* पारुल भटनागर

सुट्टी म्हणजे विश्रांती आणि खूप मजा, पण कधी कधी आपल्या एका छोटयाशा चुकीमुळे, विश्रांती ऐवजी, सुट्टी आपल्यासाठी तणावाचे कारण बनते.

आता तुम्ही विचार कराल की, हे असे कसे घडू शकते? यामागचे कारण असे की, आपण सुट्टीत फिरायला जायचे ठिकाण आपल्या आवडीनुसार निवडतो. ती जागा मुलांसाठी योग्य आहे का? मुलांना मजा करण्यासाठी तिथे काही आहे का? याचा विचार करत नाही. या सगळयाचा विचार न करता आपण तिथे जातो तेव्हा त्याचा परिणाम असा होतो की, आपण केलेले नियोजन फसते आणि मुले तसेच आपणही तिथे मजा करू शकत नाही. तिथे गेल्यावर आपला वेळ मुलांना सांभाळण्यातच जातो, कारण ती जागा मुलांसाठी अनुकूल नसते. त्यामुळे यावेळी मुलांसोबत सुट्टीचे नियोजन करताना काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या मुलांसोबत या ठिकाणांना भेट देण्याची योजना आखू शकता :

गोवा

तुम्ही थंडीपासून दूर अशी जागा शोधत आहात का, जी सुंदर आहे? जर तुम्हाला थंडीपासून दूर राहायचे असेल तर गोवा हे सर्वात चांगले ठिकाण आहे, जे लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांना आकर्षित करते. समुद्र किनाऱ्यावर लाटांमध्ये खेळण्याचा आनंद लुटण्यासोबतच, तुम्ही मुलांना पाण्यातील खेळ खेळायला लावू शकता. इथे बागा, समुद्र किनारे आहेत जिथे पाण्यातील खेळांचा आनंद घेण्यासोबतच तुम्ही सूर्य स्नानाचाही आनंद घेऊ शकता.

येथे एक स्नो पार्क म्हणजे बर्फाचे उद्यानदेखील आहे, जिथे तुमची मुलं दुप्पट मजा घेऊ शकतात. येथे येऊन तुम्ही राफ्टिंग, स्कुबा डायव्हिंग, बाइकिंग, बनाना राईड, बलून राईड यांसारख्या मजेदार खेळांचा आनंद घेऊ शकता.

लॅन्सडाउन, उत्तराखंड

उत्तराखंड हे निसर्ग सौंदर्यासाठी ओळखले जाते. लॅन्सडाउन हे उत्तराखंडमधील एक लहान शहर आहे. हे ठिकाण हिरवाईने नटलेले असून येथील डोंगरातून वाहणारऱ्या नद्या आणि धबधबे मनाला वेगळीच शांतता देतात. हे ठिकाण विश्रांतीसाठी तसेच मजा करण्यासाठी अतिशय योग्य असून ते ट्रेकिंग प्रेमींना भुरळ घालते.

तुम्ही मुलांसोबत भुल्ला तलावाला भेट देऊ शकता, हे तलाव भलेही लहान असले तरी तुम्ही येथे बोटिंगसह आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता. यासोबतच मुलांना येथील टिप अँड टॉप हायकिंग आवडेल अशीच आहे.

येथे, थंड वाऱ्याचा आनंद घेत, तुम्ही तुमच्या मुलांसोबत मॅगी, सूप, मोमोज, कॉफी इत्यादी रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्य पदार्थांचा आनंद घेऊ शकता. धबधबे आणि संथ वाहणाऱ्या नद्या पार करून तुम्ही मुलांसोबत खूप मजा करू शकता, हे ठिकाण मनाला आनंद देणारे आहे.

जिमकॉर्बेट, उत्तराखंड

हे उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील रामनगरजवळ वसलेले आहे. तिथे जाऊन तुम्ही जिमकोर्बेट नॅशनल पार्क तसेच त्याच्या आजूबाजूच्या नैनिताल हिल स्टेशनचा आनंद घेऊ शकता. म्हणजे २ सुंदर पर्यटनस्थळे एकत्र पाहू शकता, जिथे तुम्ही जिम कोर्बेटमध्ये ओपन जीप किंवा बस सेवेने जाऊ शकता. येथे ५० हून अधिक प्रजातींची झाडे, ५८० प्रजातींचे पक्षी आणि ५०हून अधिक प्रजातींचे प्राणी पाहायला मिळतात.

जेव्हा तुम्ही जीपमधून हे ठिकाण पाहायला जाल, तेव्हा तुम्हाला मैदानं आणि तलावांचे सुंदर दृश्यदेखील पाहायला मिळेल, जे तुम्ही आणि तुमची मुलं कॅमऱ्यात कैद करू शकता आणि या आठवणी कायमस्वरूपी तुमच्यासोबत जतन करुन ठेवू शकता. तुम्ही जिमकॉर्बेटमध्ये कॉर्बेट फॉल, उंटावरची सफर, रिव्हर क्रॉसिंग, कॅपिंग इत्यादींचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणाला भेट दिल्यानंतर तुम्ही नैनितालला जाऊ शकता, जिथे ७ ठिकाणी बोटिंगचा आनंद घेण्यासोबतच तुम्ही मुलांसोबत घोडेस्वारी, ट्रॉली इत्यादींचाही आनंद अनुभवू शकता. ही सहल तुमच्या कायम स्मरणात राहील.

