* गरिमा पंकज

32 वर्षांच्या अन्वेषाने मनालीला एकटीने जायचे ठरवले तेव्हा घरात एकच खळबळ उडाली. तिच्या सासरच्यांनी स्पष्टपणे नकार दिला. अन्वेषा स्वत: थोडी गोंधळली होती. सुमारे १० वर्षांपूर्वी अविवाहित असताना ती एकटी जयपूरला गेली होती आणि तिने सहलीचा पुरेपूर आनंद लुटला होता. त्यानंतर काही दिवसांतच तिचे लग्न झाले आणि नंतर तिला ही संधी कधीच मिळाली नाही, कारण तिला जिथे कुठे जायचे असायचे तिथे पती राहुल सोबत असायचा.

पण, या काळात अन्वेषाला स्वत:वरचा आत्मविश्वास कमी झाल्याचे जाणवू लागले होते. गृहिणी झाल्यासारखे तिला वाटत होते, प्रत्यक्षात लहानपणापासूनच तिने पुढे जाण्याचे स्वप्न पाहिले होते. आता तिचा मुलगा ८ वर्षांचा झाला होता, त्यामुळे ती निश्चिंत झाली होती. गेल्या वर्षीच तिने स्वत:चे करियर करण्याचा विचार केला आणि घरच्यांची परवानगी घेऊन नोकरीत रुजू झाली. यामुळे तिला स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाल्यासारखे वाटले.

आता तिला कार्यालयीन कामासाठी मनालीला जायचे होते. तिने विचार केला की, तिथे गेल्यावर १-२ दिवस फिरून घ्यायचे. राहुल त्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे सोबत येऊ शकत नव्हता, त्यामुळे सासरचे तिला मनालीला एकटीला पाठवायला तयार नव्हते. अन्वेषाने राहुलला फोनवरून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. राहुलला तिला दुखवायचे नव्हते. अन्वेषा खूप हुशार, सुशिक्षित आहे, ती स्वत:ची काळजी सहज घेईल, हे त्याला माहीत होते.

स्वप्नांचा पाठलाग

राहुल घरी येताच त्याच्या आई-वडिलांनी हा विषय काढला. तेव्हा त्याने फेसबुकवर एका नातेवाईकाच्या मुलीचा फोटो त्यांना दाखवला आणि म्हणाला, ‘‘बाबा ही सुरभी, नीलम काकूंची मुलगी, १०-१२ वर्षांची असताना ती आपल्या घरी आली होती, आठवतंय का?’’

‘‘अरे वा, मुलगी एवढी मोठी झाली? आणि कुठे फिरतेय?’’

‘‘आई, ती एकटीच लंडनला गेली आहे. आज तिसरा दिवस. एकटयाने प्रवासाचा आनंद घेताना तिच्या चेहऱ्यावर किती आत्मविश्वास आहे ते बघ. अन्वेषानेही तिच्या आयुष्यात हा थरार अनुभवावा असं तुला वाटत नाही का?’’

‘‘पण बाळा, तो प्रवास सुरक्षित असेल का?’’

‘‘बाबा, तिची अजिबात काळजी करू नका, मी तिचा प्रवास विमा काढेन. तिच्या प्रवासाची आणि राहाण्याची योग्य व्यवस्था कंपनी करेल. आपण तिच्यावर लक्ष ठेवू, शिवाय अन्वेषा खूप धीट आणि हुशार आहे. ती लहान मुलगी नाही, जी स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही, तिलाही तिचे आयुष्य जगायला देऊया. तसेही ती तिच्या पाकिटात मिरचीचा स्प्रे आणि चाकू ठेवते, मग घाबरायचं कशाला?’’

सासू-सासऱ्यांनी राहुलचे म्हणणे समजून घेत परवानगी दिली. पतीच्या पाठिंब्यामुळे आणि स्वत:च्या हिमतीवर अन्वेषा स्वप्नांचा पाठलाग सुरू करत निघायची तयारी करू लागली.

एकल पर्यटनाचे वेड

सध्या मुली आणि महिलांमध्ये सोलो ट्रॅव्हलिंग अर्थात एकटयाने पर्यटनाचे वेड वाढत आहे. असो, पूर्वीच्या मुली कुठेही एकटयाने जाण्यापूर्वी शंभरदा विचार करायच्या, पण आजच्या मुली सुशिक्षित आणि मुक्त विचारांच्या आहेत. मुलांप्रमाणे त्यांनाही एकटयाने प्रवासाचा थरार अनुभवायचा आहे. कुटुंब किंवा मित्रांसोबत बाहेर जाताना अनेक तडजोडी कराव्या लागतात.

