* नसीम अंसारी कोचर

साधारणपणे पाहिलं जातं की गावातील स्त्रियांच्या तुलनेत शहरातील स्त्रिया जास्त सुंदर आणि कमनीय असतात. त्यांची त्वचा स्वच्छ आणि चमकदार असते. याचं कारण आहे ब्युटी पार्लरची सुविधा आणि कॉस्मेटिक्सचा वापर, जे गावातील स्त्रियांना उपलब्ध नसतात. परंतु शहरी स्त्रियांची शारीरिक ताकद आणि इम्युनिटी गावातील स्त्रियांच्या तुलनेत खूपच कमी असते.

गावातील स्त्रिया शहरी स्त्रियांच्या तुलनेत खूपच कमी आजारी पडतात. मोठा आजार प्रसुती व मासिक समस्येशी जोडलेली असतात. साधारणपणे सर्दी खोकला तर घरगुती औषधं जसं की काढा इत्यादीच्या वापराने ठीक होतो. परंतु शहरातील स्त्रियांना तणाव, ब्लड प्रेशर, दम लागणं, हृदयरोग, अर्थरायटिस, स्किन प्रॉब्लेम, केस गळती, नैराश्यतासारखे अनेक त्रास खूपच कमी वयामध्ये सुरू होतात.

राधिका एक मध्यमवर्गीय कुटुंबाची सून आहे. वय २९ वर्षे आहे. लग्नाला ६ वर्षे झाली आहेत. त्यांना एक ४ वर्षाचा मुलगा आहे, जो आता शाळेत जाऊ लागला आहे. हे एक चांगलं खातं पितं कुटुंब आहे. गरजेच्या सर्व वस्तू घरात आहेत. मोलकरीणदेखील घरी आहे.

गेल्या २ महिन्यापासून राधिकाला जाणीव होऊ लागलीय की पायऱ्या चढतेवेळी तिचा श्वास फुल लागतो, गच्चीवर जातेवेळी धडधड वाढते. त्यामुळे तिने तिचं वजन केलं, जे पूर्वीपेक्षा दहा किलो वाढलं होतं. राधिकाला चिंता सतावू लागली श्वास फुलणं नक्कीच वाढत्या वजनाचं कारण आहे. हे ओळखून ते कसंही कमी करावं लागणार हा विचार करून तिने आधी मोलकरीण काढून टाकली. विचार केला की आता घरातील झाडूपोछा, भांडी ती स्वत:च करेल. यामुळे तिचं वाढलेलं वजन कमी होईल आणि तिचा व्यायामदेखील होईल.

मशीन्सच्या आधारे आयुष्य

राधिकाने सकाळी लवकर उठून झाडूपोछा करायला सुरुवात केली, परंतु हे तिच्यासाठी एवढे सहज सोपं नव्हतं. संपूर्ण घरात झाडू मारण्यातच राधिकाला पंधरा मिनिटाचा वेळ लागला. परंतु या १५ मिनिटात वाकून वाकून तिची कंबर दुखू लागली. मोलकरीण ज्या प्रकारे आरामात बसून पोछा मारत होती तसं राधिका करू शकली नाही. नंतर तिने उभ्या-उभ्याच पायानेच पोछा मारला. अर्ध्या तासाच्या कामानंतर ती दमून बिछान्यावर पडली. त्या दिवशी नाश्ता आणि लंचदेखील तिच्या सासूबाईंनाच करावा लागला.

राधिका हैराण झाली होती की तिच्यापेक्षा दुप्पट वयाची रामवती कशी आरामात पूर्ण घराचा झाडू पोछा, भांडी वगैरे करते. एवढेच नाही तर तिच्या घराबरोबरच दिवसभर ती ८ ते १० घरांमध्ये हे काम करायला जाते. तिने कधीच दुखण्याची तक्रार केली नाही. राधिकाने ५ दिवस कसंबसं काम केलं, मात्र सहाव्या दिवशी रामवतिला पुन्हा कामावरती बोलवलं.