बांधवगड राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश

बांधवगड राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील उमरिया जिल्ह्यात स्थित एक वन्य अभयारण्य आहे. हे उद्यान ४४६ चौरस किलोमीटरवर पसरलेले आहे. येथे वाघांचा वावर मोठया प्रमाणावर आहे. पर्यटक त्यांना सहज पाहू शकतात. या ठिकाणाला भेट द्यायला विसरू नका.

केवळ लहान मुलेच नाही तर प्रौढदेखील या पर्यटनस्थळाचा खूप आनंद घेऊ शकतात, कारण हे ठिकाण खूपच सुंदर आहे, केवळ वाघच नाहीत तर हे ठिकाण अनेक वनस्पती आणि प्राण्यांचे घर आहे, जे मुलांना खूप आवडते. बांधवगडमध्ये येऊन तुम्ही मुलांना वन्यजीव संवर्धनाविषयी समजावून सांगू शकता. इथल्या जीप सफारीची मजा वेगळीच आहे.

या ठिकाणाव्यतिरिक्त, तुम्ही बांधवगड किल्ल्याचे नयनरम्य दृश्य पाहू शकता, तसेच मुलांना बांधवगड राष्ट्रीय उद्यानात हॉट एअर बलून राईड करायला लावू शकता, जी आयुष्यभर स्मरणात राहील, शिवाय तुम्हाला या ठिकाणी पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल. हे ठिकाण मुलांना फिरण्यासाठी खूप वेगळे आणि चांगले मानले जाते.

मनाली, हिमाचल प्रदेश

लहान मुलं असोत किंवा वृद्ध, त्यांना साहसी गोष्टी पाहायला आणि करायला आवडतात. अशावेळी तुम्ही त्यांना अशा ठिकाणी घेऊन गेलात की, जिथे त्यांच्यासाठी कोणतेही उपक्रम नाहीत, तर तुमचे सर्व नियोजन वाया जाईल, शिवाय मुलांना सहलीचा आनंद घेता येणार नाही. त्यामुळेच जर तुम्ही सुट्टीत कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल, तर मनाली हे सर्वोत्तम ठिकाण आहे, कारण येथे पाहण्यासाठी आणि मजा करण्यासाठी अनेक साहसी गोष्टी आहेत, ज्याचा तुम्ही मुलांसह खूप आनंद घेऊ शकता.

येथील सुंदर दऱ्या मनाला शांती देतात, तर आल्हाददायक हवामान मन आणि हृदयाला ताजेतवाने करते. येथे तुम्ही मुलांना स्नो स्कूटर, स्कीइंग, माउंटन बाइकिंग, झिपलाइन, हॉट बलून राईड, पॅराग्लायडिंग आणि राफ्टिंग यांसारख्या साहसांचा आनंद आणि हिमवर्षावही दाखवू शकता, जेव्हा तुमची मुलं कारमध्ये बसून अटल बोगद्यामधून जातील तेव्हा त्यांचे मन आनंदाने भरून जाईल. विश्वास ठेवा, की ते या सहलीचा खूप आनंद घेतील.

जैसलमेर, राजस्थान

जैसलमेरचे सौंदर्य नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. हे सुंदर शहर जयपूरपासून  ५७५ किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण मुलांना खूप आकर्षित करते, कारण येथे विशेषत: हॅझर्ड कॅम्प, जीप आणि उंटाच्या सफारीचा मजेदार अनुभव घेता येतो. हे ठिकाण गोल्डन सिटी म्हणूनही ओळखले जाते. येथील वालुकामय टेकड्या, थरचे वाळवंट या ठिकाणच्या सौंदर्यात भर घालतात.

जर तुम्ही मुलांसोबत येथे येण्याचा विचार करत असाल तर मुलांना जैसलमेर   किल्ल्याच्या सौंदर्याची ओळख करून द्यायला विसरू नका. हा किल्ला सोन्यासारखा चमकतो, कारण तो पिवळया वाळूच्या दगडांनी बांधलेला आहे. त्यामुळे याला सोनार किल्ला असेही म्हणतात. येथे सॅम सँड डुलुनेस हे पाहाण्यासारखे ठिकाण आहे, जे उंट किंवा जीप सफारीने दाखवले जाते, जे मनाला रोमांचित करते. तुम्ही मुलांसोबत गडीसर तलावात बोटिंगचा आनंद घेऊ शकता. यासोबतच तुम्ही येथे पवनचक्की उद्यानदेखील पाहू शकता, ज्यामुळे मुलांना पवनचक्कीचे थेट प्रात्यक्षिक पाहाता येईल आणि त्यामुळे त्यांना या  ठिकाणचा खूप आनंद घेता येईल. येथील मजा घेण्यासाठी हिंवाळा हा उत्तम ऋतू आहे. विश्वास ठेवा, ही सर्व ठिकाणे साहसी खेळ, खाद्यपदार्थ, हवामान आणि मुलांसाठी खूप उत्तम आहेत. चला तर मग, यावेळी या ठिकाणी जाऊन मुलांसोबत सुट्टीचा आनंद घ्या.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...