पण, एकल पर्यटनाची मजा काही वेगळीच असते. अप्रतिम पायवाटेवर एकटयाने जाण्याने तुमचा आत्मविश्वास तर वाढतोच, शिवाय तुम्ही आयुष्याकडे वेगळया दृष्टिकोनातून बघायला शिकता. त्यामुळेच आता महिलाही मोठया प्रमाणात एकल पर्यटनाला जात असून त्याचा आनंद लुटत आहेत.

केवळ मुलीच नाही तर ५० आणि त्याहून अधिक वयाच्या महिलाही गटात किंवा एकटयाने बाहेर जाण्यास प्राधान्य देऊ लागल्या आहेत. त्या बॅगा भरतात आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे जीवन जगण्याच्या उत्कटतेने निघतात. आधुनिक जगात प्रवास, राहाण्याची आणि जेवणाची सोय सर्वत्र उपलब्ध असते. तुम्ही एकटया प्रवास करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवून, तुम्ही तुमचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायी करू शकता.

एकटयाने पर्यटनाला जाताना या गोष्टी लक्षात ठेवा :

पर्यटन स्थळ काळजीपूर्वक निवडा

पर्यटन स्थळ निवडताना काळजी घ्या. तुमच्या ओळखीचे कोणीतरी तिथे गेले होते म्हणून किंवा छायाचित्रांमध्ये ते ठिकाण चांगले दिसते म्हणून कोणतेही पर्यटन स्थळ निवडू नका. त्याऐवजी आधी त्या जागेचा पूर्ण अभ्यास करा आणि ती जागा तुमच्या आवडीनुसार आणि सोयीनुसार योग्य आहे की नाही, हे समजून घ्या. तिथे जाण्यासाठी कोणता ऋतू चांगला आहे, तिथे जाणे किती सुरक्षित आहे, तिथे राहण्याची काय व्यवस्था आहे, तिथे एकटयाने प्रवास करताना काय सुविधा मिळू शकतात, जवळचे रेल्वे स्टेशन, विमानतळ, रस्ता मार्ग, उपाहारगृह, जेवणाची व्यवस्था, बाजारपेठ, पोलीस स्टेशन, प्रसिद्ध ठिकाणे इत्यादींबाबत महिती घेऊनच निर्णय घ्या.

स्मार्ट वॉलेट गरजेचे

स्मार्ट वॉलेट म्हणजे रोख रक्कम कमी ठेवणे आणि कार्ड जास्त वापरणे. तसे, थोडी रोकडही सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला स्थानिक बाजारपेठेत सहज खरेदी करता येईल किंवा इतर गरजेच्यावेळी पैसे उपयोगी पडतील. हे युग कॅशलेस असले तरी अनेक ठिकाणी जेथे एटीएम सुविधा नाही तिथे फक्त रोकडच मागितली जाते. त्यामुळे तुमच्यासोबत नेहमी काही रक्कम असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही कधीही अडचणीत येणार नाही. तुम्ही परदेशात जात असाल तर तिथले काही चलन सोबत ठेवा आणि तुमच्या मोबाइलवर स्थानिक मोड ऑफ पेमेंट्स डाउनलोड करा.

उपाहारगृह आरक्षित करताना लक्ष द्या

गंतव्य स्थानावर पोहोचून उपाहारगृह, धर्मशाळा किंवा होम स्टेमध्ये राहाणे बजेट तसेच बचतीसाठी सर्वोत्तम ठरते. पण जर तुम्ही उपाहारगृह ऑनलाइन बुकिंग म्हणजेच आरक्षित करण्याचा विचार करत असाल तर ते एखाद्या चांगल्या आणि विश्वासार्ह ट्रॅव्हल साइटवरूनच बुक करणे अधिक योग्य ठरेल. बुकिंग करण्यापूर्वी उपाहारगृह हे अशा ठिकाणी नसावे जिथे वाहतूक मिळणे कठीण जाईल. उपाहारगृहाच्या खोलीचे कुलूप आणि फोन व्यवस्थित काम करत आहे का, तेही तपासा. खोलीत किंवा स्नानगृहात कोणताही छुपा कॅमेरा बसवला नसल्याचे तपासा.

