्वत:चे ‘किंतू, परंतू’ असायलाच हवेत असे मुळीच नाही. अनेक पालक अशा मैत्रीला फारसे महत्त्व देत नाहीत, पण जे महत्त्व देतात त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे, जेणेकरून मैत्री मर्यादेच्या कक्षेत राहून सुरळीत सुरू राहील.

काळजी घेण्याची गरज

वेगवेगळी आवड : तुम्ही ज्यांच्याशी जोडले गेले आहात त्यांच्या आवडी तुमच्यासारख्याच असतील असे नाही. बऱ्याचशा मैत्रीचा शेवट असा होतो की, ‘त्याच्या आणि माझ्या विचारांत काहीच साम्य नव्हते,’ उदाहरणार्थ जर इतर पालकांना चित्रपटांबद्दल बोलायचे असेल आणि तुम्हाला चित्रपटांची आवड नसेल किंवा ते घराच्या सजावटीबद्दल बोलण्यास प्राधान्य देत असतील आणि तुम्हाला त्यात रस नसेल तर तुम्ही गप्पांचा आनंद घेऊ शकणार नाही.

अशा परिस्थितीत कंटाळण्याऐवजी त्यांच्या गप्पांमध्ये रस घेणे किंवा तसा प्रयत्न करणे, हाच उत्तम उपाय आहे. त्यासाठी त्याबद्दल वाचून किंवा जाणून घेऊन त्यात आवड निर्माण करणे चांगले ठरेल.

पालकत्वाबद्दल वेगवेगळी मते : कदाचित तुमचा प्रेमळ पालकत्वावर विश्वास असेल आणि इतर पालक त्यांच्या मुलांना कठोरपणे शिस्त लावत असतील किंवा कदाचित तुम्ही मुलांना मैत्रीपूर्ण वागवत असाल आणि इतर पालकही मुलांची खूप काळजी करणारे असावेत, असे तुम्हाला वाटत असेल. मुळात पालकत्वाच्या शैलीतील हे फरक सामान्य आहेत आणि ‘जगा आणि जगू द्या’ ही शैलीच त्यासाठी सर्वोत्तम आहे.

त्याचप्रमाणे, जर तुम्हाला त्यांच्या आजूबाजूला राहाणे किंवा तुमचे मूल त्यांच्या आजूबाजूला असणे सोयीस्कर वाटत नसेल, जसे की जर एखादे पालक त्यांच्या मुलांना सतत मारत असतील तर त्यांच्यापासून तुम्ही स्वत:ला दूर ठेवू शकता.

मैत्री टिकवण्यासाठी सल्ले

प्रतिष्ठा आणि जात-धर्मावर जाऊ नका : भारतात लग्नादरम्यान जात, धर्म आणि प्रतिष्ठेला प्राधान्य दिले जाते. समाजाच्या कानाकोपऱ्यात हा आजार पसरला आहे, इतका की मैत्री करतानाही हेच पाहिले जाते. आपल्या मुलांनाही मैत्री करण्यापासून रोखले जाते. जरी कोणी भिन्न धर्म किंवा जातीशी मैत्री केली तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्याला कमीपणा दाखवला जातो. असे अजिबात करू नका. समाज बदलत आहे. स्वत:ला बदला. या सर्व जुन्या गोष्टी निरर्थक झाल्या आहेत.

वादग्रस्त विषयांत गुंतू नका : धार्मिक किंवा राजकीय विषयांवर वादविवाद करण्यासाठी तुम्ही कितीही उत्सुक असलात तरी समोरची व्यक्ती तुमच्याशी सहमत असेलच असे नाही. अनेकदा धार्मिक मुद्दयांवरून वेगळया धर्माच्या मित्राशी भांडण झाल्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.

पाठीमागून वाईट बोलू नका : असे होते की मुलांचे पालक जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा तिसऱ्या व्यक्तीबद्दल कुजबुजायला लागतात. त्याच्या पाठीमागून त्याला वाईट बोलतात.

असे स्त्रियांमध्ये अनेकदा दिसून येते. लक्षात ठेवा की, ज्याला तुम्ही काही सांगत आहात तो फक्त एका विशिष्ट काळापुरताच तुमचा मित्र असेल. त्यामुळे असे वागून तुमचीच प्रतिमा खराब होईल. तुमच्या पाठीमागून कोणीतरी तुमच्याबद्दलही बोलत असेलच.

सर्व मिळून फिरायला जा : एखाद्या दिवशी तुम्ही सर्व मुले आणि पालक कुठेतरी सहलीला जाऊ शकता. असे केल्याने मुलांचे नाते तर घट्ट होईलच, पण तुम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल. यासाठी तुम्ही चांगले उद्यान निवडू शकता किंवा संग्रहालय, उपहारगृह, चित्रपट पाहायला जाण्याची योजना आखू शकता, पण लक्षात ठेवा की, फक्त चांगल्याच गप्पा मारा.

मर्यादा निश्चित करा : नवीन मित्रांशी संपर्क साधला जातो, परंतु तो मैत्रीपूर्ण बनणे कठीण होते, अशावेळी, नाते मजबूत करण्यासाठी त्यांना आपल्या वैयक्तिक आयुष्यात डोकावू देणे गरजेचे नाही. मुलांच्या वर्गमित्रांच्या पालकांना घराबाहेर मर्यादित ठेवा. मैत्री घराबाहेर राहिली तर उत्तम, तुमच्या तत्त्वांना चिकटून राहा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...