सिमरनचा त्रास

सिमरनचं माहेर पंजाबच्या एका खेडेगावामध्ये आहे. तिचं लग्न कमी वयातच दिल्लीत राहणाऱ्या जसवीर सिंहसोबत झालं होतं. जसवीरच्या घरी येऊन सिमरनला ते सर्व मिळालं ज्याची तिने कल्पनादेखील केली नव्हती. आधुनिक साधनं असणारा फ्लॅट ज्यामध्ये किचनमध्ये कणिक मळण्यापासून ते पोळी बनवण्याच्या उपकरणापासून मिक्सर, ज्यूसर, राईस कुकर, डिश वॉशर, टोस्टर, मायक्रोवेव्ह, अत्याधुनिक गॅस शेगडी सर्वकाही होतं. बाथरूममध्ये गिझर आणि वॉशिंग मशीन होतं. येण्या जाण्यासाठी कार उभी होती.

तर सिमरनच्या माहेरी तिची आई अजूनदेखील लाकडाची चूल पेटवते आणि पाट्यावरती वाटण वाटते. मोठयाशा टबामध्ये घरभरचे कपडे भिजवून हाताने रगडून धुते. पूर्ण घराची स्वच्छता स्वत: करते. भर दुपारी पतीसोबत शेतात शेती करायला जाते, जवळच्या जंगलातून लाकडं आणि आपल्या शेतातून धान्याच्या बोऱ्या स्वत:च्या डोक्यावर ठेवून येते. घराच्या मागे एका मोठया भागात लावलेल्या भाज्यांची देखभाल ती देखील ती करते.

अनेकदा रात्री शेतामध्ये पाणी देण्याची जबाबदारी देखील तिचीच असायची. घराच्या ओखलीमध्ये धान्य टाकून कुटण्याची आणि तांदूळ वेगळे करण्याचं काम ती दररोज करते. घरामध्ये पाळलेल्या गाई-म्हशींना चारा व पाणी देणं, त्यांना धुणं आणि दूध काढण्याचं कामदेखील तिची जबाबदारी आहे. म्हणजेच दिवसभर ती भरपूर शारीरिक श्रम करते. परिणामी तिचं शरीर बलिष्ठ आणि ऊर्जावान आहे. आजार तिच्या आजूबाजूलादेखील फिरत नाही. ५५ वर्षाची असून देखील तिचा जोश २५ वर्षाच्या तरुण मुलीसारखा आहे.

परंतु तिची २५ वर्षाची मुलगी सिमरन तरुणपणीच वृद्धपणाच्या आजाराने घेरलेली आहे. सासरी विविध प्रकारच्या गॅजेट्सने तिला कामसुकार बनवलंय. लग्नाच्या ८ वर्षातच तिला लठ्ठपणा, गुडघेदुखी, हाय ब्लड प्रेशर आणि स्पाँडिलायसिससारख्या आजारांनी घेरलंय. सिमरनचा हा आजार तंत्रज्ञानाची देणगी आहे. ज्याने तिला आणि तिच्यासारख्या अनेक मुलींना शारीरिकरित्या अशक्त आणि कामचुकार बनवलं आहे. सोबतच अनेक रोगांनी ग्रस्तदेखील केलं आहे.

आरामशीर आयुष्याचे साईड इफेक्ट्स

सिमरन माहेरी खूपच कमी जाते. गेली तरी ती २-३ दिवसात परत येते कारण तिथे सर्व कामं स्वत:च्याच हाताने करावी लागतात. आधुनिक मशीनची सवय झालेल्या सिमरनकडून मेहनतीची काम होत नाहीत. माहेरी शौचालयदेखील इंडियन स्टाईलचा आणि घराबाहेर बनलेला आहे, जिथे बालदीत पाणी भरून जावं लागतं, तर सासरी वेस्टर्न स्टाईल कमोड ची सुविधा आहे. त्याची तिला ८ वर्षापासूनच सवय झालीय आणि आता तिला खाली देखील बसता येत नाही. खाली बसल्यानंतर तिचे गुडघे दुखू लागतात. खरं तर, सासरी आरामदायक जीवन आणि आधुनिक उपकरणांनी सिमरनला आजारी, आळशी आणि थुलथुलीत बनवलं आहे.