कागदपत्रांसंबंधी खबरदारी

प्रवासादरम्यान मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, तिकीट, उपाहारगृहाचे आरक्षण यासारखी महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवा. व्हिसा, पासपोर्ट, आधार कार्ड इत्यादी सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या किमान ३ छायांकित प्रती सोबत ठेवा. आवश्यक असेल तेव्हाच मूळ कागदपत्रे दाखवा आणि ती तुमच्याकडे पुन्हा सुरक्षित ठेवा. देशाबाहेर जाण्याच्या बाबतीत, निश्चितपणे प्रवास विमा काढा, त्यामुळे तुम्हाला स्वत:साठी तसेच तुमच्या सामानासाठी एक सुरक्षा कवच मिळेल, जे कठीण काळात खूप उपयुक्त ठरेल.

मोबाइल तयार ठेवा

प्रीपेड बॅलन्स आणि लोकेशननुसार डेटासह तुमचे मोबाइल सिम तयार ठेवा, सर्वत्र वायफाय वापरू नका. जिथे वायफाय नसेल तिथे तुमचा मोबाइल डेटा उपयोगी पडेल. त्यासाठी सर्वोत्तम कनेक्टिव्हिटीचे सिम आणि प्लॅन निवडा.

स्थळाची संपूर्ण माहिती घ्या

तुम्ही कुठेही जात असाल, त्या ठिकाणची स्थानिक वाहतूक, भाषा आणि खाद्यपदार्थ यांची संपूर्ण माहिती मिळवा. मदत, बाथरूम, खाद्यपदार्थ, उपाहारगृह, पोलीस स्टेशन इत्यादी किमान महत्त्वाच्या शब्दांना स्थानिक भाषेत काय म्हणतात ते लक्षात ठेवा. तुमच्या खाण्याच्या आवडीनुसार त्या ठिकाणचे पर्याय शोधा.

पर्यटन ठिकाणानुसार आवश्यक गोष्टी सोबत ठेवा

समुद्र किनाऱ्यावर जा किंवा डोंगरावर, प्रत्येक ठिकाणी हवामान, वातावरणानुसार काही गोष्टी सोबत असणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, समुद्रकिनारी तुम्हाला छत्री, पोहण्याचा पोशाख, वॉटर प्रुफ बॅग इत्यादींची आवश्यकता असते तर पर्वतांमध्ये, तुम्हाला बर्फात घालण्यासाठी बूट आणि जॅकेट गरजेचे असते. अशावेळी या वस्तू खरेदी करणे आणि त्यांना आपल्यासोबत घेणे ही नक्कीच चांगली कल्पना नाही.

अतिरिक्त सामान हाताळण्याचा त्रास टाळा. अशा गोष्टी जागेवर भाडयाने मिळू शकतात. त्या कुठे मिळतील याची माहिती नेटवर किंवा स्थानिक उपाहारगृह किंवा दुकानदारांकडून मिळू शकते. जर तुम्हाला स्वच्छतेची काळजी वाटत असेल, तर त्यासाठीची साधने एक दिवस आधी स्वच्छ करा किंवा धुवून सुकवून ठेवा. छोटया छोटया गोष्टी तिथे विकत घेता येतात.

मूलभूत औषधे सोबत ठेवा

प्रवासादरम्यान तुमची प्रकृती बिघडण्याची शक्यता असते. अशावेळी काही औषधे उपयुक्त ठरतात. पोटदुखी, जुलाब, वात, वेदनाशामक, ताप इ.ची औषधे सोबत ठेवा, जेणेकरून आजारी पडल्यास बाजारात धाव घ्यावी लागणार नाही आणि तुमची तब्येतही जास्त बिघडणार नाही.

सावध राहा

कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, विशेषत: कोणाच्या घरी राहाणे, खाणे किंवा कोणाकडून लिफ्ट मागणे यासारख्या बाबतीत जास्त सावध राहा. तुम्ही असे केलात तरी मुलभूत सुरक्षेसाठी मिरचीचा स्प्रे, छोटा चाकू इत्यादी सोबत ठेवा आणि कुठेही जाताना स्थळ आणि नाव इत्यादी तुमच्या कुटुंबाला सांगून जा.

कोणत्याही एकाकी जागी एकटे जाण्याऐवजी गटासोबत राहा आणि तुमचे उपाहारगृह किंवा टॅक्सी, बस इत्यादी ठिकाणी वेळेवर पोहोचा. तुमची फ्लाइट, ट्रेन, बस इत्यादी चुकल्यास घाबरू नका, त्याऐवजी विमानतळ किंवा रेल्वे स्टेशनवर जा. तेथील अधिकाऱ्यांकडून अधिक माहिती घ्या.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...