तंत्रज्ञानाच्या विस्ताराने स्त्रियांच आयुष्य सहज सोपं झालंय, परंतु शारीरिकरित्या कमजोर आणि आजारी जास्त केलंय. मुलं तर कॉलेज, ऑफिस, जिम, खेळ इत्यादीच्या माध्यमातून स्वत:ला शारीरिकरित्या फिट आणि ऊर्जावान ठेवतात, परंतु खास गृहिणींसाठी जे शारीरिक श्रम जसं की धान्य दळणं, पाटयावर मसाला वाटणे, पीठ मळणं, विहिरीतून पाणी आणणं, शेतामध्ये काम करणं पूर्वी करत होत्या आणि त्यामुळे त्या एकदम तंदुरुस्त होत होत्या, आधुनिक उपकरणांनी मेहनतीची कामं काढून घेतली.

परिणामी त्यांच्या शरीराचे मसल्स खूपच कमी वयात सैलसर आणि कमजोर होऊ लागले. साधारणपणे स्त्रियां जिमला जिथे शारीरिक व्यायाम होतो तिथे फार जात नाहीत. शहरी स्त्रिया आधुनिक उपकरणांच्या मदतीने कमी वेळात घरातील काम आटपून दिवसभर टीव्ही सिरीयल्स पाहतात व मोबाईलमध्ये बिझि असतात. व्यायाम न करता आरामशीर आयुष्य त्यांचं आरोग्य खराब करत आहे.

टेक्नॉलॉजीचे गुलाम

टेक्नॉलॉजीने कामाला सुगम नक्कीच केलंय, कामाची वेळ देखील कमी केलीय, परंतु त्याने माणसाचं शरीर मात्र कमजोर केलंय. कम्प्युटर कीबोर्डवर वेगाने बोटं चालविणारी लोकं आता हातात पेन पकडून दोन पानाची चिठ्ठीदेखील व्यवस्थित लिहू शकत नाहीत. कागदावर पेन चालविणारे हात थरथर कापतात. पेनावरती बोटांची पकड व्यवस्थित बसत नाही. बाईक चालविणाऱ्यांना जर काही अंतर पायी वा सायकल चालवून जावं लागलं तर त्यांच्या गुडघ्यांमध्ये वेदना होतात.

तंत्रज्ञानाचे गुलाम बनून आपण मानसिकरित्या कमजोर होत आहोत. वाण्याच्या दुकानावर सामान खरेदी केल्यानंतर आपण मोबाईल फोनवर कॅल्क्युलेटर करून हिशेब करतो तर आपल्यापेक्षा अगोदरच्या पिढीतील लोकं आणि लहानपणापासून आपणदेखील सर्व हिशेब मिनिटांमध्ये डोक्याने जोडत होतो.

नवीन शोधामुळे नक्कीच आपल्याला फायदा झाला आहे. हे तंत्रज्ञान असं झालं आहे ज्याने मानवी जीवन खूपच सहज, सरळ आणि रोचक बनलं आहे. परंतु कोणत्याही तंत्रज्ञानासोबत त्याचा खरा आणि चुकीचा अशा दोन्ही बाजू आहेत. अशावेळी आपण हे ठरवायला हवं की कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर आपण आपल्या आयुष्यात कुठपर्यंत करावा. आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये की तंत्रज्ञानाच्या अत्याधिक उपयोगानेच आज ग्लोबल वॉर्मिंसारखी गंभीर आव्हानं आपल्यासमोर उभी राहिली आहेत, जी मानवी शरीरासाठी, मानवी जीवनासाठी नाही, तर संपूर्ण धरती पर्यावरण आणि जीवजंतूंसाठीदेखील घातक सिद्ध होत आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...